आतां आपण इन्स्पेक्टर सर्जेराव यांस लोणावळ्यास शांतिगृहांत मोडून सरोजिनीबाईच्या हकीकतीकडे वळूया.ह्या कादंबरीच्या आतापर्यंत आलेल्या काही प्रकरणांवरून आमच्या वाचकांचा सरोजिनीबाईंच्या स्वभावाशी थोडाबहुत परिचय झालाच असेल. 
दांडेकर मास्तर ! मास्तरांसंबंधी सरोजिनीबाईंनी काढलेले उद्गार वाचकांच्या स्मरणांतून गेले नसतीलच. परंतु त्यांच्या शब्दांवरून मास्तरांची कल्पना केल्यास ती खात्रीने चुकीची ठरेल. मास्तर अजून पर्यंत अविवाहित असून पुढेही तसेंच जीवित कंटण्याचा त्यांचा सध्या तरी विचार होता खरा. ते एका इंग्रजी शाळेत परकीय भाषा शिक विण्याचे अध्यापक असून त्यांचा सर्व वेळ, त्यांच्या मते, आपण घेत. लेल्या विषयाच्या अध्ययनांत जाई. मास्तरांस क्लबमध्ये अगर हॉटे लांत राहणे आवडत नसल्यामुळे व त्यांना एकांतवासाची फार आवड असल्यामुळे, ते आजपर्यंत आपल्या मनास पाहिजे तशा एकांत जागेच्या शोधांतच होते, व तशी जागा त्यांना सरोजिनीबाईच्या मालकीच्या असलेल्या जमिनीवरील एका झोपडीवजा बंगलींत सांपडली. ताबडतोब त्यांनी ती जागा परवानगीने आपल्या ताब्यात घेतली. ही बंगली सरोजिनीबाईंच्या स्वतःच्या बंगल्याच्या मागच्या बाजूस काही कदमांवर होती. त्या बंगलीसभोवती लहान पण सुरेख असे फळ्यांचे कुंपण असून पाठीमागल्या बाजूस एक लहानसा ओढा 

वाहत होता. हा ओढा फक्त पावसाळ्यांतच तुडुंब भरत असून त्यामुळे त्याच्या आसपासच्या जागेला एक प्रकारची सर्द हवा लागत असे. प्रथम सरोजिनीबाईना ती बंगली भाड्याने द्यावीशी वाटेना. पण अलीकडे मास्तरांना पाहिल्यापासून व त्यांच्या मनांतील विचार तिला तंतोतंत पटल्यामुळेच की काय, अगर एकांतप्रिय स्वभाव पाहूनच तिने त्यांना ती बंगली भाड्याने देऊ केली. मास्तरांनीही, अगदी आपल्या इच्छे प्रमाणे जागा मिळत आहे असे पाहन, विशेष विचार न करतां ती जागा ताबडतोत भाड्याने घेऊन तीत ते राहूं लागले व अशा रीतीने वऱ्याच दिवसांपासून ते सरोजिनीबाईचे भाडोत्री बनले होते. 

मास्तर स्वभावाने अगदी शांत व एकांतप्रिय होते. त्यांनी आपल्या घरकामास कोणीही चाकर ठेवलेला नसून घरचे सर्व काम ते स्वतःच पाहत असत. मास्तर राहत असलेल्या त्या बंगलीमध्ये फक्त दोनच खोल्या असून त्यांपैकी एक ते स्वयंपाकगहाप्रमाणे वापरीत असत व दुसऱ्या बाहेरच्या खोलीचा उपयोग जेवण, निजणे, बसणे, उठणे वगैरे इतर किरकोळ कामाकडे होत असे. दुसरी-बाहेरील खोली आंतल्या खोलीपेक्षा मोठी व हवाशीर असून ती जरी थोडी सर्द होती, तरी आमच्या मास्तरांना ती विशेष आवडण्याचे कारण तिकडे अस लेली शांतता व एकांत होय. त्या घराच्या पाठीमागल्या बाजूकडील ओढयावरून नजर फेंकली असतां पलीकडे निरनिराळ्या आकृतींचे, कल्पना लढवन बांधलेले मनोरम बंगले दृष्टीस पडत असत. बंगलीच्या डाव्या बाजूस साधारणतः शहराचा देखावा व आंतील रहदारी दिसन येत असे.. 

प्रथमतः कमलाकराला आमच्या मास्तराविषयी, त्यांची साधी राहणी पाहून आदर वाटत असल्यामुळे तो मधून मधून त्यांना भेटा वयास जात असे. तो त्या जागेचा सर्दपणा व ओलावा पाहून त्यांना तो काढावयास वरचेवर सांगत असे; परंतु व्यर्थ ! मास्तर पक्के हट्टी होते. “ मी आहे तोपर्यंत मला याचा काहीएक त्रास होत नाही,' 
ते आपल्या नेहमीच्या पद्धतीने म्हणत असत, " तशांत मी कदाचित इथं फार दिवस राहणारही नाही." 
" तुमचा सोडून जायचा बेत आहे ?'' त्यांना भेटावयास आलेल्या कमलाकराने विचारले. 
" कदाचित. कारण माझं नशीब उघडण्याचा संभव आहे. कदा चित् वारस म्हणून मला माझ्या एका नातलगाकडून बरीच माया मिळण्याचा संभव आहे. मग इथं राहणार आहे कोण ? मला या बकाल मुंबईत राहावंसंसुद्धा वाटत नाहीं; पैसे मिळालेच, तर मी ब्रम्ह. देशासारख्या ठिकाणीही जाऊन राहीन." 
होकारार्थी कमलाकराने नुसती मान हालविली. 
दांडेकर मास्तर !--आपण एका इंग्रजी शाळेमध्ये परकीय भाषेचे अध्यापक असल्यामुळे सर्वांनी आपणास मास्तर या वचनानें न संबो धतां ते शिकवीत असलेल्या गहन परकीय भाषेमुळे 'प्रोफेसर' म्हणावें अशी त्यांची फार इच्छा असे व म्हणूनच इतरांनी जरी त्यांना ती पदवी दिलेली नव्हती तरी आपण होऊन ते 'प्रोफेसर' ही पदवी आपल्या नांवामागे लावून घेत असत. मास्तर दिसण्यांत अगदी विलक्षण व तन्हेवाइक दिसत असत. ते शरीराने अगदी रोडके होते; मांसाचा त्यावर लवलेशही नव्हता. त्यांच्यासारख्या प्रकृतीच्या मनु ध्याला सरोजिनीबाईंच्या त्या सर्द जागेत संधिवातासारखा रोग जडा चयास काही वेळ लागला नसता; परंत आश्चर्य हेच की, ते आजारी पडलेले कधीच दिसले नाहीत. त्यांचा घालण्याचा एक ठराविक काळा पोषाक असून कोठेही जावयाचे असले तरी ते त्याच पोषाकांत बाहेर पडत असत. त्यांचे चालणे अगदी मंद असून ते स्मशानयात्रेस निघ. णाऱ्या माणसाप्रमाणे दिसत असे. त्यांचा चेहरा ब्रम्हदेश आसाम मधल्या लोकांसारखा दिसत असे. परंतु तो इतका रोडावलेला होता की, त्याजकडे पाहतांच हे एक जिवंत मढे आहे की काय असा भास होत असे. त्यांचे ते खोल गेलेले गाल, पातळ व फिकट दिसणारे बट बटीत डोळे, ओष्ठद्वय, टक्कल पडलेले कपाळ व स्मभू व दाढीविरहित 
चेहरा हे पाहून त्यांचा चेहरा मनोवेधक न दिसतां उलट हिडिस व भेसूर दिसत असे. परंतु त्यांच्या एकंदर अवयवांमध्ये मनांत भरण्या जोगे असे त्यांचे डोळेच होते. वर असलेल्या काळ्याकुट्ट भुवयां खाली ते एखाद्या दीपज्योतीप्रमाणे चकाकत असल्याप्रमाणे वाटत असत. मास्तरसाहेब कितीही जरी अशक्त व दुबळे दिसत असत, तरी त्यांच्या त्या डोळ्यांकडे पाहताक्षणीच त्यांच्यांत काही तरी जीवन शक्ति असावी अशी मन साक्ष देत असे. त्यांचे हात त्यांच्या अखिल यष्टीप्रमाणेच रोडके असन, त्यांची लाबटांगी पावलें त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फारच लवकर नेत. लांब टांगा टाकीत, सरकत, आपला मार्ग आक्रमीत असतांना त्यांना पाहणाऱ्यांना अत्यंत 
आश्चर्य वाटत असे. 
रत्नमहालांतील खनासंबंधानें मास्तरसाहेबांची काहीही मते असोत; परंतु ते ती कधीही आपण होऊन कोणापाशी व्यक्त करीत नसत. त्यांना स्वतःला वर्तमानपत्रे वाचण्याचा बराच नाद असे, तरीही ते एकाही वर्तमानपत्राचे वर्गणीदार झाले नाहीत अगर त्यासाठी त्यांनी आपल्या पदरची एक दिडकीही खर्च केली नाही. मात्र सरोजिनी बाईच्या घरी 'विश्ववृत्त' म्हणून में एक दैनिक येत असे ते वाचल्या शिवाय ते कधीही राहत नसत. एखाद्या दिवसाचा अंक त्यांचा वाचावयाचा राहिला असे कधीही झाले नाही. मास्तरसाहेब शाळेतून घरी जातेवेळी नियमितपणाने सरोजिनीबाईकडून त्या दिवसाचा अंक मागन घेऊन जात असत. अंक घेऊन जाण्याच्या वेळी दांडेकर मास्तर सरोजिनीबाईंबरोबर चाल विषयावर थोडा वेळ गप्पा मारीत व थोडा वेळ त्यांच्या प्रकृतीसंबंधाने बोलणे झाल्यानंतर ते तो अंक घेऊन घरी जात. 
एके दिवशी नेहमीप्रमाणे सरोजिनीबाईच्या घरून वर्तमानपत्राचा अंक घेऊन घाईघाईने घरी जात असतां-मास्तर नेहमीच चालतांना स्टेशनवर आलेली गाडी पकडण्यास पळत असत-त्यांना वाटेत कमलाकर भेटला. मास्तर कोठेही जात असता त्यांच्या गतींत कोणाच्या आकस्मिक भेटण्याने अडथळा झालाच तर त्यांची मुद्रा एकदम त्रासिक 
दिसू लागे. तद्वतच कमळाकर दिसतांच त्रासिक चेहरा करून त्यांनी त्याच्याकडे पाहिले. 
“ओहोहो ! मास्तरसाहेब ? कुठं एवढया घाईनं. ?” त्यांना पाहतांच त्यांचा रस्ता अडवून कमळाकराने आपल्या नेहमींच्या विनोदी स्वरांत विचारले. “ आपल्याशी काही वेळ बोलत राहायला आपली कांहीं हरकत नाही ना?" __ " ह्यः यः ! त्यांत हरकत कसली : आपल्यासारख्या उद्योगी माण साशी दोन शब्द बोलायचं आमच्यासारख्यांना तरी भाग्य हवंच ना ?" मास्तरांनी वळेच म्हटले. परंतु चेहऱ्यावरून त्यांची इच्छा कमलाकराच्या तावडीतून लवकरच सुटून जाण्याची दिसत होती. ___“मास्तरसाहेब," त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचा हात आपल्या हाती घेऊन कमळाकर म्हणाला, “ रत्नमहालांत झालेल्या खनासंबंधानं आप त्याशी चार शब्द बोलायची माझी इच्छा आहे. आपण माझ्या प्रश्नांची 
उत्तरं द्याल का?" 

"तुमच्या शंकेचं समाधान माझ्याकडन होईल असं नाही." मास्तर म्हणाले. या वेळी ते दोघेही मास्तरांच्या बंगलीभोवतालच्या कुंपणा पाशी आले होते. "ह्या खनाच्या विषयावर मला तुमची कोणतीही शंका फेडतां येणं शक्य नाही. माझं काम आपलं परकीय भाषेच्या अध्यय नाचं आणि अध्यापकाचं आहे. खुनी शोधन काढायचं नव्हे. मी काही गुप्त पोलिस नाही." __“गुप्त पोलिस नसला म्हणून काय झालं ? खुनी इसम कोण असावा हे समजून घ्यायची आपल्यालाही उत्कंठा असणार. अर्थात् आपल्या विचारशक्तीच्या जोरावर खुनी इसम कोण असाचा ह्यासंबंधानं काही तरी अटकळ तुमची असणारच. तशी खात्रीलायक माहिती तुम्हांला आहे असं काही माझं म्हणणं नाही." ___“आपण माझी काही तरी स्तुति करीत आहां झालं." खिशांतील किल्ली काढून दरवाजाच्या कुलपांत घालीत मास्तरांनी म्हटले, "आंत येतां का?" दरवाजा उघडन आंत जातां जातां त्यांनी कमळाकरास विचारले. . 
ha 
"तुम्ही बोलावतां तर आंत का येणार नाही ? ” कमळाकराने प्रश्नात्मक उत्तर दिले. __ आपल्या प्रश्नाला कमळाकराकडून होकारात्मक उत्तर येईल अशी त्यांची कल्पना नव्हती. परंतु उत्तर अपेक्षेविरुद्ध आल्यामुळे आंत 
येण्याविषयी आपण कमळाकरास विनाकारण विचारलें या गोष्टीची त्यांना चुटपुट लागून राहिली. दार उघडल्यानंतर ते दोघेही आंत शिरले. खोलीत शिरतांच कमळाकर एका आरामखुर्चीवर बसला व खिशां तून एक सिगारेट काढून त्याने धूम्रपान करण्यास सुरवात केली, व सिगारेटकेसमधून दुसरी एक सिगारेट काढून ती मास्तरांपुढे केली. __ " ह्यापेक्षा मला पाइपमधून धूम्रपान करणं अधिक आवडतं," असें म्हणून मास्तरांनी खणांतून एक 'पाइप' काढून त्यांत थोडा 'टोबॅको' भरून ते कमळाकराजवळच एका खुर्चीवर बसले व जणूं काय तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्यास आतां तयार आहों अशा दृष्टीने त्याजकडे पाहून धूम्रपानामध्ये त्याचेच अनुकरण करू लागले. ___ "हे पाहा ” कमळाकर थोड्या वेळाने मास्तरांच्या हातांतील वर्त मानपत्राचा अंक घेऊन त्यांतील एका पानावरील मजकूरावर बोट ठेवून म्हणाला, " हे वाचा.” ___“ कांहीं खुनाबद्दलच आहे की काय ? " हवेत एक धुराचा फवारा सोडीत मास्तरांनी प्रश्न केला. 
" होय त्या मूर्खान-सर्जेरावानं रत्नमहालांतील खुनाच्या बाबतीत एक साधारण महत्त्वाचा शोध लाविलेला दिसतो." __ " असं जर असेल तर तो मूर्ख कसा बरं होईल ? " मास्तरसाहेब धुराचे लोटच्या लोट हवेत सोडून म्हणाले, "पण त्या पत्रांत काय आहे ते तर मला सांगा. कारण मला तुमचा स्वभाव चांगलाच माहित आहे. तुम्ही पांच मिनिटंसुद्धा स्वस्थ राहणार नाही. आणि मला तर चाचीत असतांना पूर्ण शांतता पाहिजे.” __ “ योग्य टोला दिलात बुवा, " कमळाकर हंसत हसंत म्हणाला, " माझी जीभ चुरुचुरू बोलणारी असून मन चहूंकडे भटकणारं आहे. 
मी तुम्हांला तो मजकूर कांहीं वाचन दाखवीत नाही. कारण मलाही मोठयानं वाचायचा फारच कंटाळा आहे. पण त्या मजकुरा वरून असं दिसतं की, त्यांनी अर्थात सर्जेरावानं त्या मयत स्त्रीचं नांव शोधून काढलं आहे म्हणे." 
"वः ! हा तर फारच चित्ताकर्षक मजकूर आहे." मास्तर म्हणाले, " पण त्याला ते कसं आढळून आलं बुवा ! " 
" लोणावळ्याहून त्याला कुणी एकानं पत्र धाडलं की,” कमळाकर आपल्या हातांतील वर्तमानपत्र बाजूच्या मेजावर फेंकून म्हणाला, " तेथील 'हेस्टिंग्स लेन'मध्ये एक बाई राहत असून ज्या प्रकारच्या दिवाणखान्यांत त्या बाईच्या खन झाला तसल्याच प्रकारचा एक दिवाणखाना ती राहत असलेल्या घरांत आहे.” 
" हेस्टिंग्स लेन ?" मास्तर आपले डोळे ताणून म्हणाले. 
"तेव्हां इन्स्पेक्टर सर्जेराव तो बंगला पाहायला गेले होते." कमळा कर त्यांच्या भाषणाकडे लक्ष न देतां पुढे म्हणाला, " पण त्यांना तें घर बंद असलेलं आढळून आलं. पण त्या घराच्या मालकाजवळ त्याची किल्ली असल्यामुळं त्यांना त्या घरांत शिरकाव करून घेता आला. आंत गेल्यावर-रत्नमहालांत ज्या सफेत दिवाणखान्यांत त्या स्त्रीचा खून झाला तसलाच एक सफेत दिवाणखाना त्या घराला आहे, असं सर्जे रावांना आढळन आलं. मात्र दोन दिवाणखान्यांत फरक इतकाच की, रत्नमहालांतील सफेत दिवाणखान्यांत उंची व मौल्यवान सामान रच लेलं आहे व त्यांत अगदी साधारण प्रतीचं आहे. आणि आढळन आलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, त्या दिवाणखान्यांतील गालीचा वर खून झालेल्या बाईची तसबीर-पडलेली होती.” 
"अहो, पण सविस्तर हकीकत तुम्ही भला मागाहून सांगितली तरी चालेल." मास्तर मध्येच घाईने म्हणाले, “मला प्रथम त्या बाईचं नांव सांगाल का ? कराच एवढी मेहरबानी." 
“तिचं नाव किनखापे." 

१०३ कमळाकराच्या तोंडून त्या बाईचें नांव बाहेर पडतांच मास्तरसाहेब झटका बसल्याप्रमाणे एकदम आपल्या खुर्चीवरून उठून उभे राहिले ! त्यांनी हाती असलेला पाइप फेकून देऊन, आपले हात समोरच अस लेल्या मेजावर आपटीत ते म्हणाले, 
" काय ? किनखापे ! सरला किनखापे ?" 
" होय. पण तिचं नांव सरला हे तुम्हाला कसं समजलं ? वा ! मास्तर, तुम्ही तरी बरेच दिसतां की! वर्तमानपत्र वाचत नाही म्हणता काय ?" 
“ छे छे, अहो, ती तर माझी आतेबहीण !'' शेवटी एक दुःखोद्वार काढून मास्तरसाहेबांनी दोन्ही हातांनी आपला चेहरा झांकून घेतला. ___ सरले आणि मास्तरांचे नाते समजतांच कमळाकराच्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही. मास्तरांच्या तोंडून अशी काही तरी आणखी नवीन हकीकत आपणास समजेल अशी त्याची मुळीच कल्पना नव्हती. अर्थात् मास्तराच्या तोंडून ते शब्द बाहेर पडतांच तो आश्चर्याने अगदी थक्क झाला. काही वेळ गेल्यानंतर त्याने मास्तरास म्हटलें, 
" मग तिचा खून कोणी केला, हे तुम्हाला माहित असेल तर ?' 
कमळाकराचे हे शब्द ऐकतांच मास्तर आपल्या अंगाला एकदम हिसडा देऊन त्याच्याकडे पाहूं लागले व एकदम ओरडून म्हणाले, “तुम्ही कोणत्या प्रकारचे माणूस आहां तेच मला कळत नाही. तुम्ही म्हणतां तरी काय ? तिचा खून कोणी केला हे मला कळणार कसं ?" ___ " तसा काही माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही हो. एकदम चिडू नका. 
म्हटलं तम्ही तिचे आतेभाऊ आहा आणि सर्जेराव तर असं म्हणत. आहेत की, तिचा खून व्हायचं कारण तिच्या गतायुष्यावरून कदाचित् समजण्यासारखं आहे.” 
· "पण मला तिच्या मागील चरित्राची अगदीच थोडी माहिती आहे; मुळीच नाही म्हटलं तरी चालेल. "मास्तरसाहेब आपल्या खोलीत इक. इन तिकडे जोरजोराने येरझारा करीत म्हणाले. 
" मग जी काही थोडी माहिती आपणास आहे ती मला सांगायला काही हरकत आहे का ?" कमळाकराने विचारले. ___ मास्तरसाहेब कमळाकराकडे एखाद्या अविश्वासी माणसाप्रमाणे पाहूं लागले. ते म्हणाले,"ते मला तुमच्यापाशी सांगावंसं वाटत नाही. कारण, ते तुम्हांला सांगितलं तर तुम्ही ते सर्व गुप्त ठेवाल किंवा नाही याची मला शंका वाटते." 
" असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सर्व काही तुम्ही पोलि. सांनाच सांगा. पण एवढं मात्र लक्षात ठेवा की, त्यांना तुम्हांला सर्व काही सांगावं लागून त्यासंबंधानं ते तुम्हांला पुन्हा पुन्हा विचारून बरेच त्रासून सोडतील. शिवाय, जे काहीं तुम्ही त्यांना सांगाल ते सर्व प्रसि. द्धही होईल.” 
" हो, हेही एका अर्थी खरंच !” मास्तरसाहेब घाबरून म्हणाले, " कमळाकर, खरोखर तुम्हीं हुषार व चाणाक्ष आहांत ! माझ्या आतां पर्यंतच्या बोलण्याचा राग न धरतां तुम्ही मला इतःपर निरपेक्ष मदत कराल अशी मी आशा करूं का ?" 
"तुम्हांला मदत !" कमळाकर मास्तरांकडे पाहून म्हणाला, “ ती कसली बुवा?" 
" म्हणजे ! पोलिसांच्या बाबतींत तुम्ही मला मदत करा, येवढंच माझं म्हणणं ! माझा अशा प्रकारे पोलिसाशी कधीच संबंध न आल्या मुळं मला थोडी भीति वाटते. कारण ते मला, माझी हकीकत पुरती ऐकून घेतल्याशिवाय वाटतील तसे आडवेतिडवे प्रश्न विचारून भंडावून सोडतील अशी माझी खात्री आहे.” 
" मग त्यांत हरकत कसली ?” कमळाकर मास्तरांकडे पाहत म्हणाला, “तुम्हांला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सहज देता येतील." .. 
"होय, ते खरं, पण पोलिस लोक किती संशयी असतात हेही तुम्हांला माहित असेलच." 
" असतील! मग त्यांत येवढं भिण्यासारखं तें काय आहे?" 
" त्या स्त्रीचा सरलेचा-खून रत्नमहालांत झाला ती जागा ह्या बंगलीपासून अगदी जवळ असल्यामुळं त्यांना कदाचित् असं वाटेल 
की " __ “ तुम्हींच तिचा खून केलात असंच ना ? हे तुमचं आपलं काहीं तरी. तिचा खून तुमच्या घरापासून जवळ झाला म्हणून त्यांत पोलि सांना तुमचा संशय कां म्हणून यावा ? पण काय हो मास्तरसाहेब, तुम्ही हिवाळ्यांना ओळखतां का ?" ___“ छे, त्याचं नांवसुद्धा कधी मी ऐकलेलं नाही." 
" नलिनीनं तुम्हांला कधीच सांगितलं नाहीं ? नलिनीची आणि तुमची ओळख आहे नव्हे ?" ___ तसा काही विशेष परिचय नाही. कुठं दोनचार शब्द बोलली असेल इतकंच. अनोळखी माणसाशी विशेषतः बायकांशी बोलण्यास आपणास शरम वाटते बुवा. तुमची भावी---'' 
"शरयू ," मध्येच कमलाकर म्हणाला. "होय, शरयू; त्यांनीच मला नलिनीची ओळख करून दिली. पण आमची काही फारशी ओळख झालेली नाही. तुमच्या भावि पत्नीनं बोलता बोलतां सहज एकदा हिवाळ्यांचं नांव काढलं होतं खरं. पण नंतर ते माझ्या स्मरणांत राहिलं नाही; पाहा बुवा मी किती विसरभोळा आहे तो !" 
" होय, हे खरं आहे.” कमळाकर त्यांना धीर देण्याच्या उद्देशाने म्हणाला. त्यांच्या बोलण्यावरून व चेहऱ्यावर उठन येणाऱ्या तरंगांवरून ते वरेच भित्रे असावेत असा त्याला संशय येऊ लागला. तो पुढे म्हणाला, " हे पाहा मास्तरसाहेब, व्यर्थ घाबरण्यांत काही अर्थ 
मला अगदी सावकाशपणे त्या तुमच्या आतेबहिणीची हकीकत मापाहं." " ती माझी वडील आतेबहीण;" मास्तर एका खुर्चीवर बसून अंगी जितकें अवसान आणतां येईल तितके आणन म्हणाले, "कांहीं दिवस ले च्या सॉलिसिटरकडन मला एक पत्र आलं होतं. हे 

6U 
पाहा तें" असे म्हणून त्यांनी एका खणांतून ती नोटिस काढून कमळा करास दाखविली. तींत पुढील वाक्य टाइप केलेले होते.--- 
"Mrs. Sarlabai Kinkhape has come in for a large fortune and that she intends next year to allow you an income etc." ___ “मग तिच्या आकस्मिक मृत्युमुळं तुमचं नुकसानच झालं असेल, नाहीं ?'' कमळाकर म्हणाला. 
"असंच काही नाही म्हणता यायचं,' किंचित थांबून ते पुढे म्हणाले, " खरं सांगायचं म्हणजे माझ्या नांवावर आपण कांहीं रक्कम ठेवणार असं तिनं मला पूर्वीच कळवलं होतं आणि त्याप्रमाणं आपलं मत्युपत्रही तिनं मला फायदेशीर असंच करून ठेविलं आहे, याची मला खात्री आहे."मास्तरांच्या तोंडचे अखेरचे वाक्य ऐकतांच कमळा. कर त्यांजकडे आश्चर्याने टवकारून पाहूं लागला. त्यांची गरिबीची स्थिति पाहतांच सरलेचा खून होण्यास येवढे देखील कारण पुरेसें आहे असा एक विचार झटकन त्याच्या मनांत येऊन गेला. परंतु त्यावर विश्वास ठेवण्यास कमळाकराचे मन धजेना. कारण, मास्तरासारखा भ्याड माणस खनासारखें किळसवाणे कृत्य करील की काय, असा त्याला संशय वाटू लागला. शेवटी थोडा वेळ विचार करून त्याने पुन्हा मास्तरांस विचारले. 
" तिची एकंदर मिळकत किती असेल बरं ?" “ वार्षिक वीस हजार." 
" नशीब काढलंत खरं एकंदरीत तुम्ही !” कमलाकर म्हणाला, " तिच्या मरणानं तुमचा उलट फायदाच झाला म्हणायचा." 
"काय बडबडतां हें !” मास्तर एकदम उसळन म्हणाले, "तिच्या. जिवापेक्षा पैशाची किंमत मला अधिक आहे का ? तिचा अशा रा पद्धतीनं खून व्हावा हा विचारच मुळी माझ्या मनाला सहन होत ना माझी स्थिति कशी आहे ती तुम्ही पाहत आहांच. जिथं हा खून झाला जागा इथून जवळच आहे आणि मला पैशाची अतिशय निकड आहे। सरलेच्या मरणानंतर तिच्या वीस हजारांच्या दौलतीच मीच 
आहे. कमळाकर, मुबईचे पोलिस कसे आहेत ते तुम्हाला माहित आहेत व अशा प्रकारच्या ह्या सर्व गोष्टींचा संबंध पाहिला म्हणजे तिच्या खुनाचा आरोप ते माझ्यावर ठेवू शकतील की नाही याचा तुम्हीच विचार करा." 
__ "छट ! भलतंच कांही तरी मनांत आणून घाबरतां झालं ! नुसत्या एवढया संबंधावरूनच खुनाचा आरोप ठेवता येत नाही.” अशा मनुष्याविषयी आपणास भलताच संशय आला कसा याची लाज वाटून कमलाकर म्हणाला, "तुम्ही अगदी न घाबरतां मन पूर्णपणे शांत ठेवा. एखाद्या धनाढय माणसाला त्याच्या वारसाकडूनच मृत्यु येतो 
असा कांहीं कुठं सिद्धान्त आहे का ? " 
"नाहीं हो ! मी अगदी खरं सांगतो; मनापासून सांगतो. मला जगांतलं सर्व भांडार जरी कुणी देऊ केलं असतं तरी मी सरलेचं वाईट चिंतलं नसतं; मग करणं दूरच राहो. ती फारच गोड मुलगी होती. " 
"तिला ही वीस हजारांची मिळकत कुठून मिळाली ?" "ते काही मला सांगता येणार नाहीं; तसंच, तिनं आपल्या पतीविष यीही मझ्याजवळ कधीच काही सांगितलं नाही. पण तिच्या संदिग्ध भाषणावरून मात्र मला एवढं समजून आलं की, तो व्यापारी असून नेहमी फिरतीवर असतो. तसंच, तिच्या चेहऱ्यावरून व इतर प्रसंगींच्या वागणुकीवरून ती सुखी नसावी असा मला मधून मधून संशय येत असे. पण तिनं बिचारीनं आपल्या दुःखासंबंधानं एक चकार शब्दसुद्धा मायापाशी कधी काढला नाही." 
सं!" "कमळाकर आपल्या जागेवरून उठन म्हणाला, "पण काय बचा नवरा तिच्या मिळकतीसाठी तुमच्यावर दावा करणार 
"ते काही सांगवत नाही. कदाचित् तो आतां आपलं तोंडसुद्ध। खवणार नाही." "का हजारांचं उत्पन्न कुणास नको होईल ? " 

" तें खरं. पण सर्जेरावांना, त्यानंच तिचा खन केला असावा असं वाटत आहे. हे पत्र वाचा मग समजेल तुम्हांला सारं." ___ " असं जर असेल तर मग फारच वाईट गोष्ट झाली.” मास्तर एक दम अंगावर शहारे आणन म्हणाले, " आतां मी पढं काय करावं तें तुम्हीच मला सांगा. कराच एवढी मेहेरबानी. " थोड्या याचनेच्या भाषेत ते पुढे म्हणाले. __“ माझंच जर मत तुम्हांला पाहिजे असेल तर तम्ही असेच जाऊन तिच्या सॉलिसिटरला भेटा म्हणजे तेच तुम्हाला या बाबतीत पुढं 
काय काय करायचं तो सल्ला देतील.” 
मास्तसाहेबांनी कमळाकराचे म्हणणे मान्य केले. 
“ठीक आहे,” ते म्हणाले, "ह्या कामाकरता त्यांचे खिसे भरूं असं तुमचं म्हणणं आहे एकंदरीत तर ? 'आलिया भोगासी असावे सादर !' लागावंच त्या कामाला." 
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel