मणिभद्र राजा सोमवंशी त्याचे कूळ, उपनाम चवाण, कपिल ऋषि गोत्र कुळदैवत जोतीबा आणि खंडेराव, चाचरी मुद्रा, नृसिंह मंत्र, तक्त गादी पंजाब, पिवळी गादी, पिवळे निशाण, पिवळा वारू, विवाह (लग्न) कार्यास देवक वासुंद्रीवेल; विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र पूजणे खांडा. यांची कुळे येणेप्रमाणेः- घवाण, धडम, वारंगे आणि दलपते. ही चार कुळे मिळून चवाण. क्षत्रिय धर्म चालवणे, सोवळे धूत वस्त्र परिधान करणे, गोग्रास देणे, अतीत अभ्यागत पाळणे, पुराण श्रवण करणे असे चवाण जाणावे.
- स्वैर अन्वय
सोमवंशीय राजा मणिभद्र याने चवाण/चव्हाण/चौहान कुळाचा पाया घातला. चवाण/चव्हाण या कुळाचे गोत्र कपिल(काश्यप) आहे. चवाण/चव्हाण/चौहान कुळाचे कुलदैवत जोतिबा(ज्योतिबा) आणि खंडोबा(खंडेराय/खंडेराव) आहे. चवाण/चव्हाण/चौहान कुळाची गादी(सत्ता) पंजाबची आहे. या कुलाच्या सिंहासनाची गादी पिवळ्या रंगाची आहे. या कुळाचा झेंडा पिवळ्या रंगाचा असून त्यावर चाचरी मुद्रा असलेला पिवळा घोडा आहे. या कुळाचा यल्गार(एल्गार) नृसिंग मंत्र आहे. विवाह(लग्न) कार्यात चवाण/चव्हाण/चौहान कुळाचे वासुंदीवेल(वासनवेल) हे देवक पूजले जाते. विजयादशमीला या कुळात खंडा हे शस्त्र पूजे जाते. चवाण/चव्हाण/चौहान या कुळात घावण, धड्म, वारंगे, आणि दलपते(दलपती/दळपति) हे आहेत. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे शुभ्र(पांढरे) कपडे परिधान करावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. अतिथीचे आदरातिथ्य करावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.