गीरथी, मुलांची तोंडं जरा आतां बंद कर पाहूं. एक 

सारखी भांडत आहेत मर्षापासून, अन् गोंगाट तर इतका चालला आहे की, मला पुस्तक वाचायचं सुचू देत नाहीत मेली !" ___ "पण बाई, मी करूं म्हणून तरी काय ?" आपल्या कर्कश आवा जांत भागीरथी ओरडली, "तिकडे धुणी तशी पडली आहेत, भोर्डी तर घांसायचीच आहेत. उष्टं-खरकटं तर अजून काढलेलंच नाही; मग मी ते काम करू. की इकडे लक्ष देऊ ?' 

"काय ग तुमचा त्रास हा! मला नुसती छळून खाताहेत सगळी. ही सर्व अव्यवस्था पाहून नलिनी काय बरं म्हणेल ? तुमच्यानं जर ही कामं होत नाहीत तर मग नोकरीला तरी कां राहतां ग ?-आणि शरयू कुठं गेली आहे ?" 

" कमलाकरशेटना भेटायला कारखान्यांत गेली आहे." 

“ मला वाटलंच तें. मला काय होतं आहे, काय नाहीं; इकडे कुणा चंच मेलं लक्ष नाही. जो तो आपल्या सुखांत दंग! मी मरेना का इकडे मग. अव्यायी! काय ओरड ही! काय किंकाळ्या ह्या ! जशी मेली मसणवटीतील भुतंच ! ही कारटी माझं रक्त आटवण्याकरतांच मागं ठेवली आहेत ! थांब, जाऊ नको !” 

परंतु भागीरथीला आपल्या धनिनीचा 'पिरपिया' स्वभाव माहीत असल्यामुळे ती तेथे एक क्षणभरही थांबली नाही. सरोजिनीबाईनीं खूप हाका मारल्या व शेवटी तिला मनांतल्या मनांत शिव्या देत त्यांनी आपले पुस्तक वाचण्यास सुरवात केली. 

सरोजिनी लहान असतांना तिच्या वडिलांजवळ बराच पैसा होता. सरोजिनी ही त्यांची एकुलती एक कन्या असल्यामुळे त्यांनी तिला मॅट्रिकपर्यंत शिक्षण दिले. तोपर्यंत तिचे लग्न करण्याचा विचरासुद्धा त्यांच्या मनांत आला नाही. सरोजिनी तरुणपणी फार सुंदर दिसत असल्यामुळे पुष्कळ तरुमांचे डोळे तिच्याकडे वळत असत. बापाची एकुलती एक मुलगी असल्यामुळे सरोजिनीचा स्वभाव थोडासा हट्टी व एककल्ली बनला होता. सरोजिनी मॅट्रिक पास झाल्यावर व तिचे विसावें वर्ष संपल्यानंतर तिचा वाप तिच्यासाठी 'स्थळे' शोधू लागला. सरोजिनी ही जात्याच सुंदर असल्यामुळे व तिचे शिक्षणही थोडेबहुत झाले असल्याकारणाने 'स्थळे' आपोआप चालून येतील असा पहिल्याने त्यांचा समज झाला होता. परंतु अनुभवाअंती त्यांचे डोळे पुरते उघडले. मुलीच्या बापाला वरसंशोधनाला किती सायास पडतात हे त्यांना कळून चुकले. त्यांना आपल्या कन्येसंबंधानें वृथा अभिमान असल्यामुळे डोळ्यांदेखतच्या 'स्थळां'कडे त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलेले होते. परंतु मागाहून आपली चूक कळून येतांच त्यांना पश्चात्ताप झाल्याखेरीज राहिला नाही. असो. अशा रीतीने ते 'स्थ शोधीत .असतां त्यांच्या घराशेजारी, कॉलेजमध्ये जाणारा आत्माराम भवाने या नांवाचा एक विद्यार्थी येऊन राहिला. त्याला अविवाहित असलेला पाहतांच ते 'स्थळ' साधण्याची सरोजिनीच्या वडिलांनी खटपट चालविली. आत्माराम हा स्वच्छंदी व चैनवाज होता. त्याने सरोजिनी ही बापाची एकुलती एक मुलगी असून पुढेमागे बापाचा सर्व पैसा तिलाच मिळणार असें पाहून तिचें पाणिग्रहण करण्याचे कबूल केलें व थोडयाच दिवसांत दोघांचा विवाह झाला. लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आंतच सरोजिनीचे वडील विषमज्वराला बळी पडून इहलोक सोडून चालते झाले. अर्थातच त्यांची सर्व दौलत सरोजिनीला मिळाली. आपण मनांत योजिलेलें भविष्य इतक्या लौकर सफल झालेले पाहून आत्मारामाला आनंदाच्या गुदगुल्याच होऊ लागल्या ! 

पैसा मिळतांच अत्मारामपंत आपले गण उधळू लागले. दारू, बाहेर ख्याली, जुगार इत्यादि सर्व व्यसनांनी ते परिपूर्ण होते. सरोजिनीच्या पित्याने आपली सर्व संपत्ति तिच्या नावे केली असल्यामुळे आपल्याला लागणारे पैसे तिच्यापासून मागून घेण्याखेरीज त्याला गत्यंतर नव्हते. दिवसेंदिवस त्याची व्यसने वळावत चालली. लग्न झाल्यानंतर दोन वर्षांनी सरोजिनीला एक कन्यारत्न झाले, तिचें नांव शरयू. शरयूच्या जन्मानंतर एकदोन महिन्यांच्या आंतच पैसा न मिळाल्यामुळे अगर दुसऱ्या काही कारणांमुळे आत्मारामपंताने दुसरे लग्न केलें. सरोजिनीचें व त्याचे दर्शनही होईनासे झाले. 

बापाने मागे टेविलेल्या संपत्तीमुळे सरोजिनीच्या उपजीविकेचा प्रश्नच नव्हता. थोड्याच दिवसांनी तिनें १०२० डिलाइलरोड येथे एक स्वतंत्र बंगला घेऊन तेथे ती शरयूसह एकटीच राहू लागली. __ आत्मारामाला दुसऱ्या बायकोपासून सात मुले झाली, व शेवटी नवऱ्याच्या जुलमाला कुंटाळून ती बिचारी स्वर्गाला निघून गेली ! मरणापूर्वी तिने आपली मुले सरोजिनीच्या स्वाधीन केली होती. सरोजिनी स्वभावाने दयाळु असल्यामुळे व तिच्यावरही तसलाच प्रसंग आलेला असल्यामुळे तिनेही त्या मुलांना ठेऊन घेतले. अशा रीतीने आत्मारात हवा तसा स्वच्छंदाने वागण्यास मोकळा झाल व इकडे सरोजिनी मुलांसह कसेबसें आपलें जीवित कटू लागली. आत्मारामपंत तिच्या वाऱ्यालासुद्धा कधी उभा राहत नसे. वर दिलेला प्रसंग ह्या 

गोष्टीनंतर जवळ जवळ अठरा वर्षांनंतर आहे. अस्तु. 

शरयू आतां चांगली वीस वर्षांची झाली होती. दोन वर्षांपूर्वी सरोजिनीबाईंच्या मावशीचा भाचा कमलाकर महाले याने मुंबईला एक ' मोटर' कंपनी काढली होती. कमलाकर हा सरोजिनीवाईचा नातलग असल्यामुळे वारंवार त्यांच्या घरी येतजात असे. थोड्याच दिव सांत त्याचा त्या घरांतील सर्व मंडळीशी चांगलाच परिचय झाला. शरयूने त्याचे मन आकर्षण करून घेऊन आपले हृदयही त्याला अर्पण केले. त्यांचे एकमेकांवर बसलेले प्रेम पाहून सरोजिनीबाईंनाही त्यांचा जोडा पसंत पडला, व त्यांनी एका शुभ मुहूर्तावर वानिश्चय करून टाकला. 

वर दिल्याप्रमाणे सरोजिनीबाई भापल्या खोलीत पुस्तक वाचीत बसल्या होत्या. ती खोली चांगली व्यवस्थित अशी नसून जमिनीवर जागोजाग मुलांची खेळणी पडलेली होती, जमिनीवरील गालिचा जिकडेतिकडे दुडलेला, भिंतीवरील तसविरी वांकडयातिकड्या झालेल्या, मेजावर, खुर्योवर पुस्तकें अस्ताव्यस्त पडलेली, अशा त-हेची शोभा त्या खोलीत होती ! खोलीतून दिसणारे सृष्टिसौंदर्य मात्र बहारी, होते. परंतु खोलीत पसरलेल्या अव्यवस्थेमुळे मात्र त्या जागेची सर्व शोभा नष्ट झालेली होती. 

सरोजिनीवाई वाचीत असतां थोड्या वेळाने नलिनीने त्या खोलीत प्रवेश केला. तिला पाहतांच पुन्हा एकदा त्यांनी आपला शब्दांचा भडिमार करण्यास सुरवात केली. ___“काय ग नलिनी, तला शरयूबरोबर इतक्या गलिच्छ जागेत, जिकडेतिकडे अव्यवस्था आहे अशा घरांत राहयला तरी कसं 

आवडतं ग?" __ “ सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखी खपत असते, पण व्यवस्था म्हणून कशी ती मुळीच लागत नाही. अगदी त्रासून गेले आहे मी." __ " कसंही असलं तरी मला ही जागा आपली सुखदायक वाटते." नलिनी तेथील एका खुर्चीवर बसून म्हणाली, “ पण काय हो मामी, आज तुम्हांला कसं काय वाटतंय ?” 

___ “ मी जिवंत आहेसं मला वाटतं ! अग, रात्रभर मला झोप नसल्या मुळं मी सारखी तळमळत होते. त्यांत आणखी भयंकर स्वप्नांची 

भर." 

सरोजिनीबाईंचा स्वभाव अगदीच विचित्र होता ! सर्व दिघस आळ सांत घालवूनसुद्धा त्या आपण किती काम केले तरी व्यर्थ, असे भास वीत असत. त्या फारच आळशी बनल्या होत्या. त्यांना एका जागे वरून उठून दुसऱ्या जागी जाणे, म्हणजेसुद्धा फार त्रास वाटत असे! नलिनीला हा तिचा स्वभाव मुळीच आवडत नसे. परंतु ती तेथे पाहुणी या नात्याने राहिल्यामुळे व शरय तिची अगदी जिवलग मैत्रिण अस. स्यामुळे ती मुकाटयाने तेथील त्रास सहन करीत असे. सरोजिनीबाईचा स्वभाव जरी असा विचित्र होता, तरी त्या दयाळु, परोपकारी व इतर बाबतींत सुस्वभावी असल्यामुळे त्यांचे बोलणे कोणी मनावर घेत नसे. 

" मी आतां शरयूबरोबर बाहेर गेले होते,” थोड्या वेळाने नलिनीने बोलण्यास सुरवात केली, " ती कमलाकरांना भेटण्याकरतां त्यांच्या कारखान्यांत गेली आहे.” 

" तिला फिरायला जायला बरं सुचतं ! मी सकाळपासून संध्या काळपर्यंत एवढा त्रास भोगते, याचं तिला काही आहे का ? " सरो जिनीबाई एक दीर्घ सुस्कारा सोडून म्हणाल्या, “ ह्या सबंध वर्षात माझ्या अंगची नुस्ती हाडं राहिली आहेत !” __ हे तिचे भाषण ऐकतांच नलिनीला हंसूं लोटलें. कारण सरोजिनी बाई अंगाने इतक्या ला होत्या की, त्यांना आपलें अंग हालविण्यास फार त्रास वाटत असे. नलिनीला जरी हंसें आले, तरी ते आवरून ती म्हणाली, “खरंच मामी, तुम्ही आपल्या प्रकृतीचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. असे एकसारखे श्रम करून चालायचं नाही." 

"तूं इथं चुकतेस, नलिनी. मला माझ्या मलीकरतां व त्या काटोकरतां तरी स्वार्थत्याग केलाच पाहिजे. मी इतकी मरमर मरते, पण त्यांना त्याचं काहीच वाटत नाहीं !" 

सरोजिनीबाईंना आपले गुण दुसऱ्याजवळ वर्णन करून सांगण्याची फार सवय होती व त्या सवयीचा पाढा त्यांनी नलिनीजवळ गिर विण्यास सुरवात केली. __ " नलिनी," ती म्हणाली, “ मी लहान असून माझ्या बापाजवळ जेव्हा राहत असे तेव्हां मी किती तरी सुखी होते. माझी आई माझ्या वयाच्या दुसऱ्याच वर्षी मला सोडून गेली, तरीही त्या वेळी मी पूर्ण सुखी होते. असं दुःख पुढं भोगावं लागेल अशी कल्पनाही त्या वेळी माझ्या मनाला कधी शिवली नाही. पण ज्या दिवशी माझी माळ त्या मेल्याच्या गळ्यांत पडली, त्याच दिवसापासून माझ्या नशिबानं उलट खाऊन माझ्या दुःखाला प्रारंभ झाला." 

विषय फिरवण्यासाटी नलिनी म्हणाली, “ मामी, मला आजच रमाताईचं पत्र आलं आहे. तिनं मला दोन दिवसांत चौपाटीवर राहा. यला बोलावलं असल्यामुळं मला आतां तिकडे गेलं पाहिजे, तमच्या पाहुणचाराचा लाभ मी खप दिवस घेतला नाही का?" 

"-कां ?-इतके जास्त दिवस राहिलीस का तूं इकडे ? मला आतांशी आपल्याभोवती चार माणसं अरावी असंच वाटायला लागलं आहे." एक सुस्कारा सोडून सरोजिनीवाई म्हणाल्या, “ आतां माझं काय राहिलं आहे ! शरयू आता लवकरच कमलाकराची होईल व तोही तिला अनुरूप आहे; पण नली, हे ग काय ! तूं अशी मलूल कां दिसतेस ?" 

सरोजिनीबाईंचा हा अकस्मात आलेला प्रश्न ऐकतांच नलिनी जरा गोंधळली. नलिनी सुंदर व नाजुक दिसत असे. तिचा वर्ण गोरा असून, तिचे डोळे पाणीदार व तिचा चेहरा नेहमी सुहास्य असे. तिचा स्वभाव नेहमी आनंदी, उदार, प्रेमळ व घट्टेखोर होता. सरोजिनी वाईचा तो प्रश्न ऐकून तिने उत्तर दिले, 

___“ मला काही होत नाही, मामी; रात्री झोंप मात्र चांगली लागली नाही." 

“ याचे कारण स्वप्नं बरं !” सरोजिनीबाई ठासून म्हणाल्या, “ रात्री मला तुझ्याविषयी बरीच वाईट स्वप्नं पडली. मी तुला जेव तांना पाहिलं. कुणालाही जेवतांना पाहिलं की त्याला तें स्वप्न अपाय कारक होतं. तुझ्यावर काही तरी संकट येत आहे हे खास. 

" नको; आणखी त्याचा उल्लेख नको, मामी." नलिनी दचकून म्हणाली, " पण-पण माझा स्वप्नांवर विश्वासच नाहीं मुळी. " 

" तुझा स्वप्नांवर विश्वास नाहीं, नली, पण माझा आहे.” सरोजिनी बाई म्हणाल्या, “प्रत्यक्ष घडून आलेल्या गोष्टी मी स्वतः पाहिल्या आहेत. त्या जर तुला सांगत बसेन तर तूं त्या ऐकून थक्कच होशील ! काय ग, तूं काल रात्री बाहेर कुठं गेली होतीस ?" __ " कुठं नाही ग मामी, बागेतच फिरत होतें थोडा वेळ." 

" चांदण्यांत मधुकराचं चिंतन करण्याकरतां वाटतं ? ” असें सरो जिनीबाई तिची थोडी थट्टा करण्याच्या हेतूने म्हणाल्या. 

नलिनी हा प्रश्न ऐकतांच लाजली. तिचा कपोलप्रदेश आरक्त झाला. 

“एवढं लाजायला काय झालं त्यांत !" थोडा वेळ आठवल्यासारखें करून सरोजिनीबाई पुढे म्हणाल्या, " तो जरी नट असला तरी सुस्वभावी व सुशिक्षित आहे." 

" पण मामी, नटाचा धंदा कमी प्रतीचा आहे की काय ? " 

" बरोबर !” सरोजिनीबाई तिला खिजविण्याच्या हेतूने म्हणाल्या, " मी जरी तो धंदा वाईट म्हटला तरी तुझ्या मधुकरावरील प्रेमानं त्या धंद्याला उच्च प्रतीला नेऊन ठेवलं आहे ना ?" 

" पण ते सभ्य आहेत. इतर नाटक्यांप्रमाणं दारूबाज व इतर व्यसनांत गुरफटलेले नाहीत ते." 

"पण तुझ्या बहिणीला असं नाहीं ना वाटत ?' 

" नसेल ! " नलिनी रागाने म्हणाली, “ रमाताईच्या पसंतीकडे मला काय करायचं आहे ?” 

" तूं म्हणते आहेस ते बरोबर आहे, नली. पण तिच्या नांवावर बरीचशी इस्टेट आहे हे विसरूं नकोस ! " __“ बाबांनी जितकी मिळकत तिच्या नांवावर केली आहे तितकीच मलाही दिलेली आहे. आमचे आईबाप आमच्या लहानपणीच आम्हां दोघांना या जगांत एकटी ठेवून निघून गेले. तेव्हापासून आमच्या दोघांच्या इस्टेटीच्या येणाऱ्या व्याजावर आम्ही आमची उपजीविका करीत आहो. ” नालिनीला पुढे आपली हकीकत सरोजिनीबाईंना सांगण्यास संकोच वाटू लागला. सरोजिनीबाईंच्या शब्दांनी तिला आपल्या इच्छेविरुद्ध आपली हकीकत सांगण्यास प्रवृत्त केले होते, परंतु आपण हे काय करीत आहो असे तिचे तिलाच वाटून तिने ती पुढे सांगितली नाही. सुदैवाने त्याच वेळी सरोजिनीबाईंच्या मुलांची आरडा ओरड ऐकू येऊ लागली. ती कानी पडतांच सरोजिनीबाईंनी म्हटलें, ___ " काय द्वाड कारटी आहेत हीं ! मारामाऱ्यांशिवाय यांना दुसरं कांहीं सुचतच नाहीं ! नले, जरा जाऊन त्यांना गप्प कर पाहूं." __ तेथे बसण्याचा कंटाळा आल्यामुळे नलिनीलाही बाहेर जाण्यास काही तरी कारण हवेच होते. सरोजिनीबाईंची आज्ञा होतांच ती त्या, खोलीतून एकदम बाहेर पडली. 

नलिनी खाली गेली तेव्हा मुलांमध्ये भांडण चालले होते. एकमेकांना चिमटे काढणे व लाथांनी बडविणे व मोठमोठ्याने ओरडणे असा त्यांचा आकांत चालला होता. नलिनीने एकदम मध्ये शिरून त्यांना 

दूर करीत म्हटले, 

" रघू, सुमन, तुम्ही आपल्या लहान भावंडांना असं भांडूं देतां ? तुम्ही दोघं आतां इतकी मोठी झाला तरी आपल्या लहान भांवडांची भांडणं नाहीं का मिटवतां येत तुम्हाला? तुम्ही त्यांच्यात वडील आहांत." 

“ आम्ही काय करावं त्याला ?” सुमन म्हणाली, “ आम्ही काही त्यांना भांडायला सांगितलं नव्हतं. यांच्या गडबडीमळं माझा अभ्यास मात्र होत नाही.” 

" व माझाही आल्जिवा होत नाही." 

" मग तुम्ही इथं अभ्यास कां करतां ? शरयूच्या खोलीत का बसत नाही ?' नलिनीने त्यांना विचारलं. नलिनी आणखी पुढे बोलणार होती, परंतु तिला आपणास कोणी हाका मारीत आहे असा भास झाल्यामुळे तिने दचकून मागे पाहिले, तो शरयू तिच्याकडे घाईघाईने येत होती, असें तिला दिसून आले. 

“ नली ! नली !” शरयू ओरडत आली, “ एक भयंकर बातमी तुला सांगायची आहे.” __ " काय,-काय ग झालं ?" घाबरून नलिनीने विचारले. 

“ इकडून आणवलेली विलायतेची नवी मोटर काल रात्री कुणी चोरानं पळवली. पण त्याहून भयंकर बातमी म्हणजे, तुमच्या रत्न. महालांत खून झाला आहे ! आतांच ही बातमी मला त्यांनी सांगितली." 

" काय ? खून !” “ नलिनी तिचा हात घट्ट दाबीत म्हणाली, " कुणाचा ग ?" हा प्रश्न विचारतांना तिचे डोळे पाण्यांनी भरून आले व तिची छाती धडधडू लागली. 

" कुणा स्त्रीचा खून झाला आहे." 

“ स्त्री !'' सुटकेचा एक निःश्वास टाकून नलिनीने विचारले, "कोण ग आहे ती?". 

" तर कुणालाच माहीत नाही. तिचं प्रेत सफेत दिवाणखान्यांत सांपडलं. तिच्या गळ्याला मागं शस्त्र खुपसून तिचा खून केलेला आहे. हे सांगत होते की, ती अगदी तरुण असून दिसण्यांत सुंदर आहे व ज्यानं तिचा खून केला त्यानंच आपली मोटर पळवली असावी असं 'इकड'चं मत आहे. आतां तुला भेटण्यास इकडेच येणार आहेत.' 

“ मला भेटायला ! मला भेटायचं कारण ? यांतलं मला काहीं एक माहित नाहीं ! " 

नलीनी घाबरल्याप्रमाणे दिसू लागली. 

" ती स्त्री घरांत आली कशी ? " तिनें शरयला विचारले, “ तो आहे तरी कोण ?" - "अग, तेच तर गूढ आहे." शरयूने उत्तर दिले,"ते जेव्हां इथं येतील तेव्हां तुला खुनाची सर्व हकीकत कळेल. पण आईला मात्र यांतील काही एक सांगू नको हो ! नाही तर ती आणखी अकांडतांडव करायची ! गजाननराव भेटेपर्यंत गप्प राहणं बरं, असं यांचं म्हणणं आहे व पोलिसांनीही गजाननरावांना ताबडतोब येण्यासाठी तार केली आहे." 

" पोलिस ! शरयू , पोलिसपर्यंत हे प्रकरण जाईल का ग?" 

" अर्थातच ! कारण, एका पोलिसालाच तें प्रेत काल रात्री आढ ळून आलं.” 

" पण तो पोलिस घरांत शिरला कसा ?" नलिनीने विचारले, " घराला तर कुलुप आहे व कुणी राखणदारसुद्धा तिकडे नाही.” 

“सर्व हकीकत मला माहित नाही. कारण त्यांनी मला सर्व काही सांगितलं नाही. काय ग नली, " शरयू तिच्याकडे पाहत म्हणाली, " तूं काल रात्री तिकडे गेली होतीस ना ? ” । 

“ नाहीं ग.” चांचरत चांचरत नलिनीने थोड्या वेळाने उत्तर दिले, “ मी मधुकरांना भेटण्यासाठी तिकडे जाणार आहे, असं तुला सांगितलं होतं खरं, पण मी काही मग तिकडे गेले नाही. रमाताई आमच्या लग्नाला अडथळा आणीत आहे हे तुला ठाउक आहे ना ? म्हणून तर मला त्यांची चोरून भेट घ्यावी लागते. अर्थातच त्या बंद केलेल्या घरांत आमची भेट होणं शक्य नाही." 

"पण काल तझी आणि त्यांची भेट झाली का ग ? " शरय. सहजगत्या विचारले. 

" नाही. ते कदाचित् भेटतील असा विचार करून मी बागेच्या पलीकडे एका झाडाखाली अर्धा तास उभी होते. पण ते कांहीं त्या बाजूला आलेच नाहीत.” 

" तसं त्यांनी तुला वचन दिलं होतं का ? " 

"छे ग! सहज नशिबाची परीक्षा पाहण्याकरता म्हणून मी गेलें होतं. दुसऱ्या माणसानं नाटकांतलं स्वतःचं काम केल्यास निसटतां येईल अशा त्यांची समजूत होती. पण ते त्यांना करता आलं नसावं असं वाटतं." __“ माझीसुद्धा हीच समजूत आहे.” शरयू म्हणाली, " पण हा खून भयंकर आणि चमत्कारिक आहे, नाहीं ? ती स्त्री कोण आहे व त्या घरांत आली कशी याचा तर्कच होत नाही !' ___ " तेंच तर आश्चर्यकारक आहे. " नलिनी म्हणाली. तिचा चेहरा भीतीमुळे फिकट व चमत्कारिक झाला होता. “ शरय, मी काल रात्री बाहेर गेलें होतें तें तूं कमलाकरांकडे बोललीस का ? " थोड्या वेळाने तिने प्रश्न केला. ___ " नाहीं; ऐकलेल्या गोष्टीमुळे मी तर इतकी आश्चर्यचकित झाले, 

की ती गोष्ट मी साफ विसरून गेले. " __“ मग त्याबद्दल तूं कुणाजवळ काहीच बोलू नको. नाही तर रमाताई मला ते समजल्यावर फारच त्रास देईल.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel