मेडिकल स्टोरमध्ये (औषधालयात) औषधांची साठवणूक, हाताळणी, वितरण करीत असताना फार्मसिस्ट कडून योग्य ती काळजी घेतली जाते परंतु जेंव्हा ही औषधे घरी साठवली जातात तेंव्हा रुग्णांकडून तितक्या प्रमाण याची काळजी घेतली जात नाही...
औषधे ही कोरड्या जागी,सूर्यप्रकाशापासून, उष्णतेपासून दूर ठेवायची असतात परंतु
बऱ्याच ठिकाणी असे दिसून येते की घरामध्ये औषधे ही कुठेतरी टेबलवर, फ्रिजवर, टिव्हीजवळ किंवा किचनमध्ये कुठेतरी अशी पडलेली असतात...
या सर्व गोष्टींचा औषधांच्या परिणामकारकता, कार्यकाळ(समाप्ती तिथी), कार्यकारी तत्वाचे प्रमाण,रंग,चव यावर परिणाम झाल्याचे दिसून येते.
हे सर्व प्रकार टाळण्यासाठी,आपल्या आरोग्यासाठी आपण घरामध्ये औषधे ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा करावी. ही जागा सूर्यप्रकाश येणार नाही व थंड आणि कोरडे वातावरण असेल अशी निवडावी. शक्यतो ही जागा टीव्ही फ्रीज यापासून दूर एखाद्या कपाटात उंचावरती असणे योग्य राहील, कारण अशा ठिकाणी विद्युत उपकरणे टीव्ही फ्रीजची उष्णता यामुळे समस्या निर्माण होण्याचा धोका असत नाही तसेच आशा ठिकाणी लहान मुले सहजासहजी पोहचू शकत नाहीत...
औषधे ठेवण्यासाठी एक बॉक्स करावा ज्यामध्ये बाह्य वावरची,आपत्कालीन स्थितीतील औषधे, औषधे, प्रथमोपचारमध्ये वापरली जाणारी औषधे, रुग्णांनुसार औषधे आशा प्रकारे औषधे विभागून ठेवावीत... बाह्य वापराची औषधे ही नेहमीच इतर औषधापासून दूर ठेवावीत आणि ही सर्व औषधे लहान मुलांपासून दूर ठेवावीत.लहान मुलांकडून औषधाचा वापर हा केवळ पालकांच्या देखरेखीखालीच व्हावा याची पालकांनी काळजी घ्यावी.
औषधे घेताना कोणतेही नुकसान, हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, औषधांची काळजीपूर्वक हाताळणी करावी. औषध वावरून झाल्यावर झाकण योग्य प्रकारे लावावे...
औषध वापरत असताना वेळोवेळी त्यावरील समाप्ती तिथी तपासावी.
औषधे ही डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार व सूचनांनुसारच वापरावीत व लक्षणे नाहीशी झाली तरी औषधांचा डोस मध्येच सोडू नये(विशेषतः अँटिबायोटिक प्रतिजैविके वापरताना), लक्षणे जरी सारखी असली तरी एका रुग्णाची औषधे इतरांनी वावरू नयेत, औषधे ही प्राणी व लहान मुलांपासून दूर ठेवावीत,औषध वापरून झाल्यावर झाकण नीट बंद करावे ज्यामुळे बाहेरील वातावरणापासून संरक्षण होते व औषधाचा टिकाऊपणा टिकून राहतो,काही औषधे साठवून ठेवण्यासांधर्भात विशेष सूचना आसतात जसे की उष्णता व प्रकाश यापासून दूर ठेवावे, थंड व कोरड्या वातावरणात ठेवावे, शीतकपाटामध्ये (फ्रिजमध्ये) ठेवावे, अथवा काही औषधे विशिष्ट तापमानात साठवून ठेवायची आसतात यांमध्ये तापमानाची नोंद केलेली असते आशा सूचनांचे योग्य प्रकारे पालन करावे.
औषध वापरताना डॉक्टर तसेच फार्मासिस्टनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,औषधांच्या पॅकिंगवरील सूचना नीट वाचून त्याची अंमलबजावणी करावी.
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६