(प्रस्तुस्त लेख हा मी एका शिष्यवृत्ती योजनेसाठी इंग्रजीमधून लिहिलेला निबंध आहे. सुरवातीला मी सर्व मुद्दे व निबंध मराठीतून लिहिला होता जो इंग्रजीमध्ये अलंकारिकरित्या लिहिण्यासाठी व नवनवीन मुद्दे निवडण्यासाठी मला आमच्या कॉलेजमधील शिक्षिका डॉक्टर प्रीती कुलकर्णी मॅम यांनी खूप मोठी मदत केली तसेच माझी बहिण दीपाली शेडगे व वर्गमित्र शुभम घोष यांचेही सहकार्य लाभले. त्याच्याशिवाय अरविंद सर आणि भास्कर सर यांच्याकडूनही वेळोवेळी सहकार्य लाभले. या सर्वांचे तसेच इतर सर्वजण ज्यांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले त्या सर्वांवर मनःपूर्वक आभार)

औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) हे वैद्यकीय क्षेत्रातील संपूर्ण जगभरासाठी अत्यावश्यक आणि एक अत्यंत महत्वपूर्ण क्षेत्र आहे हे एक अस क्षेत्र आहे ज्यात लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून समाजाच्या हिताकडे लक्ष केंद्रित करतो. आज औषध निर्यातीमध्ये आपला भारत देश तिसऱ्या स्थानावर आहे ज्यामध्ये देशातील विविध औषध कंपन्यांचा मोलाचा वाटा आहे. या क्षेत्रात भविष्यात अनेक सुवर्णसंधी आहे ज्याद्वारे भविष्यकाळात २०२० पर्यंत आपण औषधनिर्यात क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असू मात्र दुसऱ्या बाजूला फार्मसी प्रोफेशन आणि फार्मसिस्ट त्याच्याकडून मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा याबाबत जितका विकास आणि जनजागृती होणं गरजेचं होतं तितकी झालेली नाही...
जर या परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला असे दिसून येते की भारतीय अर्थ आणि उद्योग मंत्रालयाने २००४ मध्ये फार्माएक्सिल म्हणून एक स्वतंत्र आयोग निर्माण केला जो औषधनिर्यातीला उत्तेजना देतो. यामुळे औषधनिर्यात या क्षेत्राची व उद्योगाची झपाट्याने प्रगती झालीतथापि फार्मसी प्रोफेशन जे वैद्यकीय सेवा पुरवणारा एक महत्वाचा घटक आहे याचा मात्र विकास झाला नाही. यासाठी आपण ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की औषधनिर्माणशास्त्र म्हणजे फक्त औषधनिर्यात आणि औषधनिरर्मिती उद्योगच नाहीत तर या क्षेत्रातील इतर भाग जसे औषधवितरण, रुग्ण समुपदेशन, रुग्णांना सुरक्षित औषधवापराबाबत मार्गदर्शन आशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. वास्तविकपणे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात एकाच वेळी फार्मसी क्षेत्राची सुरवात झाली पण ज्याप्रकारे अमेरिकेत या क्षेत्राची प्रगती झाली तशी आपल्या इथे झाली नाही कारण आपल्या इथे फार्मसी क्षेत्रातील काही विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित केले मात्र फार्मसी प्रोफेशन आणि फार्मसिस्ट जो या क्षेत्राचा मुख्य भाग आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलं.
आज भारतात कित्येक लोकांना फार्मसिस्ट कोण आहे त्याची त्यांच्या आरोग्याच्या बाबती काय भूमिका आहे त्याच्या कोणत्या जबाबदारी आहेत याबद्दल काहीच माहिती नाही. या सर्व परस्थितला आपल्या येथील कायदे, आरोग्य यंत्रणा, येथील शिक्षणव्यवस्था आणि याचबरोबरीने फार्मसिस्ट देखील तितकाच जबाबदार आहे कारण तो देखील कुठेतरी त्याची भूमिका बजावण्यात मागे पडत आहे.

वास्तविकपणे फरसमिस्टची भूमिका ही केवळ औषधनिर्मिती आणि औषधवितरण इथपर्यंतच मर्यादित नसून आरोग्यासंदर्भात इतर अनेक सुविधांमध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
फार्मसिस्ट हा डॉक्टर आणि रुग्ण यांमधील एक महत्वाचा दुवा आहे. केवळ औषधनिर्मिती आणि औषधवितरणच नव्हे तर वितरण केलेल्या औषधांची नोंद करणे, रुग्ण इतिहासाची नोंद तसेच रुग्ण समुपदेशन आणि रुग्णांना त्यांच्या आरोग्यसंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करणे या त्याच्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या आहेत. मात्र दुर्दैवाने भारतात डॉक्टरांनी दिलेल्या औषधयोजनेनुसार (प्रिस्क्रिप्शननुसार) औषध वितरण करणे आणि इतर सर्व गोष्टी डॉक्टरांवर सोडल्या जातात...
या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता असा निष्कर्ष निघतो की आपल्या येथील फार्मसी क्षेत्रातील शिक्षणव्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. आपला अभ्यासक्रम हा प्रात्यक्षिकरित्या वापरता येणारा नसून खूप थेरीवर आधारित आहे. विद्यार्थी हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रात्यक्षिक समस्यांना सामोरे जातात त्यावेळी केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी पडत नाही तसेच या सर्व समस्यांना ते अनभिज्ञ असतात यासाठी पूर्वीपासूनच पूर्णपणे प्रात्यक्षिक दृष्टीकोनातून अभ्यासक्रम असायला हवा.
तसेच ग्रामीण भागातील कित्येक लोकांना फार्मसिस्टच्या भूमिकेबद्दल माहिती नसते.
जसे की मी एक नवोदित फार्मसिस्ट आहे मी सुरवातीला या क्षेत्रातील समस्या जाणून लोकांमध्ये फार्मसिस्टबद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने काम करायला सुरुवात केली.आज फार्मसी संदर्भात विस्तृत अस ज्ञान इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे परंतु हे ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ते स्थानिक भाषेतही लोकांना मिळणं आवश्यक आहे.
या दृष्टिकोनातुन मी मराठी भाषेत फार्मसीसंदर्भातील लेख लिहायला सुरुवात केली. मला खात्री आहे की नक्कीच याची लोकांना फार्मसिस्ट कोण आहे व त्याची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोकांना मदत होईल. या दोन वर्षांत आत्तापर्यंत मी ३५ लेख लिहिले आहेत जे  Bookstruck या संकेतस्थळावर फार्मसिस्ट तुमच्या आरोग्यासाठी या पुस्तकात प्रकाशित केले आहेत तसेच या सर्व लेखांचा संग्रह गुगल प्ले स्टोरवर ई पुस्तक स्वरूपात Pharmacy and Your Health या नावाने उपलब्ध आहे.
पन्नास लेख पूर्ण झाल्यानंतर हे सर्व लेख पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याचे प्रयोजन आहे   जेणेकरून हे सर्व ज्ञान प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचेल...

एक फार्मसिस्ट या नात्याने माझी तीन ध्येय आहेत...
एक फार्मसी अभ्यासक या म्हणून सध्या औषधांची जी लेबल्स आहेत त्यामध्ये रुग्णांचे नाव आणि काही विशिष्ट सूचना द्यायच्या असल्यास तर त्या देण्यासाठी जागा असत नाही तर त्यासाठी आशा पध्दतीचे लेबल्स बनवले पाहिजे ज्यामध्ये रुग्णाचे नाव आणि फार्मसिस्ट कडून दिल्या जाणाऱ्या विशिष्ट सूचना लिहिण्यासाठी पुरेशी जागा असेल. यामुळे सेल्फ मेडिकेशन, औषधाचा गैरवापर, औषध वापरताना निर्माण होणाऱ्या त्रुटी दूर होण्यास मदत होईल आणि याचबरोबर फार्मसिस्टची भूमिका वाढण्यातही मदत होईल.
झपाट्याने वाढणाऱ्या ऑनलाइन औषध विक्रीचा थेट परिणाम फार्मसी व्यवसाय तसेच फार्मसिस्ट यावर होत आहे. ऑनलाईन औषध खरेदी मध्ये तुमची औषधयोजना (प्रिस्क्रिप्शन) मान्यताप्राप्त फार्मसिस्टनेच तपासली असेलच असे नाही शिवाय यात औषधांचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत असतो. यातील सर्व समस्या लक्षात घेत मी अस एक सॉफ्टवेअरची रचना केली आहे ज्या माध्यमातून यातील सर्व समस्या दूर होतील व हे सॉफ्टवेअर फार्मसिस्ट, डॉक्टर, रुग्ण तसेच ऑनलाइन औषध सुविधा देणाऱ्यांना देखील फायदेशीर ठरेल.
माझं दुसरं महत्वाचं ध्येय म्हणजे एक बिगर सरकारी संस्था (एन जी ओ) स्थापन करणे. ही संस्था समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती तसेच त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी काम करेल. लोकांमध्ये सुरक्षित औषध वापर, फार्मसिस्ट आणि त्याची त्यांच्या आरोग्यसंदर्भातील भूमिका याबाबत जनजागृती. यासाठी मी वेगवेगळ्या क्षेत्राती तज्ञ व्यक्ती जसे की औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय क्षेत्र कायदे यांच्या मदतीने एक मजबूत आणि कार्यशील टीम बनवून समाजाच्या आरोग्यासाठी एकत्रितपणे काम करेल. ही एन जी ओ ची संकल्पना माझ्या मनात आली जेव्हा आम्ही जागतिक कर्करोग दिनानिमित्त  लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक प्रात्याक्षिक व्हिडीओ बनवला होता ज्यातून धूम्रपान व त्याचे आरोग्यावर होणारे घातक दुष्परिणाम याबात मार्गदर्शन केले होते शिवाय आम्ही आसपासच्या लोकांमध्ये कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी भेटलो होतो... हे सर्व व्हिडीओ यु ट्यूब वरती उपलब्ध आहेत ज्यातून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.
 माझं तिसर आणि सर्वात महत्वाचे ध्येय म्हणजे माझं उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी फार्मसी शैक्षणिक क्षेत्रात काम करू इच्छितो ज्यामध्ये फार्मसी शिक्षण क्षेत्राचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. मला ठामपणे वाटत आहे की फार्मसी अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती यांमध्ये पुनःबांधणी करणे आवश्यक आहे. ज्याद्वारे अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करून थेअरी अभ्यासक्रमा ऐवजी जास्त प्रात्यक्षिक अभ्यासक्रम बनवायला हवा ज्याद्वारे फार्मसीचे विद्यार्थी जेव्हा प्रत्यक्षात फार्मसिस्ट म्हणून काम करतील तेंव्हा येणाऱ्या सर्व समस्यांना योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतील व एक चांगला फार्मसिस्ट जो आरोग्ययंत्रणेचा एक महत्वाचा भाग आहे ही  जबाबदारी ते निभावू शकतील...
यासाठी शिक्षण पध्दतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून अधिक प्रभावी पध्दतीने शिक्षण दिले जाईल याचशिवाय भविष्यात येणाऱ्या समस्या व कामाचे स्वरूप याबद्दल माहिती होण्यासाठी पूर्वीपासूनच प्रयोजन केलं जाईल यासाठी शैक्षणिक कार्यकाळातच सराव करण्याचा भाग समाविष्ट केला जाईल याचशिवाय इतर वैद्यकीय सेवा पुरवणारे घटक जसे डॉक्टर आणि परिचारिका यांच्यासोबत परस्परसंबंध साधून चर्चा सत्र आणि प्रभावी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भविष्यात ते एक फार्मसिस्ट म्हणून चांगल्याप्रकारे काम करू शकतील. तसेच इंडस्ट्रीमध्ये काम करताना समस्या येऊ नये म्हणून शैक्षणिक   अभ्यासक्रमादरम्यान इंडस्ट्रीमधील अनुभवी व तज्ञ व्यक्तीसोबत परस्परसंबंध साधून मार्गदर्शन केलं जाईल. या सर्व गोष्टींची अंमलबजावणी होण्यासाठी मी शैक्षणिक क्षेत्रात येऊन या क्षेत्रातील नियामक संस्थांशी परस्पर संवाद साधुन हे आमूलाग्र बदल होण्यासाठी प्रयत्न करेन
माझा नेहमीच विश्वास आहे की विस्तृत मन आणि विस्तृत कल्पना ज्या माझं ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक दिशा देतात. यश हे तेंव्हाच मिळत जेंव्हा योग्य प्रकारे नियोजन केल जात... माझ्या प्रिय फार्मसी प्रोफेशनला उज्वल भविष्य येण्यासाठी जे माझं मोठं ध्येय आहार त्यासाठी मी नक्कीच माझे निश्चयी आणि समर्पित प्रयत्न करीन.

आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे नवी मुंबई.
९७६५२६२९२६
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel