जय जय आरती त्रिभुवनमाते ।
तनमन कुर्वंडी तव पदी शांते ॥ धृ. ॥
आवाहन ध्यान निवेदुनि आसन ।
अर्ध्य पाद्यपूजा अर्चन वंदन ॥ जय. ॥ १ ॥
आभारणादी चिरे सुमनधन ।
धूप दीप फल तांबूल अर्पण ॥ जय. ॥ २ ॥
वीणा टाळ मृदंग सुशोभित ।
उजळुनि आरती गाइन ॥ जय. ॥ ३ ॥
मंत्रपुष्पे बहू आणि प्रदक्षिणा ।
दीर्घ दंडवत आत्मनिवेदन ॥ जय. ॥ ४ ॥
शंकरसरस्वती वरदप्रसंगे ।
मोरेश्वर नामीं तन्मय रंगें ॥ जय. ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel