मधुकर व नलिनी ते प्रणयी जोड बराच वेळ भीतीने एकमेकांकडे पाहत राहिले होते. गेल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे रामसिंग व दांडेकर मास्तर हे दोघेजण निघून जाते वेळी झालेली मुद्रा नलिनीच्या अकस्मात झालेल्या आगमनामुळे, मधुकरास पुनः पूर्वस्थितीवर ताबडतोब आणतां आली नाही. तो तशाच स्थितीत तिजकडे पाहत राहिला. मागील एका प्रकरणांत लिहिल्याप्रमाणे, सांपडलेल्या रत्नखचित खंजीराच्या आधारा वरून 'मधुकर हाच खनी' असें रमाबाईनी नलिनीच्या मनांत भरवून दिल्यामुळे, तिने केलेले विधान साफ खोटें अशी मनाची खात्री अस तांनाही, केवळ संशयामुळे ती इच्छेविरुद्ध मनाशी झगडत खऱ्या खोटयाचा निर्णय करण्यासाठी या वेळी मधुकराकडे आली होती. __ " या वेळी तूं इकडे येशील अशी माझी कल्पना नव्हती." मधु. कराने बोलण्यास सुरवात केली, " तुझा चेहरा किती तरी काळवंडलेला व चमत्कारिक दिसतो आहे. बरं वाटतंय ना तुला ?” 
"आता इथं कोगी माणसं आली होती वाटतं ?" त्याच्या प्रश्नास उत्तर न देतां तिने प्रश्न केला. ___ "हो" या वेळी त्याने आपले मन तान्यांत आणले होते व त्याचा स्वर शांत होता. “जे दोघेजण आतांच ह्या खोलीतून बाहेर गेले त्यांपैकी एकजण गुप्तपोलिस रामसिंग असून दुसन्याचं नांव दांडेकर-" 

" दांडेकर ? " आपला खालचा ओंठ वरच्या दातांनी घट्ट दाबून नलिनी एकदम ओरडली, " त्याला पाहतांच, हा चेहरा पूर्वी कुठं तरी पाहिला असावा असं मला वाटलं.” ती पुढे म्हणाली, " होय, तोच तो. मी त्याला मावशीच्या घरींच एकदोन वेळ पाहिलं होतं. तो तिच्या वाडीतच असलेल्या एका लहान झोपडयांत राहत असतो. बहतेक दर. दिवशी तो वर्तमानपत्र अगर कांहीं तरी पुस्तक नेण्याच्या निमित्तानं मावशीकडे येतो-किती बाई त्याचा भयंकर चेहरा तो! पाहण्याबरोबर मेला तिटकाराच येतो!" 
तिचा त्या वेळचा आवेश पाहून मधुकराला अत्यंत आश्चर्य वाटले. 


" मलासुद्धा तो माणूस बिलकुल आवडत नाही.” तो म्हणाला, " मी आज त्याला प्रथमच पाहत आहे. अशा त-हेच्या त्या माणसाचं व माझं नातं असावं हे किती तरी विलक्षण, नाहीं ? " __ " नातं ? नलिनी पुन्हा तेच शब्द पुटपुटली, "होय, आतां मला आठवलं खरं. रत्नमहालांत खन झालेली स्त्री आपली मावसबहीण होती असं तो कमळाकरांना एकदा सांगत होता खरा." 
" खरं आहे. तिची आई आणि दांडेकरांची आई ह्या बहिणी बहिणी होत्या." 


" आणि आपण तिचे चलतभाऊ ना?" " होय. माझ्या काकांची ती मुलगी." 


" दांडेकर मास्तरांची मला नेहमी भीति वाटते." थोडा वेळ थांबन नलिनी म्हणाली, " शिवाय तुम्ही त्याच्या सुखाआड येतां आहां.'' 
"कोण, मी? तो कसा ? " मधुकराने विचारले. 


" कसं ते आपल्या ध्यानांत नाही का येत ? मग आमची बायकी बुद्धि बरी म्हणायला हरकत नाही! आपल्या मावसबहिणीचा आप णांस बरेच पैसा देण्याचा बेत आहे, हे त्यानं कमळाकरांना एकदा सांगितल्याचं मला आठवतं; पण त्याच्या अपेक्षेप्रमाणं तिनं त्याला कांहींच न ठेवून त्याची अगदी निराशा केली व त्याऐवजी आपणांस वार्षिक दहा हजारांचं उत्पन्न ठेवलं हे मला मावशीकडून. समजलं, व 

ही गोष्ट स्वतः मास्तरांनीच तिला कळवली होती. दांडेकर मास्तर अत्यंत गरीब असन त्यांची स्थिति हलाखीची आहे, अर्थात् इतक्या गरीब स्थितीतला माणूस अशा त-हेनं आपलं नुकसान मुकाटयानं सोसून घेईल असं तुम्हांला वाटतं का ?" 

" खरंच, माझ्या हे ध्यानांतच नाही आलं ! पण दांडेकरांची मला मुळीच भीति वाटत नाही. " मधुकर म्हणाला. यानंतर काही वेळ नलिनी स्तब्ध होती. नंतर तिने एकदम प्रश्न केला, "माझ्यावर आपलं प्रेम आहे ना?" ___“म्हणजे, हे काय विचारते आहेस? तुझ्याशी केव्हां तरी मी प्रता रणा केली आहे का?" __“ नाही. म्हणूनच मी हे धाडस करीत आहे.” धडधडणाऱ्या हृद याने नलिनीने उत्तर दिले, “हे पाहा काय तें !" असे म्हणून थरथर णाऱ्या आपल्या हाताने आपल्या वस्त्रांत लपविलेला तो रत्नजडित खंजीर बाहेर काढून तिने भीतभीत विचारले, " अगदी खरं सांगायचं, हा आपला आहे का ?" __ " होय. हा माझाच आहे." तिच्या हातीं तो खंजीर पाहून अत्यंत आश्चर्य वाटून तो म्हणाला, " आमच्या नव्या खेळाच्या दुसऱ्या अंकांत मी घेतों तोच हा खंजीर ! मी हा तुला कधी पूर्वी दाखवला नव्हता का ? " 

" हो. पण तो खुनापूर्वी दाखवला होता." नलिनीचे हृदय अधिक धडधडू लागले. 

ती काय बोलत आहे ते मधुकराला न समजल्यामुळे तो आश्चर्य चकित होऊन तिजकडे पाहतच राहिला. 

“ मला सर्व काही सांगू दे," तो पुढे म्हणाला, “ कारण, तुला आज माझ्याविषयी कसला तरी संशय येत असावा, हे तुझ्या असल्या चमत्कारिक भाषणावरून मला वाटत आहे. आज तूं काय बोलत आहेस ते मला तर समजत नाहीच, पण तुलाही ते कळत नसणार. कारण कुणाच्या तरी शिकवणीवरून हे तूं बोलत असावीस. ऐक. मध्ये 

बोलू नकोस. मागं तुला हा खंजीर दाखवल्यानंतर थोड्याच दिवसांनी तो मजपासन हरवला, आणि-" __" हरवला नाही. त्या स्त्रीचा खन करून आमच्या स्वयंपाकघरा तील कोनाडयांत मुद्दाम फेकून दिला.” 

“ नलि-नलि !” मधुकर आपले मस्तक दोन्ही हातांनी घट्ट दाबन निराशायुक्त स्वराने ओरडला. थोड्याच वेळापर्वी असलेला त्याचा शांत व निग्रही चेहरा नलिनीचे वरील शब्द ऐकतांच एकदम फिकट व घाबरट माणसाप्रमाणे दिसू लागला. त्याचे पाय लटलटू लागले. त्याचे लालभडक ओंठ एखाद्या क्षयरोग्याप्रमाणे कळाहीन व रक्तहीन दिसू लागले. तेजःपुंज दिसणारी त्याची शरीरकांति एकदम कोमेजून गेली ! ___ "नली! नको! अशी मजविषयी निष्ठर होऊ नकोस,” बोलतां बोलतां त्याचे डोळे पाण्याने भरून येऊन त्याने आपला चेहरा दोन्ही हातांनी झांकून घेतला. __ “निव्वळ संशय ! प्रत्यक्ष प्रेमाच्या माणसाकडून असे शब्द ऐकण्यापेक्षा अधिक वाईट शब्द ते कोणते !” अडखळून त्याने कसे तरी वाक्य संपविले. 

त्याची अशी स्थिति झालेली पाहून नलिनीला आपल्या निष्ठर वर्तनाबद्दल अतिशय वाईट वाटले. तिच्या डोळ्यांतील दोन कढत अश्रुबिंदु मधुकराच्या पायावर पडले. 

“आपण निरपराधी आहां, खरंच आपण शुद्ध असून खनाचा डाग आपणांस मुळीच लागलेला नाहीं !" नलिनी स्फुदतच मधुकराजवळ आली व त्याच्या पुढयांत जमिनीवर गुडघे टेकून तिने त्याच्या गळ्या सभोंवतीं आपला करपाश घातला व आपले मस्तक त्याच्या छातीवर ठेवून ती स्फुदून रडू लागली. ___“ आपण अगदी निरपराधी आहांत. अशी माझी पूर्ण खात्री होती. "आपण खुनी, या शब्दावर मी कधीच विश्वास ठेवला नाही व ठेवणारही नाही. आपलं मन दुखवलं म्हणून मला क्षमा करायची. नाहीं ना रागवायचं? बोला ना गडे ! क्षमा केली म्हणेतोपर्यंत आपले पाय 

सोडणार नाही.” असे म्हणून नलिनीने खरोखरच त्याचे पाय धरून त्यावर ती अश्रु ढाळू लागली. ___ मधुकराचे मन द्रवले. त्याने तिला ताबडतोब उठवून जवळच अस लेल्या एका खुर्चीवर बसविले, व आपणही तिथल्याच एका खुर्चीवर, बसून तिजकडे पाहत राहिला. 

" आता मला किनई, किती तरी हलकं वाटतं," खुर्चावर बसल्यानंतर काही वेळाने नलिनी उद्गारली. “मला आपल्याजवळ पुष्कळ बोलायचं आहे. आपण निर्दोषी आहां-" ___ " पण अजून तरी तुझी खात्री झाली का?” डोळे मिचकावीन 

मधुकराने विचारले. __ "हिणवू नका गडे असं ! त्याबद्दल माझी अगदी पूर्ण खात्री आहे." तिने निश्चयी स्वरांत उत्तर दिले. “मघांच्या आपल्या उत्तरानं इतरांना जरी काही वाटणार नाही, तरी त्यामुळंच माझ्या अंतःकरणास, माझ्या सदसदविवेकबुद्धीला आपल्या पूर्ण निरपराधीपणाची जाणीव झाली. पण माझा जरी आपल्यावर पूर्ण विश्वास आहे, तरी इतरांचा कस बसणार ? आपल्या नात्याकडे पाहून माझं म्हणणं कुणी खरं मानणार नाही. हा खंजीर---" 

" कुठं मिळाला हा ? " मधुकराने तो खंजीर पाहत विचारले त्याची मुद्रा अद्यापि निस्तेज दिसत होती. 

"आमच्या आचाऱ्याला स्वयंपाकघरांतील वरच्या एका कोनाड्यांत हा मिळाला. त्याला हा मूल्यवान असेल असं वाटल्यामुळं त्यानं हा रमा ताईस दाखवला; पण तिनं तो आपल्या मिनीस खेळण्यासाठी घेतला होता, अशी त्याची खोटीच समजूत घालून त्याला वाटेला लावल्यावर मला बोलावून तो दाखवला व या खुनाच्या बाबतींत आपणच अप राधी आहां असं बोलन दाखवलं. आपला नवा खेळ तिनं पाहिला असल्यामुळं, दुसन्या अंकांत राजाचा खून करते वेळी आपण असला खंजीर बाळगतां हे तिला ठाऊक होतं, म्हणूनच तिला एकदम आपला संशय ला. पण मी तिचा जोरानं निषेध करून असं कधीही शक्यः 

 

नाहीं असं सांगून त्याच पावली इथं आलें.” बोलत असतो नलिनीच्या मुद्रेवर राग, तिरस्कार, आवेश इत्यादि विकारांच्या छटा दिसू लागल्या. तिचा कंठही बराच सद्गदित झाला होता. “आपण आतां मजपासून कांहीं एक लपवून न ठेवतां घडली असेल ती सर्व हकीकत मला सांगि तली पाहिजे; कांहीं एक लपवू नका. खुनाच्या रात्रीपासून मी आपणा पासून मुद्दाम दूर दूर राहत होते हे आपण जाणतांच. असं वागतांना माझ्या मनाला काय यातना होत होत्या त्या माझ्या मलाच माहित ! पण आपणांस या प्रकरणांत कुणी ओढू नये म्हणून-म्हणून होता होईल तो मी आपल्या दृष्टीसमोर येत नसे." __ " होय.” मधुकर तीव्रतेने म्हणाला, “हे मला स्पष्ट दिसत होतं. त्या दिवशी जेव्हा मी तुझ्या घरी तुला भेटायला आलो होतो, तेव्हां तूं मला भेटण्याची टाळाटाळ केलीस, हे माझ्या नजरेतून सुटलं नाही. माझ्या पत्रांचीही तूं उत्तरं पाठवली नाहीस. मला वाटलं तुला माझा संशय-" __ " नाहीं ! केव्हाही नाही.” नलिनी एकदम मध्येच म्हणाली, " आपला संशय येण्यास इतरांना जरी सबळ कारण आहे तरी मला आपला संशय कधीच येणार नाही.” __ मधुकर तिच्याकडे चकित होऊन पाहूं लागला. आपला संशय येण्यास सबळ कारण कोणते ते त्याला समजेना. त्याने कुतूहल दृष्टीने तिजकडे पाहिले. __ " आपण मला रत्नमहालांत भेटण्याविषयी लिहिलं होतं तें 

आपल्या स्मरणांत असेल." नलिनीने म्हटले. __“ मी? केव्हां ?" मधुकराने प्रश्न केला. नलिनीच्या प्रश्नानें तो थिजूनच गेला. __ “२४ जुलईच्या दिवशी रात्री साडेनऊ वाजतां-म्हणजे ज्या दिवशी 

त्या बिचारीचा खून झाला त्या रात्री." __ " असं ! नल," मधुकराने बोलण्यास सुरवात केली. या वेळी त्याच्या शब्दांत पूर्णपणे गांभीर्य व चेहऱ्यावर उद्विग्नता पसरली 

 

होती." नल," तो पुढे म्हणाला, “ मी तर तुला कधीच बोलावलं नव्हतं. उलटं तूंच मला तसं लिहिलं होतंस, तें तूं विसरलीस का ? तूं पाठवलेलं--" ___ "काय ?" आश्चर्यचकित होऊन ती म्हणाली, “ काही तरी भयंकर घोटाळा झाला आहे यात शंका नाही. आम्हां उभयतांना संकटांत लोटण्यासाठी आपल्या भोंवतीं खाचखळगे तयार करण्यात आले आहेत, कशी जाळी पसरलेली आहेत, याची आपल्याला कल्पना नाही. त्या दिवशी रात्री साडेनऊ वाजतां भेटण्याकरता म्हणन आपण मला पाठवलेलं पत्र अद्यापि माझ्या खिशांतच आहे. आपण त्या दिवशी रात्री रत्नमहालांत आला होता, हा आपल्याविरुद्ध जाणारा पुरावा अजिबात नाहींसा व्हावा, यासाठी मी ते पत्र ताबडतोब जाळून टाकलं असतं; पण ते आपणांस दाखवून आपल्यास रत्नमहालाच्या मुख्य दरवाजाची किल्ली कशी मिळाली हे विचारण्यासाठी मी तें तसंच ठेविलं आहे." ___ "कां बरं? ती चावी तूंच नाही का मला पाठवलीस?' तो एक. दम चकित होऊन म्हणाला, "तुला पुरावा हवाच असेल, तर तुझं पत्रही माझ्याजवळ आहे. पण-पण नंतर ती किल्ली कुठं हरवली.” __ " ती त्या दिवशी रात्री पोलिसबरोवर बोलत असतांना तुम्हीच नाहीं का रस्त्यावर टाकली ?" 

मधुकराने नकारार्थी मान हालविली. __ " पण,” तो पुढे म्हणाला, " तो माणूस मीच हे तुला कशावरून 

वाटतं?" 

" त्यांत एवढं कठीण ते काय आहे ? त्या पोलिसानं आपलं व आपल्या पोषाखाचं वर्णन केलं, विशेषतः त्याच्याबरोबर बोलणाऱ्या इसमाला लहानच टोकदार दाढी होती असं जेव्हां सांगितलं,त्याच वेळी ती बहुतेक आपलीच स्वारी असावी हे मी ओळखलं. कारण, आपल्या नव्या खेळाच्या दुसऱ्या अंकांत खुनाच्या वेळी आपण तसलाच घेष नाही का करीत ? आपण ठरवलेल्या वेळी येण्याचा मापल्या हातनः 

 

होईल तेवढा प्रयत्न केलात, पण आपणाला कामामुळं रत्नमहालांत वेळी येतां आलं नाहीं, होय ना? नंतर येण्याच्या धांदलीत आपण आपल्या रंगभमीवरच्या वेशांतच व एकंदर नाटकी स्वरूपांतच रत्न महालांत आलां, हे नंतर मला समजलं. येण्याच्या घाईत तो वेष उतर विण्याची आठवणसुद्धा इकडे झाली नाही, अं?" असे म्हणन नलिनी त्याच्या तोंडाकडे पाहूं लागली. 

" असं जर आहे तर सरलेचा खून माझ्याच हातून झाला , असंही तुला वाटलं पाहिजे. कारण खून झाल्यानंतर तिथून-" 

" नाही, नाहीं !” नलिनी त्याला एकदम थांबवून म्हणाली, " आपण रत्नमहालांत साडेनऊ वाजतां मुळीच आला नव्हता; कारण त्या वेळी मी आपलीच वाट पाहत रत्नमहालाच्या फाटकापाशी उभी होते. आपण पत्रांत लिहिल्याप्रमाणं, मी रत्नमहालांत येतांच, आपण आधीच आंत येऊन बसला असाल ह्या समजुतीनं, आपण मला आंत घ्यावं म्हणून मी किती वेळ तरी 'बेल' वाजवली. पण आंतून कुणींच माझ्या हाकेला उत्तर न दिल्यामुळं, थिएटरांतील कामामळं आपणांस उशीर झाला असावा, असा मी तर्क केला. अर्थात् ज्या अर्थी सरला बाईचा खून नऊ वाजण्यापूर्वी झाला होता, त्या अर्थी आपण पूर्ण निरप राधी आहां हे सिद्ध झालंच, नाही का ?" 

"नल ," मधुकराने बोलण्यास सुरवात केली, "आता मी तुला माझी सर्व हकीकत सांगतो. मग तुला, मी इतके दिवस तटस्थ कां राहिलों होतो ते समजून येईल. प्रथम मी तुझ्या पत्रापासून सुरवात करतो. तुझं मला आलेलं पत्र - 

" पण दुसऱ्या गोष्टींस सुरवात करण्यापूर्वी प्रथम ते पत्र मला दाख वायचं. मला ते एकदा नीट पाहूं द्या. आपण पाठवलेलं पत्र हे पाहा इथं आहे." ती पत्र दाखवून पुढे म्हणाली, "आपली इच्छा असेल तर ते आपण पुन्हा एकदा वाचावं. तोपर्यंत मी बाहेर जाऊन आपलं भाषण कुणी ऐकत आहे की काय ते पाहून येते." 

 

नलिनी टेहेळण्याकरतां बाहेर गेली. ती बाहेर गेल्यावर मधुकराने आपल्या मेजांतून एक ( पत्र्याची पेटी ) बाहेर काढन तीमधून एक पत्र बाहेर काढले, व तें नलिनीने त्याला दिलेल्या पत्राजवळच उघडन ठेवून दिले. आजूबाजूस राहून आपले भाषण कोणीही ऐकत नाही याची खात्री करून जेव्हां नलिनी आंत आली तेव्हां त्याने तिला तिचें पत्र दाखवून म्हटले, ___" हे पत्र मी मुळींच लिहिलेलं नाही." तो खात्रीच्या स्वराने पुढे 

म्हणाला, " कुणी तरी माझ्या अक्षराची हुबेहुब नक्कल करून हे तुला पाठवलं आहे." 

" आणि आपण माझं पत्र में म्हणतां तेंही मी लिहिलं नसून असंच नकली आहे." नलिनी त्या दोन्ही पत्रांकडे पाहत आश्चर्याने म्हणाली, "अहाहा, काय पण अक्षर काढलं आहे !" ती उपहासात्मक स्वरांत पुढे म्हणाली, " तो मेला माझ्यासारखं लिहायचा प्रयत्न करीत होता, पण किती तरी ठिकाणी चुकला आहे. सही मात्र कशी ती हुबेहुब माझ्या सही सारखी केली आहे. पण पत्रांतला शेवटला मजकूर तर अगदीच गचाळ लिहिला आहे. ऊः, नक्कल कांहीं इतकी चांगली साधली नाही.” __ " पण हे शेवटी काय लिहिलं आहे ते पाहिलंस का ? " मधुकर त्या पत्रांतीळ एका ओळीवर बोट ठेवून म्हणाला, “ 'पत्र घाईनं लिहिल्यामुळे अक्षराला हसू नये,' असं त्यानं लिहिल्यामुळं मला या पत्राचा कसलाच संशय आला नाही. कारण तुझं प्रत्येक वेळचं अक्षर नीट व सुरेख असतं; पण या शेवटच्या वाक्यावरून, तूं घाईत असल्यामुळं असं अक्षर काढलं असावंस, असा विचार करून या पत्राच्या खरेखोटेपणाविषयी मी विचारच केला नाही व तसं कारणही नव्हतं; एरव्ही तुझ्या अक्षराचं वळण त्याला बरंच साधलं आहे, यांत संशय नाही." ___ “एँ. मी पत्र नेहमी नीट लिहितें. कितीही गडबडीत असले तरी असं गचाळ कधीही लिहीत नाही. शिवाय असलं घाणेरडं पत्र पाठवा यला मला किती तरी लाज वाटली असती. पत्राचा नोटपेपर मात्र यानं थेट माझ्या नोटपेपरसारखाच घेतला आहे." 

" पण आपल्या पत्राबद्दल संशय घ्यायला मात्र बिलकुल जागा नाही हं." ती किंचित् काल थांबन मधुकराच्या पत्राकडे नजर वळ. वीत म्हणाली, " आपले खेळ ज्या थिएटरांत होतात तिथूनच हे आलेलं असन शिवाय बाहेरील पाकिटावर व आंतील नोटपेपरवरसुद्धा आपलं छापील नांव आहे. मग बाई आपल्या पत्राबद्दल संशय तरी कसा घ्यावा ? हे मला शरयूच्या घरी पोस्टमननं आणून दिलं." __ “ आणि हे तुझं म्हणून मला २४ जुलई रोजी दोन प्रहरी आमच्या घरवाल्यानं आणून दिलं. यांतच रत्नमहालाच्या मुख्य दरवाजाची किल्ली होती.” 

" यांतन ती किल्ली आपणांजवळ आली ? आपण म्हणतां तरी काय ?" अत्यंत आश्चर्यचकित होऊन नलिनीने प्रश्न केला. ___ " प्रथम हे तूं वाचून पाहा, मग तुझी खात्री पटेल." असें म्हणून मधुकरानें तें नलिनीच्या हाती दिले. 

पत्र पुढीलप्रमाणे होते:-- "२४ जुलई 

C/o सरोजिनी आ. भवाने, 

माटुंगा, मुंबई. आपणापाशी मला अत्यंत महत्त्वाच्या व जरूरीच्या अशा कांहीं गोष्टी बोलावयाच्या असल्यामळे मी आपणांस हे पत्र लिहीत आहे. म्हणन आज रात्री साडेनऊ वाजता रत्नमहालांत येऊन मला अवश्य भेटण्याचे करावें. हल्ली रमाताई वगैरे सर्व मंडळी चौपाटीवर राहावयास गेली असल्यामुळे बंगला बाहेरून बंद आहे. यासाठी, तो आपणास उघडन आंत जाता यावे म्हणून सोबत मुख्य दरवाजाची चावी मी भाउजींकड़न घेऊन पाठवीत आहे. मला तिथं येण्यास कदाचित् उशीर होईल. याकरितां किल्ली आपणाजवळ पाठवीत आहे. नरी आल्या शिवाय राहूं नये. विशेष भेटीवर ठेवते. 

पत्र घाईने लिहिल्यामुळे अक्षराला हंसू नये. 

सर्वस्वी आपलीच, 

नलिनी" 

" यापैकी एक अक्षरही मी लिहिलेलं नाही," पत्र वाचन होतांच नलिनी म्हणाली, "तसंच ती चावीसुद्धा मी पाठवलेली नाही. या पत्रांत लिहिल्याप्रमाणं भाउजी आणि रमाताई त्या वेळी चौपाटीवर राहायला गेली होती खरी, पण भाउजींनी रमाताईंच्या धाकामळं ती चावी मज पाशी केव्हाही दिली नसती. आणि ती जोपर्यंत चौपाटीवर होती तों पर्यंत मी रत्नमहालाच्या आसपाससुद्धा फिरले नाही. त्या वेळी मी मावशीकडे राहायला गेले होते हे आपणांस माहीत असेलच.” 

नलिनीला आलेले पत्र काहींसें अशाच प्रकारचे होते. त्यांत " कांहीं जरूरीच्या गोष्टींविषयी बोलावयाचे असल्यामुळे रात्री साडे नऊ वाज ण्याच्या सुमारास रत्नमहालामध्ये अवश्य येऊन भेट; तूं येण्यापूर्वीच मी तेथे जाऊन तूं दरवाजाबाहेरील 'बेल' वाजवितांच तुला आंत घेईन. आजच्या नाटकांतील माझें काम दुसऱ्या एका पात्रावर सोप विल्यामुळे मला जाण्यास कोणतीच हरकत राहणार नाही-'' वगैरे मजकूर लिहिलेला असून खाली मधुकराच्या सहीची हुबेहुब नक्कल केली होती. __ " ही पत्रं लिहिणारा मनुष्य मोठा धूर्त आणि कावेबाज आहे यांत शंका नाही." मधुकर त्या पत्रांकडे पाहत म्हणाला, " त्यानं ही दोन्ही पत्रं तुला व मला संध्याकाळच्या वेळी पाठवली. अर्थात् त्यानंतर तुला व मला रात्रींच्या ठरलेल्या वेळाखेरीज भेटणं शक्यच नव्हतं. हाच त्याचा कावा, व खरं काय ते त्याच वेळी समजायचं. आम्हां उभयतां नाही तोंडघशी पाडण्याच्या विचारांत तो होता. काय घोटाळा आहे, काय नाही, ते काही सांगवत नाही." ___ " पण आपण रत्नमहालांत खरंच आला होतां का?" नलिनीने विचारले. 

"होय, त्या रात्री मी रलमहालांत आलो होतो." मधुकराने उत्तर दिले. “ मॅनेजरची परवानगी घेऊन घरी येतांच मी प्रथम माझं जेवण आटोपलं. पुढील गोधीविषयी मी विचार करीत असतां, मला केव्ह झोप लागली तेंच समजलं नाही. जागा होतांच घड्याळाकडे पाहिलं, 

तो नुक्तेच नऊ वाजून गेले होते. यावरून मला फार वेळ झोप लागली असावी असं वाटतं. नेहमींच्या माझ्या संबईप्रमाणं वास्तविक मी केव्हांच जागा व्हायचा. पण त्याच दिवशी कशी ती झोप लागली. तरीही मला रत्नमहालांत वेळीच हजर राहता आलं असतं, पण कपडे करून मी बाहेर पडतों न पडतों तोंच मॅनेजरकड़न मला अत्यंत निक डीचं बोलावणं आलं. ज्याला तो माझं काम करायला लावणार होता, तोच मनुष्य त्या दिवशी अकस्मात आजारी झाल्यामुळं त्या दिवसाचं माझं काम मलाच केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. नाइलाजानं मला माझं काम करावं लागलं. अर्थात् खेळ खलास होईपर्यंत मला बाहेर पडणं शक्यच नव्हतं. तुझी मूर्ति माझ्या डोळ्यांसमोर असल्यामुळे त्या दिवशी माझ्या हातन माझं नेहमीचं कामसुद्धा उठावदार झालं नाही. तुला भेटण्याची मला इतकी उत्कंठा लागली होती की खेळ आटोपतांच, रंगभूमीवरील पोषाकसुद्धा न उतरतां मी तसाच गाडी करून पंधरा. वीस मिनिटांत रत्नमहालांत येऊन थडकलो. तूं कदाचित् भेटणार नाहींस, असं मला वाटत होतं, पण आशा ही वेडी आहे." 

"अग बाई ! आपण रत्नमहालापर्यंत गाडी आणली होती ?' नलि. नीने प्रश्न केला. __ " नाही. तुझ्या हितासाठी आपली भेट गुप्त राखावी असं मला वाटल्यामुळे दहाबारा घरं अलीकडे गाडीवाल्याला सोडून मी रत्नमहा लांत पायींच आलो. त्या वेळी आसपास कोणीही चिटपाखरूं नव्हतं. मी तसाच बागेत शिरलों; पण तूं काही मला तिथं दिसली नाहीस. नंतर मी बाहेर वेळ न घालवितां मजजवळ असलेल्या चावीचा उपयोग करून बंगल्यांत शिरलो. बरीच रात्र होऊन गेली असल्यामुळं तूं येऊन गेली असावीस अशी माझी पूर्ण खात्री झाली होती. पण कदाचित तूं एखादं पत्र अगर निरोप आंत लिहून ठेविला असल्यास तो पाहावा, या हेतूनं मी बंगल्यात शिरलो. शिवाय मी बागेत शिरलों त्या वेळी दुसऱ्या मजल्यावर दिव्यांचा चांगला चकचकाट होता. त्यामुळं तूं कदाचित् वरही असशील असाही दुसरा विचार माझ्या मनांत आला. 

 

तुला बराच वेळ तिष्ठत ठेवल्यामुळं मला वाईटही वाटलं. म्हणून मी खाली अधिक वेळ न दवडतां जिथं ते दिवे पेटलेले होते त्या सफेत दिवाणखान्यांत एकदम शिरलो. पण आंत कुणीच नव्हतं. दिवाण खान्यांतील एका कोपऱ्यांत मात्र उघडलेल्या बाजाच्या पेटीवर झोंपल्या. प्रमाणं डोके टेकून खुर्चीवर बसलेली एक स्त्री मला दिसली. ती जिवंतच आहे असं मला प्रथम वाटलं; पण जवळ जाऊन पाहतो तों ती मृत स्थितीत होती. एवढंच नव्हे, तर ती माझी चुलत बहीण सरला आहे असं मला आढळून आलं. तिचा प्राण गेला असून तिच्या गळ्याच्या मागील बाजूनं वाहत असलेला रक्तप्रवाह सुकून गेलेला होता. हा देखावा पाहतांच माझ्या डोळ्यांसमोर अंधेरी येऊन, मी मट कन शक्तिपात झाल्याप्रमाणं खालींच बसलो. माझ्या लाडक्या बहि णीची-माझ्या सरलेची अशी दुर्दशा झालेली पाहतांच मला एकदम दुःखाचा उमाळा आला. खरोखर त्या वेळच्या माझ्या स्थितीचं वर्णन करायला एखादा कादंबरीकारही असमर्थ होईल. मी तिच्या शांत दिस णाऱ्या चेहऱ्याकडे किती तरी वेळ शून्य दृष्टीनं पाहत होतो. त्याच वेळी पोलिसास बोलावून आणून तिचा बळी घेणा-या दुष्टाचा मागमूस लावावा असं माझ्या मनांत आलं होतं. पण असं केल्यास ते कदा चित् मजवरच उलटायचे इतकंच नव्हे, तर तुझ्यावरही संशय घ्यायला पुरावा आहे असा विचार करून भीतीनं मी तो बेत रद्द केला. 

"फार वेळ त्या जागी राहणं मला शक्य नव्हतं.आधी तिकडून काढता पाय घ्यावा, मग पुढचा विचार, याच विचारांत मी होतो. कारण या गोष्टीचा सुगावा लागतांच पोलिसखातं अपराधी म्हणून मलाच जबाबदार धरल्याशिवाय राहतं ना. शिवाय नात्यानं मी तिचा चुलतभाऊ असून रत्नमहालाची मुख्य चावी माझ्यापाशी होती, हे माझ्याविरुद्ध असणारे भक्कम पुरावे पोलिसांना आयतेच मिळाले असते. प्रेतवत् पडलेल्या माझ्या सरलेला सोडन जातांना माझं मन द्विधा झालं. तिला त्या स्थितीत टाकून मला तेथून जाववेना. पण परिणामाकडे लक्ष देऊन, मन घट्ट करून, मला तिथून शक्य तितक्या लवकर निघणं भागच होतं. 

शेवटी मनाचा हिय्या करून मी खाली बागेत आलो. बरोबर त्याच वेळी तो पोलिस बागेत डोकावून पाहत होता. त्याच्याचबरोबर बोलत बोलत वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्याप्रमाणं मी तिथून निसटलो. मात्र त्याच्या बरोबर बोलत बोलत जात असतां, माझ्याजवळ असलेली रत्नमहा. लाची चावी मात्र कुठं हरवली. मी माझ्या नाटकी वेषानं तिकडे गेलों होतो, हे एका अर्थी ठीकच झालं म्हटलं पाहिजे. कारण त्याचमुळं मला अद्याप कुणीही ओळखू शकला नाही, व पोलिसबरोबर बोलणारा इसम मीच, हेही कुणाच्याही ध्यानी येण्यासारखं नाही." 

बोलता बोलतां मधुकराच्या सर्वांगास दरदरून घाम सुटला आणि त्याचे डोळे आरक्त झाले. बोलण्याच्या आवेशाच्या भरांत तो त्या 

खोलीत येरझारा घालू लागला. 

"हे कृत्य कोणी केलं असावं अशी तुमची समजूत आहे ?" नलिनीने विचारले. 

" नाहीं," मधुकर थोडा वेळ विचार करून म्हणाला, " मी कुणाचा कसा बरं संशय घेऊ ? सरला जरी माझी बहीण होती, तरी तिचा संबंध येणा-या इतर माणसांची मला फारच थोडी माहिती आहे. मी जेव्हां जेव्हां म्हणन तिला भेटण्यासाठी जात असे त्या त्या वेळी फक्त आमच्या अशाच मौजेच्या गप्पा चालत असत. पण ज्या अर्थी तिनं आपली सर्व मिळकत मलाच दिली आहे, त्या अर्थी तिचा बळी घेणाऱ्या दुष्टाचा शोध करण्याचा प्रयत्न मला केलाच पाहिजे. नल, मला वाटतं, दांडेकर मास्तरांनाही माझाच संशय येत असावा. त्याला माझाच संशय का येतो ते मला काही सांगता येत नाही. अर्थात मी त्या रात्री रत्नमहा लांत गेलो होतो, वगैरे काहींच हकीकत त्याला माहित नसावीशी दिसते. त्यानं ह्या खुनाचा तपास करण्याकरतां रामसिंगाला माझ्याकडे 

आणिलं होतं व माझ्यावर त्याचा संशय असल्यास तो दूर व्हावा, या हेतूनं मला रामसिंगाला ह्या तपासाच्या कामावर नेमावं लागलं.” 

" अरेरे ! आपण केवढी बरं चूक केलीत ही ? " नलिनी धाबऱ्या स्वराने म्हणाली, "रामसिंग दुष्ट अंतःकरणाचा दिसतो." 

__ "होय; हा मूर्खपणा जरी मी केला तरी तो माझ्याच फायद्याकरता आहे, म्हणनच केला. रामसिंगाची मला मुळीच भीति वाटत नाही. जरी कदाचित् मी त्या रात्री बंगल्यावर गेलो होतो, असं त्याला आढ ळून आलं, तरी मी त्याचा हात चांगला दाबतांच तो कांहीं एक बोला यचा नाही. कारण तो फक्त पैशाचा भुकेलेला असावा असं मला आजच्या त्याच्या वर्तनावरून आढळून आलं. त्याला जर काहींच उमगलं नाही, तर माझ्या मागची पीडाच गेली. पण मला काय वाटतं ते त्या मास्तरांचं !” __ "आपण त्या मास्तराला कसलाच पत्ता लागू देतां नये. रामसिंगाला शोध लावू दे. जर त्याला खरी गोष्ट समजली तर ठीकच होईल. मग आपल्याला संशयानं झुरायला नको. पण त्या खंजिरासंबंधानं काय ? तो तिथं कसा आला ते आपण मला सांगितलं नाहीं !" ___ "तो माझा आहे. त्या दिवशी मी तो तुला दाखवला, व नंतर सर लेला जेव्हां भेटायला गेलों, त्या वेळी तिला दाखवण्याकरतां तो नेला. पण फिरून येते वेळी मी तो तिथंच विसरून आलो. मला वाटतं, तिनंच येते वेळी रत्नमहालांत तो आणला असावा. कां तें परमेश्वर जाणे!" 

"काही हरकत नाही. आपण निर्दोष आहात. आपला निरपराधी पणा मी सिद्ध करीन. आपण या कामावर रामसिंगाला नेमलंच आहे. मीही कमलाकरांच्या मदतीनं माझ्या हातून होईल ते करीन."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel