याच काळात इंग्लंडममध्ये जे लेखक झाले ते पुनः पुन्हा रुचीवरूनच सौंदर्याची व्याख्या करितांना दिसून येतात. सौंदर्याची व्याख्या सौंदर्याच्या गुणावरून ते करीत नाहीत. सौंदर्यसमीक्षा बाजूस राहून रुचिसमीक्षाच इंग्लंडममध्ये महत्त्वाची होऊन बसली.

रीड (१७०४-१७९६) म्हणतो की सौंदर्य हे संपूर्णपणे प्रेक्षकावर अवलंबून आहे. रीडनंतर अ‍ॅलिसन आला (१७९० मेला) ''रुचिस्वभाव व रुचितत्त्व'' यावर त्याने निबंध लिहिला आहे. त्या निबंधात रीडच्याच म्हणण्याची री त्याने ओढली आहे, रीडचेंचे म्हणणें सिध्द केले आहे. प्रसिध्द चार्ल्स डार्विनचा आजोबा इरॅमस डार्विन (१७३१-१८०२) याने अन्य रीतीने तीच गोष्ट प्रतिपादली आहे. आपणांस जे जे प्रिय असतें, त्याच्याशी ज्या ज्या गोष्टींचा संबंध आपल्या विचारांत असतो, ते ते सारे आपणास सुंदर वाटते. रिचर्ड नाईट याच मताकडे झुकत आहे असे त्याच्या ग्रंथावरून दिसते.

बहुतेक इंग्लिश सौंदर्यमीमांसकांची मते समानच आहेत. एकुणिसाव्या शतकांतील प्रमुख सौंदर्यशास्त्रावरचे लेखक म्हणजे काही थोडासा चार्ल्स डार्विन, हर्बर्ट स्पेन्सर, गँट अ‍ॅलन, केर व नाईट हे होत.

चार्ल्स डार्विन (१८०९-८२) आपल्या मनुष्याची उत्पत्ति ह्या ग्रंथात म्हणतो ''सौंदर्य ही एक भावना आहे. ही माणसांतच स्वाभाविक रीत्या असते. असें नाही, तर ती पशुपक्ष्यांतही असते. पक्षी आपली घरटी किती सुंदर रीतीने तयार करितात. त्या घरटयांच्या आतील बाजू मऊमऊ अशी केलेली असते. माद्या नरावर प्रेम करितात. पक्ष्यांची जोडपी एकमेकांचे सौंदर्य ओळखतात. नर मादीला साद घालतो व मादी नराला आळविते. सौंदर्याचा विवाहावर परिणाम होत असतो. सौंदर्याची कल्पना ही साधी कल्पना नाही. ह्या कल्पनेत अनेक भाव असतात, अनेक दुस-या कल्पनांचे मिश्रण असते. नर मादीला प्रेमाने साद घालतो, त्यात संगीताचा आरंभ आहे.

हर्बर्ट स्पेन्सर १८२० मध्ये जन्मला. याच्या मतें खेळांतून कला जन्मली आहे. पूर्वी शिलरने हा विचार प्रगट केला होता. मनुष्येतर प्राण्यांची सारी शक्ति व सारा उत्साह जीवनकलहांतच खलास होऊन जातात. परंतु जगण्यापुरते श्रम करूनही माणसांत उत्साह व शक्ती शिल्लक राहतात. हा शिक्षक उत्साह मनुष्य खेळांत खर्च करितो. या खेळांतूनच पुढे नाना कला जन्मला आल्या. खेळांममध्ये आपण अनुकरण करीत असतो म्हणून कलासुध्दां जीवनाचे अनुकरणच करते. सौंदर्यासंबंधी आनंदाचे त्रिविध उगम आहेत. १. जेथे त्या त्या विवक्षित वृत्तींचे संपूर्ण समाधान होत असतें, त्या त्या विविक्षित वृत्तीवर संपूर्णपणे परिणाम होत असतो, उत्साहातिशयामुळे अत्यंत निर्दोषपध्दतीने जेथे त्या त्या विवक्षित वृत्तींना खेळ खेळण्यास भरपूर वाव मिळतो. २. मनाला सुखद संवेदना देणा-या उत्तेजक प्रेरणेंतील विजातीयत्व ३. काही विशेष संयोगांनी त्या सुखद संवेदनांचे उत्थापन.

टॉडहंटर (१८७२) सौंदर्यमीमांसेच्या आपल्या ग्रंथांत हा म्हणतो ''सौंदर्य म्हणजे निरतिशय रमणीयता. ही रमणीयता बुध्दि व प्रेमातिशय ह्यांमुळे आपण अनुभवितों. अशा सौंदर्याची अनुभूति ही वैयक्तिक रुचीवर अवलंबून असते. रुचीला प्रमाण नाही, नियम नाही. कारण व्यक्ति तितक्या रुचि. रुचि म्हणजे सुसंस्कृतता म्हणाना वाटले तर. (परंतु सुसंस्कृतता म्हणजे काय ते टॉडहंटर सांगत नाही) यथार्थतेनं व नीट विचारपूर्वक पाहिले तर कला म्हणजे आंधळेपणाचा प्रकार नाही हे समजून येईल. रेखा, रंमग, ध्वनि, शब्द वगैरेंनी आपणांवर परिणाम करणारी जी कला - ती बुध्दीच्या शक्तीचेंच फळ आहे. विचारानें ठरविलेल्या विशिष्ट ध्येयाकडे जाण्यास जे बुध्दीचे गुण मदत करीतात, त्या विवक्षित गुणांकडून कला निर्मिली जाते. सौंदर्यँ म्हणजे विरोधपरिहार, सौंदर्य म्हणजे समन्वय, सौंदर्य म्हणजे विभिन्न सुरांतून निर्माण केलेले सुरेल संगीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel