एक खूप अशक्त उंदीर होता. एकदा त्याला खूप भूक लागली म्हणून एका धान्याच्या कणगीच्या भोकातून तो आत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहून त्याने मनसोक्त खाऊन घेतले. खाऊन खाऊन तो इतका धष्टपुष्ट झाला की, त्याला त्या भोकातून बाहेर येता येईना. तो तेथेच धडपडत होता. ते पाहून एक चिचुंद्री त्याला म्हणाली, "मित्रा, ह्या भोकातून बाहेर पडायचं असेल तर तुला परत पहिल्यासारखं बारीक व्हायला पाहिजे.
तात्पर्य
- अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटात सापडतो. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.