लेखाचं शीर्षक वाचून तुम्हाला वाटलं असेल की हे मोदींच्या कार्यक्रमाबद्दल काही तरी आहे पण तसं नाही या लेखात आपण आपल्या मनाच्या आरोग्याबद्दल माहिती घेणार आहोत.


जस तुमचं पोट, हात,पाय दुखतात तसच तुमचं मन देखील दुखू शकत आजारी असू शकत आणि त्यालाही हात, पाय, पोट याप्रमाणे विश्रांती व उपचारांची गरज असते पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की जेव्हा मनाच्या आरोग्याची गोष्ट येते तेव्हा आपल्या येथे वेड लागण, वेडा हेच समजलं जातं!


आपलं मन देखील शरीराचा एक भाग आहे त्याला देखी दुखू शकत ते देखील आजारी पडू शकत म्हणून त्यालाही विश्रांती आणि उपचारांची गरज आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे तर ही अशी स्थिती आहे ज्यात व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या संतुलित, स्थिर असणं होय 


लोक काय म्हणतील यामुळं कित्येक लोक त्यांच्या मनाच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत.बदलेली जीवनशैली, समाजव्यवस्था, वाढलेली स्पर्धा या सर्वांमुले अनेकजण मानिसकदृष्टीने खचतात. सर्वांनाच या परिस्थिती हाताळता येतील अस नाही त्यामुळे बरेच जण आशा परिस्थितीत चुकीच्या मार्गाला जाणे, नशा, आत्महत्या आशा पर्यांयांना जवळ करतात.


या सर्व परिस्थिती टाळण्यासाठी एकच गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे आपलं मानसिक आरोग्य राखण! यासाठी आपण 'योग' जी भारतीय संस्कृतीला लाभलेली अमूल्य देणगी आहे तिचा वापर केला पाहिजे ध्यान (मेडिटेशन) जसे जप करणे,एका ठिकाणी मन केंद्रित करणे अशा पद्धती आपण आपल्या मनाच आरोग्य जपण्यासाठी करू शकतो याशिवाय आपल्या ज्या काही समस्या असतील त्या मनात कोंडून न ठेवता मनमोकळ्यापणे आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करा, आज माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया (समाज मध्यम) मुळे जरी जग जवळ येत चाललं असलं तरी आपल्यातला संवाद कमी होत चालला आहे हा संवाद वाढणं गरजेचं आहे.


आपल्या भारतीय संस्कृतीत भगवद्गीतेत मन व त्याच्या संतुलन याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन केलेलं.आपले अनेक संत मंडळी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, रामदास स्वामी यांनी मनाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

रामदास स्वामींनी तर मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून मानाबद्दल अतिशय विस्तृत माहिती व मार्गदर्शन केलं आहे.


या सर्व गोष्टींचा अवलंब करून आपण आपल्या मनाला तंदुरुस्त ठेऊ शकतो.


एकंदरीत जस आपलं शरीर आजारी असत तस मन देखील आजारी असू शकत त्यालाही विश्रांती आणि उपचारांची गरज असते मन आजारी असणं म्हणजे वेडं असण अस नाही, आपल्या समाजातील हाच चुकीचा समज बदलणं गरजेचं आहे, शारीरिक आजार बरे करण्यासाठी जशा उपचार पद्धती आहेत तशाच मनाचे आजार बरे करण्यासाठी उपचार पद्धती आहेत. त्यामुळे तुम्हाला जर काही मानसिक समस्या असतील तर तुम्ही त्याबाबत उपचार घेणं आवश्यक आहे.


मानसिक आजारात वेळीच उपचार न घेतल्यास ते भविष्यात अधिक गंभीर होऊ शकतात.

मानसिक अजारग्रस्त रुग्णांना मदत करण्यासाठी १०४ हा हेल्पलाईन क्रमांक २४ फेब्रुवारी २०१५ पासून सुरू करण्यात आला आहे. मानसिक आजार झालेल्या कुटूंबातील सहकारी, नातेवाईक, मित्र, शेजारी यांनी रुग्णांचे लक्षणं ओळखून मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन गरजूंना उपचार पुरवले जाऊ शकतात.


तर मग तुम्हाला अथवा तुमच्या आजूबाजूला कोणाला मानसिक आजार असेल तर त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.


फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel