जय जय निजादिमाता श्रीलक्ष्मी जननें ।
जगदुद्भवस्थिती प्रलया करिं सी सुख सदने ॥
उपनिषदात्मक सागर सारामृत मथने ।
नवनित चिद्धन निज तूं निजजनन सुखकरणें ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय लक्ष्मी वरदे, श्रीलक्ष्मी वरदे ।
भक्तानु ग्रहकारिणि दासानु ग्रहकारिणी ॥
सच्चिद्‌घन सुखदे ॥ धृ. ॥
स्थानत्रय देहत्रय तापत्रय परते।
भोग त्रयाद्यवस्था दिक्‌सर्ग्रा रहित ॥
साक्षी प्रत्येक् सुख तूं निजतुर्ये करते ।
चिन्मय स्वप्रभ सर्वहि दृश्याध्याति रिक्ते ॥ जय. ॥ २ ॥
देवात्मक भूतात्मक दैत्यात्मक कमले ।
वेदात्मक लोकात्मक जगतात्मक विमले ॥
स्थावर जंगम व्यापक सर्वात्मक भरले ।
तवविण विरहित न दिसे अणुभरि जगिं उरले ॥ जय. ॥ ३ ॥
कल्पांबुसम तव पदि शोभत जग कैसे ।
अनिलोद्‌गम बुन्दुदक्तम ते भासतसे ॥
रज्युस्थानी अरोपावृत्त भ्रम दिसतसे ।
भुजंग शुक्त्यांदिकी हे रजता भासतसे ॥ जय. ॥ ४ ॥
विवर्त चित्सागरिं हे जग भासक बुंदे ।
निशिदिनि सर्गाप्य पदिं खेळसि निज छंद ॥
स्वानंदामृति सुखदे सुरनरजगवंदे ।
मौनी नमितपदांबुज जय परमानंदे ॥ जय. ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel