सर्जेरावांना निरोप दिल्यानंतर गजाननराव तसेच घराबाहेर पडले. मधुकराकडून बोलावणे आल्याकारणाने ते त्याच्याकडे जाण्यास निघाले होते. मधुकराच्या घराजवळ गाडी येतांच, तो खिडकीत उभा राहून आपलीच वाट पाहत आहे असें गजाननरावांस आढळन आले. घरा समोर गाडी थांबताच त्यांनी गाडीभाडे चुकते केले व ते झटकन जिना चढून वर आले. वर येतांच मधुकराने त्यांचे अत्यंत प्रेमाने व आदराने स्वागत केले. मधुकराच्या मागे कमलाकर उभा होता. मधुकराप्रमाणे कमलाकराचीही मुद्रा गंभीर व शांत दिसत होती. 

" आपणास वेळेवर आलेले पाहून मला फार संतोष होत आहे." जवळच असलेली खुर्ची पुढे ओढून मधुकराने बोलावयास सुरवात केली. "ह्या कमळाकराला तुम्ही ओळखलंच असेल. तुमची व याची खुनाच्या चौकशीच्या दिवशी गांठ पडलेलीच आहे. आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. सरळ आपल्या कामाकडे वळतो.” 

“ कसलं काम बुवा, मधुकर ! तुम्हांला बहुतेक नलिनीची मागणी करायची असेल.” 

त्यांचे हे शब्द ऐकून मधुकराला अत्यंत आश्चर्य वाटले. तो म्हणाला, “ छे ! छे ! मी काही त्या कामासाठी तुम्हांला इथं बोलावलं नव्हतं." 

" असं." आपल्या खिशांतून एक सिगारेट काढून गजाननराव उद्गारले, "मला वाटलं रमे पाशी आपली रदबदली करण्यासाठी सांगा. 

एक गतकालीन हकीकत २०१ यला मला तुम्ही बोलावलंत." असे म्हणून त्यांनी आपली सिगरेट पेटविली. 

गजागनरावांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मधुकर म्हणाला, "गजाननराव, हे माझ्या हातात काय आहे ते ओळखतो का तम्ही ?" 

" नाही. काय आहे ते?" गजाननरावांनी दचकून विचारलें. “ सरलेची रोजनिशी." 

" रोजनिशी!" गजाननराव उद्गारले, या वेळी त्यांचा आवाज थोडा घोगरा झाला होता; “तुम्हांला तो कुठं मिळाली ?" __ "ही लपवून ठेवलेली होती.” कमलाकराने उत्तर दिले, “ सर लेच्या खनानंतर तिच्यासंबंधानं अगर तिच्या गताय यासंबंधानं कांहींच बाहेर येऊ नये म्हणून ज्यानं शांतिगृहांतील एकूण एक वस्तु नाहीशा करून टाकल्या, त्याला ही काही सांपडली नाही. पण आम्हांला मात्र हिच्या योगानं पुष्कळ गोष्टी सिद्ध करून दाखवतां येतील." 

गजननरावांनी थोडा वेळ विचार करून म्हटले, " तुम्ही वाचा यला सरवात करा. आंत काय लिहिलं आहे ते ऐकायला मी उत्सुक झाली आहे. पण सर्व वाचण्यापेक्षा मुद्याच्याच गोष्टी तुम्ही मलः सांगितल्यास ते बरं होईल.” 

मधुकराने नंतर अधिक वेळ न घालवितां हकीकत सांगावयास प्रारंभ केला. " गजाननराव," तो म्हणाला, “ सरला ही माझ्या चुलत्याची मुलगी,त्याप्रमाणं दांडेकर मास्तरांची ती मावस बहीण होती. मास्तरांच्या आईच्या बहिणीचं व माझ्या चलत्याचं पतिपत्नीचं नातं होतं. सरलेचं सर्व आयुष्य जवळजवळ एकलकोंड्याप्रमाणंच गेल्यामुळं तिनं आपल्या दिनचर्येची एक रोजनिशी ठेविली असून मरणापूर्वी घडून आलेल्या सर्व गोष्टी तिनं त्यांत नमूद करून ठेविलेल्या आहेत. एकलकोंड्याप्रमाणं म्हणण्याचं कारण की, तिचा पति व्यापारी असून त्याला आपल्या व्यापारानिमित्त देशोदेशी फिरावं लागे. त्याचं आड. नांव किनखापे असे असून तो सरलेसह लोणावळ येथील शांतिगृहांत राहत असे.लग्नापासून लिहिलेल्या ह्या तिच्या रोजनिशीवरून असं आढ ळून आलं की, तिच्या पतीला-माधवराव किनखाप्यांना-धंद्यानिमित्त नेहमी बाहेरगांवीं जावं लागत असे. पण त्यांच्या या सफरीमध्ये काही गौप्य असेल अशी शंकाही सरलेच्या भोळ्या मनाला न आल्यामुळं ती आनंदात होती. माधवरावांनी धंद्यांत मिळवलेले पैसे एका बँकेत ठेवले होते. काही दिवसांनी त्यांना व्यापारांत जसजशी वरकत येऊ लागली तशी त्यांनी सरलेपाशी, तिच्याकरतां एक स्वतंत्र बंगला बांधण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांत विशेष हेच होते की, त्या बंगल्यांत एक संपूर्ण सफेत दिवाणखाना आपण राखणार असं त्यानं तिला कळवलं होतं." 

___“ सफेत दिवाणखाना !” मिटलेले डोळे एकदम उघडून, चेहऱ्यावर जरा टवटवी आणून गजाननराव म्हणाले, " आतां या हकीकतींत मला मौज वाटू लागली खरी. कारण माझ्या बंगल्यांतही एक सफेत दिवाणखाना आहे." 

"होय. आणि बिचाऱ्या सरलेचा त्या दिवाणखान्यांतच खून झाला!" " पण तो कुणी केला?" गजाननरावांनी निर्विकार मद्रेने प्रश्न केला. 

" ते हळूहळू समजेलच. सरलेचा एक चुलतः श्रीमंत असून त्याची मिळकत सरलेलाच मिळणार होती. एक दिवस त्या चुलत्याकडून एक पत्र आलं त्यांत त्यानं सरलेला आपण आजारी असून आपला आतां काही भरंवसा नाही; त्यामुळे आपल्या एकंदर मिळकतीचं मत्युपत्र तिच्या नावं करून ठेवलेलं आहे, वगैरे मजकूर होता. त्याचं एकंदर 

उत्पन्न वार्षिक वीस हजारांचं होतं." __ "माधवराव पुढे सरलेचे ऐकेना. त्यांनी तिला ताबडतोब बंगला बांध ण्याचा आपला निश्चय कळविला व तेही आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे बांधणार असें तिला सांगून ते कसं काय बांधायचं, आंत कशी काय व्यवस्था ठेवायची याबद्दलही त्यानं तिला विचारले नाही; इतकंच नव्हे, तर तें घर कुठं बांधणार याचाही तिला पत्ता लागं दिला नाही. याच वेळी सरलेला असं दिसून आलं की, आपल्या 

नवऱ्याचं आपल्यावर पर्वीप्रमाणे प्रेम नाही. आणखी एक वर्षानं अशी एक चमत्कारिक बातमी आली की, सरलेच्या चुलत्यानं दुसरं लग्न केले असून त्याची सर्व मिळकत तिजपासून झालेल्या त्याच्या मुलांकडेच जाणार." ___ "ही बातमी कळल्या दिवसापासून माधवरावांचं तिच्यावरील प्रेम उडालं. ते तिच्याशी धड बोलेतात व पूर्वीपेक्षा अधिक दिवस बाहेर घालवू लागले. शेवटी याच्याही पुढे त्यांची मजल गेली. काही ना काही कुरापती काढून ते तिच्याशी भांडन तिला मारूही लागले. त्या वेळी सरलेच्या हृदयाचं पाणी पाणी होऊन जात असे, हैं तिनं स्वतःच्या रोजनिशीत लिहिलेल्या शब्दांवरून स्पष्टपणे व्यक्त होत आहे. शेवटी,जितकी ती पूर्वी सुखी होती त्याच्या अधिक पटीने दुःखी झाली. गेला जुलई महिना लागण्यापूर्वी थोडे दिवस अगोदर तिचा मावसभाऊ दांडेकर हा तिला भेटायला आला. ___ " तो कोणत्या कारणानं आला होता ?” गजाननरावानी मध्येच 

प्रश्न केला. __ "निव्वळ आपणास कुणी तरी जिवाभावाचं माणूस असावं म्हणून. तो सरलेप्रमाणं एकटा व दुःखी असा होता. अर्थात् त्या दोन समदुःखी जीवांची लवकरच मैत्री जमला. पण दांडेकर जरी तिजकड बऱ्याच वेळा येऊन गेला,तरी त्यानं माधवरावांना कधीच पाहिलं नाही. कारण त्या वेळी ते नेहमी फिरतीवरच असत. अशा रीतीनं तो दूर असतांना सरलेला एक पत्र आलं. त्यांत तिचा चुलता मरण पावला असन त्याची सर्व मिळकत तिलाच दिलेली आहे असं तिला कळवलं होते. पूर्वी त्याच्या लग्नासंबंधींची बातमी खोटी होती, सरलेला पैसे मिळाल्यानंतर काही दिवसांनी मास्तरांनी सरलेला असं कळवलं की, माधवराव हे तिच्या नवऱ्याचं मूळचं नांव नसून शिवाय त्यानीं दुसरं 

लनही केलं होतं." 

" याच वेळी माधवराव फिरतीवरून आले. सरलेनं त्यांना स्वतःला पैसे मिळाल्याची हकीकत कळवली व त्यांजवर दुसरं लग्न केल्याचा आरोप ठेवून त्याप्रमाणं त्यांना निक्षून विचारले. त्यांनी अर्थातच तें 

 

सर्व काही नाकबूल केलं. त्या दिवशी त्या दोघांचा भयंकर खटका उडाला व शेवटी माधवराव तें घर सोडून निघून गेले. ते गेल्यानंतर दांडेकर मास्तर तिला भेटायला आला. त्याला तिनं घडलेली हकीकत कळवतांच त्यानं, माधवरावांच्या दुसऱ्या लग्नाची हकीकत पर्ण खरी असल्याचं तिला शपथपूर्वक सांगन एक दिवस तिला त्याच्या दुसऱ्या घरी घेऊन जाण्याचं तिला वचन दिलं. मात्र त्यानं तिला माधवरावांचं दुसरं नांव कळवलं नाही. त्याच वेळी त्यानं सरलेला, तिच्या नवऱ्या. जवळ असणाऱ्या चावीसारखीच दुसरी एक चावी करून घ्यायला सांगितलं. कारण ज्या घरांत माधवराव राहत असत त्या घराच्या मुख्य दरवाजाला ती चावी लागली म्हणजे तें घर माधवरावांचंच यांत शंका राहिली नसती, असं त्याचं म्हणणं होतं. सरलेला मास्तरांचा हा बेत पसंत पड़न काही दिवसांनी माधवराव फिरून तिजकडे येतांच तिनं त्यांनी पश्चात्ताप झाल्यासारखं दर्शवलं व ते निद्रिस्त स्थितीत असतांच त्यांच्याजवळ असलेल्या चावीप्रमाणं दुसरी एक चावी तयार करून घेतली व तीच चावी तिनं मास्तरापाशी दिली. दांडेकरानं तिथन निघतांना तिला चोवीस तारखेला रात्री रत्नमहालांत आपणांस भेटण्या विषयीं बजावून तो तेथून निघन गेला." ___ या वेळी गजाननरावांची स्थिति एकदम चमत्कारिक झाली. त्यांचा अजूनपर्यंत टवटवीत व बेफिकीर असलेला चेहरा एकदम फिकट झाला व ते त्याच स्थितींत एकदम उठून, पुढचे ऐकण्याची आपल्या मनाची पूर्ण तयारी आहे असे जणूं काय दर्शवीत, त्या खोलीत जोरजोराने इकडून तिकडे फेया घालीत ओरडून म्हणाले, 

"हं, चालू द्या; पुढे काय असेल तें सर्व सांगा." 

"आतां याहूनही अधिक सांगण्यासारखं आहे, असं तुम्हाला वाटतं का? " आपल्या जागेवरून उठन मधुकर म्हणाला, " त्या ठरलेल्या रात्री सरला तुमच्या घरी, तमच्या रत्नमहालांत गेली. तिथं तिची व दांडेकरांची भेट झाली की नाही हे सांगता येणार नाही. ठरल्याप्रमाणं ती रत्नमहालांत नऊ वाजण्यापूर्वी थोडा वेळ त्या किल्लीच्या सहाय्यानं शिरली व जो सफेत दिवाणखाना तिच्या आवडीचा 

असून खुद्द तिजकरितांच म्हणून बांधलेला होता त्याच सफेत दिवाण खान्यांत-" 

" थांबा!" गजाननराव मोठयाने ओरडून म्हणाले, या वेळी त्यांचे ओठ रक्तहीन झालेले असून त्यांचा चेहरा अत्यंत फिकट दिसत होता. "तमच्या सरलेचा नवरा मीच आहे असंच तमचं म्हणणं आहे का ?" त्यांनी कांपऱ्या आवाजांत प्रश्न केला. __“ यांत काय संशय ! माधवराव, माझं म्हणणं तेच आहे. तुमचं नांव जरी गजाननराव हिवाळे असं आहे तरी तुम्ही निरपराध सरलेला माधवराव किनखापे असं खोटंच नांव सांगून फसवलंत, पहिल्या लग्नाची बायको जिवंत असतानांच तुम्ही पुन्हा दुसरं लग्न केलंत, या संबधी पुरावा पाहिजे असल्यास हा तुमच। न सरलेचा एकत्र काढलेला फोटो पाहा. तम्ही खोटसाळ, दगलबाज; आणि-" __ “खनी ! तो शब्द बोलण्यास ऐवढा वेळ का लावता ! बोलन का टाकीत नाही ?” 

" होय. तुम्हीच खनी! ती विचारी पेटीवर बसली असतांना तिच्या नाजुक मानेंत सुरा खुपसून तिच्या निरपराध रक्तानं हात विटाळणारे गळेकार तुम्हीच-" __ " साफ खोटं ! साफ खोटं !! सरलेचा खून मी केला नाही.” एक अस्पष्ट किंकाळी त्यांच्या तोंडून बाहेर पडली व दोन्ही हातांनी त्यांनी आपला चेहरा झाकून घेतला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel