एकदा, जनावरांचा राजा सिंह मरण पावला. तेव्हा दुसरा राजा शोधण्यासाठी प्राणी एकत्र जमले. तेव्हा वानराने वेडयावाकड्या नकला करून प्राण्यांना हसविले व युक्तीने तो राजा झाला. कोल्ह्यला याचा फार राग आला.
त्याने वानराची खोड मोडण्याचे ठरविले. एके दिवशी एका शेतकर्याने एक सांपळा लावून ठेवला होता. कोल्ह्याने तो पाहिला व वानरापाशी आला व म्हणाला, 'महाराज, आपल्याला खूपसं खोबरं हवं असेल तर माझ्याबरोबर चला, मी दाखवतो.'
वानराच्या तोंडाला पाणी सुटले व तो कोल्ह्याबरोबर निघाला. तेव्हा कोल्ह्याने त्या सापळ्यातले खोबरे दाखविले. ते घेण्यासाठी वानराने हात घातल्याबरोबर चाप बसून त्याची बोटे त्यात अडकली. तेव्हा कोल्हा हसत हसत म्हणाला, 'अरे, तू तर राजा आहेस, तुला हा सापळासुद्धा ओळखता येत नाही ?'
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.