' नरसिंग आणि कादर ' ही सॉलिसिटर फर्म कोटांतच एका दगडी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होती. ही फर्म फार जुनी असून वर दिलेल्या दोन भागीदारांपैकी सध्या फक्त कादर हाच तीत होता व नर सिंगच्याही कुळांनी त्याच्या मृत्यूनंतर आपली सर्व कामें कादर याज कडेच सोपविली होती. कादरच्या ऑफिसमध्ये सातआठ कारकुन असून मुख्य कारकुनाची जागा त्याने आपल्या मुलास दिली होती व पुढेमागें तोही एक फर्मचा भागीदार होणार, अशी अफवा होती. ऑफिसच्या इमारतीच्या पुढील भागावर साधारण मोठी अशी 'नरसिंग आणि कादर', 'सॉलिसिटर्स ' अशी अक्षरें कोरलेली पितळी पाटी लटका. वलेली होती. फर्मचा भागीदार नरसिंग हा जरी मयत झाला होता तरी त्याची हुषारी व कर्तबगारी यामळे झालेल्या त्याच्या ख्यातीमळे कादरने त्याचे नांव अजूनही तसेंच ठेविलेले होते.
नरसिंगइतकी जरी कादरची प्रख्याति झालेली नव्हती तरी त्याने हाती घेतलेल्या कामांत वरेंच यश संपादन केलेले होते. कादर हा शरीराने उंच व सुदृढ असन, आपल्या कामांत चालढकल करणारा असावा असा त्याजकडे पाहणाऱ्याचा समज होत असे व त्यामुळे हा आपले काम काय करणार व त्याची कर्तबगारी ती काय असें त्याजकडे कामा करिता येणाऱ्यांपैकी बहुतेकांच्या मनांत येत असे. परंत फर्मच्या नांवाकडे पाइन व जरी त्याची वरीलप्रमाणे दृष्टि होती तरीही तिच्यांत एक प्रकारचा करारीपणा दिसून येत असल्यामुळे लोक त्याच्याकडे आपा पली कामें सोंपवीत असत. तसेंच, आपणाकडे येणाऱ्या प्रत्येक कुळाचा गुणावगुण पाहण्याचा त्याचा जणू स्वभावच बनून गेला होता. कोणीही मनुष्य-मग तो पुरुष अगर स्त्री असो, चोर असो किंवा साव असो त्याजकडे तीक्ष्ण व भेदक दृष्टीने पाहून त्याचे स्वागत करण्याचा त्याचा परिपाठच होऊन गेला होता. अर्थातच त्याच्या ऑफिसमध्ये प्रथमतःच पाउल टाकणारा मनुष्य त्याची ती दृष्टि पाहून भेदरून जावयाचा.परंतु मग हाही यक्षिणीच्या कांडीप्रमाणे आपली दृष्टि व चेहऱ्यावरील विकार ताबडतोब बदलून आपल्या हंसतमुख चेहऱ्याने व कावेबाज
भाषणाने येणा-या इसमावर सहज आपली छाप बसवीत असे. तरीही 'त्याच्या अंगांत एक मोठा दोष होता. आलेला मनुष्य आपली हकीकत सांगत असतां त्याच्या हकीकतीकडे विशेष लक्ष न देता, त्याच्या बोलण्यावरून, वागण्यावरून व भाषणावरून त्याचा स्वभाव ताड. ण्याचा तो प्रयत्न करीत असे व त्याच्या गणदोषांपैकी त्याच्या दोषांकडेच तो विशेष लक्ष पुरवी. असो. विशेष सांगावयाचे म्हणजे, कादरचा जरी वर दिल्याप्रमाणे स्वभाव होता तरी त्याने आपल्या कर्तबगारीने व मिठास भाषणाने आपणाकडे बरीच कुळे ओढून आणन आपली 'फर्म'
भरभराटीस आणली होती.
एके दिवशी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सॉलिसिटर कादर आपल्या ऑफिसमधील स्वतंत्र खोलीत काम करीत बसला होता. ऑफिसास योग्य अशा असणान्या इतर वस्तंखेरीज कागदपत्रांचा ढीग पडला होता व त्या सर्वांची विल्हेवाट लावण्याचा त्याचा विचार होता. परंतु त्या वेळी त्याचे लक्ष त्या कागदपत्रांकडे मुळीच नसून हातांत असलेल्या विश्ववृत्ताच्या आदल्या दिवसाच्या प्रतीकडे होते. तें पत्र त्याच्या मुलानेच त्याला दिलेले असून त्यानेच खूण केलेला, -रत्नमहालांत घडलेला खून, शांतिगृह, सरलाबाई किनखाप्याचा शोध, -वगैरेंसंबंधींचा मजकूर तो वाचीत होता. लिहिलेल्या मजकुराचे चांग लेंच मनन केल्यावर त्याने बेल वाजवून आपल्या मुलास बोलाविलें
बोलाविल्याप्रमाणे थोड्याच वेळांत तो त्या खोलीत येऊन दाखल
झाला.
"ये, बैस. मात्र तो दरवाजा तेवढा लावून घे हं !' तो आंत येतांच कादर म्हणाला, "मला तुझ्याजवळ यासंबंधानं कांहीं बोलायचं आहे."
" हे तं मला कालच का नाही दाखवलंस?" तो बसल्यावर हाती असलेले वर्तमानपत्र पुढे करून त्याचा बाप म्हणाला.
" मीच मळी ते काल पाहिलं नव्हतं.' अवदुलने (कादरच्या मुलाने) उत्तर दिले, " खरं सांगायचं म्हणजे असल्या भिकारडया वृत्त पत्राकडे मी पाहतसुद्धा नाही. काल मी घरी जाते वेळी काही फळं घेतली, ती ठेवण्याकरता मला कागद पाहिजे होता; म्हणन स्टेशनवर मी हे विकत घेतलं, ते असंच पडलं होतं. आज सकाळी सहज माझी यांतील एका मजकुरावर नजर गेली. वाचन पाहिल्यानंतर मला तो थोडासा महत्त्वाचा वाटल्यामुळं मी हे पत्र तसंच ठेवून दिलं.कारण, तुम्ही ऑफिसांत निघून आल्यामुळं मला ते त्याच वेळी तुम्हाला दाखवता आलं नाही. आणि इथं येतांक्षणींच मी ते तुमच्याकडे पाठवन दिलं.” __ " ह्या खुनाविषयी इतर कोणत्याही पत्रांत कसलाच मजकुर नाही." कादर म्हणाला.
" हे बरीक खरं आहे. हा मजकूर दुसऱ्या पत्रांत नाही. त्या स्त्रीचा खून कसा झाला, कोणी केला, खुनी बंगल्यात शिरला कसा, व खून कोणत्या हेतूनं केला, वगैरे सर्व गोष्टी अद्यापि उजेडांत आल्याच नाहीत. आणि तिचा खून दुसऱ्या घरांत असलेल्या शांतिगृहाच्या दिवाण खान्यासारख्या दुसऱ्या दिवाणखान्यांत व्हावा, हा तरी किती विलक्षण योगायोग नव्हे ?"
" पण काय रे, खून झाला ती तीच असेल का ? "
" यांत काय संशय ! ती सरलाबाई किनखापेच असली पाहिजे. कारण, त्या सर्जेरावानं शांतिगहांत मिळालेल्या तिच्या फोटोवरून तसं
म्हटलेलं आहे. छे, फारच चमत्कारिक बुवा हे. आपली तर मति गुंग होऊन गेली आहे !" ___ " कशाविषयीं ? खुनाविषयीं ? ',
" होय, अर्थातच.” अबदुल म्हणाला, " आणखी त्यानं-काय बरं त्याचं नांव तें--हं सर्जेराव-त्याच्या शोधाचंसद्धा मला अत्यंत आश्चर्य वाटतं. आम्ही तिला इथं येऊन भेटण्यासाठी किती तरी पत्रं लिहिली होती. ती त्या शिपाईबहाद्दराला कशी मिळाली नाहीत, याचंच
मला आश्चर्य वाटतं !"
" पण ती पत्रं शोधायला कदाचित त्याला वेळ मिळाला नसेल."
" असेलही. कारण बहुशः पोलिसखात्यांतले लोक आपला वेळ व्यर्थ कधीच घालवीत नाहीत. पण तिचा बिचारीचा खून करणारा हा आहे तरी कोण? __" तें कांही मला सांगता येत नाही. खुनासंबंधानं झालेल्या चौक शीची हकीकत मी नसती वरवर वाचली होती. जिचा खून झाला ती सरलाबाई आहे, असं जर मला त्या वेळी कळतं, तर मी चौकशीच्या वेळी तसाच पढं झालो असतो; कारण, त्यापासन आपलाच फायदा
आहे. " कादर म्हणाला. ___“ मनांत आलंच तर अद्यापिही होण्यासारखं आहे.” अबदुल थोडा वेळ विचार करून म्हणाला, “ कारण तिच्या मृत्युपत्राबद्दल आम्हीच जबाबदार आहोत. आणि खनी इसमाला शोधून काढण्या करतां तिच्या वारसाला बक्षिस लावण्यास सांगायचा आम्हांला हक्कही आहे. पण त्या मृत्युपत्राची व्यवस्था आपणाला आता केली पाहिजे." ___" त्याच उद्योगाला आतां लागणार मी. ते त्या पेटीत आहे." तेथेच असलेल्या एका पेटीकडे बोट दाखवून कादर म्हणाला, “ पण तिनं आपलं मृत्युपत्र नवऱ्याच्या नांवचं कसं केलं नाही ?" ___ " मला वाटतं, तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नसावं.” अब.
दुल म्हणाला, "कारण, तो नेहमी दूर राहत असे."
" एँ: त्यांत काही अर्थ नाही. तो व्यापारी असल्यामुळं त्याला नेहमीं गांवोगांवीं जावं लागत असे."
" पण मला कांहीं तसं वाटत नाही. ” अबदुल एकदम मध्येच म्हणाला, " तो व्यापारी होता यावर माझा मुळीच विश्वास बसत नाही. कारण, अशा माणसांबरोबर सरलाबाईनं लम लावलं असेल हे मला शक्यच वाटत नाही.तुम्ही किनखाप्यांना कधी पाहिलं आहे का ?"
" नाही. " कादरने नकारार्थी मान हालवून म्हटले, " तूं तरी?"
"छेकधीच नाही. तुम्ही मला काही कामाकरता पाठवल्यामुळं मी दोन वेळा तिच्या घरी गेलो होतो, तरीही तो मला कुठंच दिसला नाही. तिच्या घरांतील तो सफेत दिवाणखाना मला चांगलाच आठवतो. पण ज्या वेळी रत्नमहालांतील खनाची हकीकत पुढं आली त्या वेळी त्याचा मला कसा विसर पडला याचंच मला आश्चर्य वाटतं! तें जाऊंद्या. पण सरलाबाईचा व आमचा संबंध कसा आला? मी या ऑफिसचं काम करूं लागल्यावर तिनं आम्हांला आपला सॅॉलिसिटर नेमलं?"
" होय.” कादर आपली शून्यदृष्टि खोलीच्या खिडकीबाहेर रोखन म्हणाला, " तिचा दूरचा एक चुलता तिच्या आईला मदत करीत असे व आईच्या मृत्यूनंतर तिच्या मुलीलाही तो तेवढीच मदत
दरमहा देई."
" मग त्याच्या मरणानंतर त्याची सर्व मिळकत हिला मिळाली असावी."
"होय. थोड्याच दिवसांपूर्वी ती तिला मिळाली. मी ताबडतोब तिला भेटायला बोलावलं. ध्यानीमनी नसता आपणास एवढी संपत्ति मिळा लेली पाहून तिला त्या वेळी जवळ जवळ मच्छीच आली ! नंतर मी तिच्या एकंदर मिळकतीची माहिती देऊन तिचं काम कसं काय पाहा. यचं ते ठरविण्याकरिता तिच्या नवऱ्याला पाठविण्यास सुचविलं. कारण, असल्या भानगडी स्त्रियांपेक्षा पुरुषालाच समजतात. पण आपला नवरा एक महिन्यापूर्वी कलकत्त्यास गेला आहे असं तिनं मला कळवलं."
" तिचा दुसरा एक चुलतभाऊ आहे ना?"
"होय,-मधकर सरनाईक त्याचं नांव." सरलेचे मृत्यपत्र असलेल्या पेटीकडे नजर वळवून कादर म्हणाला, "तो नाटकांत काम करतो. मला त्याला आतां ताबडतोब भेटायला बोलावलं पाहिजे." "कां ? त्याचा काही तिच्या मृत्युपत्राशी संबंध आहे ? " परंतु त्या प्रश्नाचें कादरने उतर देण्यापूर्वीच एका शिपायाने आंत येऊन त्याच्या हातीं एक 'व्हिजिटिंग कार्ड' दिले. “दांडेकर," तें कार्ड वाचून कादर म्हणाला, "हा सरलाबाईचा मामेभाऊ असून बहुतकरून तिच्या मृत्युपत्राची चौकशी करण्यासाठी आला असावा. मग अबदुल, तूं जरा वेळ बाहेर जा. मास्तरसाहेबांशी मला एकटयालाच थोडा वेळ बोलं दे. मात्र बालिवाला थिएटरांत मधुकर सरनाईक यांना भेटण्याविषयींचं पत्र घालायला विसरूं नको. तेवढं काम आतांच करून टाक."
मास्तरसाहेब आंत येतांच कादरने त्यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना बसावयास एक खुर्ची पुढे केली.
"आपण येण्याची तसदी घेतलीत हे पाहून मला फार आनंद होत आहे." कादरने पुढे आपण होऊनच बोलावयास सुरवात केली. "आपली आतेबहीण आपल्याविषयी मजराशी पुष्कळदा बोलत असे." __ "खरं की काय ? " कादरच्या चेह-याकडे टक लावन मास्तरसाहेब म्हणाले, "आम्हां उभयतांच्या अल्प परिचया कडे पाहतां तिनं असं करावं म्हणजे खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. बरं, ते असो. पण ज्या अर्थी तुम्ही म्हणता आहांत, त्या अर्थी तिच्यासंबंधी सर्व हकीकत
आपणांस कळलीच असेल." __ " अगदी तसंच काही म्हणता येणार नाही. जिचा खून झाला ती सरलाबाई होती हे आतांच मला या वर्तमानपत्रावरून कळत आहे." कादर समोर पडलेल्या वर्तमानपत्राकडे बोट करून म्हणाला, " मला वाटतं, तुम्ही याच कामाकरता मला भेटायला आला असाल. पण तुम्हाला ही बातमी कळली कशी?" . ___ "तुमच्याप्रमाणंच मलाही ती कळलो. माझ्या एका मित्रानं वर्तमान पत्र आणून दाखवलं. "
" अस्सं. पण तुम्ही सरलाबाईचे मामेभाऊ आहां, ते तुमच्या मित्राला माहित होतं का ?"
"नाही; आमचं नातं असेल अशी त्याला कल्पनाही नव्हती. कालच तो सहज हे पत्र घेऊन माझ्या घरी आला होता. "
" तुमचं घर कुठं आहे ?"
"दादर व माटुंगा यांच्या दरम्यान. म्हणजे ज्या घरांत तिचा खून झाला त्यापासून जवळच."
" अगदी लागन आहे का घर तें ? " " अगदी लागून जरी नसलं तरी एका हाकेच्या अंतरावर आहे."
"तेव्हां तुम्ही तिचे मामेभाऊ असून रत्नमहालापासून जवळच राहतां तर." काहींसें हळू व काहींसें मोठ्याने कादर पुटपुटला. __ " होय; आणि म्हणूनच मी पुढं काय करावं ते विचारायला आलों आहे." मास्तर अगदी त्रासून गेल्याप्रमाणे म्हणाले. “साहेब, तुम्हाला खरं खरं सांगतों, या खुनाविषयी मला अवाक्षरही माहित नाही, व जें कांहीं माहित झालेलं आहे ते सर्व वर्तमानपत्रांवरूनच कळलं. आणि कांही गोष्टी मात्र कमळाकर महाले यांनी सांगितल्या."
"कमळाकर कोण ? "
" खुनाच्या रात्री ज्यांची मोटर चोरीला गेली ते. ती मोटर ठाणे स्टेशनजवळ सांपडली." मास्तर म्हणाले, “ पोलिस म्हणत होते.''
"हं, आतां आठवलं. खुनी इसम त्या मोटरीतूनच फरारी झाला असं पोलिसखात्याचं म्हणणं होतं. पण चौकशीच्या दिवशी त्यांना तसं काही सिद्ध करून दाखवता आलं नाही. बरं, तुम्ही ह्या गुन्ह्या विषयी काही हकीकत कमळाकराच्या तोंडन ऐकली; होय ना?" ___ "होय, आणि वर्तमानपत्रांतूनही वाचली. पण जिचा खन झाला ती माझी आतेबहीण सरला असेल अशी मला कालपर्यत कल्पना नव्हती ! ते कळतांच मी आपणांस भेटायचं ठरवलं."
" तें कां?" कादरने संथपणे विचारले.
हा प्रश्न ऐकतांच मास्तरांना जरा आश्चर्य वाटले. "म्हणजे ?" ते म्हणाले, “सरलेनं आपल्या उत्पन्नापैकी काही ठराविक वार्षिक उत्पन्न मला तोडन देण्याचा केलेला बेत आपणच मला प्रथम कळवलात."
" होय. तिचा तसा पूर्वी बेत होता खरा. पण मागाहून तो बदलला." __ "ते मला माहित आहे."कादरचे उडवाउडवीचे भाषण व वागण्याची पद्धति वगैरे पाहून आश्चर्याच्या स्वराने मास्तर म्हणाले, “ ज्या वेळी तिनं मला तसं लिहिलं त्या वेळी मी तिला जाऊन भेटलों. आपण आपल्या मृत्युपत्रात तुझ्या नांवानं काही तरी ठेवीन असं तिनं मला त्या वेळी वचनलं होतं."
हे ऐकतांचा दरने एकदम चमकून वर पाहिले. दांडेकरांचे वरील भाषण चालू असतां दुर्लक्ष केल्याप्रमाणे दाखवून आपल्या समोरच असलेल्या टिपकागदावर तो हातांतील टांकाने काही तरी खरडीत होता. परंतु त्यांचा एकही शब्द त्याच्या कर्णेद्रियांतून निसटू शकला नाही. वर पाहतांच त्याने मास्तरसाहेबांच्या मनांत काय असावे हे काढण्याचे मनांत आणले __" सरलाबाईंनी तुम्हांला फायदेशीर असं मृत्युपत्र त्यांच्या मृत्यूपूर्वी एकच आठवडा केलं होतं " तो म्हणाला, " पण आता त्यांचं मृत्यु पत्र तुम्हाला फायदेशीर नाही." __ "म्हणजे ! तुम्ही म्हणतां तरी काय ? " मास्तरांनी एकदम ओर इन विचारले. अंगावर वीज कडाडून पडावी अगर डोंगराचा कडा कोसळावा तद्वत् कादरचे शब्द ऐकतांच मास्तरांची स्थिति होऊन त्यांच्या तोंडून आपोआपच वरील शब्द आले. ___ "तुम्ही असं काय म्हणतां तें मला समजलं नाही.” निराशेचा
ओघ ओसरल्यानंतर ते थोड्या वेळाने अडखळत म्हणाले. ___ " सरलाबाईनी थोड्या दिवसापूर्वी आमच्याकडे येऊन एक मृत्युपत्र तयार करून आपली सर्व जिंदगी तुमच्या नांवं करून ठेवली ! " कादरने आपली हकीकत सांगण्यास सुरवात केली, “ त्यांची सर्व मिळ
कत वर्षाला दहा हजारांच्या उत्पन्नाची आहे. त्या मृत्युपत्रांत तुम्हाला आपल्या हयातीपर्यंत वर्षाला कांहीं एक रक्कम मिळावी असंही तिनं नमूद करून ठेवलं होतं. त्यानंतर आपण काय व्यवस्था केली आहे तें तुम्हांला कळवण्याचं मनांत आणलं; पण अशा रीतीनं स्वतःला बांधून न घेण्याचा सल्ला आम्ही दिल्यामुळं तिनं मागाहून आपलं मन बदललं; त्यानंतर आमच्या विचारानं आम्ही काय लिहिलं ते तुम्हाला माहित आहेच. काही दिवसांनी तिनं तुम्हांला वर्षासन देण्याचा आपला बेत आम्हांला कळवून त्याप्रमाणं एक निराळं मृत्युपत्र बनवण्यास सांगितलं व तिच्या सांगण्याप्रमाणं आम्ही एक तसं मृत्युपत्र तयार सुद्धा केलं होतं." __ "हे तिच्याकडून मला कळलं होतं," दांडेकर मध्येच म्हणाले, “व नंतर-"
"नंतर तिनं स्त्रीस्वभावास अनुसरून आपला विचार बदलला! त्यानंतर आणखी काही दिवस गेल्यानंतर ती पुन्हा आमच्याकडे आली व पूर्वीचं मृत्युपत्र स्वहस्ते रद्द करून ताबडतोब नवं मृत्युपत्र तिनं तयार करवलं. त्यामध्ये तिनं आपली सर्व जिंदगी मधुकर सरनाईक याच्या नांवं करून दिली. मधुकर सरनाईक तुमच्या माहितीचे
असतीलच." __ " मधुकर सरनाईक ! कोण-तो, नट ? ” मास्तरांनी एकदम
ओरडून विचारले.
" होय, तोच तो; मी त्याला अजून प्रत्यक्ष पाहिलं नाही. पण माणस मोठा उमदा आहे असं ऐकतो. तुमची जरी ह्या मत्युपत्राच्या बाबतींत फसवणूक झालेली आहे, तरी तुमची स्थिति पाहून व तुमचा व सरलाबाईंचा आप्तसंबंध जाणन तो तुम्हांला काही तरी भाग देईल असं माझं मन मला सांगतं. आम्ही त्याला आजच लिहिलं असन तो लवकरच आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही."
मास्तर या वेळी कादरचे भाषण स्वस्थपणे ऐकून घेत होते. आपण केलेल्या मनोराज्याची इमारत ढासळून पडली, आपल्या सर्व आशांची
रत्नमहाल.
राखरांगोळी झाली हे त्यांना पूर्णपणे कळून चुकले. सरलेच्या मृत्यु पत्राची हकीकत ऐकतांच ते रागारागाने आपल्यावर उसळतील असें कादरने अनुमान केले होते, परंतु त्यांनी तसें कांहींच केले नाही, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. मास्तरांचा चेहरा अकस्मात मिळालेल्या धक्क्यामुळे फिका पडून छातीत कळ येऊन जावी त्याप्रमाणे त्यांचा श्वासोच्छ्वास मंद चालला होता. अशा स्थितीत बराच वेळ गेल्यानंतर मास्तरांनी एक दीर्घ श्वास सोडून हंसरी मुद्रा करीत म्हटले, "एकंदरीत तिनं मला काहीच ठेवलं नाही तर ! ठीक आहे. आनंदाची गोष्ट आहे !"
" आनंदाची ! ती कशी बुवा ?”
" एका अर्थानं आनंदाचीच नाही तर काय ? कारण जर तिनं मला आपला वारस केलं असतं तर तिच्या खुनांत माझंही थोडंबहुत अंग असावं असा संशय येऊन पोलिसांनी छळ करण्यास कमी केलं नसतं; नेम कुणी सांगावा?" __" हे खरं यांत संशय नाही. ” कादर जरासा घोटाळून म्हणाला, " पण पोलिसांना तुमचाच संशय आला असता, असंच तुम्हाला का वाटतं ? आतां ज्या घरांत तिचा खून झाला तिथून जवळच तुम्ही राहता, तरी त्या वेळी, त्या रात्री व त्या घटकेला तुम्ही कुठं होता, काय करीत होता हे साक्षीपुराव्यानिशी सिद्ध केलं असतं तरी तुम्हाला कसलीच भीति नव्हती."
" मग तिकडेच तर नडत आहे ना !" मास्तरसाहेबांनी कादरला संथपणे सांगितले. " मी एकटाच राहतो आणि त्या दिवशी संध्या काळी पांच वाजल्यापासून मी कुणालाही पाहिलं नाही व कुणासही भेटलों नाही. मग साक्षीपुरावा कुठून आणूं ? अर्थात् कुणाला न भेटतां रात्री रत्नमहालांत जाऊन पैशाच्या आशेनं तिचा खून करून स्वस्थपणे आपल्या घरी आलों असं नेहमीच प्रत्येकाकडे संशयी दृष्टीनं पाहणाऱ्या पोलिसखात्याला वाटल्याखेरीज राहील का ? त्यांच्या संशयाला प्रथम मीच बळी पडणार."
य
" तुम्ही व्यर्थ स्वतःला अस्वस्थ करून घेत आहांत झालं." मास्तरांना घाबरलेले पाहून धीर देण्याच्या उद्देशाने कादर म्हणाला, " पोलिसखात्याची ही संशयी नजर तुमच्याकडे कधीच वळणार नाही, अशी माझी पूर्ण खात्री आहे."
"तें कसं?"
" कारण, जर तुम्ही अपराधी असतां तर तुमची वागण्याची तन्हा त्याहून निराळी असती. न केलेला अपराध आपल्याच माथ्यावर लाद ण्याचा अपराध खरा अपराधी कधीच करीत नाहीं ! बरं, ते असो. या विषयावर वादविवाद वाढवण्यांत अर्थ नाही. कारण तें काम पोलिस. खात्याचं अमन त्याबद्दल आपण कितीही जरी उरस्फोट केली तरी सर. कारकड़न आपणांस एक कपर्दिकाही मिळायची नाही. बरं, याखेरीज आणखी विशेष कांहीं तुम्हांला सांगता येण्यासारखं आहे काय ? "
"काहीच नाही. जितकं ठाऊक होतं तितकं मी सांगितलंच आहे, पण आतां ज्या अर्थी तिची सर्व दौलत मधुकरास मिळाली आहे, त्या अर्थी खुनी इसम हुडकण्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला पाहिजे असं तुम्हांला नाहीं का वाटत ? जर पैसा मला मिळाला असता तर मीच तें केलं असतं.”
_ " तुमचं म्हणणं काय आहे ते माझ्या ध्यानांत नाही आलं.”
" एवढं तुम्हाला समजलं नाहीं !" मास्तरांनी आश्चर्ययुक्त हेटाळ णीने विचारले, “ माझ्या आतेबहिणीचा खन करणारा इसम फासावर लटकलाच पाहिजे ! कालच मी एका वर्तमानपत्रांत एक जाहिरात पाहिली. अशा प्रकारचे गुन्हे शोधून काढण्याचं काम एक खासगी माणस करीत असतो. इथं येण्यापूर्वी मी तिकडेच गेलो होतो."
"अस्सं ! आणि तुम्ही त्याला काय सांगितलंत?"
"त्याचं नांव रामसिंग असं आहे. सरलेच्या मृत्यूविषयी जेवढी माहिती मला होती तेवढी सर्व मी त्याला सांगितली. तसंच, ह्या खुनाशी संबंध असणारी इतर हकीकतही मी त्याला सांगून हा खटला हाती
घेण्याबद्दल मी त्याला सुचवलं आहे व त्याप्रमाणं तो प्रथम आपल्याला भेटायला येईल." ___“ मला भेटण्यापासून त्याचा काही फायदा होणार नाही. " मास्त. रांच्या या उठाठेवी कादरला न पटल्यामुळे तो थोडासा चिडून म्हणाला, "जर तुम्ही तिच्या मिळकतीचे वारस असतां तर तें ठीक होतं; पण ज्या अर्थी तुमची अशी हलाखीची स्थिति आहे, त्या अर्थी हा उपव्याप तुम्ही करायला नको होता. कारण, त्याच्या श्रमाचा मोबदला तुम्ही त्याला कुठून देणार, तेच मला कळत नाही."
" तें खरं. " मास्तरसाहेब थोडे घुटमळून म्हणाले, "आणि म्हणू नच मधुकरानं त्याच्याच हाती हे काम द्यावं अशी माझी इच्छा आहे." ___ "अशी सक्ति तुम्हांला कशी करता येईल ? आम्हाला पसंत असेल तो माणूस निवडून त्याच्याकडेच हे काम आम्ही देणार.” कादर म्हणाला.
"असंच जर असेल तर त्या गोष्टीचा छडा लावण्याचा मीही प्रयत्न करणार.” "मास्तर गुर्मीतच ठासून म्हणाले, "खुनी इसम शोधून काढ. ण्याचा मी निश्चयच केला आहे. मधुकराला-"
"जें योग्य असेल तेच करण्याची आम्ही सल्ला देऊ." कादर उठून मास्तरांचे वाक्य पुरे होऊ न देतां मध्येच म्हणाला, " त्याला दहा हजारांची मिळकत आतां मिळाली असून खुनी इसमाचा तपास करायला तो मागंपुढं पाहणार नाही, अशी आमची खात्री
आहे. मात्र ती गोष्ट शक्य असली पाहिजे."
" शक्य का नसणार ? खात्रीनं शक्य असलीच पाहिजे." मास्तर आपला हात मेजावर आपटून म्हणाले. "सरला कांहीं कारण असल्या शिवाय त्या घरी गेली नाही, अशी माझी खात्री आहे. हिवाळे कसे काय आहेत तें मला माहीत नाही व किनखाप्यांनाही मी ओळखत नाही. पण ह्या दोघांपैकी कुणी तरी एकानं तिचा खून केला असला पाहिजे."
“ याबद्दल तुमच्यापाशी काय पुरावा आहे ? " कादरने ताबडतोब प्रश्न केला.
सरलेचें मृत्युपत्र " कारण, रामसिंगानं तसं मला पटवलं म्हणून. माझी सर्व हकीकत ऐकतांच तो असं म्हणाला. " मास्तरांनी उत्तर दिले.
आतां कुठे कादरच्या डोक्यांत थोडा प्रकाश पडू लागला.
" तुम्ही रामसिंगाला इकडे पाठवून द्याल का ? माझा व मधुकर. रावांचा जर त्याच्याविषयी चांगला ग्रह झाला तर आम्ही खुनी इसमाचा तपास करण्याचं काम स्याजकडेच सोंपवू. मी इन्स्पेक्टर सर्जेरावांनाही लिहून त्याची काही मदत मिळाल्यास पाहतो. हे ठरलं तर, पण काय हो मास्तरसाहेब, ह्या खनाच्या शोधाला उपयोगी पडतील असे सरलाबाईंच्या आयुष्यातील काही प्रसंग मला सांगतां का ? ह्या कामी उपयोग होईल म्हणून विचारतों.”
"ती सस्वभावी व निर्मळ वर्तनाची स्त्री होती यापेक्षा मला काहीच अधिक माहित नाही. पण तिचा खून झाला तो सह घेण्याच्या हेतूनंच झाला असावा यांत संशय नाही. खुनी इसम मिळालाच पाहिजे; नाहीं तर-" __ " तुमचा संशय घेतील कदाचित् ! " कादर मध्येच उपरोधिकपणे हसून म्हणाला. ___ " ती निराळी गोष्ट!" मास्तर म्हणाले, " मी जरी गरीब असलों तरी माझा आहे तेवढा पैसा खर्च करीन, अगदी कफल्लक होईन, पण खुनी इसम शोधून काढण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कधीही राहणार नाही."
“पैशाकरतांच जर सरलाबाईंचा खून झाला असेल, तर खुनी मिळाल्याशिवाय कधीच राहणार नाही. कारण, तिच्या पैशांवर आपला हक्क शाबीत करूं पाहणाऱ्या प्रत्येकावर आम्ही करडी नजर ठेवल्या शिवाय राहणार नाही." असे म्हणून कादरने जाण्यास उठलेल्या मास्तरांना आपल्या खोलीचा दरवाजा उघडला. " मग आपल्याला कांहीं वार्षिक रक्कम देण्याविषयीची गोष्ट मी मधुकररावापाशी काढं का?" मास्तर बाहेर पडत असता त्याने पुढे विचारले.
__ " नको नको ! तसं करण्याची काही जरूरी नाही." मास्तरमजकूर जरा रागानेच म्हणाले, "मधुकरराव परके आहेत ! व मी परक्याचं धन कधीही घेत नाही. त्याला जर पैशाचा लोभ नसेल तर त्यानं त्यापैकी काही भाग खनी माणसाचा पत्ता लावण्याच्या कामी खर्ची घालावा. आणखी इतकंही करून जर मला काही तिचा नातलग म्हणून देण्याचीच काही इच्छा असली, तर रामसिंगालाच त्यांनी ह्या कामावर नेमावं अशी माझी इच्छा आहे,ती पूर्ण करावी. कारण सरलेची जिंदगी मलाच मिळणार, ह्याच समजुतीवर मी त्याला शब्द देऊन चुकलो आहे.
" रामसिंग हुषार आहे का ?" " तसं माझं तरी मत आहे खरं."
" पण त्रोटक हकीकत ऐकून एकदम आपलं मत प्रतिपादन कर. णारा माणस दिसतो. कारण, चौकशीच्या वेळी हिवाळ्यांनी आपला निरपराधीपणा सिद्ध करून दाखवला असताही तो त्यांनाच खनी ठरवं पाहत आहे. चांगले गुप्त पोलिस असा चंचलपणा कधीच करणार नाहीत व त्याचा तपास करण्याची पद्धति जर अशा प्रकारची असेल तर ती चुकीची असून, त्याचा उपयोग आम्हांला होणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे.”
"असं जर आपलं मत असेल तर आपण तो खटला वाटेल त्याच्या हाती देण्यास समर्थ आहां. हा माझा पत्ता. ” आपल्या खिशांतून एक व्हिजिटिंग कार्ड काढून कादरच्या हाती देत मास्तर म्हणाले, “ मध. कररावांना भेटण्याकरतां लिहा. तो हल्ली पूर्वीच्याच ठिकाणी राहत असेल."
घडून आलेल्या एकंदर गोष्टीवर विचार करीत मास्तर तेथून बाहेर पडले.