मारुनि कोल्हासुर दैत्य दत्तात्रय गुरु मा ।
माया लावुनिनिश्व भोंदी भजना लावी मा ।
मान भक्तांजवळून घेई गोंधळ घाली मा ।
माया स्त्रियांवर आहे अविनाप्रतिमा ॥ १ ॥
महालक्ष्मी करविर क्षेत्री ज्योतीरूप आहे ।
जवाउणे काशी प्रयागवटिं गंगा आहे ॥ धृ. ॥
हारूनी दु:ख पाप अवघे पुण्यवंत जीव हा ।
हा नायक विश्वरूपी कीर्तने गाती हा ।
हा दीनाचा अन्नदाता अंतरसाक्षी हा ।
हा येऊन भेट देई शांत करी हा ॥ २ ॥
ललित अलंकार पुतळ्याकानी तोंगल ।
ललित माजी राखडी माथी घालून मूदल ।
लहान थोर तुजला ध्याती स्मरणे करितील ।
लमाजी बहू सुंदर दाब चरणि सांखळ्याल ॥ ३ ॥
क्षूद्र न भूतें जवळून येती भये प्रळतीक्षू ।
क्षू आदिशक्तीच्या क्रोधे काळजळे क्षू ।
क्षू रंकाळ्यामधे देऊळ रत्नखचित क्षू ।
क्षू पाण्याचा अंत न लागे कमळें फुलती क्षू ॥ ४ ॥
मी अंबिका देवा वडिल चुंडमूंड मारी मी ।
मी वेदांची माता म्हणवुनि शास्त्रपुराणी मी ।
मी जन्ममरण चुकवी योगियांचे ध्यानी मी ।
मी परशुरामाची स्वामिण अजरामर करि मी ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel