सरलेची मिळकत आपणास मिळणार या आशेच्या जोरावर दांडेकर मास्तरांनी हवेत सुखाचे किती तरी मनोरे बांधले होते ! पण मधुकर सरलेचा वारस झाला हे कळल्यावर ते सर्व धडाडून खाली कोसळले. दांडेकरांना त्या दिवसापासून एकच चिंता लागून राहिली होती. मधुकराचा सूड आपणास कसा उगवतां येईल याचा ते विचार करीत होते. आजही आपल्या खोलीत ते विचार करीत बसले असतां आत सीता आली. 
सीता ही एका गरीब ब्राह्मण घराण्यातील मुलगी असून रमाबाईकडे ती लहान मुलांना संभाळण्याचे काम करी. 
" मी आपल्या विचाराच्या आड आले म्हणून आपल्याला राग नाही ना आला?" आंत येतां येतां तिने दांडेकर मास्तरांस विचारले. 
"छे! छे! छे! असं मुळीच नाही." सीता आपल्या खोलीत ! आपण स्वप्नांत तर नाही ना, असा त्यांना भास झाला. तोंडावर हास्य झळकवीत ते म्हणाले, “आज कुठं गरीबाघरी धूळ झाडण्याचं आठवलं?" 
" इश्श ! बायकांना कामापुरतं असं हरभऱ्याच्या झाडावर चढवा यची मेली पुरुषांची रीतच असते." ___ परंतु आमच्या मास्तरांना सीतेच्या आगमनामुळे जणू हर्षाचा मट काच माल्यामुळे त्यांना तिचे वाक्य पुरतेपणी ऐकू आले की नाही कोणास ठाउक ! सीता आंत येतांच त्यांची अत्यंत धांदल उडाली. तिला किंचितही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी तेथेच जरा दूर असलेली खुर्ची एकदम पुढे ओढ़न तिला बसावयास दिली. ती खुर्चीवर बसतांच मास्तरांनी जरा धांवतच जाऊन, तिला कदाचित् उष्म्यामुळे त्रास होईल म्हणून त्या खोलीला असणाऱ्या दोन खिडक्या झटपट उघडून टाकल्या व आपल्या मेजाचा खण उघडून त्यांतून, नुक्ताच विकत घेतलेला एक सुरेखसा घडीचा पंखा वारा घेण्यासाठी तिच्या हातांत दिला. अशा रीतीने सीतेची बाहेरील सुखसोयींची व्यवस्था लागल्यावर ते तिच्याजवळ येऊन थोडे हसंतच म्हणाले, 
"आलों हं ! फक्कडसा चहा बनवून घेऊन येतो." असे म्हणून ते धावतच आंतल्या खोलीत गेले. ___ आपल्या सुखासाठी एवढी त्यांची खटपट पाहून सीतेलाही एक 
प्रकारे आनंदच झाला, व तिला थोडासा अभिमानही वाटला. 
" खरोखर, आज तुझ्या येण्यानं माझ्या घराला किती शोभा आली आहे, याची तुला बिलकुल कल्पना करता येणार नाही.” ते हंसत हंसत सीतेकडे पाहत म्हणाले. 
"होय, मलाही दिसते खरी !” ती थट्टेच्या स्वराने म्हणाली, "पण-- पण मला वाटतं, आणखी काही दिवसांनी या घराला याहीपेक्षा अधिक शोभा येईल, नाही ?" 
" कुणी सांगावं ! कदाचित् येईलही, कदाचित् येणारही नाही ! लक्ष्मी कुणावर केव्हां कृपा करील याचा काही नेम नसतो. पण यदा कदाचित् मी जर श्रीमंत झालो, तर काय करीन माहित आहे का ?" 
" काय ? हं, समजलें. एखादी फटाकडी तरुणी आणून तिच्याबरोबर मोठया मजेनं संसार थाटाल, होय. ना ! " बाहेरून हंसतच, पण मास्तर काय उत्तर देतील याची मनांत में ति वाटून सीता म्हणाली, "बहुतेक पुरुषांचं असंच असतं." 
“पण-पण आमच्यासारख्यांना मुलगी देतो कोण ? " सीतेच्या मनांत काय असावे हे जाणण्याकरिता मास्तरांनी भीतभीतच विचारले.. 
" कां बरं ? आपल्यासारख्यांना मुलगी मिळण्याची पंचाईत ! अगदीच अशक्य." 
" खरंच का तुला असं वाटतं ?" सीता कदाचित् स्वतःविषयीं म्हणत असावी असें वाटल्यामुळे चेहरा खुलवून मास्तर म्हणाले, " मी कांहीं अगदी तरणाबांड नाहीं; शिवाय माझी गरिबीची स्थिति, व मोठेपणाच्या नांवानं पूज्य अशी स्थिति--" 
" पण शिक्षक ही सुद्धा मानाचीच पदवी नाही का ?. शिवाय आपण चांगल्या कुळांतील आहां हे काही थोडं नाही." 
" होय, खरं आहे." मास्तर खिन्न अंतःकरणाने म्हणाले, "पण नसतं उच्च शील काय जाळायचं आहे ! हातांत पैसे नाहीत, तर कुळाला विचारतो कोण ? मी श्रीमंत असतो तर--" .. 
पण सीतेच्या मनांत काय होते हे तिच्या चेहऱ्यावरून व हालचाल करणाऱ्या डोळ्यांवरून मास्तरांनी जाणले. तिच्या मकवृत्तीवरूनही त्यांनी जसे तिचे हृद्गत जाणले होते, तसेच मास्तराचें मनही चाणाक्ष सीतेने ताबडतोब ओळखलें. 
मास्तर झटकन् पुढे झाले व तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाले, “सीते, खरं सांग, तुझं मजवर प्रेम आहे का ?" .. , . 
"'इश्य ! हे काय असलं भलतंच विचारणं ?" सीतेने लाजूनच उत्तरायी प्रश्न केला. तिचा हात अद्याप मास्तरांच्याच हातांत होता: "पण तुमची स्थिति-" पुढे बोलण्यास तिला धीर न झाल्यामुळे ती नुसती मास्तराकडे पाहू लागली. - "होय, सीते, माझी स्थिति गरीबीची आहे." मास्तरांनी वाक्य पुरे केले. परंतु याच वेळी एक विचार त्यांच्या मनांत आल्यामुळे त्यांना विशेष आनंद झाल्यासारखे दिसले. ते पुढे म्हणाले, " सीते, तुझी इच्छा असेल तर मला श्रीमंत होतां येईल.” 
" म्हणजे ! आपल्या बोलण्याचा अर्थ मी नाही समजलें.” 
" सीते, खरं सांग, पैसे मिळवण्यासाठी मी सांगेन तें तूं ऐक शील का?" 

" आपल्या मनांत आहे तरी काय ? " तिने घाबरून विचारलें. 
" माझं म्हणणं एवढेच की, तूं जर मनांत आणलंस तर मी कदा चित् कैक हजारांचा मालक होईन." 
" माझ्या हातून विशेष ते काय होणार ?" तिने मास्तरांना उत्तर दिले. ___ मास्तर आपली जागा सोडन येरझारा घालू लागले. फिरता फिरतां 
काही वेळाने त्यांनी विचारले, 
" रत्नमहालांतील खन तुला आठवत असेलच !" "हो." अस्पष्ट आवाजांत सीता म्हणाली. 
" मग ऐक तर. जिचा खन झाला ती माझी आतेबहीण. तिनं माझ्या नावं वार्षिक दहा हजारांची मिळत करून ठेवली होती. पण या मधुकरानं काही ना काही प्रकारे तिचं मन वळवलं व जी मिळकत वास्तविक मला मिळायची ती सर्व आपल्या नांवानं करून घेतली. तेव्हापासून मी मधुकराचा अत्यंत द्वेष करतो. पण आता काही झालं, तरी सर्व मिळकत मला एकटयालाच मिळणं शक्य नाही. तेव्हां त्यांतली अर्धी तरी मला मिळालीच पाहिजे. नीट ऐक.-बऱ्याच कारणां मुळं हा खन त्या मधुकरानंच केला आहे अशी माझी खात्री झाली आहे.-थांब, अशी दचकू नको-मी त्याची कृत्यं चवाठयावर आणूं नये, भशी मधुकराची इच्छा असली, तर त्यानं मला आपल्या मिळकतींतून वार्षिक पांच हजार रुपये करारनाम्यानं लिहून द्यावे, असा प्रयत्न मी करणार आहे व तो खन त्यानंच केला हे सिद्ध करायला जर तूं मला मदत करशील तर माझा बेत उत्तम रीतीनं तडीला जाऊन मग तूं व मी लम करून मोठया थाटानं राहूं. बोल, आहे कबुली ? " __ सीतेला मास्तरांचे म्हणणे बहुतांशी पटले असावें असें तिच्या चेहऱ्यावरून दिसू लागले. मास्तरांना जर वार्षिक पांच हजार मिळत असले, तर तेवढया रकमेत आम्हा दोघांनाही जन्मभर किती तरी सुखांत राहता येईल.पैशांच्या कल्पनेने तिला किती तरी हर्ष झाला होता. 
" मी बाई यांत मदत ती कसली देणार ?" तिने मास्तरांना विचारले. 
दांडेकरांचे प्रियाराधन ! १८५ " सहज देता येईल. तूं खटल्याची हकीकत वर्तमानपत्रांतून वाचली आहेस?" 
" होय. पण त्यांत मधुकराचं नांवसुद्धा नव्हतं." 
" ऐकून घे. त्या रात्री पोलिसहवालदाराबरोबर बोलत राहणारा तरुण गृहस्थ मधुकरच होता. तो ज्या वेळी रत्नमहालातून बाहेर पडला त्या वेळी सरलेचं प्रेत रत्नमहालांतील सफेत दिवाणखान्यांत पडलेलं असन पोलिसाला मधुकराचा कोणत्याही प्रकार संशय होऊ नये म्हणन बंगल्यांत एक बाई गात होती. त्या बाईचा आवाज जवळजवळ रमा बाईच्या आवाजासारखाच असून ती जे गाणं गात होती, तेही रमा बाईच्याच आवडीचं होतं.” 
तरीही सीतेच्या डोक्यात नीटसा प्रकाश पडेना. " पुढं ?" तिने सहज म्हणून मास्तरांना विचारले. __ " पुढंऽऽ ! " मास्तरांनी पुन्हा तेच शब्द उतावळीपणे उच्चारले. " मी इतकं सांगितलं तरी त्याचा परिणाम तुझ्या मनावर काहींच का झाला नाही ? मी सांगितलं तें तुला समजलं का?" 
"हो." 
“ रमाबाई त्या वेळी चौपाटीवर होती असं म्हणतात. पण त्या 'पुराव्याची मला गरज नाही. रमाबाईकरता आपण काही तरी केलं असन ते आपण कुणाला सांगन तिचा विश्वासघात करणार नाही, असं जें तूं रामसिंगाजवळ बोललीस तें काय, ते मला समजलं पाहिजे. तिच्याकरतां तं काय बरं केलंस?" . “ रमाबाई त्या दिवशी," सीता म्हणाली, “ रत्नमहालात आली 
होती." 
- "आतां सर्व हकीकत सांग पाहूं;" अधीर स्वरांत मास्तर म्हणाले. 
सीतेनेही मग विशेष आढेवेढे न घेता बोलण्यास सुरवात केली. 
"आम्ही जेव्हां चौपाटीवरील बंगल्यांत होतो, तेव्हां रमाबाईच्या 'मनाला कसला तरी त्रास होतो आहे असं मी तिच्या चर्चेवरून जाणलं. दिवसेंदिवस ही तिची स्थिति वाढतच चालली, त्यामुळे त 

अतिशय चिडखोर बनन आम्हां सर्व नोकरलोकांना फार त्रास देऊ लागली. विशेषतः ती आपल्या नवऱ्याबरोबर फारच भांडू लागली." ___" चोविसाव्या तारखेला म्हणजे खून झाला त्या दिवशी गजानन रावांना एक पत्र आलं, त्या पत्रांत काही तरी तसंच चमत्कारिक असावं असं वाटतं; कारण तें पत्र वाचतांच त्यांची मद्रा एकदम कावरीबावरी होऊन त्यांचा चेहरा अगदी फिक्कट झाला. पत्र वाचन होतांच ते त्यांनी आपल्या खिशांत कोंबलं. त्या वेळी रमाबाईही खोलीतच असत्यामुळं त्यांच्या काकदृष्टीला गजाननरावांची ती स्थिति आल्यावांचून राहिली नाही. पण ती त्या वेळी मात्र काहीं एक बोलली नाही. पण मी खोलीं तून बाहेर पडतांच मात्र त्यांची त्या पत्रावरून बरीच बोलाचाली झाली असावी असं वाटतं; कारण त्यानंतर सर्व दिवस रमाबाई रागांतच होत्या व गजाननराव आपणास बरं वाटत नसल्याचं सांगन त्या दिवशी सर्व दिवस ते आपल्या खोलीतच झोपून राहिले होते. जवळजवळ संबंध दिवस रमाबाई त्यांच्याच खोलीत बसून होती. सहा वाजण्याच्या सुमारास ती त्यांच्या खोलींतन बाहेर आली व बाहेरच गजाननरावांचा नोकर बसला होता, त्याला तिनं, गजाननराव आजारी असल्यामुळं त्याला कुणीही त्रास देता कामा नये असं बजावून तिकड़न घालवन दिलं. नंतर ती मजजवळ आली व तिनं आपलं लुगडं मला नेसायला सांगितलं. काही अत्यंत जरू रीच्या कामाकरता बाहेर जायचं असल्यामुळं आपण फिरून येईपर्यंत दिवाणखान्यांत बसून राहण्याची तिनं मला ताकीद दिली. त्याच वेळी आपण बाहेर गेलो आहों हे कुणालाही समजतां कामा नये, असंही तिनं मला बजावून ठेवलं. रमाबाईच्या भावाची व्यापारी पेढी असून त्यांत गजाननराव भागीदार आहेत. पण त्यांचं सर्व काम रमाबाईच पाहते, त्या कामाप्रीत्यर्थ पुष्कळ वेळां ती आपल्या बंधूला भेटायला जात असते. त्याचप्रमाणं ती त्या दिवशीही बाहेर पडली असावी असं मला वाटलं. तसंच तिनं आपली वस्त्रं मला नेसायला दिली, त्या अर्थी गडी माणसांनी व गजाननरावानीही मलाच रमाबाई समजावं असा तिचा हेतु असावा. आणि त्यावरूनच आपल्या नवऱ्याच्या 
नकळतच ती तिकडे जात असावी असा मी तर्क केला. मी कुणालाही ती हकीकत कळवू नये म्हणन तिनं मला त्या वेळी पुष्कळ पैसेही दिले. 'मला चाकरमाणसं ओळखणार नाहीत, पण जर गजाननरावांनी हाक मारली, तर काय करणार ? ' ही माझी शंका मी तिच्या कानीं घातली; पण 'आपण त्यांना झोपेचं औषध दिलं असून त्यामुळं ते लौकर जागे होणार नाहीत, असं सांगन तिनं माझी भीति दूर केली. त्या दिवशी तिनं सर्व गडयांना लौकर रजा दिली; त्यामुळं मला कसला त्रास राहिला नाही. मी रमाबाईंची वस्त्रे नेसून दिवाणखान्यांत डोळ्यांसमोर पुस्तक धरून बसलें व ती सहाच्या सुमारास बाहेर पडली." 
" तो परत आली, त्या वेळी किती वाजले होते ? " " तरी त्या वेळी मध्यरात्र टळून गेली असावी." " त्या वेळी ती त्रासल्यासारखी दिसत होती का?" 
" मुळीच नाही. आल्यावर तिनं आपल्यामागं काही घडलं नाही अशी मजकड़न खात्री करून घेतली व नंतर मला झोंपायला जायला सांगितलं. ती मात्र ताबडतोब झोपली नाही. कसले तरी कामाचे कागद पाहत बसली होती.” 
" पण तुला कसलाच संशय आला नाही ?" 
" यत्किंचितही नाही." सीतेने अगदी निश्चयात्मक स्वराने उत्तर दिले, " रत्नमहालांत त्या रात्री म्हटलेले गाणे तिच्या आवडीचे असन ते म्हणणा-याचा आवाजही तिच्या आवाजासारखाच होता हे आपल्या कडून कळेपर्यंत मला कोणताच संशय आला नाही. ___ “ अस्सं! " दांडेकर मास्तर विचार करीत म्हणाले, " तें कांहीं असो. पण त्या रात्री रमाबाई रत्नमहालांत आली होती हे खास. पण काय ग, तिला मोटर हाकता येते काय ? 
" होय. एकदा तिला मोटर हाकतांना मी पाहिलं होतं." __ " मग तर निःसंशय तीच ती. कमळाकराच्या मोटरीत बसून नंतर ती ठाणे स्टेशनवर गेली व तिथून शेवटच्या गाडीनं घरी गेली. कमकाकराचीही कल्पना अशीच आहे असं रामसिंग म्हणत होता. सर लेचा खून कुणा स्त्रीनंच केला, असं कमळाकरचं मत आहे. ह्या तुझ्या पुराव्यानिशी आपण रमाबाईला कचाटीत धरूं या." 
"पण तुम्ही आता काय करणार?" थोड्या वेळाने सीतेने विचारले, 
" करणार काय ? " मास्तर हंसत हसत म्हणाले, " आता मधु. कराकडून वार्षिक पांच हजार ठरवून घेणार, व त्याने नाकबूल केलंच तर त्याला व रमाबाईंना पोलिसांत गुदरणार. तुझ्या साक्षीमुळं तिला कांशीची शिक्षा व त्याला जन्मठेप मिळालीच पाहिजे!" 
कॉफीचा डाग खुनासंबंधी काही महत्त्वाचे धागे लोणावळ्यासच राहिल्याने लागतील असें वाटून कमळाकराने शांतिगृहांतच राहण्याचे ठरविले होते. बरेच दिवस भाडेकरू मिळत नसल्यामुळे शांतिगृहाच्या मालकानेंही मोठया 
आनंदानें कमळाकरास ती जागा भाडयाने दिली होती. __ आज शांतिगृहाच्या दिवाणखान्यांत विचार करीत तो बसला होता. आदल्या दिवशी सकाळी सरोजिनीबाई व शरयू लोणावळ्यास येऊन त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा मुंबईस परतली होती. सरोजिनीबाईनी आणलेल्या माहितीने कमलाकर आश्चर्यसागरांत बुडून गेला होता. दोन दिवसांपूर्वी सरोजिनीबाई आपल्या खोलीत कादंबरी वाचीत असतां इतकी वर्षे परागंदा असलेला तिचा पति आत्मारामपंत याची आकृति तिने खिडकीच्याबाहेर उभी असलेली पाहिली होती व त्या वेळी सरोजिनीबाई घाबरून मोठ्याने ओरडल्यामुळे आत्मारामपंत पुन्हा अदृश्य झाला होता. आत्मारामपंताला पाहिल्यापासून सरोजिनीबाईची मनःस्थिति ताळ्यावर नव्हती. 
आणि याच गोष्टीचा विचार कमळाकर या वेळी करीत होता. इत क्यांत दुरून मधुकराची स्वारी येतांना त्याच्या दृष्टीस पडली. मधु कराला पाहतांच कमळाकर उठून बाहेर आला व तो जवळ येताक्षणी म्हणाला, " काही विशेष बातमी ?" 
" तीच सांगायला मी इथं आलो आहे,” असे म्हणून मधु कराने आपल्या कोटाच्या खिशांतून एक कागदाचा चिटोरा बाहेर 

काढला. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती. " जर तुला माझी मिळकत मिळाली तर ज्या जागी कॉफीचा डाग पडलेला असेल त्या जागेखाली नीट निरखून पाहायला विसरू नकोस." हीच ती ओळ होती. कमलाकराने ती ओळ एकदोनदा-अनेकदा वाचली; परंतु त्या पासन त्याला विशेष असा बोध होईना. "मधुकर, हे काय आहे ?" त्याने थोड्या वेळाने प्रश्न केला. 
" हा कागद मला आज सकाळीच सॉलिसिटर कादर यांजकडून मिळाला, मजकूर सरलेच्या हस्ताक्षरांतील आहे,” मधुकराने शांत. पणे उत्तर दिले, "तकडा पाकिटांत बंद केलेला असन, त्यावर माझं नांव होतं. या सूचनेचा अर्थ काय असावा हेच माझ्या ध्यानात येत नाही.” __“ पण मला या सूचनेचा अर्थ चांगला समजला आहे. आपला खन होणार याची सरलेला पूर्वी माहिती होती. " मधुकराच्या विस्मयचकित मुद्रेकडे नजर न देतां कमळाकर पुढे म्हणाला, “ नाहीं तरी ही चिठी तुला तिनं लिहिली नसती. आतां प्रथम या घरांत कॉफीचा डाग कुठं पडलेला आहे की काय हे प्रथम पाहिलं पाहिजे." __ " एकूण आपला खून होणार असं तिला वाटत असल्यामुळं आपस्या गतायुष्यावर काही तरी उजेड पाडतील असे काही कागदपत्र अगदी गुप्त अशा जागी तिनं लपवून ठेवले असावेत असंच तुझं म्हणणं 
आहे ना?" __ " अरे, नुसतं म्हणणंच नाही, तर तशी पूर्ण खात्री आहे.” कमळा कर म्हणाला, "चल, उठ अगोदर; आतां लागलंच पाहिजे शोधाला !" ___ मधुकर न उठतांच म्हणाला, "व्यर्थ भरमसाट शोध करीत बसण्या पेक्षा आधी तसा डाग कुठं असू शकेल, याचा विचार आपण केला पाहिजे. कॉफीचा डाग असू शकेल अशी सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे 'टेबलक्लॉथ'--" ___ "हो! पांढऱ्या कापडावर तसा डाग असं शकतो; पण अशा ठिकाणी तिनं ते कागद लपवले असतील असं मला काही वाटत नाही. सर्व कपडे मी यापूर्वीच उलथून पाहिले आहेत. पण त्यापासून 

माझा काहीच फायदा झाला नाही. अरे ! पण वेड्यासारखा असा त्या छताकडे काय पाहत राहिला आहेस? त्या ठिकाणी काही कॉफीचा डाग असणं शक्य नाही. " कमळाकराने थट्टेच्या स्वराने म्हटले. 
___" तिथं नसेल, पण एखाद्या भिंतीवर असणं शक्य आहे." मधु करानें गंभीर स्वरांत उत्तर दिले. ___ "कॉफीनं भरलेला प्याला तिच्या नवऱ्याने तिच्या डोक्यावर फेकला असला, तर कदाचित भिंतीवर तसा डाग असू शकेल बवा. पण तसाही डाग असला, तरी भिंती पोखरून आंत कागद ठेवायचे पूर्वीचे दिवस आतां नाहींत. नाही तर खटका दाबला की एखादी फळी बाजूला होऊन पोकळीत ठेवलेले कागद दिसतील अशी समजूत व्हायची. कदाचित् तसा डाग खालच्या गालिच्यावरही असायचा संभव आहे." 
दोघेही त्या उद्योगाला कसन लागले. त्यांनी त्या गालिच्यावर असलेल्या सर्व वस्तु हालविल्या, बाजाची पेटी हालवन पाहिली, परंतु त्यांना काहीच आढळन आले नाही. नंतर मेजें, खुर्त्या व इतर वस्तही त्यांनी बाहेर काढून बराच वेळ अत्यंत बारकाईने पाहिल्या. परंतु शेवटी त्यांची निराशाच झाली. सर्व वस्तु बाहेर काढूनही जेव्हां कॉफीचा डाग कुठेच दिसेना, तेव्हां निराश होऊन तो उद्योग सोडून देण्याच्या बेतांत ते होते. परंतु इतक्यांत दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यांत गालीच्या वर ठेवलेल्या एका लहानच लांकडी पुतळ्याकडे त्यांची नजर गेली. तत्क्षणीच त्यांनी तो पुतळा जागचा हालविला. तोंच त्यांना त्याखाली अगदी लहान असा एक कॉफीचा डाग दिसून आला. तो पाहतांच दोघांचीही कळी खुलली ! कमळाकराने ताबडतोब खिशांतून चाकू काढून त्याखालची जमीन खणन पाहिली. थोडेसें वणतांच त्यांना एक लहानसें हिरव्या कव्हराचे पुस्तक आढळून आले. त्यावर “ माझी रोजनिशी” अशी अक्षरे लिहिलेली होती. ___“ यावरूनच ह्या रहस्यावर प्रकाश पडेल.” असें म्हणून कमळा कराने आनंदाच्या भरांत मधुकराच्या पाठीवर थाप मारली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel