औषध वितरण हे फार्मसिस्ट च्या मुख्य कामांपैकी एक आहे. औषध वितरण हा औषधयोजनेची हाताळणी यामधील एक महत्वाचा भाग आहे.
कायद्यानुसार नोंदणीकृत फार्मासिस्टशिवाय इतर कोणतीही व्यक्ती औषध वितरण करू शकत नाही.तसेच फार्मासिस्ट औषधयोजनेशिवाय औषध वितरण करू शकत नाही.
औषधयोजनेशिवाय औषध वितरण करणे व नोंदणीकृत फार्मसिस्ट सोडून इतर व्यक्तींनी औषध वितरण करणे या गोष्टी नियमबाह्य आहेत.
औषधे घेण्यासाठी आलेल्या रुग्णाचे हसतमुखाने स्वागत करावे व त्याच्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करावे. आपण रुग्णांच्या आरोग्यासाठी व त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सदैव तयार आहोत असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करावा.
योग्य औषध योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य किमतीत पुरवणे व चांगली आरोग्य सेवा पुरवणे हे आपले कर्तव्य आहे ही गोष्ट लक्षात ठेवून फार्मासिस्टने औषध वितरण करावे.
औषध वितरण करत असताना फार्मसिस्टने चेहऱ्यावर असे कोणतेही हावभाव अथवा असे कोणतेही वक्तव्य करू नये ज्यामुळे रुग्णाच्या मनात आजार, उपचार तसेच औषधयोजनेसांधर्भात शंका निर्माण होईल, याचशिवाय असे कोणतेही वक्तव्य अथवा कार्य करू नये ज्यामुळे डॉक्टर किंवा विशिष्ट औषध कंपनीची प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे जाहिरात होईल किंवा बदनामी होईल.
औषध योजनेत जर काही त्रुटी असतील तर त्यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा करून फार्मसिस्ट योग्य तो बदल करू शकतो.
जर औषध योजनेत काही त्रुटी असतील तर रुग्णासमोर असे कोणतेही वक्तव्य ज्यामुले डॉक्टरांच्या व्यावसायिकतेवर गदा येईल.
फार्मसीमध्ये औषधे ही त्यांच्या नावांच्या वर्णानुक्रमे, अथवा औषधांचे प्रकार यासारख्या विविध पद्धतीने मांडणी करून ठेवतात. यामुळे औषधे शोधण्यासाठी मदत होते.
फार्मासिस्टने सर्व औषधांचे पॅकिंग तसेच लेबल तपासणे व औषधांची समाप्ती तारीख तपासणे बंधनकारक असते.
फार्मसीमध्ये घातक औषधे (Harmful Druds), नशा निर्माण करणारी औषधे (Narcotics Drugs), विषारी औषधे (poisonous Drugs) ही औषधे इतर औषधांपासुन वेगळी ठेवणे गरजेचे असते.
याचशिवाय जनावरांसाठीची औषधेसुद्धा इतर औषधापासून वेगळी ठेवणे व Not fo Human Use, Only for Veterinary use अशी सूचना लावणे गरजेचे असते.
औषध वितरण करण्यापूर्वी औषधयोजनेची सत्यता आणि वैधता तपासणे हे फार्मासिस्टचे कर्तव्य आहे.
जर औषधयोजना वैध आसेल तरच फार्मासिस्ट औषध वितरण करु शकतो. अवैध औषधयोजना अथवा औषधयोजनेशिवाय औषधवितरण करणे बेकायदेशीर आहे. तसेच नाश निर्माण करणारी औषधे व इतर घातक तसेच विषारी औषधांचा गैरवापर टाळावा म्हणून औषधयोजनेची वैधता व सत्यता तपासणे व आशा औषधाची कायदेशीर नियमाप्रमाणे वितरण करणे गरजेचे असते.
जर औषधयोजना वैध आसेल तर औषध वितरण करावे. औषध वितरण करताना औषधाचे पॅकिंग, औषधाचे लेबल, समाप्ती तारीख या सर्व गोष्टी तसेच औषध वैद्यकीय दृष्ट्या योग्य स्थितीत आहे का त्याची खात्री करावी. औषधयोजनेची किंमत (Pricing of Prescription) करत असताना कमीत कमी प्रोफेशनल चार्ज, कमीत कमी नफा अधिक चांगली वैद्यकीय सेवा या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
औषध वितरण करून झाल्यावर रुग्णांना औषध वापराबाबत मार्गदर्शन, रुग्ण समुपदेशन करणे हे फार्मसिस्टचे कर्तव्य आहे.
यानंतर वितरण केलेल्या औषधांची नोंद करणे शिवाय रुग्ण इतिहास व औषधांचा रुग्णाच्या शरीरावर होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांचा अभ्यास करणे फार्मासिस्टचे काम आहे.
औषधाची तपशीलवार माहिती, औषधाचा शरीरावर होणारा परिणाम, औषधातील कार्यकारी तत्व (API Active Pharmaceutical Ingredients), औषधाची परिणामकता, औषधांचे दुष्परिणाम (Side Effects) , औषधयोजनेची सविस्तर माहिती या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती केवळ फार्मासिस्टलाच असते
आशा प्रकारे फार्मासिस्ट हा सुद्धा वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या घटकांपैकी एक महत्वाचा घटक एक महत्वाच प्रोफेशन आहे.
We are Pharmacist Always Ready for Your Health. Better Drugs for Better World.
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई)
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.