४ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक कर्करोगदिन म्हणून साजरा केला जातो. लोकांमध्ये कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ यांनी १९३३ मध्ये प्रथम जागतिक कर्करोग दिन साजरा केला होता २००८ साली या संघाने काही उद्दिष्टे ठरवली ज्याद्वारे कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल...

या लेखात आपण कर्करोगाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत

वास्तविकपणे कर्करोग हा  रोग नसून ही शरीरातील अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील पेशींची अनिर्बंध आणि अनियंत्रितरित्या वाढ होते.

सर्वसामान्यपणे पेशी विभाजन आणि अपॉपटॉसिस अर्थात योजनाबद्ध पेशी मृत्यू या प्रक्रियेद्वारे ही जैविक प्रक्रियेद्वारे नियंत्रण केले जाते. मात्र कर्करोगामध्ये पेशी विभाजनाच्या प्रक्रियेत बिघाड आल्याने पेशींची अनियंत्रित वाढ होते.

पेशी,उती आणि अवयव यावरून कर्करोगाचे विविध शेकडो प्रकार आहेत आणि कित्येक असे प्रकार आहेत जे ज्ञात नाहीत.


कर्करोग कोणत्या स्थितीत आहे यावरून त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत

१)बिनाइन ट्यूमर (कर्करोगाची सुरवातीची स्थिती) आणि 

२)मॅलिग्नंट ट्युमर (मारक गाठी कर्करोग)


१)बिनाइन ट्यूमर (कर्करोगाची सुरवातीची स्थिती):

ही कर्करोगाची अगदी सुरुवात ची स्थिती आहे बिनाइन ट्यूमर म्हणजेच कर्करोगाची गाठ जी शस्त्रक्रियेद्वारे सहजरीत्या काढून टाकता येते व ही गाठ काढून टाकल्यानंतर पुन्हा उद्भवण्याची शक्यता खूपच कमी असते.


२)मॅलिग्नंट ट्युमर (मारक गाठी कर्करोग):

ही कर्करोगाची अशी स्थिती आहे ज्यामध्ये पेशींची अनिर्बंध आणि अनियंत्रित रित्या वाढ होते.

कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणार्‍या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो.

या प्रकारच्या स्थितीत उपचार खूप कठीण असतात.


सिगरेट आणि तंबाखू असे व्यसन असणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असते तथापि जे व्यक्ती असे व्यसन करत नाहीत त्या मध्येही कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कर्करोगाचा अभ्यास करणारी विशेष शाखा कर्करोग शास्त्र (ऑन्कॉलॉजी) म्हणून ओळखली जाते तर यातील विशेष तज्ञ कर्करोगतज्ञांना ऑन्कॉलॉजिस्ट असे म्हटले जाते.


कर्करोगावरील उपचार

शरीरातील पेशी आणि कर्करोगामुळे अनियंत्रित रित्या वाढ झालेल्या पेशी यांचे स्वरूप जवळपास एक सारखे असल्यामुळे यावरील उपचार हे अधिक जटिल असतात.

कर्करोगावर उपचारासाठी अनेक विविध पद्धती वापरली तर तर त्यामधील शस्त्रक्रिया ही एक पहिली पद्धत आहे.

किमोथेरपी ही देखील एक पद्धत वापरली जाते ज्याद्वारे अनियंत्रित रित्या होणारे पेशींची वाढ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो

रेडिओथेरेपी सारख्या आधुनिक पद्धतींचा वापर करूनही पेशींची वाढ नियंत्रणात आणली जाते व कर्करोगावर उपचार केला जातो.

योग्य निदान व उपचार पद्धती याद्वारे कर्करोग बरा होण्याचे प्रमाण अधिक आहे व हे रुग्ण सर्व सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगू शकतात.


फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...


WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel