कल्याण : शिरसमणि जवळ आहे.
वसंता : कोठून आहे रस्ता ?
चंदन : आम्ही तुम्हांला पहाटे दाखवायला येऊं.
वेदपुरुष : आता तुम्ही जा. झोंपा.
मुलें गेली वसंता व वेदपुरूष झोंपीं गेले.
पहांटे तीं दोन मुलें आलीं तों वसंता व वेदपुरूष उठलेले होते.
वसंता : तुम्ही वेळेवर उठलेत ?
चंदन : आई दळायला उठते. तिनें हांक मारली.
कल्याण : चला, तुम्हांला रस्ता दाखवतों.
वसंता : हा त्या गुराख्याचा झेंडा त्याला द्या.
वेदपुरुष : तुमच्या पायांत नाही का ?
चंदन : नाहीं. पुष्कळांच्या पायांत नाहीं.
कल्याण : पायांत कांटे मोडतात. परंतु आमच्याजवळ कांटकोरणें असतें.
वसंता : इकडून जायचें ना ?
चंदन : होय.
कल्याण : मी पुढें होतों.
वेदपुरुष : सर्वांच्या डोळ्यांसमोर कल्याण हवें.
वसंता : आणि चंदन ?
वेदपुरुष : चंदन झिजेल तर घमघमाट सुटेल.
चंदन : मला काम करायला आवडतें.
वेदपुरुष : तुमच्या गांवांत काम न करणारा कोण आहे ?
चंदन : ते लक्ष्मणराव! ते नेहमीं गादीशीं बसलेले असतात.
वसंता : त्यांना लोक मान देत असतील ?
कल्याण : हो.