कम्युनिटी फार्मसिस्ट ही फार्मसी जगतात नव्याने उदयाला आलेली संकल्पना आहे जी सध्या खूप लोकप्रिय होत आहे पूर्वी कम्युनिटी फार्मसिस्टला केमिस्ट या नावाने ओळखले जायचे
कृत्रिम औषधांच्या लाभाच्या तुलनेने हानी आणि दुष्परिणाम जास्त दिसून येतात पण तरीही त्यांची जलद परिणामकता यामुळे त्यांनी स्वतःची एक विशेष ओळख व विश्वासार्हता निर्माण केली आहे.
कृत्रिम औषधांचे वितरण आणि वापर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, त्रुटी दूर करण्याच्या संकल्पनेतून कम्युनिटी फार्मसिस्ट तसेच कम्युनिटी फार्मसी या आधुनिक संकल्पनेचा उदय झाला आहे.
कम्युनिटी फार्मसी ही औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) क्षेत्रातिल अशी शाखा आहे जिचा थेट संबंध हा औषधांचे वितरण औषधांचा योग्य वापर, रुग्ण समुपदेशन या सेवांशी आहे
दुसऱ्या शब्दात रुग्णांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य आणि औषध वापराबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन याच्याशी निगडित असणारी ही संकल्पना आहे.

इंग्लंडच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार इंग्लंडमध्ये दररोज १.६ दशलक्ष रुग्ण त्यांच्या आरोग्याविषयक समस्यांबाबत कम्युनिटी फार्मसिस्टची भेट घेतात. फार्मसीमध्ये रूग्ण समुपदेशनासाठी स्वतंत्र विभाग असतो
दुर्दैवाने आपल्या देशात डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार औषधांचे वितरण करणे आणि इतर सर्व जबाबदारी ही डॉक्टरांवर अशी स्थिती आहे. फक्त डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार औषधांचे वितरण करणे एवढंच नव्हे तर यापलीकडेही औषधयोजनेची सत्यता आणि वैधता तपासणे, औषधांची नोंद, रुग्ण इतिहास व रुग्ण समुपदेशन, औषधांचा रुगणांच्या शरीरावर होणाऱ्या सकारात्मक तसेच नकारात्मक परिणामांचा अभ्यास करणे ही त्याची कार्ये आहेत.
आपल्या देशातील या विदारक स्थितीला जितके रुग्ण जबाबदार आहेत तितकेच फार्मासिस्टही जबाबदार आहेत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. रुग्ण
वेळेच्या अभावाचे कारण देत रुग्ण समुपदेशनला नकार देतात अथवा काही फार्मासिस्ट आपली व्यावसायिक नैतिकता बाजूला ठेवत रुग्ण समुपदेशन टाळतात या दोनही गोष्टी या विदारक स्थितीला कारणीभूत आहे.
परंतु आता हळूहळू परिस्थिती बदलताना दिसत आहे. फार्मासिस्ट आपले आर्थिक लाभ बाजुला ठेवत रुग्णांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देत आहेत. फार्मसिस्ट रुग्ण समुपदेशनासाठी पुढाकार घेत आहेत. फार्मसी शॉपलाही आता एक प्रोफेशनल लूक येऊ लागला आहे. हा सर्व एकाएकी होणारा बदल नसून यासाठी वेळ द्यावा लागेल आणि आपल्यालाही फार्मासिस्टला सहकार्य कराव लागेल. फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा आहे.
चाल तर मग आपण सर्वानी सहकार्यच्या भावनेतून डॉक्टर रुग्ण आणि आम्ही फार्मासिस्ट मिळून आरोग्य रुपी त्रिकोण पूर्ण करू आणि देशातील फार्मसी व्यवसायाचा कायापालट करू.

We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.

आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे नवी मुंबई.
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel