प्रकरण २० वें 

खरा खुनी आपल्या पतीस पुन्हा एकदा पाहिल्यामुळे सरोजिनीबाईची स्थिति आजकाल थोडीशी खालावल्यासारखी झाली होती. बाहेरून ती जरी पूर्ण बेफिकीर वत्ति व धैर्य दाखवीत असे, तरी तो पुन्हा येऊन आपल्या समोर उभा राहील की काय, ह्या नुसत्या कल्पनेनेच तिचे सर्वोग थरा रून जात असे ! पूर्वीच्या अनुभवावरून आत्मारामपंत किती पाषाण हृदयाचे आहेत, याची तिला चांगलीच प्रचीति आली होती. पैशासाठी 

तो गृहस्थ खनही करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी तिची पूर्ण खात्री होती. वास्तविक पाहतां आत्मारामपंतांना तिच्या एका कप दिकेसही हात लावतां आला नसता. सरोजिनीबाईंच्या मालकीची सर्व जिंदगी तिच्या बापापासून तिला मिळाली असल्यामुळे त्यावर आत्मा रामपंतांचा तिच्या हयातीत कसलाच हक्क नसून त्या बाबतीत त्यांचे कांही एक चालण्यासारखे नव्हते. परंतु ती इस्टेट आपल्या घशाखाली उतरविण्यासाठी वाटेल तें कर कर्म करण्यास आत्मारामपंत यत्कि चितही माघार घेणार नाही, व त्यापायीं, आपला स्वतःचा अमानुष पण छळ करून-वेळ आलीच तर खनही करून व आपल्या पोरां. बाळांना भिकेस लावून स्वतःची भर करण्यास ते बिलकुल डगमगणार नाहीत, या विचारामुळे त्यांना एक प्रकारची दहशत बसून गेली होती व म्हणूनच स्वसंरक्षणासाठी त्या आपल्याजवळ नेहमी सुरा बाळगीत असत. 

ह 

 

इतक्यांत बाहेर पावलांचा आवाज ऐकू आला व कमळाकर व मधु. कर आंत आले. त्या दोघांना खोलीत आलेले पाहतांच तिला आत्मा रामपंत आल्याचाच भास होऊन, सुरा काढण्याकरितां तिने आपल्या उशाखाली हात घातला. परंतु आपणांस भासल्याप्रमाणे आंत आलेला गहस्थ आत्मारामपंत नसून, आपला भावि जामात, कमळाकर व त्याच्याबरोबर त्याचा मित्र मधुकर आहे, असें जेव्हां तिला समजले, तेव्हां तिनें उशाखालचा आपला हात काढन मंदस्मित करून त्यांचे यथोचित स्वागत केले. परंतु तिच्या त्या दचकण्याचा परिणाम तिच्या चेहऱ्यावर दिसल्यावांचून राहिला नाही. तो पांढरा फटफटीत दिसू लागला व तो फरकमळाकराच्या काकदृष्टींतन निसटणे शक्यच नव्हते. ___ " त्यानंतर आत्मारामपंतांकड़न तम्हांला काही त्रास झालेला नाहीं 

ना ? ” कमळाकराने सुरवात केली. ___ "नाही," मंदस्मित करीत सरोजिनीबाई म्हणाल्या, " त्यानंतर पुन्हा ते माझ्या वाऱ्याला देखील उभे राहिले नाहीत. पण ते जर आतां पुन्हा दिसले तर-" बोलता बोलतां त्यांच्या डोळ्यांत खुनशी पणाची चमक मारू लागली-“आतां मी मुलींच भ्यायची गाही." हळ हळ त्यांनी आपला आवेश आवरला व थोडेसें हसन मधुकराकडे पाहत त्याला दोन औपचारिक प्रश्न केले. __ मधुकर म्हणाला, "मी तुम्हांला हेच दाखवण्याकरतां आलो होतो." गजाननरावांकडून मिळालेलें तें सोन्याचे लॉकेट पुढे करीत मधुकर म्हणाला. परंतु मधुकराचे वाक्य पुरे होते न होते तोच सरोजिनी. बाईनीं तें पदक ओळखन एक आरोळी ठोकली व एकदम मधुकराचा दंड पकडीत म्हटले, 

" कुठं आहे तो ? बाहेर आहे का ? जर तो तिथंच असला तर-तर." असें म्हणून तिनें उशीखालून आपला सुरा काढला. 

" अहो, करता तरी काय हे !” मागे सरकत मधुकर म्हणाला. 

" मला वाटतं, हे लॉकेट आत्मारामपंतांचं-तिच्या नवऱ्याचं असावं." कमळाकर म्हणाला. 

खरा खुनी " होय. तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते त्यांचंच आहे.” क्षणांत दरवाजाकडे तर क्षणांत खिडकीकडे पाहत सरोजिनीबाई म्हणाल्या, " ते कुठं आहेत ? " त्यांच्या हातांत सुरा अद्यापही होताच. 

त्यांनी पुन्हा एकदा दचकून विचारले. 

" हां हां! असं आकांडतांडव करूं नका. ते काही इथं नाहीत." सरोजिनीबाईना थोपवीत कमळाकर म्हणाला; त्याने त्यांच्या हातचा सुरा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सरोजिनीबाईंच्या हेकेखोरपणामुळे त्याचे काही एक चालले नाही. ___“ आत्मारामपंतांची आठवण झाल्यामुळं हिचं डोकं फिरून गेलं 

आहे एवढंच! " मधुकर त्रासून म्हणाला, “ त्या लॉकेटविषयी तिला आतां स्पष्टच विचार पाहूं." __" होय-होय ! तेंच-तेंच लॉकेट मी त्यांना दिलं होतं. " तें लॉकेट पाहून सरोजिनीबाई सांगं लागल्या, " पहिल्या पहिल्याने ते माझ्याशी फारच चांगल्या रीतीनं वागत असत; त्या वेळी मी तें लॉकेट त्यांना दिलं होतं. पण हे तुम्हांला कुठं सांपडलं ? त्यांच्याकडे का ? ते जिवंत आहेत ना?" 

तिच्या बडबडीकडे लक्ष न देतां कमळाकर म्हणाला - 

" आत्मारामपंतांच्या रंगरूपाचं थोडंसं वर्णन कराल का?" 

" न करायला काय झालं ! ते अंगानं लठ असून त्यांचा चेहरा वाटोळा व तांबुस आहे. पाहणाऱ्याला ते नेहमी हसतमुख दिस. तात व चेहऱ्यावरून ते दयाळू व उदार असावेत असं प्रथम वाटतं. पण अंतःकरणाचे पाषाण, बेरड, दुष्ट, मांग---" 

"काय रे कमळाकर, हे तर रामसिंगाच्याच रूपाचं वर्णन दिसतं!" मधुकर कमळाकराकडे पाहत म्हणाला. 

" आतां प्रथम रामसिंगाचीच भेट घेतली पाहिजे. सकाळी दांडेकर मास्तर म्हणत होते ना, की आज रात्री रामसिंग आपल्याकडे येणार आहे म्हणन ? तिथंच जाऊन भेटूं या आपण त्यांना. मास्तरदेखील आपल्यापासून काही तरी खास चोरून ठेवीत आहेत." कमळाकर म्हणाला. 

 

मास्तरांची पर्णकुटी सरोजिनीबाईच्या बंगल्यापासून पांच मिनिटांच्या रस्त्यावर होती. थोड्याच वेळांत मधुकर व कमळाकर मास्तरांच्या घरी 

आले. रामसिंग आला नाही, हे त्यांना मास्तरांकडून समजले. अर्थात् त्याची वाट पाहत ते तिघेही खुनासंबंधींच्याच गोष्टी बोलत बसले. मास्तरही पैशाच्या व स्वतःच्या बचावाच्या आशेने मधुकराचीच बाजू उचलून धरीत होते. 

" पण आज सकाळी तुम्ही आम्हांला सर्व काही सांगितलं नाही!" मास्तरांकडे वळून मधुकर म्हणाला. 

" आणखी जे काही सांगायचं राहिलं असेल ते आतां रामसिंग आल्यावर त्याच्याच समक्ष सांगेन." मास्तर जरा बेपर्वाईनेच म्हणाले, " व जे काही सांगणार आहे ते त्याच्याविरुद्ध असल्यामुळं ती एक तुमच्या बाजची त्याच्यासमक्ष साक्षही होईल." __ " पण काय हो मास्तर, त्याला तुम्ही रामसिंग या नांवानं का हाक मारतां ?" कमळाकराने विचारले. 

" म्हणजे ! त्याला दुसरं एखादं नांव आहे की काय ?" मास्तरांनी विचारले. 

“अहो, एखादंच का, अनेक आहेत.” कमळाकर पुटपुटत म्हणाला, सरोजिनीबाईंच्या पतीचे गह्य आपण बाहेर फोडूं नये, अशा विचाराने तो पुढे काही न बोलतां स्वस्थ राहिला. मास्तरांना रामसिंग हा फक्त गुप्त पोलिसच आहे, याशिवाय त्याच्याविषयों दुसरें कांहीं एक कळलेलें नाही, हे पाहून त्याला समाधानच वाटले. 

थोडयाच वेळांत त्यांना दरवाजावर थाप ऐकू आली व मास्तरांनी दरवाजा उघडतांच रामसिंग आंत आला. 

रामसिंग आंत येतांच एका सभ्य गृहस्थाप्रमाणे जवळच असलेली एक खुर्ची पुढे ओढून तीवर बसला. या वेळी त्याचा चेहरा नेहमीप्रमाणे वाटोळा, गरगरीत व तांबुस दिसत होता. खुर्चीवर बसण्यापूर्वी त्याने मोठ्या ऐटीने सर्वोशी मोकळ्या अंत:करणाने हस्तांदोलन केलें, 

"मधुकर, तुम्हीही इथंच आहांत हे बरं झालं.” रामसिंगाने प्रथम 

 

बोलण्यास सुरवात केली, “ मला तुमच्याशी बरंच बोलायचं आहे. पण तुमचं इथं येण्याचं कारण नाहीं समजलं !" __ " ह्या खुनासंबंधानंच थोडंसं गूढ आम्हांला उकललं आहे," मधुकर म्हणाला, " व त्यासंबंधानंच थोडा खल करण्याकरता आम्ही इथं आलो आहोत.” 

"अस्सं." बेदरकारपणाने रामसिंगाने विचारले, “ अच्छा ! तुम्ही काय हुडकलंत ते तर ऐकूया !" 

"पण त्याआधी तुम्ही काय शोध लावला तो आम्हाला समजला पाहिजे.” 

"ठीक आहे." पेटत असलेल्या कंदिलाकडे सारखी नजर भिड. वीत रामसिंगाने उत्तर दिले, " एकंदर चौकशीअंती माझा असा तर्क होतो की, तो खून गजाननरावाच्याच हातन घडला. ते त्या रात्री चौपाटीवरून रत्नमहालांत आले होते, ही गोष्ट खरी आहे. इतकंच नव्हे, तर मयत स्त्रीची व त्यांची ओळखही होती." 

" ती कुठची ?" मधुकराने शांतपणे विचारले. " ती त्यांची बायको होती, असं मला समजलं आहे." 

" तुम्हांला जे माहित आहे ते सर्व सरळ को सांगून टाकीत नाही ? असे लपंडाव कां ? " कमळाकराने मध्येच विचारले," ती त्यांची पत्नी होती, हे तुम्हांला मास्तरांकडूनच समजलं असा माझा तर्क आहे.” 

" मास्तरांकडून !” एकदम संशय आल्यामुळे रामसिंगाने आश्चर्य चकित झाल्यासारखें दर्शवून विचारले, “ मला मास्तरांकडून काय समजलं?

“जें आता तुम्ही म्हणाला तेंच." आपल्या जागेवरून उठून मास्तर म्हणाले, “ मला जे काही माहित होतं ते सर्व यांना सांगून टाकलं आहे, आणि-" 

"हं ! सटकता येणार नाही." रामसिंग दरवाजाकडे सरकत अस. लेला पाहून त्याच्याआड येऊन कमळाकराने म्हटले, " इतकी घाई कामाची नाही." 

 

रामसिंगाने आपली थोडीशी खवळलेली वृत्ति पूर्वीप्रमाणे शांत कर ण्याचा प्रयत्न केला, " मला वाटतं तुम्ही माझी थट्टा करीत आहांत." कपाळावरचा घाम पुशीत व त्या दोघांच्या तीक्ष्ण नजरेकडे आपली नजर भिडवीत तो म्हणाला, "दांडेकरांना काय माहित आहे ?" __ “ सर्व काही माहित आहे." मधुकराचा आश्रय घेण्यासाठी त्याच्या पाठीमागे राहून मास्तर म्हणाले, " स्वतःच्या नांवचं मत्युपत्र सरलेला करण्यास लावण्याची युक्ति तुम्हीच सुचवलीत; गजाननरावां जवळ असलेल्या चावीसारख्याच दुसन्या चाव्या तयार करावयाच्या ही देखील तुमचीच कल्पना; मधुकर व नलिनी यांना बनावट पत्रं लिहून खनाच्या जाळ्यांत अडकवण्यासाठी त्यांना त्या रात्री रत्न महालांत तुम्हींच आणलंत, वगैरे सर्व कांहीं मला ठाउक आहे बरं ! रामसिंग, तुमचा हेतु दुष्ट असेल, तुमच्या मनांत खुनाची कल्पना खेळत असेल, असं त्या वेळी मला केव्हाही वाटलं नव्हतं. मला तुमच्या दुष्ट वासनेचा जर यत्किंचित् सुगावा लागता, तर मी तुमच्या बेतांत कधीही सामील झालों नसतो." 

“हे सर्व खोटं आहे. हा माझ्यावर निवळ आळ आहे.” अस्पष्ट स्वरांत रामसिंग ओरडला. __ "शब्दान् शब्द अक्षरशः खरा आहे, समजलांत ? इतकंच नव्हे, तर तिचा खून झालेला पाहून मी तुम्हालाच गुप्त पोलिस म्हणून नेमून त्या खटल्याची वाटेल त्या रीतीनं तुमच्या इच्छेप्रमाणे वासलात लावावी हे सुद्धा आम्ही नंतर ठरवलं होतं. सरलेनं आमच्या नकळत आपलं मत्यपत्र बदलल्यामुळं तम्हांला व मला मिळणाऱ्या पैशांच्या आड मधुकर आला, हे पाहतांच खुनाचा सर्व आळ त्यांच्याच अंगावर ढकलावा, हीसुद्धा तुमचीच कल्पना नाही का ?" 

" यांतून मला बाहेर पडलंच पाहिजे,” असें स्वतःशी पुटपुटत त्याने आपली नजर खिडकीकडे वळविली व तिकडे पाहतांच एकदम दचकल्यासारखे करून तो मोठयाने ओरडून म्हणाला, " ते पाहा, तें पाहा ! खिडकीतन कोण डोकावीत आहे तें ?" 

 

त्याच्या ह्या आकस्मिक भओरडण्याने भांबावून जाऊन त्या खोलीत सर्वोची नजर त्याने दाखविलेल्या खिडकीकडे वळली. त्यांना एक क्षणच गैरसावध स्थितीत पाहतांच रामसिंगानें मेजावरील एक जड वजन घेऊन जोराने समोरील कंदिलावर मारून आपण एकदम बाहेर पळत सुटला. वजन कंदिलावर आपटल्यामुळे तो विझून त्याच्या कांचचे एकदम तुकडे झाले व कंदिलावरून ते वजन निसटून जवळच उभ्या असलेल्या मास्तरांच्या कपाळावर आदळल्यामुळे त्याला मोठी खोंक पड़न त्या जखमेतून भळभळा रक्त वाहूं लागले ! वजन कपाळा वर आदळतांच एक मोठी किंकाळी फोडून मास्तर वेशद्ध होऊन धाडकन् जमिनीवर पडले. डोळ्याचे पाते लवतें न लवतें तोंच त्या खोलीत सर्व गोंधळ उडाला ! ! 

आपणास अशा अचानक रीतीने फसवून रामसिंग पळालेला पाहून कमळाकर मोठ्या वेषाने त्याचा पाठलाग करण्यासाठी तसाच बाहेर पडला, आणि मास्तरांची शुश्रूषा करण्यासाठी मधुकर घरांतच राहिला. आपल्याकडन होईल तितका जोर करून कमळाकर त्या कुरणांतन रामसिंगाच्या मागे पळू लागला. परंतु थोडी पावलें दूर गेला नसेल तोच एका झाडाच्या बुंध्याला अडखळून तो जमिनीवर आदळला. त्यामुळे त्याचे सर्वोग ठेचाळून गेले. अशी स्थिति झाल्यामुळे त्याने पोलिसांच्या भयाने रामसिंगाला दूर पळतां येणे शक्य नाही, असा विचार करून मास्तरांच्याच घरचा रस्ता धरला. 

रामसिंग जो घरांतून पळाला तो तसाच उघडाबोडका कुरणांतून सरोजिनीबाईंच्या घराच्या दिशेकडे पळू लागला. रस्त्यावरून उघडें बोडके पळाल्यास कदाचित् पोलिसांना संशय येईल म्हणून त्याने आपल्या सुरक्षिततेसाठी हीच वाट एकदम धरली. सरोजिनीबाईंचा बंगला येतांच त्याने कंपौंडांतून एकदम आंत उडी घेऊन बंगल्याची वाट धरली. त्याचा बेत आतां सरोजिनीबाईकडे जाऊन, तिची कृताप राधाबद्दल क्षमा मागून तिच्या माश्रयाला राहण्याचा होता. 

 

कंपौंडाच्या भिंतीवरून उडी मारून आत आल्यावर रामसिंगाने सरोजिनीच्या खोलीच्या खिडकीची वाट धरली. आपला हेतु साध्य करून घेण्यासाठी त्याने तिच्या बसण्याउठण्याच्या जागेची सर्व माहिती अगोदर करून घेतली होती. खिडकीपाशी येतांच त्याने ती प्रथम हळ हळ ठोकून पाहिली. आंतून कांहींच उत्तर येत नाही असे पाहून आंत काय चालले आहे ते समजण्याकरता त्याने खिडकीच्या बारीक फटीतून आंत पाहिले. खिडकी ठोकल्याचा आवाज ऐकतांच सरोजिनी एकदम उठून त्या दिशेकडे डोळे वटारून पाहत होती व तिचा एक हात उशीखाली गेला होता. आंतून उत्तर येत नाही असे पाहून रामसिंगाने पन्हा एकदा मोठथाने ठोकले. त्याला आतां कसला तरी आवाज ऐकू येऊ लागल्यामळे धीर होईना व त्याच्या चोरून येण्याचा सगावा लागल्यामुळे त्या बागेतला कुत्राही त्याच्या अंगावर मोठमोठ्याने भुंकन तटून पडण्याचा प्रयत्न करीत होता. 

"कोण आहे ते?" आंतन प्रश्न आला. 

"सरू, मी तो-आत्माराम. मला आत घे. मी अत्यंत संकटांत सांपडलों आहे.” __“ नाही. चालते व्हा इथून. नाही तर चोर चोर म्हणून सर्वांना 

ओरडून जागे करीन." आंतून उत्तर आले. 

परंतु रामसिंगाला आता मागे परतणे शक्य नव्हते. एक तर त्याला आपला जारीने पाठलाग होत आहे असे वाटत होते व खिडकीखाली भंकत असलेला 'बुल-डॉग' त्याच्या अंगावर उडी घेण्याच्या अगदी तयारीत होता. त्याने आंत घेण्याविषयी सरोजिनीची पष्कळ मनधरणी केली; परंतु तिने त्याच्या विनंतीस मुळीच भीक घातली नाही. शेवटीं संतापून जाऊन त्याने खिडकीवर आपल्या सर्व अंगाचा मोठ्याने प्रहार केला, त्याबरोबर खिडकीच्या सर्व कांचा खळाखळ फुटन खाली पडल्या व त्याचा आंत जाण्याचा मार्ग मोकळा झाला ! 

आत जाण्यासाठी रामसिंगाने खिडकी उघडून एकदम उडी मारली; त्याचा पाय जमिनीस लागतो न लागतो तोच संतापाने बेहोष झालेल्या सरोजिनीने आपल्या हातांतला सुरा एकदम त्याच्या पाठीत खुपसला ! एक भयंकर किंकाळी फोडून रामसिंग ऊर्फ आत्माराम त्याच क्षणी निचेष्ट होऊन जमिनीवर कोसळला.!! 

"खुनी ! बेरड ! ! दरोडेखोर ! ! ! काय पण धारिष्ट ! दरोडा घाला. यला आला होता!" सरोजिनीबाई वेड्यासारखे हातवारे करीत मोठमोठ्याने ओरडू लागल्या, “आता मला भीति नाही; हाः हाः ! वोलता बोलता त्यांच्या तोंडांतून फेसाचा लोळ येऊन त्याही रामसिंगा. च्याच शरीरावर धाडकन बेशुद्ध होऊन पडल्या. 

सरोजिनीबाईंची ओरड ऐकतांच शरयू वगैरे घरांतील सर्व मंडळी त्या खोलीत धावून आली. परंतु त्यांना खोलीत काय दिसलें ! राम सिंग रक्तबंबाळ होऊन पडलेला असून त्याच्या शरीरावरच सरोजिनीबाई गतप्राण होऊन पडल्या आहेत. कोणीही आत्मारामपंतांस ओळखले नाही, व सर्वोची समजूत दरोडेखोराशी लढतांनाच सरोजिनीला मृत्यु आला अशीच झाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel