एक कोंबडा आणि एक कुत्रा प्रवास करीत होते. एकदा रात्र पडल्यावर कोंबडा एका वृक्षावर चढून बसला. आणि कुत्रा बुंध्यापाशी झोपी गेला. सकाळी उठल्यावर कोंबडा जोरात आरवला. ते ऐकून एक कोल्हा तेथे आला व त्याला म्हणाला, 'अरे, तुझा स्वर किती मधुर आहे. तुझं गायन ऐकून मला, तुला अगदी कडकडून भेटावस वाटतं आहे,.' तेव्हा त्याच्या बोलण्यातली लबाडी लक्षात येऊन कोंबडा म्हणाला, 'मित्रा, खाली जो पहारेकरी झोपला आहे, त्याला जागा करून दरवाजा उघडायला सांग. म्हणजे मी खाली येतो.'
हे बोलणे खरे वाटून कोल्ह्याने कुत्र्यास उठविले. कुत्रा जागा झाला अन् ताबडतोब त्याने कोल्ह्याला मारून टाकले.
तात्पर्य
- काही काही वेळा सामान्य लोकांकडूनही लबाड माणसाची फजिती होते. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.