कमळाकर व मधुकर हे दोघेही निर्विकार स्थितीत खुर्चीवर पडलेल्या गजाननरावांकडे पाहत स्तब्ध उभे होते. गजाननरावांचे सर्व शरीर भयाने थरथर कांपत होते व त्यांचा चेहरा भीतीने अगदी काळा ठिक्कर पडला होता. त्यांच्या त्या वेळच्या एकंदर स्थितीवरून व त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असलेल्या प्रेतकळेवरून गजाननरावच अपराधी असावेत याबद्दल आतां तिळमात्रही संशय घेण्यास जागा नव्हती. ___ " थोड्या वेळाने गजाननराव म्हणाले.” " कमळाकर ! एक क्षणच माझं ऐका. शपथ घेऊन मी सांगतो की, मी सरलेचा प्राणघात मुळीच केला नाही." 

" ती तुमची पत्नी होती हे तरी तुम्हांला कबूल आहे का ?" ''हो-होय." " आणि ती तुमच्या घरी-रत्नमहालांत आली होती हैं ?" " होय.” " आणि तुमची व तिची रत्नमहालांत भेट झाली की नाही ?" 

" होय. पण ती मृतवत् स्थितीत असतांना; रत्नमहालांत मी तिला पाहण्यापूर्वीच तिची प्राणज्योत विझून गेलेली होती." 

"हे साफ खोटं आहे" कमलाकराने त्यांच्या म्हणण्याच्या प्रतिकार करण्याच्या हेतूने साफ या शब्दावर जोर देऊन म्हटले. 

" नाही, हे खोटं नसून अक्षरशः खरं आहे."

 

" साफ खोटं. जीव वाचवण्याकरता तुम्ही खोटं बोलण्याचं धाडस करीत आहां. अपराध केलात खरा. मग आतां असा भ्याडपणा कां ? चांगले शूर धीट माणसासारखे वागा ! तिच्यापासून आपली सुटका करून घेण्यासाठी तुम्ही तिचा खून केला की नाही ? " ___ " नाहीं; अगदी शपथपूर्वक सांगतो, की मी तिला मारलं नाही. कमळाकर, एवढं घसाफोड करून सांगत असतांनाही तुमचा माझ्या शब्दांवर कां बरं विश्वास बसत नाही ? सरला माझी पत्नी होती खरी, पण मी तिचा खन केला नाही." __ " तुमचं पूर्वी लग्न झालेलं आहे हे रमाबाईंना माहित आहे काय ?" कमळाकराने विचारले. 

" नाही." " त्या रात्री तम्हीं चौपाटीवरून रत्नमहालांत का आला होतां?” 

" कारण २४ तारखेला सकाळीच मला सरलेकडून एक पत्र आलं, त्यांत तिनं आपणास माझं घर माहित असून त्याच रात्री रमेला भेटावयास स्वतः रत्नमहालांत येणार असं तिनं मला स्पष्ट कळवलं होतं व मीही त्या वेळी बाहेर न जातां घरीच राहावं म्हणजे खरं काय ते आपोआपच बाहेर येईल, असं मला तिनं त्या पत्रांतून बजावलं होतं." __ " पण ते पत्र तुम्हांला चौपाटीच्या पत्त्यावर कसं आलं ? तिला कांहीं तो पत्ता माहित नव्हता." 

" बरोबर आहे. पण तें पत्र तिनं रत्नमहालाच्याच पत्त्यावर धाडलं होतं व दुसऱ्या दिवशी आमच्या इतर टपालाबरोबर तें चौपटी वर आलं. असं झाल्यामुळं मला तें पत्र एक दिवस उशिरानं मिळालं. अगोदर मिळालं असतं तर मीच लोणावळ्याला जाऊन तिची कशी तरी समजूत घातली असती. पण ज्या अर्थी तसं करण्यास सवड नव्हती त्या अर्थी त्या रात्री रत्नमहालांत जाण्याशिवाय मला दुसरा उपायच राहिला नाही. __ "सरला तिकडे रात्री आठ व नऊ या दरम्यान येणार असल्यामुळं मी एकदम तिकडे गेलो नाही. तोपर्यंत मी माजूबाजूलाच वेळ काढला. 

 

पण आठांच्या समाराला मी बंगल्याकडे जाणार, तोच मला माझा एक मित्र भेटला व त्यानं गोष्टी बोलता बोलतां नऊ वाजेपर्यंत मला खोळं. बन ठेवलं. नऊ वाजलेले पाहतांच मात्र मी तिथून पाय काढला आणि तडक बंगल्याकडे आलों. सर्व बंगल्यांत दाट अंधकार होता. सरला बागेतच असणार अशी माझी कल्पना असल्यामळं. मी बागेत सर्व ठिकाणी पाहिलं, पण त्या ठिकाणी ती नव्हती." 

" पण तिच्याशी चावी होती हे तुम्हाला माहित होतं का?" 

" नाही. महालाच्या किल्लीसंबंधाचा उल्लेख तिनं पत्रांतून कांहींच केला नसल्यामुळं ती कल्पनाच मला आली नाही. ती कुठं असावी हा मला तर्कच करता येईना. शेवटी त्या जागी यायला मला उशीर झालेला पाहून ती निघून गेली असावी असा तर्क करून मी परत फिरलों, पण जवळ आल्यासारखं एकदा बंगल्यांतन जाऊन यावं असं मनांत आल्यामुळं मी दरवाजा उघडून तसाच वर गेलो. वरच्या सफेत दिवाण खान्यांत जातो तोच सरला मला तिथंच मृतवत् स्थितीत पडलेली आढळली!" __“ मृतवत् स्थितीत ?" मधुकराने प्रश्न केला, " तुम्ही तसं शपथ पूर्वक सांगतां ?" 

" होय. ती बाजाच्या पेटीसमोरील खुर्चीतच गतप्राण होऊन पडलेली होती.तिच्यावर कुणी तरी मागन हल्ला करून तिचा प्राण घेतला असावा. तिचं मस्तक पेटीवर टेकलेलं होतं. त्या वेळी बरोबर सवानऊ वाजलेले होते. मी सर्व बंगला धुंडाळला, पण आंत चिटपाखरूंही आढ ळन आलं नाही. दरवाजांच्या कडया जशाच्या तशा होत्या. साडेनऊ वाजायच्या सुमाराला मी दरवाजावर बेल वाजलेली ऐकली. त्या वेळी मला इतकी काहीं भीति वाटली, की तिचं वर्णन करतां येणं शक्य नाहीं ! मयत स्त्रीपाशी मला पाहतांच मला पकडून नेण्यांत येईल ही कल्पनाच माझ्यानं करवेना. माझी त्या वेळी भयंकर गाळण उडाली !" ___आणि तुम्हाला त्याच वेळी पकडलं नाही हे खरोखरच फार वाईट झालं," कमळाकर म्हणाला. . 

 

" साडेनऊ वाजतां दरवाजावर बेल वाजली ना?" मधुकर विचार करून म्हणाला, "मग ती नलिनीच असावी, असं मला वाटतं. कारण, त्याच वेळेस रत्नमहालांत भेटण्याचं तिनं मला लिहिलं होतं. बराच वेळ वाट पाहून कुणी दरवाजा उघडीत नाही असं समजताच ती कंटाळून निघून गेली असावी." __गजाननरावांनी मधुकराकडे एकदम दचकून पाहिले, “नलिनी !” ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, " त्या वेळी नलिनीचं तिकडे काय काम होतं ? तुम्ही आला होता ते मला माहित आहे; पण नलिनी-" 

" पण मी तिथं आलो होतो तें तुम्हाला काय ठाऊक ? ' मधुकराने चटकन प्रश्न केला. 

" मी तुम्हांला पाहिलं." "केव्हां ?" " सफेत दिवाणखान्यांत सरलेच्या प्रेताकडे पाहत असतांना." "एकूण त्या वेळी तुम्ही रत्नमहालांतच होता?” । 

" होय." गजाननरावांनी अंग थरारून उत्तर दिले. " दरवाजावर बेल वाजल्यानंतर बराच वेळ मी वाट पाहिली व मग कुणी येत नाही अशी खात्री झाल्यानंतर मी सफेत दिवाणखान्यांत सरलेच्या निर्जीव प्रेताजवळ येऊन एक नाटकी खंजीर पडला होता तो घेतला." 

" काय ? नाटकी खंजीर ?" 

" होय. त्या वेळी तो नाटकी होता हे मला माहित नव्हतं. मी तो घेऊन मागच्या बाजूला गेलों व कुणाला तो दिसू नये अशा रीतीनं तो वर एका कोनाड्यांत फेकून दिला. तो बरोबर घेण्यास साहजिकच मला भीति वाटत होती. कारण, तो खंजीर व त्या सरलेशी असलेला माझा संबंध ही दोन्हीही मला फासावर लटकवण्यास सबळ कारण होती. तो खंजीर कोनाड्यांत फेकल्यानंतर फिरून बाहेर येत असतां मला जिन्यावर पावलं ऐकू आली." 

" कुणाची पावलं?" 

"ते काही निश्चित असं सांगता येणार नाही. तरी साडेदहा वाजून जाईपर्यंत मी घराबाहेर पडलों नाही. पुढचा दरवाजा बंद झालेला ऐकतांच मी बाहेर पडलों व सफेत दिवाणखान्यांत आलो. आतां बाहेर पड़न या घोटाळ्यांतन निसटावं कसं, याचा विचार करणं मला जरूर होतं. अशा रीतीनं काही वेळ विचार करीत असतां मला पुन्हा दर वाजा वाजलेला ऐकू आला.मी आतल्या खोलीत लपून राहतों न राहतों तोच मधुकर तुम्हांला आलेले मी पाहिलं. त्या प्रेताकडे पाहतांच तुम्ही केवढयानं तरी दचकलांत व सरलेला तुम्ही ओळखलंत असा माझा समज झाला. तुमची व तिची ओळख होती हे पाहून मला फारच आश्चर्य वाटलं.” 

“सर्वत्र शांत झाल्यावर मी बाहेर पडलो.” गजाननरावांनी आपल हकीकत पुढे चालू केली, "नंतर त्या प्रेताचा दहनविधि झाल्यावर मी लोणावळ्याला जाऊन, माझं व सरलेचं नातं उघडकीस आणणाऱ्या एकूण एक वस्त नाहींशा करून टाकल्या.” । 

"हं, चालू द्या. पुढं, मला पाहिल्यानंतर काय केलंत?” मधुकर म्हणाला, " तसाच मी लपून राहिलो होतो. काही वेळानं तुम्ही खाली उतरला. ज्या अर्थी तुम्हीं सरलेला ओळखलं त्या अर्थी पकडले जाण्याच्या भीतीनं तम्ही पोलिसला बोलवणार नाही, अशी माझी खात्री झाली. तुम्ही खाली उतरल्यानंतर मी तसाच खिडकीतून तुम्हांला बाहेर जातांना पाहूं लागलो. त्याच वेळी मला तो पोलिस शिपाई फुटपाथवर दिसला. त्याला पाहतांच, त्याला कसलाही संशय येऊ नये व तुम्हांलाही जाण्यांत अडथळा येऊ नये म्हणून मी ग्रामो फोन सुरू केला." __“तरीच : त्या वेळी एकदम ग्रामोफोन सुरू कसा झाला याचंच मला 

आश्चर्य वाटत होतं, गजाननराव. त्या वेळी मला फारच भीति वाटली हे मी कबूल करतो." 

" तसं मला वाटलंच होतं. तुम्ही पोलिस हवालदाराशी बोलत उभे राहिला. नंतर बोलत बोलत त्याला बरंच दूर नेलंत वगैरे तुमच्या सर्व हालचाली मी वरून पहिल्या. तुम्ही दूर गेला असं पाहून मी त्या बंग ल्यांतून सटकून रत्यावर आलो. तिथून थोडी दूर एक मोटरगाडी उभी 

होती. "

" ती माझीच गाडी.” कमळाकर म्हणाला, " तींत बसून तुम्ही ठाणे स्टेशनवर गेलां." ___ गजाननरावांनी होकारार्थी मान हालविली. ते म्हणाले "ती मोटर ठाणे स्टेशनवरच टाकून मुंबईस येणारी लोकल मी गांठली. पुढचं तुम्हांला माहीत आहेच." ___ " नाहीं; सरलेचा खून कुणी केला ते माहित नाही." मधुकर म्हणाला. __ " ते मात्र मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण, मी रत्नमहा लांत जाऊन पोहोचण्यापूर्वीच तिचा खून झाला होता. अर्थात् नऊ वाजल्यानंतर आलेल्या माणसाकडून तिचा खून झालेला नाही, हे सिद्ध 

झालंच." 

" पण मध्यंतरी जिन्यावर वाजलेली पावलं कुणाची होती ! " 

" तेंही मला माहित नाही. तसंच, सरलेचा खन कुणी केला तेही माहित नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हां ते कृत्य उघडकीला आलं, तेव्हां मी रत्नमहालांत येऊन त्या इन्स्पेक्टरला थापा मारून चांगलाच बन वला व त्यानंतर लोणावळ्याला जाऊन तिकडचाही पुरावा नाहींसा करून टाकला." 

" पण सरलेचा खून कोणी केला हे शोधून काढण्याजोगा कांहींच पुरावा तुम्हाला त्या वेळी मिळाला नाही का ? " __ गजाननराव सांगण्यास जरा कांकू करूं लागले, “ मला स्पष्ट असं कांहींच सांगता येणार नाही," ते आपले खिसे चाचपत म्हणाले, " पण ज्या अर्थी तुम्हांला मी इतकं सांगितलं त्या अर्थी आतां सर्व काही सांगतो. " ___ गजाननरावांनी शिखांतून एक लांब सांखळी काढली. त्या सांख ळीच्या एका टोकाला एक सोन्याचे लहानसे 'लॉकेट' असून ते दिस भ्यांत मनोहर होते. "हे मला सरलेच्या हातांत अडकलेलं आढळलं." तें दाखवीत गजननराव म्हणाले, "मला वाटतं, खुनी माणसानं जेव्हां तिच्यावर हल्ला केला, तेव्हां तिनं त्याच्या गळ्यांतलं हे लॉकेल पकडलं असावं." 

" एकंदरीत खुनापूर्वी त्या ठिकाणी थोडी झटापट झाली असं मानायला हरकत नाही. ” मधुकर लॉकेट आपल्या हाती घेत म्हणाला. ते हातात घेऊन त्याने उघडले. लॉकेट उघडन आंतील फोटो पाहतांच मधुकराच्या तोंडून एक चमत्कारिक उद्वार बाहेर पडला. त्याने तें ताबडतोब कमळाकराच्या हाती दिले. 

ते चित्र पाहतांच कमळाकरही एकदम दचकला. कारण त्या लॉकेटमध्ये सरोजिनीबाईचा फोटो होता. __“ हे कृत्य कुणा तरी स्त्रीचं आहे असं मला पूर्वीपासूनच वाटत होतं. " त्या फोटोकडे पाहत कमळाकर म्हणाला, “ पण सरोजिनी बाईचा त्यांत संबंध असेल असं मला केव्हाही वाटलं नव्हतं. पण कुणी सांगावं ! तिनंही हा खून केला असेल, आली असेल वेडाची लहर !"

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel