सुंदरसावळी तुकुबाई संतांची सावली ।
निधनि मळवट ।
मळवट रत्न खचित चोळी श्रवणी तानिवडे
तानिवडे मुक्ता फळते ढाळी सुंदर देखीली ।
भवानी तुळजापूरवाहीनी तनमन ओवाळू ।
ओवाळू मुर्ती आणू द्यावू सुंदर देखीली ॥ धृ. ॥
रुपे सुंदर ।
सुंदर कटी शोभे कर जोडा श्रवणीने पुढे ।
ने पुढे मस्तकी मुकूट भरा आयुद्ये शोभती ।
शोभती तुळजे तुझ्या करा लाजीण मुककमळे ।
मुककमळे लाजवेलींच्या छंदे सुंदर देखीली ॥ १ ॥
दैत्य प्रबळ । प्रबळ म्हैशासुर तो झाला त्यालगी वैश्णवी ।
वैश्णवी अवतार धरियेला त्याते मर्दुनिया ।
मर्दुनिया अवलोका जननी ऎसी अंबीका ।
अंबीका नवरात्न चंडिका सुंदर देखीली ॥ २ ॥
मैख घटशीळा ।
घटशीळा गाई मुखीचे धारा ओल्या दिपमाळा ।
दिपमाळा त्यातही बागही शाही त्यामध्ये देऊळ ।
देऊळ रचियेले मनोहर तेथे नांदतसे ।
नांदतसे तुकूबाई दातारा सुंदर देखीली ॥ ३ ॥
यमुना जल शिखरी ।
जल शिखरी राही तू मुळ स्वामी तेथूनी दाही दिशा ।
दाही दिशा अवलोका जननी तिर्थे कल्लोळ ।
कल्लोळ उत्तम तेथील पाणी स्थाने करोनिया ।
करोनिया मुक्त होतील प्राणी सुंदर देखीली ॥ ४ ॥
दसरा नवचंडी ।
नवचंडी यात्रेस बहू दारी सुरवर मुनिजन ।
मुनिजन अंबा तेथील भेटी उदये म्हणोनिया ।
म्हणोनिया चरणी घालून मिठी सुंदर देखीली ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel