एक दीर्घ उसासा सोडून बाबुराव त्या स्त्रीच्या प्रेताकडे पाहत बराच वेळ उभा होता. त्या अचेतन देहाकडे पाहून त्याच्या पोलिसी हद यालासुद्धा दया आल्याखेरीज राहिली नाही. ती निर्जीव आहे ही भावनाही विसरून, तिची पेटीवर अस्ताव्यस्त पडलेली मान नीट सावरून ठेवावी असा विचार ओझरतेपणीच त्याच्या मनांत येऊन गेला. परंतु खुनाच्या शोधाला लागणाऱ्या गुप्तपोलिसांना त्या वेळच्या स्थितीचा (Situation) कदाचित् पुरावा लागेल म्हणून तिच्या शरीराला हालविण्याचे त्याला धैर्य झाले नाही. आपण हा सर्व प्रकार वरिष्ठांच्या कानी घालून त्यांच्या विचाराप्रमाणे काय ते करावे, असा बेत योजून तो तेथें अधिक वेळ न घालवितां तसाच घराबाहेर पडला. 


पोलिस-इन्स्पेक्टर सर्जेराव यांना गेटावर आपल्या कामाची वर्दी देण्याची वेळ टळून गेली होती,म्हणून ते आसपास कोठे दिसतात की काय हे पाहण्यासाठी बाबुराव इकडे तिकडे पाहत चालला असतां जवळच्याच एका शाडूच्या रस्त्यावरून एक मनुष्य घाईघाईने येत होता. दोघेही आपापल्या विचारांत गढून गेले असल्यामुळे एकमेकांना दिसले नाहीत; अर्थातच तो आडव्या रस्त्यावरून येणारा माणूस बाबुरावाच्या अंगावर आदळला ! रत्नमहालांत घडलेलें खुनासारखें अघोर कृत्य अगदी ताजे डोळ्यांसमोर असल्यामुळे, त्या मनुष्याला अशा घाईत पाहून बाबुरावाला त्याचा संशय आला व त्याने 'कुठं चालला आहेस ?' असा त्याला दरडा वून प्रश्न केला. 


बाबुरावाचे असले धिटाईचे वर्तन पाहून त्या इसमाला अत्यंत नवल वाटले. " कुठं चाललो आहे ? " तो उत्तरादाखल रागाच्या स्वरांत म्हणाला, “मी माझी — ऑटोमोबाइल ' पाहत आहे." 
" काय ? " शब्द न समजून बाबुरावाने प्रश्न केला. 


" ऑटोमोबाइल मोटरगाडी !" तो शेवटच्या दोन शब्दांवर जोर देऊन म्हणाला, “ तुम्हाला इंग्लिश समजत नाहीसं दिसतं. कुणीं लेकानं ती पळवली आहे कुणाला ठाउक ! केव्हांचा शोधतो आहे ! तुम्हांला या बाजूनं एखादी 'रेसर कार' जातांना दिसली का हो ? अल्युमिनियमच्या रंगाची आहे ती.” 


"अस्सं !" आपल्या हातून निसटण्याकरिता हा माणूस काहीं बनवून सांगत आहे असे वाटून बाबुराव म्हणाला, " हे पाहा इन्स्पेक्टरसाहेब येत आहेत; तुम्हांला जे काय विचारायचं ते त्यांना विचारा. परंतु जें कांहीं तुम्ही बोलाल, ते तुम्हांला लागून अगर तुमच्याविरूद्ध धरलं जाईल हे ध्यानात ठेवा."

__ " का हो, तुम्ही दारू तर प्याला नाही ? " आश्चर्य थोडे निळवल्यावर त्याने प्रश्न केला. "माझं नांव कमलाकर महाले. माझी एक मोटर कंपनी आहे. मी हल्लीच मागवलेली अगदी नवीन पद्धतीची ‘रेसिंग' गाडी कुणी चोरानं पळवली असून तिच्या तपासांत मी आहे, समजलं ? तुम्हां पोलिसांत काहीच अर्थ नाहीं ! तुमच्या डोळ्यांदेखत अशा चोऱ्या होतात तरी कशा ? "

___ त्या दोघांमध्ये चाललेली ही बाचाबाची सर्जेरावांनी थोडया अंतरा रूनच ऐकिली असल्यामुळे जवळ येतांच त्यांनी कमलाकराकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले व बाबुरावाला हा काय प्रकार आहे असें अर्थसूचक नज रेने विचारिलें. घडलेली हकीकत त्यांच्या कानावर घालण्याची कमला कराची तयारी होतीच. परंतु बाबुरावाने त्याला अवसार न देतां रत्नमहा लांत पाहिलेल्या खुनाची व रस्त्यावर भेटलेल्या या पहिल्या मनुष्याची सर्व हकीकत त्यांना कळविली. प्रथम सर्जेरावांना बाबुराव हा काही तरी आपली भाकडकथा सांगत असेल असेंच वाटले. परंतु आंत खुनाची बाब आहे हे ऐकताच त्यांना त्यांत अत्यंत महत्त्व वाढू लागले. कमला करालाही बाबुरावाची हकीकत चित्ताकर्षक वाटून तो ती लक्षपूर्वक ऐकत होता. 


" फारच चमत्कारिक आहे !” ती हकीकत संपल्यावर कमलाकर म्हणाला, “काय इन्स्पेक्टरसाहेब, तुमचं काय मत आहे बुवा? माझा तरी असा अंदाज आहे की, ज्यानं तिचा खन केला तोच माझ्या मोटर मधून पळाला असावा."

___“ तसं असणं शक्य नाही." बाबुरावाने म्हटले, "कारण तो वीस पंचवीस मिनटं माझ्याबरोबरच बोलत होता. तुम्ही केव्हांपासून बरं 
आपली मोटर शोधीत आहां ?" 
“ सवाअकरा वाजल्यापासून मी ती धुंडाळीत आहे; पण अद्याप पत्ता लागत नाहीं !" 
“ तर मग ते काम त्याचं खात्रीनं नव्हे. कारण साडेअकरा वाजन जाईपर्यंत तो माझ्याशी बोलतच होता मुळी !" 
सर्जेरावांनी त्या दोघांच्या संभाषणांत अजूनपर्यंत भाग घेतलेला नव्हता. परंतु काही वेळाने विषयाचे थोडेसे रूपांतर करण्यासाठी त्यांनी कमलाकराला त्याचे नांव विचारिलें. 
" माझं नांव महाले." आपल्या नांवचे एक छापील कार्ड खिशां तून काढून त्यांच्या हाती देत कमलाकर म्हणाला, "माझी एक मोटर कंपनी आहे. विलायतेहून नुक्त्याच आणवलेल्या गाड्यांपैकी एक नवीन रेसिंग कार घेऊन मी आज रात्री माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. 


त्याच्या घरांत शिरते वेळी मोटर घराबाहेर रस्त्यावरच ठेवलेली होती. सवाअकरा वाजले म्हणून घरी जाण्याकरतां बाहेर येऊन पाहतों तों तिथं मोटर नव्हती ! तेव्हांपासून मी ती आसपास शोधीत आहे. माझी मोटर गेल्यामुळं मी अडचणीत सांपडलों आहे; पण माझी घाई पाहून त्या बाईचा खून मीच करून पलायन करण्याच्या विचारांत आहे असं यांना वाटत आहे, त्याचंच मला नवल वाटतं.” । 
कमलाकराचे हे भाषण ऐकतांच सर्जेरावांनीं गलांतल्या गालांत हंसून त्याच्याकडे एक तीक्ष्ण नजर टाकली. कमलाकर दिसण्यांत देखणा व तरतरीत असून शरीराने मजबूत होता. त्याच्या चेह-याकडे पाहतांच तो पूर्ण निर्दोष असावा अशी सर्जेरावांची खात्री झाली. तरीही केवळ मनाच्या समजुतीमुळे त्याला हातचे जाऊ देणे त्यांना इष्ट वाटेना. __सर्जेराव म्हणाले, "हं, त्या मोटारीमुळं तुम्हीही एका अर्थी या खट ल्यांत गुंतलांच आहा; तेव्हां तुम्हाला आमच्याबरोबर येणं भाग आहे. तुमची थोडीफार मदत होईल मला." __ " अवश्य ! बाकी माझी मोटर त्या माणसानंच पळवली यांत शंका नाही." ___ "मुळीच नाहीं !" बाबुराव खात्रीच्या स्वराने म्हणाला, “ कारण, तुमची मोटर ज्या वेळी नाहीशी झाली त्या वेळी तो माझ्याशी बोलत होता." 


"पण काय रे, त्या बाईचा खन त्यानंच केला असावा असा तुला संशय येतो का ? " सर्जेरावांनी बाबुरावाला विचारले. 
" तसं खात्रीपूर्वक असं मला काहीच वाटत नाही. त्यानं खून केला असेल असं एकदा मनांत येतं, तर तो खुनी नसेल असंही वाटतं.” 
" ते कसं?" 
" कारण, जर त्यानं खून केला म्हणावं तर तो ज्या वेळी बंगल्यांतून बाहेर पडला त्या वेळी वरच्या मजल्यावर गाणं चालूच होतं. अर्थात् त्या वेळी तिचा खून झाला नव्हता हे खास !' 

" असं होय ?---चल, कुठला बंगला ते दाखव पाहूं लवकर." 


रत्नमहालाच्या फाटकाशी पोचल्यावर सर्जेराव म्हणाले, “ थांबा हं ! आंत शिरण्यापूर्वी मला एकदा बंगल्याचं नांव वाचूं द्या. बाबुराव तुझा कंदील जरा दे पाहूं." 
सर्जेरावांनी बाबुरावाच्या हातून कंदील घेऊन पाटीवरील अक्षरें वाचण्यापूर्वीच कमलाकराने वरील नांवाची अक्षरे वाचली. 'रत्न महाल ! ' "काय ? रत्नमहाल !” कमलाकर थोडा वेळ थांबून म्हणाला, “ हा तर गजाननरावांचा बंगला ! रमाबाईचा तर खून झाला नसेल ना? छे ! नाहीं,- शक्य नाहीं !" 
" कां बरं ? " आश्चर्यचकित होऊन सर्जेरावांनी विचारले. 
" कारण ती सर्व मंडळी चौपाटीवर राहायला गेली आहे म्हणून. फक्त नलिनी मात्र त्यांच्याबरोबर गेलेली नाही." 
" ह्या नलिनी कोण ? " पुन्हा सर्जेरावांकडून प्रश्न आला.

___ " नलिनी ही रमाबाईंची धाकटी बहीण. थोड्या वेळापूर्वी मी 
ज्यांच्या घरी गेलो होतो तिकडेच ती राहायला गेली आहे." 
कमलाकराने दिलेली माहिती सर्जेरावांनी आपल्या मनांत पूर्णपणे बिंबवून ठेविली. 
“काय हो महाले, " आंत येतां क्षणींच सर्जेरावांनी कमलाकराला प्रश्न केला, “ ह्या बंगल्यांतून बाहेर पडलेला माणूस कोण असावा हे तुम्हीं बाबुरावानं त्याच्या दिलेल्या वर्णनावरून सांगू शकाल का ?" ___“ अहं, नाहीं; ” कमलाकाराने उत्तर दिले, " गजाननरावांची व त्यांच्या कुटुंबांतील इतर मंडळीची मला फारशी माहिती नाही व जी कांहीं थोडीबहुत आहे ती शरयूची जीवश्चकंठश्च मैत्रिण नलिनी हिच्यामुळं झाली. ह्या बंगल्यांतही मी हा वेळपर्यंत पायसुद्धा ठेवलेला नाही." 
" शरयू कोण ? " सर्जेरावानी हटकले. 
__“शरयू ही माझी भावि पत्नी.” जरा गोंधळून कमलाकराने उत्तर दिले, “तिचं आडनांव भवाने; ती सध्या आपल्या आईबरोबर दादर इथं राहते." 
बोलत बोलत ते तिघे जिना चढून सफेत दिवाणखान्यांत आले. दिवाणखान्यांत शिरतांच सर्जेराव व कमलाकर हे त्या प्रेताजवळ गेले व बाबुराव दरवाजाजवळच उभा राहिला. तें प्रेत पाहतांच दोघांनाही त्या स्त्रीची कीव आली.

__ “ ह्या रमाबाई आहेत का ? " त्या प्रेताकडे अंगुलिनिर्देश करून थोड्या वेळाने सर्जेरावांनी विचारिलें.

__ " छे !” तिच्या निर्मळ व शांत मद्रेकडे पाहत कमलाकर म्हणाला, " रमाबाई हिच्यापेक्षा अंगानं व आकारानं दुप्पट आहेत; शिवाय ही अगदीच तरुण दिसते आहे."

__ "लग्नही झालेलं दिसतं हिचं!" सर्जेराव तिच्या गळ्यांतील मंगळ सूत्राकडे पाहत म्हणाले.

___ नंतर त्यांनी दिवाणखान्याचे एकदा निरीक्षण करून, बाबुरावाला त्या घरांत कोणी आहे किंवा नाही ते पाहण्याची आज्ञा केली. 
" घरांत कुणीही नसणार; कारण ही सर्व मंडळी समुद्रकाठी राहा यला गेली आहे.” कमलाकर बाबुरावातर्फे उत्तरादाखल म्हणाला. 
काही हरकत नाही. घर राखायला कुणी तरी असेलच की नाही, बाबुराव !” त्याजकडे वळून सर्जेराव म्हणाले, " घराचा कोनान् कोपरी शोधून कुणी मिळतो की नाहीं तें पाहा. कमलाकर, तुम्ही या खुर्चीवर स्वस्थ बसा. मला या जागेची अत्यंत बारकाईनं तपासणी करायची असल्यामुळं मला थोडादेखील त्रास होतां उपयोगी नाही." असें म्हणून सर्जेरावांनी त्या जागेची तपासणी करण्यास सुरवात केली. खिडक्या, त्यांवरील पडदे, जमीन, कोचा, वर असलेल्या गिरया, मयत स्त्रीच्या आसपासची जागा वगैरे सर्व त्यांनी 

सर्व दिवाणखाना तपासून झाल्यावर ते पुन्हा प्रेताजवळ आले व ती जागा सूक्ष्म दृष्टीने पाहूं लागले. खुनावर उजेड पडेल असा खुनी इस माचा मागे राहिलेला एखादा पुरावा सांपडेल अशी त्यांना बळकट आशा होती. परंतु तसे त्यांना काहीएक मिळाले नाही. मयत स्त्रीसमोरील बाजाच्या पेटीवर संगीत सौभद्र नाटकाचे पुस्तक उघडे पडले 
असून पानावर “ किति किति सांगू तुला ” हे पद असलेले त्यांना आढळून आले. " हेच तें पद !” तें पद पाहून सर्जेराव जरा मोठ्या नेच म्हणाले, “ बाबुराव सांगत होता तेंच हैं पद. अरेरे ! गात 
असतांच कुणी तरी हिचा खन केला असावा.'' __ " असे जर असेल तर वावुरावाला भेटलेला मनुष्य निरपराधी असावा. " त्यांच्या पुटपुटण्यास उत्तर म्हणून कमलाकर म्हणाला, “ कारण तो बाहेर आला तेव्हां हेच गाणं चालू होतं." 
" कदाचित तसंही असू शकेल." 
" मग माझी मोटरही त्यानं नेली नसणार. कारण खऱ्या खुनी इसमाशिवाय इतराचं ते कृत्य नाही." __मिस्टर महाले, तुम्ही फारच भराया मारतां बुवा.” सर्जेराव म्हणाले, " पुराव्याशिवाय एखाद्या गोष्टीविषयी ठाम मत बनवणं जरा धोक्याचंच नाही का ? वरं, तुम्ही ज्यांना भेटायला गेला होता तें ठिकाण इथून कितीसं दूर आहे ?" 
" इतकं कांहीं दूर नाही. नं. २० डिलाइल रोड इथं ती मंडळी राहतात.” 


" 'नं. २० डिलाइल रोड ?' ते घर इथून काही फारस लांब नसावं. माटुंगा स्टेशनपासून पांचदहा मिनटांच्या अंतरावर असेल, नाही ?" 
" अंहं, दादरच्या बाजूला आहे तें.” कमलाकराने उत्तर केले. __ "अस्सं !” सर्जेराव ती जागा मनःचक्षंपुढे आणूं लागले. परंतु काही केल्या ती त्यांच्या ध्यानात येईना. शेवटी कंटाळून त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला. 

" काय हो इन्स्पेक्टरसाहेब, मला आपलं नांव कळवाल का ?" थोड्या वेळाने कमलाकराने विचारले, “आपलं ठाउक असलेलं बरं म्हणून विचारतों.” 
" हो हो !-न कळवायला काय झालं ? " उत्तरादाखल सर्जेराव म्हणाले, " माझं नांव सर्जेराव घाटगे; इन्स्पेक्टर घाटगे या नांवानं मला ओळखतात. दादर विभाग माझ्या ताब्यात आहे.” थोडा वेळ थांबून ते पुढे म्हणाले, “ माझ्या अमदानीत या जागी होणारा हा पहिलाच खून !" 
यावर कमलाकर काय बोलतो तें ऐकण्यासाठी सर्जेराव त्याच्याकडे पाहूं लागले. कमलाकर शीळ वाजवीत त्या प्रेताकडेच पाहत होता. त्याच्या मुद्रेवरून त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले असावे असें वाटण्याजोगे होते. “ बाबुरावांशी बोलत राहणाऱ्या मनुष्याचं हे कृत्य नसावं असं माझं मन मला सांगतं वुवा.” कमलाकर काही वेळाने पुटपुटला. 
" त्याचं नव्हे तर कुणाचं ? " सर्जेरावांनी प्रश्न केला. 
" मला वाटतं, त्या माणसानं बाबरावाला आपल्या भाषणानं झुलवीत दूर नेलं व तेवढ्या वेळांत ह्याच घरांत असलेल्या दुसऱ्या मनुष्यानं तिचा खून केला असावा!'' 
" ते या वेळी कांहींच सांगता येणार नाही.” सर्जेराव म्हणाले, " इतर चर्चा करण्यापूर्वी डॉक्टरचं मत आपण आधी घेऊ या. तुम्ही डॉक्टरना घेऊन याल का ? " 
"मला या बाजूची फारशी माहिती नाहीं; शिवाय मी ही संधि साधून पळून न जातां फिरून इथं येईन अशी तुमची खात्री आहे का ?" ___ "तशी माझी पूर्ण खात्री आहे." सर्जेराव म्हणाले, “आपली मोटर मिळावी यासाठी तरी तुम्ही पुन्हा आल्यावांचून राहणार नाही.” 
"ठीक !” कमलाकर हंसत म्हणाला, "डॉक्टरचं घर कुठं आहे ?" 
सर्जेरावांनी आपल्या खिशांतून एक 'व्हिजिटिंग कार्ड' काढून त्याच्या मागील बाजूवर काही लिहिले व तें कार्ड कमलाकराच्या हाती देत ते म्हणाले, “ समोरच्या रस्त्यावरून चारपांच घरं टाकून उजव्या हाताच्या घरांत डॉक्टर करमरकर राहतात त्यांना हे देऊन ताबडतोब इथं बोलावलं आहे म्हणून सांगा." ' सर्जेरावांच्या विनंतीला मान डोलवून कमलाकर आपल्या जागे वरून उठून डॉक्टरना आणण्याकरितां निघाला. 


कमलाकर निघून गेल्यावर सर्जेरावांनी पुनः एकदा आपली नपा सणी सुरू केली. तपासणी करून झाल्यानंतर ते एका खिडकीपाशी आले व रस्त्याकडे पाहत उभे राहिले. परंतु ते तेथे उभे राहतात न राहतात तोच सर्व बंगला धुंडाळून बाबुरावाने त्या दिवाणखान्यांत प्रवेश केला. 


" कोणीच दिसत नाहीं, साहेब ! " आंत पाऊल टाकीत असतां तो उद्गारला, “ घरामध्ये कुणीच नाहीं ! सर्व खिडक्या व दरवाजे पूर्ण बंदोबस्तानं लावून घेतल्याप्रमाणं दिसत आहेत.” _ “ आश्चर्य आहे ! " सर्जेराव स्वतःशीच पुटपुटले. “काय रे बाबु राव,” थोड्या वेळाने त्यांनी प्रश्न केला, “ तो मनुष्य तुझ्याबरोबर बोलत होता तेव्हां गाणं चाल होतं अशी तुझी खात्री आहे का ? तो प्रसंग तुला चांगला आठवतो ना ? ” ___ “ हो तर, साहेब ! त्याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे व त्यामुळंच तो मनुष्य निरपराधी असावा असा माझा अंदाज आहे." 
" पण काय रे ? त्याची मुद्रा बावरल्यासारखी दिसत होती का?" 


" तें कांही मला खात्रीलायक सांगता येणार नाही." बाबुरावाने उत्तर केले, “ पण आपला चेहरा माझ्या नजरेला न पाडण्याची खबर दारी तो घेत असावा असा माझा तर्क आहे. कारण त्यानं आपली हॅट अगदी चेहऱ्यावर आणलेली होती व माझ्यापासून तोंड लपवण्याचा त्यानं पुष्कळ प्रयत्न केला. तसंच ह्या बंगल्यांत आपली बहीन राहत 

भसन आपण तिला वरच्यावर भेटण्यासाठी येत असतो असंही तो सांगत होता.” 
"हंऽ : पण ह्या बंद असलेल्या घरांत तो कसा वर आला असावा ?" 
"त्याच्यापाशी असलेल्या ह्या चावीच्या साह्यान” चावी पुढे करीत बाबुराव म्हणाला. 
सर्जेरावांनी बाबुरावाजवळची ती चावी घेऊन तिचे चांगले निरीक्षण केलें. तिचा आकार, लांबी वगैरे सर्व काही त्यांनी नीट न्याहाळन ठेविलें. “ बाबुराव, " किल्ली पाहत असतां ते म्हणाले, " ही भगदी नवी दिसते आहे, नव्हे ? हिचा उपयोगही फारसा झालेला दिसत नाही.'' 
“ कदाचित् फार उपयोग झाल्यामुळं ती पॉलिश केलेली असावी.'' 
“ शक्य नाहीं !” सर्जेराव खात्रीच्या स्वराने म्हणाले, “ तसे असते तर ह्या कडा गुळगुळीत दिसल्या असत्या. बरं, पण त्या मनुष्यानं 
आपलं नांव तरी तुला कळवलं का ?" बाबुरावाने नकारार्थी मान हालविली. 
" तुम्हांला ह्या खुनाच्या बाबतीत काय वाटतं, साहेब ?" 
" मी थोडीशी सांखळी जुळवली आहे. कारण या प्रकरणाविषयी इतक्यांत ठाम मत बनवणं मूर्खपणाचं होईल. मला वाटतं, या खुनांत दोन माणसांचं अंग असावं. एकानं तुला झुलवत झुलवत दूर नेलं व तेवढया अवधीत दुसऱ्यानं हिचा खन करून इयन पोबारा केला असावा. त्या इसमाबरोबर तं बोलत असतांना तुला एखादी किंकाळी नाहीं का ऐकू आली ?" __ " मुळीच नाही. आम्ही थोडे दूर गेल्यावर गाणं बंद झालं व त्या नंतर आम्ही इतके दूर गेलों की, किंकाळी आम्हांला नेवढ्या दूर ऐकू येणं शक्य नव्हतं." ___ " मग तर मी म्हणतो तसंच असणार." सर्जेराव विचार करून म्हणाले, " तुला दूर नेण्याकरतांच तो इसम बाहेर आला असावा. " 
आणखी एक गर ! ___“ कदाचित् तसंही असू शकेल." बाबुराव म्हणाला, “ तो मनुष्य जेव्हां बाहेर आला तेव्हां मी बागेच्या फाटकापाशी उभा होतो." 
"बरोबर, त्यांनी तुला वरच्या खिडकीतन पाहिलं असावं व तूं जवळ असल्याकारणानं त्यांना आपलं काम सुलभ रीतीनं करतां येण्याजोगं नव्हतं, म्हणून त्यांपैकी एकानं खाली येऊन तुला दूर नेलं व दुसऱ्यानं हे खुनाचं अघोर कर्म पार पाडलं ! तो मनुष्य तुला सोडून गेला तेव्हां किती वाजले होते ?" ___ " त्या वेळी साडेअकरा वाजले होते. तो माझ्यावरोवर जवळ जवळ अर्धा तासपर्यंत बोलत होता." 


" ह्या स्त्रीचा खून करून आपला मार्ग सुधारण्यास त्या दुसचा मनुष्याला एवढा वेळ पुरे होता. पण हे पाहा डॉक्टर आलेच !" सजे. राव रस्त्याकडे पाहत असतांना त्यांची नजर समोरून येत असलेल्या डॉक्टरकडे गेली. त्याबरोबर त्यांनी आपल्या हाताखालच्या आणखी दोन माणसांना बोलावून आणण्याकरितां बाबुरावाला पाठविलें. __ बाबुराव निघून जातांच सर्जेरावांनी पुन्हा एकदा आपल्या तपास णीला सुरवात केली. त्यांनी त्या मयत स्त्रीचा पोशाख पाहून ठेविला. ती का लुगडे नेसलेली असून तिने अंगांत आधुनिक पद्धतीचा पोलका घातलेला होता. हातांतील सोन्याच्या दोन बांगडया व कानां तील कुडी यांशिवाय इतर दागिना तिच्या अंगावर दिसण्यांत येत नव्हता. तिच्या अंगावरील सर्व पोषाख साधा होता. बाजाची पेटी वाजवीत असतां अचानक रीतीने तिचा खून झाला असावा असें दिसून येत होते. तिचे मस्तक बाजाच्या पेटीवर टेकलेले असून दुरून पाहिले असता ती निजलेली असावी असाच भास होत असे ! तिची मुद्रा शांत दिसत होती. 


पेटीच्या पलीकडे असलेल्या खुर्चीवर तिचा शेला पडलेला होता. तो मात्र फार किंमतीचा दिसत होता. ती स्त्री त्या बंगल्यातील माणसांना भेटावयास आली असावी अशी सर्जेरावांची समजूत झालेली होती. परंतु ज्या घरांत नुसती घराची मालकीणच नव्हे तर कुणी राखणदारही नव्हता अशा ठिकाणी ती कां आली असावी याचा उलगडा त्यांना होईना. पहिल्या इसमाने हिला आपल्याजवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडून आंत आणली असेल काय, असाही प्रश्न त्यांच्या मनांत उद्भवला. परंतु त्याच वेळी त्याच्याजवळ त्या घराची चावी यावी कशी, या प्रतिकूल विचाराने त्यांच्या प्रश्नाला हाणून पाडले. अशा रीतीने ते स्वतःच प्रश्नोत्तरे तयार करीत बसले असतां कमलाकर व डॉक्टर करमरकर यांनी त्या दिवाणखान्यांत प्रवेश केला. आंत येतांच त्यांनी प्रेताची तपासणी करण्यास सुरवात केली. त्यांची तपासणी चालली असतां कमलाकराने सर्जेरावांना एकीकडे नेऊन काही नवीन शोध लागला किंवा नाही असा प्रश्न केला. ___“मला वाटतं ती या घरांत कुणाला तरी भेटायला आली असावी.” सर्जेराव खुर्चीवर पडलेल्या तिच्या शेल्याकडे बोट दाख वीत म्हणाले. 
“ अस्संs!" आश्चर्य वाटून कमलाकर म्हणाला, “ घरांत मालक नसतांना त्याच्यामागं ही कां बरं आली असावी ?" 
" पण या घराचे मालक सध्या समुद्रकांठी राहायला गेले आहेत, ही तुमची खात्री आहे ना ?" 
" हो तर ! शरयूला ही गोष्ट तिच्या ज्या मैत्रिणीनं सांगितली ती या बंगल्याच्या मालकाची मेहुणी आहे. रमाबाईंची ती सख्खी बहीण. ती मंडळी तिकडे आणखी एक महिना राहणार आहेत असं कालच त्यांचं तिला पत्र आलं होतं.” 
"चौपाटीपासून हे घर कितीसं दूर आहे ?” सर्जेरावांनी प्रश्न केला.

___“ चौपाटीवरच आहे तें घर. त्या घराचा पुढील भाग समुद्राच्या दिशेला आहे.” कमलाकराने उत्तर दिले. 
"ज्यांच्यापाशी ही बाबुरावांना सांपडलेली किल्ली होती ते कदाचित् गजाननराव तर नसतील ? कारण, त्यांच्याशिवाय इतर पुरुषाकडे तो किल्ली असणं जरा अशक्यच दिसतं." 
“ मला नाही असं वाटत." " बरं; त्यांच्यामागं इथं कोणी राहत होता का ?" 
“ तें कांही मला ठाऊक नाही.” कमलाकराने उत्तर दिले, “ मला कांही यासंबंधी विशेष माहिती नाही. तुम्हाला जरूर असेल ती माहिती तुम्ही नलिनीलाच विचारा. तिनं दिलेल्या माहितीचा तुम्हाला तुमच्या कार्यात थोडाबहुत उपयोग येईल.” 
त्याच वेळी डॉक्टर करमरकर यांचे तपासणीचे काम पुरे झाले व ते आतां काय सांगतात याकडे दोघांचेही लक्ष वेधले.

___ “तिचा प्राण गेल्याला पांच तास होऊन गेले आहेत." डॉक्टरसाहेब म्हणाले. 
“पांच तास !" सर्जेरावांनी विचारले, "पण अकरा वाजतां तर ती होती अन् आतां तर पुरता दीडदेखील वाजला नाही!” 


" तें कांहीं मला माहित नाही," डॉक्टरसाहेब निश्चयाने म्हणाले, " एवढंच मी सांगू शकतों की, हीचा प्राण जाऊन पांच पास झाले आहेत." 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel