मास्तरांचे साधलें ! " गजाननराव, माझ्या हातून शक्य तेवढा प्रयत्न मी केला पण त्यापासून हा खून उजेडांत न येतां शेवटी मलाच हात टेकावे लागले." एके दिवशी पोलिस इन्स्पेक्टर सर्जेराव अत्यंत खिन्न वदनाने गजानन रावांच्या घरी-रत्नमहालांत-त्यांची भेट घेऊन म्हणाले, " यापुढे हैं गढ उकललं जाईल असं मला काही वाटत नाही." ___ "तुम्ही त्या खुनाविषयी म्हणतां बाटतं ? " गजाननरावांनी आठ वण करीत विचारले. ___ "मग दुसऱ्या कशाविषयी सांगणार !” सर्जेराव काकुळतीच्या स्वराने म्हणाले, “ याखेरीज तुमच्याकडे बोलायला माझ्याजवळ दुसरा विषयच नाही. 

गजाननरावांनी प्रश्न केला, “ सरलेच्या नवऱ्याचा पत्ता तुम्हांला लागला काय ?" 

" नाही व यापुढं तो लागेल असंही दिसत नाही. मधुकरानं खुनी इसम शोधून काढायचं काम रामसिंग नावाच्या एका माणसाकडे सोंपवलं आहे असं एकतों; तो शोध काय लावतो ते पाहूं या. पण तो तरी आमच्यापेक्षा विशेष असं काय करणार ? आमच्याप्रमाणं त्याचीही खटपट शेवटी व्यर्थ जाणार.” । 

" हा रामसिंग हुषार मनुष्य आहे का ?" 

" हो. तो तसा आहे असं म्हणतात. त्याच्या अंगांत काही तरी चलाखी असावी, असं मला वाटतं. मधुकरराव खुनी इसमाचा शोध 

मास्तरांचे साधले ! 

लावणाऱ्यास चांगलेच इनाम देतील व ते पटकावावं असं माझ्याही मनांत येतं. पण हा खन मुळी इतका गुंतागुंतीचा आहे की, आपला सर्व मेंदू जरी आटवला तरी शेवटी-शेवटी काय ? सर्वच कांहीं भोम् फस होणार हे ठरलेलं.” एक उसासा सोडून सर्जेरावांनी म्हटले. ___ गजाननरावांनी थोडा वेळ विचार केला व आपल्या जागेवरून उठून ते जवळच असलेल्या एका मेजाकडे गेले व त्यांतून एक चेकबुक काढून त्यानी सर्जेरावांच्या नांवें एक चेक लिहून म्हटले, 

" तुमच्या श्रमांचा काही तरी मोबदला तुम्हाला मिळालाच पाहिजे. विनाकारण दुसऱ्याचे मोफत श्रम घेणं मला मुळीच आवडत नाही. तुमच्या श्रमांचा थोडासा मोबदला मी हा तुम्हांला देत आहे, याचा तुम्ही स्वीकार करा. पण याच्याऐवजी एक अल्पशी देणगी मी तुमच्या कडे मागत आहे. तुमच्याजवळ जी त्या मयत स्त्रीची तसबीर आहे, ती तम्ही मला द्या. माझ्याकडून तरी शक्य तितका तपास करण्याचा मी काही तरी प्रयत्न करून पाहतो." __ " ती तसबीर मी तुम्हांला देईनच.” तो चेक खिशांत ठेवीत सर्जेराव म्हणाले, "पण मला वाईट वाटतं तें एवढंच की, निकालाच्या अभावी हा गुन्हा तसाच पडून राहणार." सर्जेराव जाण्यासाठी उठले व त्यांना पोचविण्याकरितां गजाननराव दारापयत आले. 

बाहेर पडण्याकरितां गजाननरावांनी दार उघडतांच त्यांना समोरच एक माणस उभा असलेला दिसला. तो शरीराने उंच व वर्णाने सांवळा असून, गजाननरावांनी जेव्हां दरवाजा उघडला तेव्हां त्यावरील बेल दाबण्याकरिता त्याने आपला हात वर उचललेला होता. गजाननरावांनी त्याजकडे निरखन पाहिले. परंतु त्यांना काही त्याची ओळख पटेना. 

" तुम्हांला कोण पाहिजे ?' त्यांनी सौम्य स्वरांत त्या नवख्या इसमास विचारले. 

"काही कामाकरता मला रमाबाईची भेट घ्यायची आहे." दांडेकर मास्तरांनी उत्तर दिले. ( तो गृहस्थ दांडेकर मास्तर होता.) 

" आपलं काही तरी आफिसचं काम असेल. अच्छा ! ती आपल्या खोलीत वर आहे." असे म्हणून गजाननरावांनी जवळच असलेल्या एका नोकरास म्हटले, " यांचं नांव विचारून घेऊन घरांत कळव व मग यांना वर घेऊन जाः" असे म्हणन ते व सर्जेराव बोलत बोलत बाहेर पडून निघन गेले. 

धन्याच्या आज्ञेप्रमाणे नोकराने मास्तरांना खालीच एका खुर्चीवर बसवून आपण त्यांच्या आगमनाची वर्दी देण्याकरितां वर निधन गेला. मध्यंतरी मास्तरसाहेबांचा आपणाशी विचार चाललाच होता. गजाननरावांना पाहतांच, त्यांना आपण कोठे तरी पाहिले असावें असे त्यांना वाटू लागले. त्यांनी आपले डोके खाजवून त्यांना कोठे पाहिले असावे याचा बराच विचार केला. परंतु त्यांच्या डोक्यांत प्रकाश पडेना. त्यांचा त्यावर आणखीही विचार चालला असता; परंतु तित. क्यांतच वर गेलेला नोकर पुन्हा खाली येऊन "बाईसाहेव आपली भेट घेण्यास तयार आहेत" असे सांगू लागला. नोकराने खुणावल्याप्रमाणे मास्तर त्याच्या मागोमाग जिना चढून वर गेले. नोकराने त्यांना सफेत दिवाणखान्यांत सोडले. ___ मास्तर रमाबाईनी निर्देशिलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झाल्यावर त्या म्हणाल्या, " कोणत्या कामासाठी आपण माझी भेट घेतली ते मला 

आधी समजेल का?" 

रमाबाईंच्या प्रश्नाला प्रथम उत्तर न देतां आपल्या खिशांतून आपल्या नावाची एक 'व्हिजिटिंग कार्ड' काढून ती रमाबाईंच्या हाती देत त्यांनी म्हटले, “ ह्या काडावरून आपल्याला माझं पूर्ण नांव व धंदा कळेलच." __ “ दांडेकर मास्तर !” रमाबाई तें कार्ड वाचून उद्गारल्या. " हं ! काय काम आहे तुमचं ?" ___“ ज्या स्त्रीचा ह्या तुमच्या दिवाणखान्यांत खून झाला तिचा मी मामेभाऊ." असें म्हणून आपल्याच ताठयांत असलेल्या रमाबाईंच्या चेह-यावर आतां चांगलाच फरक होणार या आशेने ते तिच्या चेह-या कडे निरखून पाहू लागले. 

परंतु त्यांच्या अटकळीप्रमाणे रमाबाईंच्या भृकटी वक्र झाल्या नाहीत अगर त्यांच्या चेहऱ्यावरही भयाचे कसलेच चिन्ह दिसले नाही. 

" बरं, मग ?' त्यांनी किंचित् ओळखल्यासारखं करून प्रश्न केला. 

"मी आतां सरळ मुद्यावर येतो. त्या खुनाच्या रात्री तुम्ही त्या बंगल्यांत कशा व कोणत्या कारणासाठी आला होतां ?" 

रमाबाई एकदम आश्चर्यमूढ होऊन मास्तरांकडे डोळे वटारून पाहूं लागल्या. 

" साफ खोटं ! " त्या एकदम म्हणाल्या, " त्या रात्री मी तिथं मळीच आले नव्हते. कुणी सागितलं तुम्हांला हे ?" । 

" तुम्ही आला होता. इतकंच नव्हे, तर तुम्हाला तुमचं आवडतं गाणं गात असतांना लोकांनी ऐकलेलं आहे." 

"हं !” थोडा वेळ विचार करून रमाबाई उद्गारल्या. त्यांनी या वेळी आपल्या चेहऱ्यावर कसलाच फरक दिसू दिला नाही; तसेच आपल्या मनावरील ताबाही त्यांनी यत्किंचितही ढळू दिला नाही. पूर्वी प्रमाणे पूर्ण शांत चेहरा करून त्या आपल्या जागेवरून बसून म्हणाल्या, 

" पण मी त्या रात्री चौपाटीवरील आपल्या बंगल्यात होते, हे तुम्ही विसरल्यासारखे दिसतां." 

"ते मला ठाऊक आहे. इतरांच्या दृष्टीनं ते बरोबर आहे. गजानन रावही तिथंच होते.” 

"होय, बरोबर." रमाबाई थंडपणे म्हणाल्या, " असे मार्गावर या. पण हे असे प्रश्न विचारण्यांत तुमचा हेतु तरी काय आहे, ते मला कृपा करून सांगाल का ? " 

“ मला तो अपराध मधुकरावर शाबीत करायचा आहे." 

" पण या बाबतीत तुम्हाला मदत करायला मी पूर्ण असमर्थ आहे.” रमाबाई उतावीळपणाने म्हणाल्या. 

“ छे ! छे ! साफ चुकलांत तुम्ही.” मास्तर म्हणाले, “तुम्हांला सहज मदत करता येण्यासारखी आहे, पण तुम्ही ती करायची टाळाटाळी करीत आहां, एवढंच. कारण त्या खुनाच्या रात्री पोलिसांबरोबर बोलत जाणारा माणस मधुकरच असून त्याला निसटून जायला तुम्हीच मदत केली. त्या रात्री तुमची दोघांची ह्या बंगल्यांत भेट झाली होती 

खास व सरलेचा खून त्या चांडाळानंच तिच्या मानेत खंजीर खुपसून - केला." 

" खंजीर ? कुठचा खंजीर ?" ___" हं ! कुठचा खंजीर ! तमच्या आचाऱ्याला स्वयंपाकघरांतील रच्या एका कोनाड्यांत मिळाला होता तो खंजीर. कोणत्याही कार णानं का असेना, पण जो आपला स्वतःचा असं तुम्ही सर्वांना सांगि तलं, तो खंजीर. आतां तरी आलं का ध्यानांत ? मधकरानं खन करून खंजीर स्वयंपाकघरांतील झरोक्यांत फेकून दिला." __ " अगदीच अशक्य. " रमाबाई उपहासात्मक हसून म्हणाल्या, " घराची मागील बाजू बंद असल्यामुळं त्याचा आंत प्रवेश होणं शक्य नव्हतं." 

हे ऐकताच मास्तरांचा थोडासा गोंधळ उडाला खरा. परंतु ते डगमगणारे नव्हते. त्यांनी निधड्या छातीने रमाबाईच्या दरएक विधानास तोंड देण्याचा निश्चय केला. ते म्हणाले, “ ज्याचा रत्नमहा लांत सहज प्रवेश झाला, त्याला आतील भागांत जायला कितीसा वेळ लागणार ?" __ " अस्सं ?" रमाबाई आपल्या पाहुण्याकडे तटस्थ नजरेने पाहत म्हणाल्या, " एकूण त्याला मी घरांत घेतला असं तुमचं म्हणणं 

आहे तर ?” 

" होय; तसंच, रत्नमहालाची चावी गजाननरावांपाशी होती. अर्थात् ती तुमच्या हाती येणं शक्य होतं. कदाचित त्या वेळी जरी ती चावी; मिळण्यासारखी नव्हती, तरी त्यापूर्वी तसलीच दुसरी चावी बनवणं तुम्हांला कांहीं कठीण नव्हतं. खून घडवून आणल्यानंतर घराच्या बाहेर पडण्यासाठी म्हणून तुम्ही ती चावी त्याजजवळ दिली व कोणाला आपल्या अमानुष कृत्याचा संशय येऊ नये म्हणून तुम्ही तिथंच गात राहिलां." 

"हं, मग माझी सुटका कशी झाली ?" 

" कां बरं ? तुम्हाला तुमची सुटका करून घ्यायला बराच अवधि होता. शिवाय ज्या अर्थी तुम्ही त्या रात्री कमलाकराची मोटर ठाणे स्टेशनपर्यंत हाकून नेली, त्या अर्थी मोटर हाकण्याचं तुमचं नैपुण्य 

आम्हांला समजून आलं." 

" चौपाटीवर जायला ठाण्यावरून जाणं जवळ पडेल खरं !" 

" बाईसाहेब, अशा आडरस्त्यानं जाण्यामुळं च तुमची हुषारी दिसून येत नाही. लोकांना आपला संशय येऊ नये, म्हणून तुम्हांला हाच मार्ग पत्करावा लागला. तम्ही ती मोटर ठाणे स्टेशनच्या हद्दीत ठेवन दिलीत व लोकलनं दादरवर येऊन पुढं चौपाटी गांठलीत." 

मास्तरांचें हें तर्कशास्त्र ऐकतांच, रमाबाईच्या चेहऱ्यावर एकदम फरक होऊन त्या आपल्या जागेवरून उठन म्हणाल्या, “एकूण माझ्या हालचालीची पूर्ण माहिती तुम्हांला अवगत असावी असं दिसतं." 

"होय. आणि त्याबद्दल मी माझी पूर्ण खात्री करून घेतली आहे." मास्तर विजयी मुद्रा धारण करून म्हणाले. 

" आणि मी त्या रात्री ह्या दिवाणखान्यांत असन गात बसले होते असंच तुमचं म्हणणं ना ?" 

"होय. तुम्हीच त्या रात्रीं 'किति किति सांगू तुला' हे पद गात होता." 

"पण तुमच्या ह्या सर्व कल्पना साफ चुकीच्या आहेत, असंच मला म्हटलं पाहिजे, समजलं का ? मी त्या रात्रीं ह्या दिवाणखान्यांत नसून या जागेपासन बऱ्याच अंतरावर-चौपाटीवर आपल्या बंगल्यांत होते. मी मधुकराला ह्या बंगल्यांत मुळीच घेतलं नाही. इतकंच नव्हे तर त्या संबंध दिवसांत मी ह्या बाजूलासुद्धा फिरकले नाही." __ मास्तरसाहेबांनी आपले खांदे उडविले व एक प्रकारची तिरसट मुद्रा करून म्हटले, "मग मला ह्या सर्व गोष्टी नाकारून तुम्ही मला पोलिसांत जायला भाग पाडीत आहांत असंच ना मी समजावं ?" __ " मुर्ख आहांत झालं !” रागाने गुरगरत मास्तरांकडे वळून रमाबाई म्हणाल्या, "माझं बोलणं पटवन देता येण्याजोगी विधानं मजजवळ नाहीत, अशी तुमची समजत आहे की काय ? मी में में कांही सांगितलं ते सर्व काही सिद्ध करता येईल ही माझी खात्री असल्यामुळेच तुम्ही मजवर ठेवलेले सर्व आरोप मी उघडपणे नाकरीत आहे. मी त्या रात्री 

रत्नमहाल 

था दिवाणखान्यांत गात होते, हाच तुमचा मुख्य आरोप आहे, नव्हे ? ठीक आहे. तेच गाणं मी तुम्हांला आतां ऐकवते.” । ___ असें म्हणन रमाबाई दिवाणखान्याच्या एका दाराला लावलेला पडदा थोडा बाजूला सारून आत गेल्या. ती आता काय करणार याचा कांहींच तर्क न झाल्यामुळे दांडेकर तटस्थ होऊन ती गेली त्या बाजू. कडे पाहत राहिले. __ थोडक्याच वेळांत रमाबाई आंत गेल्या होत्या, त्या दाराच्या पडद्या मागून मधुर स्वर ऐकू येऊ लागले. अत्यंत मधुर व कानाला गोड लागणारा असा तो रमाबाईंचाच आवाज होता. आपणास होत नव्हतें तेवढे संगीताचे ज्ञान लढवून त्या " किती मिति सांगं " हे पद घोळ वून म्हणू लागल्या. परंतु आमचे मास्तर त्या गायनांत गुंग होऊ लागले न लागले तोच त्या दाराचा पडदा एकदम बाजूला सरकला व मांतून रमाबाई बाहेर पडल्या. रमाबाई त्या दिवाणखान्यांत आल्या तरी आंत गाणे चालच होते. " हेच ना ते गाणं?" बाहेर येताच त्यांनी मास्तरांस प्रश्न केला. 

" पण-पण--” हे काय घडले याचा काहींच तर्क न झाल्यामळे शन्य चेहल्याने मास्तर अडखळत म्हणाले. ___" आणि गाणारीही मीच ना?" रमाबाईनी पुन्हा प्रश्न केला. " मग पाहा तर." तिने डोळ्याचे पाते लवतें न लवतें तोच त्या दाराचा थोडासा बाजस सरकलेला पडदा एकदम बाजूला खेचतांच आंत ते गाणे उठवीत असलेला एक मोठा ग्रामोफोन मास्तरांच्या दृष्टीस पडला. मास्तर 'आ' वासन एकदा रमाबाईकडे व एकदा त्या ग्रामोफोन. कडे शून्य दृष्टीने पाहूं लागले! अशा त्यांच्या झालेल्या फजितीने आनं दित होऊन, रमाबाई पुढे येऊन उपहासात्मक हास्य करीत म्हणाल्या, "मला वाटतं, आता तुमची चांगलीच खात्री झाली असेल. त्या रात्री पोलिसाला जो माझ्या गाण्याचा आवाज ऐकू आला तो हाच होय." 

रमाबाई आंत जाऊन ग्रामोफोन बंद करून आल्या. मास्तर जरी हतबुद्ध झाले होते, तरी शरण जाण्याचा त्यांचा विचार होईना. ते म्हणाले, "काहीही असलं तरी त्या रात्री तम्ही ह्या बंगल्यांत या जागी होता, ही गोष्ट मी कधीच नाकबल करणार नाही. तुम्ही इथं असूनही कदाचित् फसवणुकीसाठी ग्रामाफोन लावला असेल. पण आतांच सांगितलेल्या इतर गोष्टींविषयी माझी पूर्ण खात्री आहे. त्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता तुम्ही चौपाटी सोडून इथं आलांत हे मी 

छाती टोकून सांगू शकतो.” 

" हे तुम्ही कसं सिद्ध करणार ?” रमाबाईनी प्रश्न केला. 

" माझ्याजवळ माटुंगा स्टेशनवरील तिकिट कलेक्टर व तेथील एक पोर्टर यांच्यापासून मिळालेला सबळ पुरावा आहे. व त्या वेळी आपला पोशाख कसा काय होता, हेही चांगलंच ठाऊक आहे." 

ला कसं कळलं?" " तुमच्याच सीतेकडून." मास्तर चटकन बोलून गेले. 

"अस्सं!" रमाबाई रागाने आपला खालचा ओंठ कडकडन चावन व आपल्या हाताच्या मुठी आवळून म्हणाल्या, "तुम्हांला सर्व काही माहित आहे, अशी आतां माझी खात्री झाली. पण त्या स्त्रीचा मी खन केला नाही. कारण तिला ठार मारण्याचं मला कोणतंच कारण नव्हतं. खना पूर्वीही मी तिला कधीही पाहिलं नव्हते व तिची-माझी ओळखही नव्हती. इतकंच नव्हे, तर त्या दिवशी मी ह्या बंगल्यात पाऊलही ठेवलं नाही." 

" पण मी सांगतों की...' 

" थांबा." त्यांना मध्येच थांबवून रमाबाई एकदम म्हणाल्या, " तुम्ही सांगण्यापूर्वीच मी तुम्हाला असं सांगते की, तुमची कल्पना साफ चकीची आहे. इकडून दुसऱ्या कुणा स्त्रीच्या प्रेमपाशांत असावं असा मला खूनापूर्वी बरीक संशय येत होता. खुनाच्या दिवशी सका. ळीच त्यांना एका स्त्रीकडून पत्रं आलं.ते पाहतांच मला वाटत असलेला संशय मी त्यांच्यापाशी प्रकट केला. पण त्यांनी सर्व काही नाकबल केलं व आपल्याला बरं वाटत नाही असं कळवन आपल्या खोलीचा मार्ग त्यांनी धरला. संध्याकाळपर्यंत मी त्यांच्याशी बोललेही नाही. संध्या. 

२०० 

 

काळी पांच वाजन गेल्यानंतर जेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले, तेव्हां ते खोलीत नसून बाहेर गेल्याचं मला समजलं. अर्थात् ते आपल्या प्रिय माणसाला भेटायला गेले असावेत, ही माझी खात्री झाली. ते थोडयाच वेळापूर्वी बाहेर पडले असं समजताच मी सीतेला माझ्या वेषांत तिथंच बसायला सांगन त्यांच्या मागोमागच बाहेर पडले. मी त्यांना पँटरोड स्टेशनवर गांठलं आणि त्यांच्या नकळतच त्यांच्याच गाडीत चढ़न, त्यांना माटुंगा स्टेशनवर उतरलेले पाहतांच, मीही तिथंच उतरले. पण स्टेशनच्या बाहेर येऊन पाहते तो ते कुठंच दिसेनात ! अखेरीस तिथंच त्यांची-माझी चुकामुक झाली. " 

" म्हणून तुम्ही ह्या बंगल्यात आला ?' 

" नाही. मी या बाजूला मुळीच आले नाही. ते त्या स्त्रीला या बंगल्यांत आणतील ही कल्पनाच मला अगदी अशक्य वाटली. इत कंच नाही, तर त्यांनी तिला इथं आणली नाही ही माझी पूर्ण खात्री आहे. माटुंगा स्टेशनवर उतरल्यानंतर ते पुढं कुठं गेले हे मात्र मला सांगता येणार नाही. पण मी मात्र बरीच रात्र होईपर्यंत त्यांना मुद्देमालासहित पकडावं या हेतूनं माटुंगा स्टेशनवरच होते. ते रात्रीच्या शेवटच्या गाडीनं मुंबईला आले, तेव्हां मीही त्याच गाडीनं परतले. त्यांनी मला मळीच पाहिलं नाही व ज्या अर्थी त्यांच्या विरुद्ध कसलाच पुरावा मला सांपडला नाही, त्या अर्थी मीही त्यांच्याजवळ तो विषय काढला नाही. मी मागोमाग बाहेर पडून त्यांच्या पाळतीवर होते ही गोष्ट त्यांना मुळीच समजली नाही व ती समजू नये अशीही माझी इच्छा होती. तसंच सरलेच्या खुनाची हकीकत जेव्हां वर्तमानपत्रांतन वाचली तेव्हाही मला त्यांचा मुळीच संशय आला नाही. त्याच वेळी नव्हे, तर मला त्यांचा आताही मुळीच संशय येत नाही. कारण खुनासारखं अमानुष कृत्य करायला यांच्यासारखा मित्रा मनुष्य केव्हांच धजणार नाही ही माझी खात्री आहे. शिवाय आपल्याच घरांत रकपात करायचा मूर्खपणा त्यांनी केव्हाही केला नसता." 

 

"अस्सं! आता मला माझी चूक आढळून आली. तुम्ही पूर्ण निरपराधी आहांत ही माझी खात्री झाली. तुम्हांला नाही ती दूषणे देऊन मी तुमच्या मनाला त्रास दिला याबद्दल मी आपली मनःपूर्वक क्षमा मागतो. " असे म्हणन मास्तरांनी रमाबाईंना खरोखरच लवन नम स्कार केला. आरंभी टवटवीत असलेला त्यांचा चेहरा निराशेमुळे अगदी कोमेजून गेला. __ परंतु रमाबाईंनी त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या मनाची कोमल 

भावना व्यक्त केली नाही.

 

 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel