तू आजपासून... तुला सांगून ठेवतो मी...'...हो रे बाळा...
ना नात्याचे ना गोत्याचे ते दोन जीव... आईमुलाच्या नात्यात बांधले गेले...दिवस जात होत होते... एक दिवस अचानक ती लॅबमध्येच कोसळली... काय झाले कोणालाच काही कळले नाही..एक महिना झाला,२महिने झाले... चक्क ६महिने झाले तरी ती कॉलेजमध्ये येऊ शकली नाही......मधल्या काळात त्याचे फोन यायचे तिला... त्याच्या आवाजावरून त्याचं प्रकरण बिघडत चाललं आहे हे जाणवायचं तिला पण तीही हतबल होती...शेवटी तब्बल ८महिन्यांनी ती एकदाची कॉलेजमध्ये पोचली..अजूनही तिला नीट चालता येत नव्हतं.. कशीतरी आधार घेत ती कॉलेजमध्ये जात होती...तिच्या लॅब मध्ये गेल्यावर तिला अगदी प्रसन्न वाटलं..तिला पटकन त्याची आठवण झाली... तो संपूर्ण दिवस तिचा भेटीगाठीतच गेला.. दिवसभर सगळे विद्यार्थी, स्टाफ मेंबर्स येऊन तिला भेटून जात होते... भेटला नाही तोच फक्त...तिला दिवसेंदिवस काम करणं मुश्किल होत होतं.. शरीर साथ देत नव्हतं.. शेवटी तिने नोकरी सोडायची ठरवली... शेवटचा एक महिना राहिला होता.…एकेक दिवस जात होता... एक दिवस अचानक तो आला... तडक धावत तिच्या जवळ येऊनच थांबला..' wow...आलात ना तुम्ही!!मी miss करत होतो तुम्हांला...तो उत्तरला...'miss करत होतास म्हणून पत्ता नव्हता ना तुझा...अरे बारावीला आहेस ना तू !! इतका कसा काय रे भोंगळ तू.....ती सात्विक संतापाने उत्तरली....मला माहित नाही हं मला चांगला result पाहिजे तुझा..मी आधीच सांगून ठेवतेय तुला... कळलं का काही???'........


तिच्या ह्या संतापाचा त्याच्यावर तिळमात्रही फरक पडला नव्हता.... गालावर खळी पाडत तो पुन्हा एकदा खळखळला....'Result तर मी देणारच आहे पण तुम्हांला एक गिफ्ट पण द्यायचं आहे मला... तुम्ही बऱ्या झाल्या ना म्हणून....'तो आनंदाने ओसंडून जात म्हणाला... 'तुझा चांगला result हेच माझं गिफ्ट..'
'काय हे... सांगा ना तुम्हांला काय gift देऊ..?' बघ हं आता सांगशील गिफ्ट मागा आणि मग देऊ शकणार नाहीस...


'अहो तुम्ही मागा तर खरं...'
तिने एक क्षण विचार केला... तुझ्या डोक्यावर बोकड वाढला आहे ना... त्याची लोकर काप... मिळेल मला हवं असलेलं गिफ्ट...'
तो मस्त हसला नेहमीप्रमाणेच...आणि पुन्हा गायब...दिवस भरभर सरले.. तिच्या नोकरीचा शेवटचा दिवस... send off साठी तिच्या सगळ्या batches ची मुलं आली होती.. लांबून लांबून.. कदाचित ती पुन्हा कधीच वास्तूत येणार नव्हती... तिने डोळे भरून तिच्या लॅब ला डोळ्यात साठवलं.. mr. सांगाडा ह्यांना पण सांगितलं.. काळजी घ्या स्वतःची...'नेहमी चटकन डोळ्यात पाणी येणारी ती... त्यादिवशी मात्र अगदी शांत होती ...अगदी शांत....निघाली ती... सगळा स्टाफ, तिची मुलं ह्यांनी संपूर्ण रस्ता भरला होता... इतक्यात तो आला.. धावत धावत... हातात पांढरे गुलाब होते... तिचा आवडता रंग...डोक्यावरचे केस अगदी बारीक केलेले होते... ''बोकड कापला मी.''..तेच निर्मळ हसू सांडलं त्याच्या चेहऱ्यावर....तिने शांतपणे निरोप घेतला त्याचा...तो बघत होता तिच्याकडे... एकटक... हसत.... हात हलवत... तिला निरोप देत...एक वर्ष झालं.. अचानक तिला फोन आला...तिच्या मैत्रिणीचा.... तिचं बोलणं ऐकून ती पुन्हा ढासळली...
तिचा लाडका, तिचा जिवलग खूप दूर गेला होता... सगळ्यांपासून... सगळ्यापासून......अनंताच्या प्रवासाला...


अरे सगळं सांगायचास ना रे मला तू... मग शेवटचं दुःख पण सांगता नाही आलं का?ती टाहो फोडत होती त्याच्या साठी... तिच्या लेकासाठी...
वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षी काय दुःख असेल त्याला की त्याला स्वतःला संपवावेसे वाटले..तेही त्याच्याच वाढदिवशी.... किती वाईट आहे हे...एक हसरं स्वप्न अकाली कोमेजले होतं... आज सात वर्ष झाली...अजूनही तो भेटतो तिला तिच्या विचारांत...तसाच हसत... गालावर गोड खळी पाडून.... सांगतो तो तिला... सांभाळ बाकीच्यांना... मनातून एकटी असतात त्यांना... बोलकं कर त्यांना... ठेव हसत त्यांना...तेव्हापासून जपते ती प्रत्येक फुलाला... करते बोलकं त्यांना...जिवलगा.... का रे का गेलास तू.. इतक्या कोवळ्या वयात....आजची ही आठवण तुझ्यासाठी...
एका मैत्रिणीची तिच्या छोट्या दोस्तासाठी... जी रूढार्थाने तुझी आई नव्हती पण ती जेव्हाही तुला बघायची तेव्हा मात्र ती फक्त आणि फक्त तुझी आईच होती....

*विदुला पाटील तेंडुलकर*
*पालघर*#285327374
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel