अजुनी अंत माते किती पाहसी ।
जागृत कां गे अजुनी होईनासी ॥ धृ. ॥
आदिमाया मूळ तूं कुळदैवत ।
भक्तालागी धरिसी सगुणत्व ॥
दैत्य वधूनी जाहालिस प्रतापवंत ।
लक्ष्मीनाम म्हणती त्रिजगतांत ॥ अजु. ॥ १ ॥
करवीर क्षेत्रीं वास करूनी मौन्यें ॥
जगत्रयीं होऊनी धन्य धन्य ॥
तुजला ध्याति करिती नामस्मरण ।
त्यांना कैचे मग भवबंधन ॥ अजु. ॥ २ ॥
म्हणवूनी शरण आलों तव पायी ।
ब्रीदावळी जागवी आपुलें ह्रदयी ॥
करूणा करी माऊली लवलाही ।
रामचंद्रा रक्षावे अंबाबाई ॥ अजु. ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel