जय जगदंबे सुखकर अंबे आरती करतो हें ।
प्रणवोपासनी द्विदलकमळी ओवाळीन पाहें ॥ धृ. ॥
सद्‌गुरु सदय द्विदळी वसतो स्वयंज्योतिरुपा ।
दर्शन घेतां जीव शिव ऎक्यरुपी पाहा ॥ जय. ॥ १ ॥
पंचप्राण पंचाभूतात्मी पांचा पंचवीस तो सर्वत्रीं ।
तो अधिकारी झाला सहजची तो ॥ जय. ॥ २ ॥
मणिपुरद्विपी सहस्त्रदळी जे श्री महामाया तूं ।
चैतन्य त्रपींकर्ता कारण प्रकृतिपुरुष तू ॥ जय. ॥ ३ ॥
सदाशिवजीवरुपी आत्मा समदृष्टी पाहसी ॥
आनंद असती गुणप्रतापी परमानंदे वससी ॥ जय. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel