यानंतर थोड्याच दिवसांची गोष्ट. रमाबाई आपली मुलगी माणक हिला खेळविण्यांत गढून गेली होती. इतक्यांत गजाननराव तेथे आले. त्यांचे आगमन रमाबाईंना आवडले नसावे असे त्यांच्या मुद्रे वरून दिसले. __“ आपण या वेळी इथं आला नसतां तर बरं झालं असतं; कारण, इतक्यांत माझ्या काही मैत्रिणी मला भेटायला यायच्या आहेत." रमाबाई त्यांच्याकडे निरखून पाहत शांतपणे म्हणाल्या. 

" पण मी काही इथं फार वेळ राहणार नाही." गजाननरावांनी खिडकीच्या बाहेर पाहत उदासीनवृत्तीने उत्तर दिले. 

"तसं असलं तर बरंच आहे. पण सध्या आपण आपल्या नेहमीच्या उद्योगधंद्याला कां जात नाही ? '' विषय बदलण्याच्या हेतूने रमाबाईंनी विचारलें. __ " तूं मला जाऊं देशील तेव्हां ना !" गजाननरावांनी बेफिकीर वृत्तीने उत्तर दिले. ___ " एकूण, माझी संमति नाही म्हणून आपण जात नाही, असंचा ना!” रमाबाई आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गजाननरावांना खिजवि ण्याच्या उद्देशाने म्हणाल्या, "नाहीं तरी घरची व्यवस्था पाहण्याकरतां आपण घरी राहिलंच पाहिजे. नाही तर ते सर्व स्वतः मलाच पाहावं लागेल. छे, कोण ग बाई तो त्रास सोशील ! " 

__ " जशी तुझी इच्छा !” गजाननराव मिनीशेजारी जमिनीवर बसून तिला खेळवीत म्हणाले, “ आपण काही तुझ्या इच्छेबाहेर नाही." ___“ अस्सं ? म्हणूनच उद्योगधंद्याच्या निमित्तानं महिन्यांतले पंधर दिवस आपण बाहेर घालवीत होतां वाटतं ? कुणी ऐकलं तर त्याला या बिचाऱ्यांची दयाच यायची ! जशी बायको अगदी कर्कशाच आहे. पण आपण या महिन्यांत प्रवासाला कसे गेला नाहीं ?” रमाबाईंनी विचारले. __ " नाहीं गेलो. आणि यापढं बहुतकरून मी कधीच जाणार नाहीं व मला ही प्रवासाची दगदगही सोसवत नाही. शिवाय मी नेहमी बाहेर असतों अशी माझ्या मागची पिरपीर चुकेल. पण काय ग, आपला हा रत्नमहाल विकायला केव्हां काढणार ! आपल्यानं बुवा ह्या खून झालेल्या घरांत काही राहवत नाही.” गजाननराव विषय बदलण्याच्या हेतूने पुढे म्हणाले. 

" मी त्याच तजविजीस आतां लागले आहे. बहुतकरून या महि न्यांतच तें काम होईल. या बंगल्याचे पैसे येतांच आपण पुण्यालोणा वळ्यासारख्या हवेच्या ठिकाणी एखादा बंगला विकत घेऊ. आपली मिनीही तसल्या ठिकाणी सुधारेल.” 

"तिकडे राहणं आपल्याला काही आवडणार नाही." 

" का बरं ? आपण तर आतां व्यापारधंदा पाहणार नाही म्हणतां, मग तिकडे जाऊन राहायला हरकत कोणती? पण, आपली इच्छा नसली तर माझी कांहीं बळजबरी नाही. कारण, जोपर्यंत मला स्वतःचा कारभार पाहायला अडचण होत नाही तोपर्यंत मला कुठंही राहणं सारखंच." 

"मला वाटतं हे शहर सोडून बाहेर कुठंच जाण्याची आपणास गरज नाही. " गजाननराव म्हणाले. 

" आपल्याला नसली तरी मला आहे.'' रमाबाई जरा कुर्यानेच म्हणाल्या, “ माझ्या मनाप्रमाणं चालण्यांत तुमचं कल्याण आहे. काय केल्यानं आपलं हित होईल हे मलाच कळतं, समजलं ? हं,ऐका, 

खाली कुणी तरी बोलत आहे. बहुतकरून माझ्या मैत्रीणीच माल्या असतील." 

गजाननरावांची इच्छा नव्हती तरी त्यांना उठावेंच लागलें. रमाबाई. पुढे त्यांची मात्रा चालत नसे. ते बाहेर जाता जाता म्हणाले, “ आज मी चांगलीच झोप काढली तरी काही माझी सुस्ती जात नाही. मला वाटतं, आज नाटकाला गेलेलं बरं. मनाची काही तरी करमणूक तरी होईल; जाऊ ना ?" त्यांनी रमाबाईस विचारलें. 

" आपली इच्छा असली तर खुशाल जावं.” रमाबाई शांतपणे म्हणाल्या. 

रमाबाई आणखी पुढे काही बोलणार होत्या, तोच दरवाजावर थाप ऐकू येऊ लागली व मागोमाग नोकरशाही पोषाक केलेला व अंगाने फोफसा असा एक माणूस त्या दिवाणखान्यांत शिरला. त्याला आंत 

आलेला पाहून आपल्या पत्नीच्या मैत्रिणीची वर्दी देण्याकरितां तो आला असावा अशी समजूत करून, गजाननराव बाहेर निघून गेले. तो माणूस आंत येतांच आपल्या धनिणीकडे कावऱ्याबावऱ्या नजरेने पाहत उभा राहिला. 

" काय रे, काय गडबड आहे ? ” रमाबाईने त्याला थोडेसें दटावू नच विचारले. ___ "कांहीं नाहीं, बाईसाहेब," तो नवागत माणस चांचरत म्हणाला, "आपला स्वयंपाकी वेड्यासारखाच काही तरी बडबडत आहे, एवढंच सांगायला आलो होतो." 

" खरं की काय ?" त्याच्या बातमीनें भयभीत व आश्चर्यचकित होऊन रमाबाईनी विचारले. ती बातमी ऐकून तिच्या हाती असलेले विण. कामाचे सामान तिच्या नकळतच गळून पडले होते. म्हणजे ! असं ते काय बडबडत आहे ?" तिने पुढे विचारले. __"आपल्याला अगणित द्रव्य सांपडलं असन लवकरच आपण लक्षा धीश होणार असं काहींच्याबाहींच तो बरळत सुटला आहे, व है हकीकत आपणास कळवण्याकरता तो स्वतः वर येणार आहे, बाई 

 

साहेब. पण काय रे, असं काही तरी बडबडायची ही त्याची तिसरी खेप नव्हे ? मागं केव्हां केव्हां असंच काही तरी तो बरळत असतांना आपण ऐकलं आहे." 

"होय. प-पण बाईसाहेब, मला वाटतं, की या वेळी मात्र तो व्यर्थ बडबड करीत नसावा. कारण त्याला खरोखरच हिरे सांपडलेले आहेत." __ "हिरे सांपडले ! तूं म्हणतोस तरी काय ? शुद्धीवर आहेस ना?" या वेळी मात्र रमाबाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्याची छटा स्पष्टपणे दृग्गोचर होत होती. __ " ते हिरे त्याला स्वयंपाकखोलीत वर असलेल्या एका कोनाडयांत सांपडले. आणि ते..." 

इतक्यांत तो स्वयंपाकी तेथे आला. “बाईसाहेब," तो धापा टाकीत म्हणाला, "मी आपली नोकरी आज याच घटकेला, नव्हे याच क्षणाला सोडली, बरं का?" त्याच्या दृष्टींत हळू हळ वेपर्वाईची झांक मारूं लागली. " माझं सामानसुमान सर्व काही बांधून तयार असन फक्त 

आपला निरोप घ्यायचाच तेवढा राहिला आहे." ___ "हं ! अस्सं !” रमाबाई उत्तरादाखल उपहासात्मक हंसून म्हणाल्या, "ठीक आहे, तुला जायचं असेल तर खुशाल जा. माझी मुळीच आडकाठी नाही. पण तसं केलंस तर झाल्या दिवसांचा पगार कांहीं तुला मिळणार नाही व पुन्हा जर इथं भिक्षा मागायला आलास तर तुला मी दारांत उभा करणार नाही, समजलास ? चल, चालता हो खाली !" ___"पण मला आतां पगार मिळाला न मिळाला सारखाच ! मला त्याची आतां मुळीच फिकीर नाही." तो आपल्या जागेवरून न हालतां म्हणाला, " म्हणजे मी तुमची चोरी करून जात आहे असं मात्र मनांत आणू नका, हं. कारण मला तुमच्या स्वयंपाकघरांतील वरच्या कोनाडयांत बरंच धन मिळाल्यामुळं मी आतां तुमच्या बरो बरीचा श्रीमंत माणूस झालो आहे. " 

" अस्सं ! कसलं धन तुला सांपडलं ?" __"अहं, ते मी नाही सांगणार. तुम्हांला तें मी सांगितलं, तर तुम्ही ते माझ्याकडून घेतल्याशिवाय राहाल का ? " 

"हं ! तुझी जीभ एकंदरीत बरीच लांबत चालली. पण माझ्याशी तुझ्या गमजा चालायच्या नाहीत, हे तूं विसरलास. तला सांपडलेली वस्तु जर तूं मला ताबडतोब दाखवली नाहीस तर पोलिसला बोलावन आणून त्याच्या स्वाधीन तुला इथल्या इथं करीन, समजलास ? हं, काढ बाहेर काय ते.” __ "नको नको, बाईसाहेब, तेवढं मात्र करूं नका.” पोलिसाचें नांव ऐक तांच त्या आचाऱ्याची निशा पार उतरली. त्याचा पूर्वीचा लालट चेहरा एकदम भीतीने फिका होऊन तो आंतल्या आंत थरथर कापू लागला. __ " ही पाहा ती, बाईसाहेब.” असे म्हणून त्याने एक खंजीर सदयाच्या खिशांतून बाहेर काढला. त्या खंजीराचे पातें पोलादी असून अत्यंत तीक्ष्ण धारेचे होते. खंजीराची मूठ सुवर्णाची बन. विलेली दिसत असून तीवर ठिकठिकाणी हिरे, माणके, पाचूचे खडे इत्यादि अत्यंत मौल्यवान दिसणारी रत्ने बसविलेली असन ती अत्यंत सुशोभित केलेली दिसत होती. त्या आचाऱ्याने तो खंजीर बाहेर काढ. तांच त्या दिवाणखान्याच्या खिडकीतून आंत आलेले सूर्यकिरण त्यावर पडून त्या खड्यांची प्रभा एकदम चोहोकडे फांकली, व तिचे तांबडे, हिरवे, जांभळे व इंद्रधनध्याचे रंग परिवर्तित होऊन त्या दिवाण खान्याच्या भिंतीवर चोहीकडे पसरले व त्यामुळे त्या दिवाणखान्यास एक प्रकारची विलक्षण शोभा आली. रमाबाईची लहानगी मिनी जवळच खेळत होती; ती ते खडे व त्यांचा तो रंगीत स्वैरमंचार पाह तांच टाळ्या पिढू लागली. व तो खंजार आपणास मिळावा, म्हणून त्या आचाऱ्याशी लडिवाळपणाने लगट करू लागली. तिचा तो आनंद पाहतांच त्या आचान्यासही आपणास मिळालेल्या दिव्य वस्तूविषयी 

अभिमान वाढू लागला. __" किती तरी छान आहे हा, नाहीं ताईसाहेब ?" तो अभिमानाने त्या लहानग्या मुलीस विचारूं लागला, " आणि हा मला एकटयालाच सांपडला हो." ___“ मला तो पाहायला दे पाहूं." त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून रमाबाई मध्येच म्हणाल्या. 

 

पोलिसच्या भीतीने म्हणा अगर रमाबाईंच्या वटारलेल्या दृष्टीकडे पाहून घाबरून म्हणा, त्याने तो खंजीर ताबडतोब त्यांच्या हाती दिला. परंतु त्याने त्यावरील आपली तीक्ष्ण नजर क्षणभरसुद्धा वळविली नाही. रमाबाई तो खंजीर जसजसा इकडून तिकडे करीत असत तशी त्याची नजरही त्या त्या बाजूला वळत असे. यदाकदाचित् रमाबाईंनी तो खंजीर जर मालकीच्या जोरावर स्वतः गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याने तिजवर हल्ला करण्यासही कमी केले नसते, व तसे करून यःपलायन करण्याचीही त्याची तयारी दिसत होती. असो. रमाबाई त्या खंजिराकडे अगदी आश्चर्यचिकत होऊन पाहत आहेत असें पाहतांच त्यालाही आनंदाच्या उकळ्या फुटूं लागल्या. नशेत आपण काय बोलावें व काय नाही याचा विचार करण्याची त्याची शक्तिही हर्षातिशयाने नष्ट होत चालली होती. __ स्वयंपाक्याचे बरळणे चाललेच होते. रमाबाई खंजीर नीट न्याहाळन पाहत होत्या. __ "मूर्ख आहेस झालं. तुला वाटत आहे तितक्या किंमतीचा 

हा नाही." ___ " बाईसाहेब, तुम्ही कितीही थट्टा केलीत, तरी मी काही फसायचा 

नाहीं हो. मलाही थोडीबहुत खडयांची माहिती आहे." 

"तुला किती माहिती आहे ते दिसतंच आहे. नाही तर हे खडे कसले आहेत हे तुला ओळखतां आलंच असतं." 

" म्हणजे ! आपलं म्हणणं माझ्या ध्यानांत नाही आलं." 

" मूर्खा, त्याचा अर्थ हाच की, हा खंजीर माझा असून त्यावरील हे खडे नुसते कांचेचे तुकडे आहेत. आता तरी डोक्यात शिरलं 

की नाही ?" _ "तुमचा ! बाईसाहेब ? काही तरी सांगतां झालं. असल्या खंजिराचा तुम्हाला काय उपयोग?" 

" म्हणूनच तर तुला मी मूर्ख म्हणते. त्या दिवशी मी व मिनी फिरायला गेलो होतो तें तुला आठवत नाही का ?" 

" त्याचा ह्या खंजिराशी काय संबंध?" 

" चुप बैस. मूर्ख कुठला ! मध्येच तोंड न घालतां सांगते, ते सर्व नीट ऐकून घे." रमाबाई रागाने म्हणाल्या, "त्या वेळी वाटेत आम्हाला नाटकाला लागणारं स न विकायला ठेवलेलं एक दुकान दिसलं. तिथं हा खंजीर पाहतांच माझ्या मिनीनं हा खंजीर आपणाला हवा असा हट्ट घेतल्यामुळं मी हा दोन रुपयांना विकत घेतला. पण असला धारेचा खंजीर लहान मुलांना खेळायला योग्य नाही म्हणून घरी येतांच तिला जेव्हा त्याचा विसर पडला तेव्हां तो तिच्या हाती पुन्हा लागू नये अशा विचारानं मी त्या कोनाडयांत ठेवून दिला होता; तो आज तुला सांपडला. " 

ही हकीकत ऐकतांच त्या आचा-याची मुद्रा पाहण्यालायक झाली! तो तेथल्या तेथेच मटकन एका खर्चीवर अवसानगालत होऊन बसला. जर तो पूर्ण शुद्धीवर असता तर त्याला संशय येऊन रमाबाईंनी सांगि तलेली हकीकत खोटी वाटण्याचा संभव होता व त्याचा तिजवर विश्वा सच बसला नसता. कारण, तिने सांगितलेली हकीकत खोटी वाटण्या जोगी होती. आधी रमाबाईंसारखी स्त्री असली वस्तु कधीच घ्याव याची नाही, व यदाकदाचित् तिने ती घेतलीच, तर मलीपासून लप विण्याकरता ती आपल्या ताब्यात असलेल्या कुलपाकिल्लीत न ठेवतां एखाद्या धुळीने भरून गेलेल्या घाणेरड्या कोनाड्यांत ठेवील ही गोष्ट कधीच संभवनीय नव्हती. परंतु मदिरने आपला पूर्ण अंमल त्याजवर बसविल्यामुळे खऱ्या वस्तुस्थितीचा विचारच त्याच्या मनांत आला नाही. रमाबाईंनी सांगितलेली हकीकत ऐकतांच त्याची श्रीमंतीची धुंदी पार उतरून गेली. आपण श्रीमंत तर होणार नाहीच, परंतु उलट तिच्यासमोर केलेल्या अरेरावीमुळे ती कदाचित् आपणास नोकरीवरून दूर करील ही भीति त्याला आतां वाढू लागली. तरीही त्या नशेतच विचार करता करतां एक आशेचा किरण त्याला दिसू लागला. 

 

" पण बाईसाहेब, तो खंजीर एखाद्या जवाहिन्याकडे तरी घेऊन जातों, म्हणजे ते खडे खरे आहेत की खोटे यांचा तरी एकदांचा निर्णय होईल." तो निराशायुक्त स्वराने म्हणाला. 

“ छट, तुला काय वेड लागलंय ? हे खडे खोटे आहेत हे तुला एखादं लहान पोरसुद्धा सांगू शकेल. तेव्हां हा खंजीर जवाहिन्याकडे न्यायची मुळीच जरूर नाही.” रमाबाई नकारार्थी आपली मान हाल वन म्हणाल्या, " तेव्हा हा मी मजपाशी ठेवून देते; कारण, जर हा तुजजवळ असला तर तुझं डोकं काही ठिकाणावर राहायचं नाही, आणखी आतां तूं जी माझ्याशी बेमुर्वतखोर वर्तणूक केली आहेस त्याबद्दल एक वेळ तुला क्षमा करते. पण पुढे असं केव्हां केलंस तर तुला कदापिही क्षमा व्हायची नाही, हे ध्यानात ठेव. चल, जा खाली 

आणि लाग आपल्या कामाला !" 

त्या आचाऱ्यावर वज्राघातच झाला ! आज्ञेप्रमाणे तो जावयास उठला, परंतु तो खंजीर हस्तगत करून घेण्याकरता शेवटचा तरी प्रयत्न करून पाहावा ह्या हेतूने तो म्हणाला, “ बाईसाहेब, पण ज्या अर्थी तो मला सांपडला आहे त्या अर्थी त्यावर माझीच मालकी नाही का?" ___" आमच्या घरांत असलेल्या अगर सांपडलेल्या प्रत्येक वस्तूवर मालकी आमचीच, समजलं ? चल नीघ आता. खाली गेल्यानंतर तुझ्या मित्रांनी जर तुला ह्या खंजिराविषयी काही विचारलंच, तर त्यांना मी 

सांगितलेली हकीकत सांगून त्यांची तोंडं बंद कर.” 

बिचारा आचारी ! यावर पुढे काय बोलणार ! मुकाटयाने तेथून निधन जाण्याखेरीज त्याला गत्यंतर नव्हते. " अरेरे ! शेवटी गुलामगिरीतच खिचात पडण्याची पाळी आली !'' असें स्वगत पुटपुटून तो निघून गेला. त्याच्या मनांतून आणखी काही बोलावयाचे होते; परंतु रमावाईची करडी नजर पाहतांच त्याला तेथून काढता पाय घ्यावाच लागला. 

तो आचारी दिवाणखान्यातून निघून जातांच रमाबाईनी पोल. क्याच्या खिशांतन तो खंजीर पुन्हा बाहेर काढला व विचार करीत त्या त्याजकडे न्याहाळन पाहूं लागल्या. विचार करीत असतां मधूनच त्या त्याच्या तीक्ष्ण धारेच्या पात्यावरून हात फिरवीत असत. इत क्यांत जिन्यावर कुणाची तरी पावलें ऐकू आल्यामुळे त्यांना तो खंजीर पुन्हा आपल्या खिशांत लपवून ठेवावा लागला. 

लवकरच त्या दिवाणखान्यांत नलिनीने प्रवेश केला. जिन्यावर पावले वाजत होती ती तिचीच होती. 

" तुझी कुणी मैत्रीण आज भेटायला येणार होती ना ग? मग अद्याप कुणी कसं आलं नाहीं तें ? ” आंत येतांच तिने रमाबाईस प्रश्न केला. 

" नाही.” रमाबाईंनी उत्तर दिले. " कुणीच नाही ?" 

" छे, कुणीच नाही." रमाबाईनी जरा त्रासूनच म्हटले, “कां ग ? मधुकर येणार आहे का ?" त्यांनी पुन्हा जरा खोचीने विचारले. 

नलिनी जरा त्रासल्यासारखी झाली. रमाबाईंनी हा प्रश्न कोणत्या हेत. विचारला असावा ते तिला समजले. ___ " ते काही सांगता येत नाही. ” तिने त्याच स्वरांत उत्तर दिले, 

" पण बहुतकरून ते आज येणार नसावे असं वाटतं.” __ " त्या दिवशीही तूं असंच म्हणालीस. पण त्यांनंतर थोड्याच वेळानं मी जेव्हां खन झालेल्या स्त्रीच्या नांवाचा पत्ता लागला असं यांना कळवायला वर आले, तेव्हां त्याला मी बरोबर बोलत अस लेला पाहिला." असे म्हणान नलिनीच्या चेहऱ्यावर काय परिणाम होतो तें रमाबाई बारकाईने न्याहाळू लागल्या. परंतु नलिनीने तिच्या भाषणाकडे अगदी दुर्लक्ष केले. __ " पण मला वाटतं, आपण हा विषय सोडून दिलेला बरा नाही का?" ती म्हणाली, "हें बोलन आपल्याला काय करायचं आहे ? एक वेळ सूर्याच्या अस्तोदयाच्या दिशांत फरक होईल; पण तूं त्यांच्याकडे चांगल्या दृष्टीनं कधीच पाहायची नाहींस. ___ “कां बरं मी पाहणार नाही ? ' रमाबाई सौम्यपणे म्हणाल्या, "पण तुं त्याला त्या कंपनीच्या नव्या खेळांत काम करतांना कधी पाहिलं आहेस का?" रमाबाईनी एकदम विषय बदलला. हातांनी त्यांचे वीणकाम चालले होते, पण त्यांचे सर्व लक्ष नलिनीच्या उत्तरा कडे होते. “ मला वाटतं, तूं भवान्यांच्या मंडळीबरोबर त्या खेळाला गेली होतीस, नव्हे ?" __"होय, मी शरयबरोबर गेले होते व तो खेळही मला फारच 

आवडला." नलिनीने थंडपणे उत्तर दिले. 

" आणि आता मला असंही आठवतं की, त्या नाटकाच्या दुसऱ्या अंकांत राजा आपल्या प्रधानासह दौऱ्यावर असतांना प्रधान स्वतः राजाचा खन करतो. ज्या खंजीरानं तो स्वतःच्या स्वामीचा खून करतो त्याची मठ चांगल्या हिरेमाणकांच्या खड्यांनी मढवलेली असते. होय ना?" __ " होय. प्रधानाचं काम तेच करतात. पण तूं हे प्रश्न आज का म्हणून विचारते आहेस ?" ___“तसंच." रमाबाई नलिनीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून गंभीरपणे म्हणाल्या, "जेव्हां मधुकर यांना भेटायला आला होता, त्याच दिवशी आपल्या ह्या सफेत दिवाणखान्यासारखा दुसरा एक दिवाणखाना लोणावळ्यास असून ते घर सरलाबाई किनखापे नांवाच्या कुणा बाईनं घेतलंलं होतं, हे माझ्या वाचण्यांत आलं व त्याच दिवशी मधुकरानं आपण त्या सरलेचा चुलतभाऊ असं इकडे सांगितलेलं मी ऐकलं आहे. आणि त्या रात्री जिचा ह्या सफेत दिवाणखान्यांत खन झाला ती सरलाबाई किनखापे होती." __ " म्हणजे, तुझं म्हणणं आहे तरी काय ? " नलिनी त्रासल्याप्रमाणे होऊन म्हणाली. रमाबाई बोलत असतांना तिचा चेहरा कधी रागाने लाल तर कधी भीतीने फिकट होत असे. 

" मधकर त्या कंपनीच्या नव्या खेळांत प्रधानाचं काम करतो." रमाबाई पुढे म्हणाल्या, “ त्या वेळी राजाचा खून करायच्या पूर्वी त्याच्याकडे हिरेमाणकांच्या खड्यांनी मढवलेल्या मुठीचा एक खंजीर 

खात्रीनं असतो. " 

 

" हो. तसला एक खंजीर त्याच्याजवळ असतो. पण त्याचा इथं संबंध काय ?" ___संबंध इतकाच की, त्याच्याजवळच असतो तो खंजीर हा." असे म्हणून रमाबाईंनी आपल्या पोलक्याच्या खिशांत पूर्वी लपवून ठेवलेला तो खंजीर बाहेर काढून नलिनीस दाखविला. “ हाच तो खंजीर." ती पुढे म्हणाली, “ यावरील हिरेमाणकं दिसतात ते निवळ कांचेचे खडे आहेत व हा खंजीर आमच्या आचायाला स्वयंपाकखोलीतील कोनाडयांत सापडला.” 

" पढं ?" नलिनीनें तो खंजीर आपल्या हाती घेऊन नीट तपास म्हटले. त्या वेळी तिची मुद्रा फिकट झाली होती. 

" पुढं ? ” रमावाई कुत्सित हेतुनें नलिनीस म्हणाली, “ पढं काय तें तूंच विचार करून ठरव. मी यापेक्षा अधिक सांगू इच्छित नाही." 

" म्हणजे त्यांनी तिचा खून केला हेच तुझं म्हणणं की नाही ? " 

" तूंच विचार करून पाहा, ती त्याची चुलत बहीण होती. हा खंजीर नाटकी लोकांच्या उपयोगाचा आहे.-तिसरं मधुकर वरच्यावर इकडे येत असून त्याला ह्या बंगल्याची चांगली माहिती आहे. सर्व मुद्यांची नीट जुळवाजुळव करून त्यांतून निष्कर्ष निघतो-' 

" बस्स, बस्स ! पुढं एक शब्दही बोलू नकोस." रागाने उसळून नलिनी म्हणाली, “ तूं जरी काही म्हटलंस तरी माझा कल्पांतीही विश्वास बसायचा नाही. समजलीस ? जरी ती त्यांची चुलत बहीण होती तरी आपल्या प्रत्यक्ष बहिणीचा खून ते कां म्हणून करतील ?" __ " तो खंजीर आणि त्या दोघांचं नातं लक्षात आण. पण काय ग, आपल्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाची किली मधकराला कोणी दिली ? तूं का ? ” रमाबाईनी एकदम विचारले. ___“ द्वेषाचा अतिरेक याहून होणं शक्य नाही. प्रत्यक्ष मागच्या बहि णीच्या भावि पतीविषयीं अकारण द्वेष ! त्या बाईचा खून करण्यांत त्यांना मी मदत केली, असं तर तझं म्हणगं, नाहीं?" . 

 

"हं, आतां ये अशी ताळ्यावर. एकूण मधुकरानं तिला मारलं हे तूं कबूल करतेस तर ?" रमाबाईनी विचारले. __“ नाहीं नाहीं ! तें मी कधींच म्हणणार नाही. तुझ्या खोचदार बोलण्यानं तूं मला फसवलंस. त्यांनी हा खून केला हे मला केव्हाही खरं वाटणार नाही. तुझ्या बोलण्यानं माझं डोकं भिरभिरतं आहे." बोलता बोलता नलिनी खुर्चीवरून उठून त्या दिवाणखान्यांत जोरा जोराने येरझारा करीत म्हणाली, “ नाही, त्यांनी हा खून मुळीच केला नाही हा खून करून त्यांना काहीच फायदा-" __ "नले ! " रमाबाई मनांत कांहीं निश्चय करून आपल्या जागेवरून उठून म्हणाल्या, " तुला या खुनांतलं काही तरी माहित असलंच पाहिजे, अशी माझी पूर्ण खात्री आहे. कारण, मधुकराबरोबर खुनापूर्वी तूं जशी वागत होतीस तशी आतांशा वागत नाहीस. सांग, तला काय माहित आहे ते, कांहीं एक न लपवतां सांग." __ " नाही. मला खरोखरच काही माहित नाही." उद्वेगाने जोराने 

चाललेल्या श्वाच्छोच्छ्वासामुळे या वेळी तिचे वक्षस्थळ एकसारखें खालींवर होत होते. त्याच वेळी रमाबाईंनी तिचे दोन्ही हात घट्ट पकडून तिच्या हृदयांचा भेद करण्याकरितांच जणूं काय त्या तिजकडे भेदक नजरेने पाहत राहिल्या. 

“ चल, मला जाऊ दे.--" आपले हात सोडविण्याचा प्रयत्न करीत नलिनी म्हणाली. 

" नाहीं, तूं सर्व काही सांगेपर्यंत नाही." रमाबाई आणखी पुढे काही बोलणार होत्या. इतक्यात त्या दिवाण खान्याचा दरवाजा उघडून एक नोकर आंत आला व त्याने सरोजिनी बाई भेटीस आल्याची वर्दी रमाबाईस दिली. त्याच्या मागोमागच सरोजिनीबाई आंत आल्या. त्यांना पाहतांच रमाबाईनी आपला क्षुब्ध झालेला चेहरा, जसें कांहीं काहीच झाले नाही, अशा त-हेने एकदम पूर्वीप्रमाणे सौम्य करून त्यांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. 

 

" या, या ! आज किती दिवसांनी आमच्या घरी पायधूळ झाडली ही !" रमाबाई गोड शब्दाने बोलू लागल्या. " बसा इथं. तुम्ही येण्या पूर्वी मी व नली एक प्रहसन बसवीत होतो. आमची तालीमच चालली होती म्हणाना ! आमच्या इथं लवकरच स्त्रियांचं संमेलन भरायचं असून त्यांत हे प्रहसन करून दाखवायचं आहे. पाहणाऱ्या बायका व प्रहसनांत भाग घेणाऱ्याही बायकाच आहेत. किती मजेदार बेत आहे हा आमचा, नाही ?" सरोजिनीबाईंना मुळीच बोलू न देतां तिचें चित्त दुसरीकडे गुंतविण्याकरता रमाबाई एकसारख्या बोलतच होत्या. 

"अरे, गोविंदा, जा, सुरेखसा चहा नी फराळाचं यांच्यासाठी तयार करून लवकर वर घेऊन ये;" नंतर सरोजिनीबाईंकडे वळन त्या म्हणाल्या, “ आतां चहा येईल, बरं का. पण सध्या तमची प्रकृति कशी काय आहे ? दिसते आहे तर चांगली." 

इतके जलद भाषण ऐकण्याची कधीच सवय नसल्यामुळे रमा बाईंच्या ह्या चहाटाला सरोजिनी अगदीच त्रासून गेली. इतकेच नव्हे तर तिचा मेंदू इतका तरतरीत नसल्यामुळे तिच्या भाषणाचा बहुतेक भाग तिला समजलाच नाहीं ! ती जवळ्याच्याच एका कोचावर बसून, चालून आल्याकारणाने आलेल्या थकव्यामुळे रमाबाईंच्या भाषणाकडे दुर्लक्ष करून विश्रांति घेऊ लागली. __ " अग, मी केव्हांची येणार होते.” सरोजिनीबाईनी बोलावयास सुरवात केली, " पण येतां येतां आजचा दिवस उजाडला. आणखी बेत लांबवला असता तर केव्हां आलें असतें कोण जाणे ! पण दोन दिवसांपूर्वी आमच्या मास्तरसाहेबांनी एक बातमी सांगितल्यापासून केन्हा एकदा इकडे येऊन नलिनीचं अभिनंदन करीन असं मला झालं आहे." __ " काय बातमी सांगितली मास्तरसाहेबांनी ?” रमाबाईनीं विचारले. 

 

“ मधुकराला दैवयोगानं बरीच मोठी दौलत मिळाली आहे असं ते मला सांगत होते.” 

“ दौलत ! कुठली दौलत ? ” नलिनीने मध्येच विचारले; तिचा चेहरा या वेळी अगदी उतरून गेला होता. 

" वाऽऽग!” सरोजिनीबाई लडिवाळपणे म्हणाल्या, “ जसं काही तुला ठाऊकच नाहीं अं! पण त्यानं सर्व काहीं तुला सांगितलं आहे हे मला माहित आहे हो ! जिचा खून झाला ती त्याची चुलत बहीण हे त्यांनी तुला सांगितलं होतं की नाही ? तिचा पैसा मधुकराला मिळणार आहे." 

थोड्या वेळाने सरोजिनीबाई गेल्यावर रमाबाई नलिनीला म्हणाल्या, 

"नलू , सरलेच्या खुनाचं कारण तुला हवं होतं ना ? ऐक तर; मधुकरानं निवळ पैशाच्या लोभाकरतां तिचा खून केला. आतां समजलं 

का?" 

नलिनीच्या तोंडून तिला नकळतच एक भयसूचक उद्गार बाहेर पडला!

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel