ंनी भेटण्याची वेळ आणि ठिकाण ठरवले.
सागर खूप आनंदी होता. आपण प्रसन्ना ला प्रत्यक्ष भेटणार आहोत. दोघांनी ही एकमेकांना कधी बघितले नव्हते. त्यामुळे एकमेकांना कसे ओळखावे हे कठीण होते. सागर ने त्याचे काही फोटो सोशल मिडीयावर टाकले होते. त्यामुळे प्रसन्ना त्याला ओळखेल हे त्याला माहित होते. ज्या ठिकाणी भेटायचे ठरले होते त्या ठिकाणी सागर जाऊन तिची वाट पाहत होता. समोरून एक मुलगी येत होती, कदाचित तीच प्रसन्ना असेल असे त्याला वाटले. ती डोळ्यासमोर आली आणि तिने इशाऱ्याने Hi केले. त्याने सुद्धा तिला इशाऱ्याने Hi केले. दोघेही एका ठिकाणी बसले तेव्हा सागर तिच्याशी खूप बोलत होता. ती फक्त Smile देत होती. त्याला असे वाटले की हीला ऑड वाटत असेल म्हणून आपल्याशी बोलत नसेल. पण सागर बोलतच राहिला आणि अचानक त्याने पहिले की प्रसन्नाच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने तिला विचारले की का रडत आहेस. ती काही बोललीच नाही. त्याने विचारले की मी कुठे चुकलो का? तरीही ती काहीच बोलली नाही. तिने त्याच्या हातात लेटर दिले आणि तेथून निघून गेली.
तो ते लेटर तिकडेच वाचत होता. त्यात असे लिहले होते की, "सागर मला माफ कर मी आपल्या मैत्रीच्या नात्यात फसवणूक केली आहे. मी तुझ्याशी खूप खोटं बोलली आहे. खर सांगू तर मला बोलता येत नाही. लहानपणापासून मी मुकी आहे आणि हेच मला माझ्या आयुष्यातला कमी पणा वाटतो. मी तुझी मैत्रीण नाही बनू शकत हे सत्य मला स्वीकारायला हवं. मला नाही करमणार तुझ्याशिवाय पण मला माहित आहे. तुला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा तू स्वतः आपलं मैत्रीचं नातं तोडशील. मला जास्त त्रास होण्यापेक्षा मीच तुला माझे खरे सत्य सांगून आपले मैत्रीचे नाते तोडते. जमेल तर मला माफ कर.” हे वाचून त्याला खूप वाईट वाटते. तो तिला मॅसेज करतो की, "तू जिकडे आहेस तिकडून परत ये, मी अजून इथेच आहे. जोपर्यंत तू येणार नाही. तोपर्यंत मी इथेच राहीन तुझी वाट बघेन".
ती हा मॅसेज बघून परत मागे येते आणि त्याच्या समोर उभी राहते. तो बोलतो " तू बरोबर समजलीस मला, तुझे हे सत्य ऐकून आपल्यातलं हे मैत्रीचे नाते संपवणार आहे.” तिच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती जाण्यास निघते. तेव्हा तो बोलतो, "आणि हे मैत्रीचे नाते तोडून मला तुझ्यासोबत प्रेमाचे नाते जोडायचे आहे. मला तुझ्यातला हा निरागस पणा आवडायला लागला आहे. काय झालं जर तू बोलत नसलीस, मला तुझे मन बघून तुझ्यावर प्रेम झाले आहे. खरंतर मी तुझ्या कवितांचा आधीपासून वेडा होतोचं आता तर तुझ्या मनाचा ही वेडा झालो आहे. जरीही तू माझ्याशी ओठाने बोलू शकली नाही तरी तुझ्या मनाने तू माझ्याशी बोलू शकतेस, मग सांग होशील का माझ्या आयुष्याचा पार्ट”. ती हे सगळं ऐकून त्याला मिठी मारते आणि त्याला कळते की हीला सुद्धा माझ्या आयुष्याचा पार्ट व्हायचा आहे" पुढे तो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला तिच्याच कवितांचा संग्रहाचं पुस्तक गिफ्ट करतो आणि म्हणतो की, "आता सगळे तुझी कविता वाचतील”.#285327360
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel