रत्नमहालांतील खुनाची हकीकत आतां षटकर्णी झाली असून त्या हकीकतीने लोकांत मोठी खळबळ उडवून दिलेली होती. दादर व मांटुगा या विभागांतील लोक, त्यांच्या बाजूला असला खुनाचा प्रकार केव्हांच घडला नसल्यामुळे गांगरून गेले होते. त्यांची बाजू पूर्वी अगदीं शांत, कसलीही गडबड नाही व कोणाचाही त्रास नाही अशी होती; परंतु तीच आतां वरच्यावर गुप्त पोलिस, पोलिसखात्यांतील अंमलदार, वर्तमानपत्रांचे बातमीदार, व इतर रिकामटेकडे व आळशी लोक यांनी गजबजून गेली होती. पूर्वीची शांतता त्या जागी सध्या तरी दिसत नव्हती. गजाननराव व रमाबाई ही दोघे आपल्या मुलीला, तिची दाई सोना, हिच्याकडे सोपवून लवकर होणाऱ्या चौकशीकरितां तिकडे आली होती. खनाची चौकशी रत्नमहालापासून जवळच असलेल्या एका सार्व जनिक जागेत होणार होती. जगन्नाथपंतांनी येताक्षणीच त्या स्त्रीचे प्रेत तेथून हालविण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली.
“ तिचे प्रेत त्याच वेळी येथून नेले पाहिजे होते." ते सर्जेरावास म्हणाले, “ ती स्त्री कोण आहे ते काही मला माहित नाही व मी तिला कधीही पाहिलेले नाही."
" ह्या घराची चावी तुमच्या एकटयाजवळच आहे का ? " सर्जे रावांचे तीक्ष्ण डोळे गजाननरावांवर खिळले होते.
"मुख्य चावी एक माझ्याजवळच आहे !" गजाननरावांनी उत्तर दिले, " पुढील दरवाजाचं कुलप एका विवक्षित रचनेचं असून त्याला माझ्या किल्लीशिवाय दुसरी कुठचीच किल्ली लागायची नाही. ही पाहा ती." असे म्हणन गजाननरावांनी आपल्या खिशांतून एक लांब बारीक चावी बाहेर काढली. ती पाहतांच सजेरावांनीही आपल्या खिशांतन वावरावास मिळालेली दुसरी किल्ली बाहेर काढली. त्या दोन्ही चाव्या सर्व त-हेने अगदी सारख्या होत्या. " ही पाहा तमच्या चावीची दुसरी नक्कल." सर्जेराव म्हणाले, "बाबुरावानं जेव्हां ही चावी माझ्या जवळ दिली तेव्हां ही अगदी नवी होती."
" ही चावी तुम्हांला कुठं मिळाली ? "
" ज्यानं बाबुरावाला बोलत बोलत दूर नेलं त्याच्या खिशांतून ही पडली. " __ " मग मोठाच चमत्कार म्हणायचा !” गजाननराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले, " हा काय घोटाळा आहे ते मला समजत नाही. ज्या लोहारानं माझी चावी बनवली त्यानं दुसरी तयार केली असेल असं मला नाही वाटत. कारण मी त्याला तसं न करण्यावद्दल पुन्हा पुन्हा बजावलं होतं.”
" त्याचा पत्ता तुमच्याजवळ आहे का ?”
" होय. पण तो मंबईला माझ्या ऑफिसांत आहे. मी तो तम्हांला देईन. तो लोहार अगदी विश्वास आहे याची मला खात्री आहे." ___“ अस्सं !” सर्जेराव आपले खांदे उडवीत म्हणाले, “ पण असले विश्वास लोक कधी कधी पैशाच्या लोभाला बळी पडणं अशक्य नाही." __"पण ह्या अनोळखी स्त्रीचा प्राण घ्यायला खुनी इसमानं तिला माझ्याच घरांत कां बरं आणलं?".
"तें कसं बरं सांगता येणार ? आपणाला तेच तर शोधून काढा यचं आहे. ती स्त्री तुमच्या मुळीच ओळखीची नाही? तिला तुम्ही कधीच पाहिलेलं नाही का ?' सर्जेरावांनी संशयित वृत्तीने विचारले. __ गजाननराव हे चलाख, उल्हसित वृत्तीचे, परंतु साधारण मुखदुर्बल असे होते. नलिनीने सांगितल्याप्रमाणे ते आजारी असल्यामुळे त्यांची
जरी इच्छा नव्हती तरी पोलिस अंमलदाराकडून बोलावणे आल्यामुळे त्यांना रत्नमहालांत येणे भाग पडले व त्यामुळेच त्यांचा चेहरा सध्या जरा उतरलेला दिसत होता. सर्जेरावांनी वरील प्रश्न विचारतांच ते घोटाळल्याप्रमाणे झाले. परंतु ताबडतोब सांवरून त्यांनी थोडयाशा क्रोधयुक्त स्वराने म्हटलें, “ ह्या खुनांत माझा हात असावा असं तुम्ही मला अप्रत्यक्षपणं सुचवतां का ?" ___ " तसं नव्हे. पण ज्या अर्थी ती इकडेच आली त्या अर्थी तिची तुमची ओळख असावी अशी आपली माझी समजूत झाली." सर्जेराव वरमल्यासारखें दाखवून म्हणाले. __ “तमचं म्हणणं बरोबर आहे. कुणालाही तसं वाटणं साहजिक आहे; पण वास्तविक पाहतां तशी गोष्ट नाही. या स्त्रीला मी आजच प्रथम पाहत असून ती माझ्याच घरांत कशी आली याचाच मला अचंबा वाटत आहे. माझी तिची ओळख असून तिच्या खनांत माझं अंग आहे असा कुणाचाही समज होणं शक्य आहे. पण हे विधान फेटाळून लावण्याकरतां, ज्या वेळी हा खून घडला त्या वेळी मी चौपाटीवरच्या बंगल्यांत होतो हे मला सिद्ध करून दाखवता येईल. तसंच, जरी मी आजारी नसून या स्त्रीचा व माझा परिचय असता तरी मी तिला तिचा प्राणघात करण्यासाठी खद्द माझ्याच घरी कधीही
आणलं नसतं." ___“ नाहीं नाहीं ! तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.' सर्जेराव
ओशाळून म्हणाले, “ तसं म्हणण्याचा माझा हेत नव्हता. पण तसा संशय आलाच, तर त्याच्या मूळाशी ही चावी आहे. तुमच्या हातून ही कधी हरवली होती का?" ___ " कधीच नाही. मी ही माझ्या जानव्यांतच नेहमी अडकवून ठेवतों व फक्त उपयोगाच्याच वेळी बाहेर काढतो. आमचं घर क्वचितच बंद राहत असल्यामुळं तिचा उपयोगही फारसा होत नाही. तसंच, इतरांच्या हाती ती मी मुळीच जाऊ देत नाही. माझ्या पत्नीला मात्र ती पाहिजे तेव्हां मिळू शकते. पण तिच्याबद्दल तम्ही संशय घेणार नाही ना ?
हो! सर्वच पोलिसखातं संशयी असतं म्हणून म्हणतों. तिनंच या चावीप्रमाणं दुसरी चावी बनवून घेतली असा तुम्ही तिच्यावर आरोप करणार नाही अशी मला खात्री आहे.” गजाननरावांनी म्हटलें.
" रमाबाई तरी त्या दुर्दैवी स्त्रीला ओळखतात का ? " सर्जेरावांनी त्यांच्या भाषणाकडे दुर्लक्ष करून विचारले. ___नाही; मी खात्रीनं सांगतों की, तिनं हिला कधी पाहिलंसुद्धा
नसेल.”
" फारच चमत्कारिक तर ! तिचा ह्याच जागी खून कां व्हावा हे कांहीं मला कळत नाही."
“तुम्हांला तिचं नांव माहित नाही का ?" गजाननरावांनी विचारले.
" नाही. ती कोणालाही नकळत तुमच्या घरांत आली असून काळाच्या भक्ष्यस्थानी पडली आहे, यापेक्षा अधिक माहिती आम्हाला कांहींच नाही. आतां हिची चौकशी होईल त्या वेळी काय बाहेर येईल ते पाहूं या."
" माझीही तीच इच्छा आहे. ' गजाननराव म्हणाले, "आतां आपली रजा घ्यायला हरकत नाही ना ? ” __" आणखी एकच मिनिट थांबा." ते जावयास निघाले असे पाहून सर्जेराव म्हणाले, “ एक लहानशी व अणकुचीदार दाढी राखणारा असा एखादा इसम तुमच्या परिचयाचा आहे का ?" ___“छे ! मला काही असा मनुष्य कुठं पाहिल्याचं आठवत नाही." गजाननराव आठवण करून म्हणाले, " व कदाचित तसला मनुष्य मला कुठं दिसला असला तरी सध्या कांहीं आठवत नाही."
“ ठीक आहे.” सर्जेरावाच्या मुखांतून एक निराशेचा उद्गार बाहेर पडला, " आपणास ह्या खटल्याची चौकशी होईपर्यंत वाट पाहिली पाहिजे."
परंतु त्या खुनासंबंधानें कॉरोनरपुढे झालेल्या चौकशीतही सर्जे रावांची पूर्ण निराशा झाली, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण, त्या चौकशीनें खून कोणी केला अगर त्या कृत्यांत कोणाकोणाचें अंग असावें
हे कांहींच बाहेर आले नाहीं ! मयत स्त्रीच्या गळ्यामागील बाजूला हत्यार खुपसण्यांत आले असून ते खुपसताक्षणीच ती मृत्यु पावली असावी, असें डॉक्टर करमरकर यांनी सिद्ध करून दाखविले. तसेच, आपण रत्नमहालांत येण्यापूर्वी पांच तास अगोदर तिचा प्राण निघून गेला अमावा हेही त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखविले. असे जर होतें तर जिचा खून झाला ती स्त्री गात नव्हती व जो मनुष्य बाबुरावासमोर फाटकाच्या बाहेर आला होता तो त्याला दूर नेण्याकरितां आला नसावा. कारण त्यापूर्वीच खून झाला असल्याकारणाने तसे करण्याचे त्याला प्रयोजनच नव्हते, व त्या वेळी तिचा खून होऊन तीन तास झाले होते. उलट अर्थी तसे नसावे असे गृहीत धरल्यास डाक्ट रांनी आपला शोध वैद्यकशास्त्राच्या आधाराने सप्रमाण सिद्ध करून दाखविला होता. अर्थातच त्यामुळे त्या खटल्याविषयी विचार करण्यास बसणाऱ्या ज्यूरर्सची मने गोंधळून जाऊन 'खंजिराने सहेतुक खून केला' एवढाच त्यांनी निकाल दिला. अशा रीतीने सर्जेरावांनी आपल्या मते मोठ्या विचाराने जुळविलेली सांखळी तुटून पडली ! __ " आता त्या स्त्रीच्या दहनविधीची तयारी केली पाहिजे,” सर्व मंडळी निघून गेल्यानंतर सर्जेराव गजाननरावांस म्हणाले, “ व येणारा खर्च या भागांत राहणाऱ्या लोकांवर सारखा बसविला पाहिजे.”
" नाही. माझी असं करण्याची इच्छा नाही. " गजाननराव म्हणाले, “ज्या अर्थी ती माझ्या घरांत मत्य पावली आहे त्या अर्थी तिच्या दहनविधीची व्यवस्था मलाच केली पाहिजे व मी सर्व खर्च करणार आहे. याविषयी मी माझ्या पत्नीचं मत घेतलं असून तीही माझ्या म्हणण्याला अनुकूल आहे."
"पण तुम्हांला तिची काहीच माहिती नाही असं म्हणत होता ना?" " ते खरं आहे. पण तसं करणं माझा धर्म आहे. ज्यूरीचा फार्स आटोपला. आतां त्या खुनासंबंधानं आम्ही आपल्या बाजूनं स्वतंत्र तपास चाल करावा, अशी माझी इच्छा आहे."
-
“ सुरवात कशी करावी हेच मला सुचत नाही," सर्जेराव निराशेने म्हणाले, " ते असो. तिला आतां तुम्ही स्वतःच्याच खचानं जाळणार
असाल तर माझी मळींच हरकत नाही."
ती माझ्या घरांत मरण पावली असल्यामळं मी तसं करणं हैं माझं कर्तव्यच समजनों. पण एखाद्या दैनिक पत्रांत जाहिरात देऊन ती कोण आहे हे समजून कां घेत नाही ?"
“तेंही करायचं आम्ही ठेवलं नाही. तिच्या चेहरेपट्टीचं वर्णन देऊन सोबत चित्रही दिलं व जिकडे तिकडे जाहिरातीही चिकटवलेल्या आहेत. तसंच, बाहेर गांवच्या पोलिसांनाही कळवून याबद्दल जारीनं शोध करायला इशारत दिलेली आहे. आता शेवटी काय निष्पन्न होतं तेंच पाहायचं आहे." ___ "झालंच पाहिजे. कारण मुंबईसारख्या अगणित वस्तीच्या शहरांत कोणी ना कोणी तिला ओळखीत असलाच पाहिजे." __ " पण अशाच बकाल वस्तीच्या ठिकाणी गुप्त राहण्याचा बराच संभव असतो.' सर्जेरावांनी उत्तर दिले, “ जे मुंबईसारख्या शहरांत राहतात त्यांना शहरांत किती आले व किती गेले याचा मुळीच पत्ता नसतो! आपलीच गोष्ट उदाहरणार्थ घेऊ. या स्त्रीचं प्रेत आपल्या समोर आहे, पण ही कोण आहे, कुठून आली, तुमच्याच घरांत हिचा खून का झाला, वगैरे आपणाम कांहींच माहिती नाही व कदा चित् होणारही नाही.” ___“ चाललंच आहे. " जणू काय त्या गोष्टीचा आता कंटाळा आला आहे असे दाखवून गजाननराव म्हणाले, “ आता तुम्ही ह्या खुनाची चौकसी चालू ठेवणार आहां ना ? तर तुमच्या शोधाअंती काय आढ बन आलं हे मला वरच्यावर कळवीत चला. ती स्त्री त्या घरांत कशा रीतीनं आली हे जाणण्याची माझी इच्छा आहे. ही चावी तयार करून देणाऱ्या लोहाराला तुम्ही भेटला होता का ?"
" होय. पण तो अशी दुसरी चावी न केल्याचं शपथपूर्वक सांगतो इतकंच नव्हे, तर असली चावी त्याच्याजवळ नमुन्यालासुद्धा नाहीं !
. .हे ऐकून गजाननरावांचे मन थोडे संशयित झाले. ते म्हणाले, " व्यापारासाठी त्यानं माझ्यासारख्या किल्लीचा एखादा नमुना तरी आपल्यापाशी ठेवला असावा अशी माझी समजूत होती. आता जर एखादे वेळेस ही किल्ली हरवली तर-" . . .
" तर काय ! त्याला याच प्रकारची दुसरी चावी बनवतां येणं शक्य नाही. कारण त्याच्याजवळ तुमच्या चावीचा नमुनाच मुळी नाही, असं तो म्हणतो. तथापि मी त्याच्यावर चांगलीच नजर ठेव लेली आहे. कारण आपल्या फायद्यासाठी तो कदाचित् खोटंही बोलत असेल. प्रत्येकाकडे संशयी दृष्टीनं आम्हाला पाहावं लागतं.
"हं, माझ्या मेहुणीनं सांगितलेल्या हकीकतीवरून तुम्हाला माझा संशय येत होता तो यामुळंच वाटतं ?" ___ "तसंच काही नाही. पण हा खटलाच तितका चमत्कारिक नाहीं का ?" सर्जेरावांनी उत्तर दिले, "आतां माझी पूर्ण खात्री झाली आहे की, या बाबतीत तुमचा काहीएक संबंध नाही." ___ “ह्या तुमच्या मताबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. " गजा
ननराव म्हणाले.
" खरोखर तुम्ही सुदैवी आहांत” सर्जेराव उल्हसित वृत्तीने म्हणाले, " जर तुम्ही त्या रात्री शहरांत असतां व जर तुम्हाला आपली बाजू समर्थन करता आली नसती तर यापुढं या बाबतीत तुम्हाला फारच त्रास झाला असता."
• " म्हणजे ! तमच्या म्हणण्याचा अर्थ-----"
"नाही. माझं आतां तसं म्हणणं मुळीच नाही. पण ही बाबच अत्यंत चमत्कारिक आहे की नाही ते पाहा. तुम्ही माझ्या अगर इतर कोणाच्या जागी आहां असं समजून विचार करा. एक परकी व अनोळखी स्त्री तुमच्या घरांत येते व तिचा तिथं खून होतो ! त्या घराची चावी तुमच्या खेरीज इतर कोणाजवळ नाही. अर्थात् तुम्ही आपली बाजू पुराव्यानिशीं समर्थन करूं शकलां हे तुमचं सुदैव नाही का ? व तसं जर नसतं तर. चौकशीच्या वेळी हजर असणाऱ्यांपैकी बहुतेक लोकांना तुमचा मंशय येऊन तुम्ही सांगत आहां त्याहून काही तरी अधिक माहिती तुम्हांला आहे असंच वाटलं असतं." __ " जे मला माहित होतं ते मी तुम्हाला सर्व सांगितलं."
" आतां तशी माझी खात्री झाली आहे व तुम्ही आपला निर्दोष पणा सिद्ध करूनही दाखवला असल्यामुळं तुम्ही अगदी निष्कलंक आहां, यांत संशय नाही. असो. आता माझ्याविषयी विचाराल, तर मी ज्याच्या खिशांतून ती किल्ली सांडली त्याचा तपास करायचं बाजला ठेवून त्या बाईचं पूर्ववृत्त शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. ते शोधून काढल्यानंतरच तिच्या खुनाचं कारण समजून येईल. मी जे जे काहीं यत्न करीन व में कांहीं मला आढळून येईल ते सर्व तुम्हाला सांगेन व तुम्हालाही जर याबद्दल काही कळलं तर मला तुम्ही कळवलं पाहिजे.”
गजननरावांनी आपल्या नेहमीच्या संवयीप्रमाणे खांदे हालवीत म्हटले, “ अंऽहं ! तें नाहीं जुळायचं आपल्याला. एकदाचं हे दहनकार्य
आटोपलं की मी ह्या भानगडींत मुळींच पडणार नाही."
" जशी तुमची इच्छा. " सर्जेराव उद्गारले ! दोघेही एकमेकांना नमस्कार करून आपापल्या वाटेने निघून गेले. सर्जेरावांच्या डोक्यात विचारांचे काहूर माजून राहिले होते. आतांपर्यंत वाचलेल्या एकंदर हकीकतीवरून सर्जेरावांचे डोके या खटल्यांत कितीसें चालले असावे हे वाचकांना समजून आले असेलच. जे विचार प्रथम त्यांच्या डोक्यात आले होते,ते शेवटपर्यंत तसेच कायम होते. खुनाच्या चौकशीला सुरवात होण्यापूर्वी आपल्या विचारांत भरीवपणा आहे, अशीच त्यांची समजूत होती; परंतु ज्यूरीने दिलेला निकाल व चौक शीच्या वेळी बाहेर आलेल्या एकंदर साक्षी ऐकतांच आपण जुळविलेल्या मुद्यांचे दुवे अगदीच कच्चे आहेत, असे त्यांचे त्यांनाच कळन चकलें ! मेंदूला शीण देऊन मोठया कष्टानं उभारलेला त्यांचा विचाररूपी किल्ला अशा रीतीने एकदम ढासळन पडला ! सर्जेरावांना प्रथमपासनच गजा ननराव अपराधी असावेत असे वाटत होते-नव्हे, तशी त्यांची जवळ जवळ खात्रीच होती असे म्हणावयास हरकत नाही. परंतु चौकशीच्या दिवशी जे काही बाहेर आले त्यामुळे त्यांना आपले मत बदलावेंच लागले.रमाबाईनी, ज्या वेळी खून झाला त्या वेळी गजाननराव बिछान्या वर निजून होते हे सप्रमाण प्रसिद्ध करून दाखविल्यामुळे तो प्रश्नच आतां उरला नव्हता.
“ परंतु रमाबाईनी हे सर्व खोटेंच कारस्थान कशावरून रचलें नसेल ? " सर्जेराव चालतां चालतां स्वगत विचार करूं लागले, " पण छे ! खोटे असणे अगदीच अशक्य. कारण पत्राची तारीख,वेळ वगैरे खुनापूर्वीची असून गजाननराव असले घाणेरडे कृत्य करतील असें मन सांगत नाही. खनी मनुष्य त्याच्या नजरेवरूनच ओळ खावा, व गजाननरावांचा चेहरा तर आरशासारखा निर्मळ दिसतो आहे. अर्थात् ते खात्रीने अपराधी नसावेत. मग खरा अपराधी कोण, हाच मुख्य प्रश्न असून तोच मला सोडवितां येणे कठीण दिसते." अशा रीतीनें खुनी इसम कोण असावा हे हुडकून काढण्यासाठी सर्जेरावांनी सर्व बाजूंनी विचार करून पाहिला, परंतु अमकाच एक तो आहे, असे त्यांचे ठाम मत होईना. असो.
त्या मयत स्त्रीची स्मशानयात्रा योग्य रीतीने पार पडली. यात्रे. बरोबर गजाननराव, कमलाकर व त्या भागांतील त्या मयत स्त्रीविषयी सहानभूति वाटत होती असे काही लोक हजर होते. गजाननरावांनी त्या स्त्रीची दहन क्रिया एखाद्या आपल्याच कुटुंबांतील माणसाप्रमाणे केली. प्रेताला अग्नि देते वेळी गजाननरावांचा चेहरा म्लान व फिकट दिसत होता व नक्ताच त्यांना आलेला आजार याला कारण असावा असाच पुष्कळांचा समज झाला होता. कारण, गजाननरावांना त्यांच्या इच्छेविरुद्ध आपला बिछाना सोडून रत्नमहालांत चौकशीसाठी हजर राहावे लागले होते. हे सर्वाना टाऊक होते. दहनविधि आटोपल्यानंतर पुष्कळ लोकांनी गजाननरावांची त्या निराधार स्त्रीला अशा रीतीने अग्नि दिल्याबद्दल पाठ थोपटली. ह्याप्रमाणे दादर व मांटुगा या विभागांतील लोकांत खळबळ उडवून देणान्या त्या प्रेताचे भस्म झाले.
झालेल्या खनाची व चौकशीची हकीकत निरनिगळ्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागली. वर्तमानपत्रांच्या संपादकांना आपल्या पत्रांचे रकाने भरून काढण्यास असे काही तरी हवेच असते, व तसे काहीं तरी घडून आल्यास ते त्यांत आपल्या पदरची बरीच भर टाकून ती हकी कत हृदयस्पर्शी करून प्रसिद्ध केल्याशिवाय कधीच राहत नाहींत. जणं काय हा त्यांचा हक्कच आहे, व अशा प्रकारची कांहीं हकीकत घडून आल्यास प्रत्येक वर्तमानपत्रकार ती हकीकत आपल्या पत्रांत सर्वांच्या अगोदर व सविस्तर रीतीने कशी देण्यास सांपडेल याच उद्यो गास लागलेला असतो. अशा वर्तमानपत्रांपैकी त्या वेळी 'विश्ववृत्त' हे वर्तमानपत्र होते. खुनाची व त्याविषयी झालेल्या चौकशीची हकीकत आपल्या पत्रांत प्रथम प्रसिद्ध करून त्याचा खप करावा या उद्योगास त्या पत्राचा संपादक लागला व लौकरच त्याने सर्व हकीकत, त्यांत
आपल्या लेखनकलेची थोडी भर घालन आपल्या पत्रांत प्रसिद्ध केली. ती वाचल्यास वाचकांची कदाचित बरीचशी करमणूक होण्यासारखी आहे, म्हणून ती जशीच्या तशी पुढे देत आहे.
" दादर व माटुंगा या दरम्यान असलेल्या रत्नमहाल या नांवाच्या बंगल्यात झालेल्या खनाच्या योगाने तेथे राहत असलेल्या लोकांत मोठीच खळबळ उडून गेलेली आहे. दादर व माटुंगा ह्यांच्या दरम्यान मोठमोठे श्रीमंत भाटये, वकील,डॉक्टर,व्यापारी वगैरे श्रीमंत लोक राह तात. त्या ठिकाणी अशा प्रकारचे निंद्य कर्म-खनासारखें नीच प्रकारचे कृत्य घडून येणे ही अत्यंत लाजिरवाणी व शरमेची गोष्ट आहे व हा खून कोणी व कां केला याचा सुगावा येथील पोलिसखात्याला लागू नये ही अत्यंत आश्चर्यजनक गोष्ट आहे. इतकेच नव्हे, तर ज्या बाईचा खून रत्नमहालांत झाला ती कोण, कुठची व तिचें नांव गांव वगैरे कोणत्याच गोष्टीचा सुगावा त्या खात्यास अद्यापि लागलेला नाही. असा प्रकार मुंबईतील पोलिसखात्यांत पाहिला म्हणजे तेथील नागरिकांचे त्या खात्यासंबंधाने कसे काय मत होईल याचा विचार त्या खात्याच्या वरिष्ठांनीच करावा, हे उत्तम. मुंबईसारख्या शहरांत जाहिराती, वर्तमान पत्रे, इत्यादिकांसारखी बरीच सोयीची साधने असूनही येथील पोलिस खात्याला या बाबतीत काही माहिती मिळू नये, हे अत्यंत आश्चर्य होय. नियतकालिकांची मदत घेतली तर हा गप्त प्रकार उजेडात आणतां येणार नाही काय ? पोलिस इन्स्पेक्टर सर्जेराव यांचे मत असें आहे की, प्रथमतः स्त्री कोण आहे हे अत्यंत बारकाईने शोधून काढले पाहिजे व तिच्या मागील चरित्राचा एकदा तपास लागला म्हणजे हा खन कां व कोणी केला हे समजून येण्यासारखे आहे. हा शोध लावण्याचे काम इन्स्पेक्टर सर्जेराव यांनी स्वतः आपल्या हाती घेतले असून अजनपर्यत त्यांची या खनाच्या शोधाच्या बाबतीत फारशी प्रगति झालेली दिसत नाही. तरीही त्या खटल्यासंबंधाने त्यांना पूर्ण शोध लागून ते यशस्वी होवोत असे आम्ही इच्छितों. __“ चौकशीच्या दिवशी पुढे आलेल्या काही पुराव्यावरून असे सिद्ध होते की, ती स्त्री आठ आणि नऊ या दरम्यान त्या बंगल्यांत शिरली व आंत शिरल्यानंतर थोड्याच वेळाने तिचा खन झाला. ती बाजाचे पेटीपढील खुर्चीवर बसलेली असून तिच्यासमोर हार्मोनियमगाइड मधील "किती किती सांगू तुला" हे गाणे उघडले होते, हे जरी निःसंशय खरे आहे, तरी ती स्त्री ते गाणे केव्हाही म्हणत नव्हती, हे निर्विवाद आहे. ज्या माणसाची ती स्त्री वाट पाहत होती-कदाचित् ज्याने तिचा खून केला त्याचीच ती वाट पाहत असावी-तो येईपर्यंत तिने कदाचित् गाणे म्हटले असेल, परंतु बाबुरावाने अकरा वाजतां ऐकलेले गाणे तिचे नसून, ती.मेल्यावर तीन तासांनी दुसऱ्या कोणी स्त्रीने म्हटलेलें तें गाणे होय व डॉक्टर करमरकरही स्पष्टपणे सांगत आहेत की, नऊ वाजण्यापूर्वीच तिचा खून झालेला आहे. ___ " त्या रस्त्यावर जरी त्या रात्री बऱ्याच लोकांची ये-जा होती,तरीही त्या स्त्रीला त्या बंगल्यांत शिरतांना कोणीही पाहिलेले नाही. अशा गजबजलेल्या वेळी बंगल्यांत शिरतांना ती स्त्री कोणाच्याच दृष्टीला पडू नये ही फारच आश्चर्याची गोष्ट आहे. इतकेच नव्हे, तर गजाननराव व त्यांचे कुटुंब-रत्नमहालाचे मालक-हीं वाळकेश्वरी राहावयास गेली आहेत हे सुद्धा बहुतेकांना माहित नव्हतें : सर्व प्रकारची चौकशी अगदी बारकाईने करण्यांत आलेली आहे, परंतु त्या स्त्रीला तेथे येतांना कोणीही पाहिलेले नाही. यामुळे ती वंगल्यांत एकटीच शिरली, की तिच्याबरोबर दुसरें कोणी होते, हे सांगणे अशक्य आटे
"खुनी माणसाविषयी सांगावयाचे म्हणजे-खुनी इसम पुरुष असन त्या रात्री बाबुरावाबरोबर जो इसम बोलत होता तोच तो असावा असे आमचे मत आहे.-आपल्यापाशी असलेल्या बंगल्याच्या मुख्य दर. वाजाच्या किल्लीच्या योगाने त्या स्त्रीबरोबर त्याने आंत प्रवेश करून
आंत जातांक्षणीच त्याने तिचा खून केला व आपण यःपलायते कर. ण्याची संधि तो पाहूं लागला असावा, असंही असू शकेल. तो त्या स्त्री बरोबर बंगल्यांत शिरला असावा हे स्पष्टच होत आहे.कदाचित् आम्ही. वर दिल्याप्रमाणे ती स्त्री त्याच्यापूर्वीच वंगल्यांत जाऊन त्याची वाट पाहत असावी. काहीही असो, परंतु डॉक्टरांच्या अनुमानाप्रमाणे ते दोघेही आठ आणि नऊ यांच्या दरम्यान आंत शिरले असले पाहिजेत. गरीब बिचारी दुर्दैवी स्त्री ! आपण मत्यमुखी पडण्यास जात आहोत, हे तिला काय ठाऊक ! त्याने तिला सफेत दिवाणखान्यांत नेऊन आपले
काम साधण्यास संधि सांपडावी ह्या दुष्ट हेतने पेटी वाजविण्यास सांगि. तले व त्याप्रमाणे ती बसतांच आपली वेळ आल्यानंतर मागन शस्त्र सवपसन तिचा प्राण घेतला असावा. तिचा खन करतांक्षणींच तो
आपल्या पलायनाची संधि पाहूं लागला. डांचत असलेल्या आपल्या. कर्मामुळे व पकडल्या जाण्याच्या भीतीमुळे तो अकरा वाजेपर्यंत त्या बंगल्यांतच राहिला असावा. अशा रीतीनें तो पलायनाची संधि पाहत असता त्याला रस्त्यावर पोलिसशिपाई दिसला व त्याला चकविण्या करितां, त्याला कोणी तरी स्त्री त्या बंगल्यात गात असावी असे भास विण्यासाठी तो स्वतः पेटीवर बसून बारीक आवाजांत गाऊ लागला असावा. नंतर पोलिमांची साधारणपणे करमणक झाली आहे अशी त्याची खात्री पटल्यावर तो वंगल्याबाहेर पडला व त्याने चौकशीत बाहेर पडल्याप्रमाणे आपली सुटका करून घेतली. असो. बाबुरावाने
गाणाराचा आवाज साधारणपणे किनरा व मधून मधन ओढून ताणून आणल्यासारखा येत होता, असे सांगितले होते. अर्थातच त्या मनुष्याने खोटा आवाज काढून गाणे म्हटले असावे व त्या स्त्रीला त्या बंगल्यांत आणून तिचा खून करणारा इसमही तोच असला पाहिजे. कारण, रत्न महालाची किल्ली त्याच्याजवळ असल्यामुळे दुसऱ्या कोणास त्या घरांत येणे शक्य नव्हते." विश्ववृत्तांतील वरील हकीकतीमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली.
मुंबईतील हरएक वर्तमानपत्रास व त्यांच्या संपादकास 'कॉपिटिटर' म्हणून असतोच व ह्या दोघांमध्ये एक प्रकारची चढाओढ चाललेली असते व असा एखादा खुनासारखा प्रकार असला म्हणजे ते दोघेही त्याच्या खरेपणाविषयी संशयित वत्ति दर्शवन एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढन त्यांत आपल्या पदरची थोडीशी भर घालतात व एकंदर हकी कत तिखटमीठ लावून होतां होईतों मनोरंजक करतात. विश्ववृत्ता'स त्या वेळी 'प्रातःकाल' या नांवाचे दुसरें प्रतिस्पर्धी वर्तमानपत्र होते व त्या दोन पत्रकारांच्या बाबतीत काहींसा असाच प्रकार चाल होता. विश्व वृत्ताने एखादी बातमी प्रसिद्ध केली की, याने त्यांतील ठिगळे काढून त्यावरच आपल्या पत्राचे रकानेच्या रकाने भरून काढावे. विश्ववृत्त पत्रांत रत्नमहालांतील खुनाची बातमी प्रसिद्ध होतांच दुसऱ्या दिवशी या वर्तमानपत्रांत पुढीलप्रमाणे हकीकत आली: __ " रत्नमहालांतील खुनाच्या हकीकतीसंबंधी आमच्या व्यवसायबंधूनी विश्ववृत्त पत्राच्या संपादकांनी जरा अतिशयोक्तीची हकीकत दिली आहे. पोलिस शिपाई बाबुराव याचे म्हणणे असे होते की, तो मनुष्य जेव्हा बंगल्यातून बाहेर आला व आपल्याबरोबर भाषण करूं लागला त्या वेळी बंगल्यात पूर्वीप्रमाणेच गाणे चालू होते. त्या अर्थी बाबुराव याजबरोबर बोलत राहणारा मनुष्य खोटा आवाज काढन गाणं म्हणत नसावा असें पूर्णपणे सिद्ध होतेच. विश्ववृत्तपत्राने दिलेली हकीकत जरी चित्तरंजक आहे, तरी त्या हकीकतींत काही तथ्य असावे असें
आम्हांस मुळीच वाटत नाही. आमच्या मते पुढे दिलेल्या हकीकतीचा आणि खऱ्या वस्तुस्थितीचा बराचसा मेळ जमेल यांत शंका नाही.
" आमच्या मतं प्रथमतः त्या मनष्याने त्या स्त्रियांना आंत घेतले. है आम्ही स्त्रिया' असे म्हणण्याचे कारण, आमच्या मतें खुनाच्या वेळी बंगल्यांत दोन त्रिया होत्या. एक मयत स्त्री व दुसरी त्या कर्मास मदत करणारी स्त्री. त्या दोन स्त्रिया बाबुरावां बरोबर बोलत राहणाऱ्या मनुष्याबरोबरच आंत शिरल्या अगर त्याच्या मागन आल्या, यासंबंधाने निश्चित असें कांहींच सांगतां गेत नाही. त्या आंत आल्यानंतर त्याने त्या स्त्रियांना सफेत दिवाणखान्यांत नेले व त्यांपैकी एकीला पेटीवर बसावयास सांगून ती गातां गातां रंगांत आली असतां तिचा मागन शस्त्र खूपसून खून केला. खून त्या दुसऱ्या स्त्रीने केला की पुरुषाने केला यासंबंधानं ठाम मत देतां येणार नाहीं; तरीही खनाच्या बाबतीत ती दोघेही मारखींच अपराधी ठरतात हे निसंशय. खून केल्यानंतर ती दोघेही आपल्या पलायनाची संधि पाहूं लागली. खुनानंतर तीन तास त्यांनी त्या जागी राहावें ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. परन्तु भीतिग्रस्त झाल्यामुळे अगर आपला कोणालाही संशय येऊ नये हा हेत मनांत धरूनच ती एवढा वेळपर्यत रत्नमहालांत राहिली असावी असे म्हणण्यास हरकत नाही. रत्नमहालाच्या आजूबाजूला असलेल्या रस्त्यावरील रहदारी कमी होण्याची ती दोघेही वाट पाहत असावीत. सुमारे अकरा वाजतां त्यांनी तेथन यःपलायते करण्याचा विचार केला असावा; परन्तु त्याच वेळी बंगल्या ममोर पोलिस कॉन्स्टेबल बाबराव हा येऊन उभा राहिला. बाबुरावाने त्यांना कदाचित् पाहिले असावे व त्याला संशय आला असल्यास तो घालवावा या हेतूने ती दुसरी स्त्री पेटीवर बसून गाऊ लागली व त्या मनुष्याने खाली येऊन बाबुरावाला झुलवीत झुलवीत दूर नेले व तेवढया वेळांत ती स्त्री बंगल्याबाहेर पडली. रस्त्यावर आल्यावर तिला कमला करांची मोटर उभी असलेली दिसली असावी. ती स्त्री खुनी व दरोडे. खोर असल्यामुळे तिला मोटर चालविण्याची माहिती असलीच पाहिजे. ती ताबडतोब त्या मोटरमध्ये बसून ठाणे स्टेशनवर गेली असावी. ठाण्यासारख्या गजबजलेल्या स्टेशनावर तिच्याकडे कोणाचंच लक्ष गेलें नाहीं यांत कांहीं नवल नाही. मोटर सोडल्यानंतर ती मेलमध्ये बसन कोटें तरी पळून गेली असावी. अशा रीतीने ती खुनी स्त्री वेपत्ता झाली व काही तासांनंतर त्या हरवलेल्या मोटरीचा पत्ता लागला.
" आमच्या मते खनाची हकीकत ही अशी आहे व आमचे मित्र विश्ववृत्तकार यांनी आपल्या पत्रांत दिलेल्या हकीकतीपेक्षा आम्ही दिलेली हकीकत बहुतांशी खरी आहे हे आमचे वाचकसद्धा कबूल कर तीलच. गजाननराव ज्या अर्थी त्या स्त्रीला ओळखत नाहीत त्या अर्थी तिचा खून त्यांच्याच रत्नमहालांत कसा झाला ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. गजाननरावांचे सर्व नोकरचाकर त्यांच्याबरोबरच चौपाटी वरील त्यांच्या बंगल्यांत गेले होते. अर्थात् या बावतींत त्याच्यांवर कोणत्याही प्रकारचा दोष लादतां येत नाही. गजाननराव हे सुद्धा खून झाला त्या वेळी आजारी असल्यामुळे बिछान्याला खिळून होते. अर्थात् त्यांनाही कांहींच माहिती नसणारच. मात्र, रत्नमहालाच्या मुख्य दरवा जाची चावी आपणाखेरीज दुसऱ्या कोणाजवळ केव्हांच गेलेली नाही,असें ते निक्षून सांगत आहेत व ज्याने ती चावी तयार केली तो लोहारही त्या चावीसारखी दुसरी चावी आपण कधीच तयार केली नाही अशी साक्ष देतो. तेव्हां तसलीच दुसरी चावी त्या माणसाजवळ आली कशी हेच या खटल्यांतले मोटें गूढ आहे. तसेच, ज्या जागी त्या स्त्रीचा खून झाला ती जागाही विचित्रच आहे. त्या सफेत दिवाणखान्यांतील सर्व पांढऱ्या शुभ्र वस्तूंना विरोधी असे फक्त त्या मयत स्त्रीच्या अंगावरील कपडेच होते. अशा त-हेचा विचित्र दिवाणखाना बनविण्यास गजानन रावांना काय कारण झाले असेल ते समजल्यास बरे होईल. कदाचित् ही त्यांची एक लहरही असू शकेल. शेवटी थोडक्यात सांगावयाचे म्हणजे ती स्त्री कोण, रत्नमहालांत ती कशी आली, तिचा खून कोणी व का केला, तसेंच रत्नमहालाच्या मुख्य दरवाजाच्या चावीसारखीच दुसरी चावी त्या माणसाजवळ कशी आली, हे सर्वच काही अद्यापपर्यत
गूढ आहे."
दुसऱ्या दिवशी विश्ववृत्तांत पुढील मजकूर प्रसिद्ध झाला:
“ आमचे प्रिय मित्र प्रातःकालकर्ते असे म्हणतात की, अकरा वाजतां दुसऱ्या स्त्रीने व त्या मनुष्याने पळून जाण्याचा बेत केला, परंतु तितक्यांत पोलिस आल्यामुळे, ती स्त्री पेटी वाजविण्यास वसून तो पोलिसाला झुलविण्याकरितां बाहेर पडला. परंतु आम्हांला त्यांस इतकेंच विचारावयाचे आहे की, त्यांनी पळावयाचा बेत कोणत्या रीतीने व कोणत्या वेळी ठरविलेला होता ?"
ह्या प्रश्नास 'प्रातःकाल' पत्राकडून कांहींच उत्तर आलें नाहीं व त्या दिवसापासून कोणत्याही वर्तमानपत्रांत रत्नमहालांतील खुनासंबंधानें कांहींच बातमी छापून आली नाही. जणूं काय कांहींच घडून आले नाही, अशा रीतीने दोन आठवडे सर्वत्र शांत होते. परंतु इतक्यात एकाएकी एक चमत्कारिक गोष्ट घडून आली :