औषधकोश हे एक प्रमाणित पुस्तक आहे ज्यामध्ये औषध तसेच औषधी याविषयी सविस्तर माहिती दिलेली असते ज्यामध्ये त्या औषधांबद्दल त्याचे रासायनिक नाव,सूत्र, रासायनिक रचना, आकारमान, वस्तुमान, औषधाची मात्रा, वापर इत्यादीबद्दल सविस्तर माहिती दिलेली असते.
औषध बनवत असताना लागणारा फॉर्म्युला (सूत्र) ज्यात घटक व त्यांची मात्र याबद्दल माहिती असते याच्यासाठी औषधकोश वापरला जातो.
बऱ्याच देशांचे स्वतःचे औषधकोश असतात जसे की भारतीय औषधकोश (Indian Pharmacopoeia IP), Briti Pharmacopoeia BP, United State Pharmacopoeia USP, International Pharmacopoeia etc.
या औषधकोसशाची आवृत्ती ठराविक वर्षांनी बदल असते बऱ्याच ठिकाणी दर पाच ते दहा वर्षांत आवृत्ती बदलत असते शिवाय जसजसे नवनवी माहिती येते ती अद्यावत केली जाते. जर काही दुरुस्ती अथवा बदल असतील तर तेही वेळोवेळी केले जातात.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय भारत सरकार मधील भारतीय औषधकोश आयोग हा औषधकोश निर्मितीचे काम पहात असतो.
भारतीय औषधकोश बनवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया १९४४ पासून आर एन चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली ज्याचे काम १९४६ साली पूर्ण झाले. तत्पुर्वी १९४४ साली भारतीय औषधकोश सूची प्रकाशित केली ज्यामध्ये ब्रिटिश औषधकोशामध्ये समावेश नसलेली आणि समावेश असलेली भारतीय आयुर्वेदिक औषधे व इतर औषधे आशा पध्दतीने वर्गीकरण करून भारतीय औषधकोश औषधसूची प्रकाशित केली जी औषधकोश बनवण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी आणि एक महत्वपूर्ण पाऊल होत.
त्यांतर १९४४ साली पहिला औषधकोश प्रकाशित झाला यामध्ये समाविष्ट नसलेली औषधे समाविष्ट करण्यासाठी पुरवणी प्रकाशित केली गेली त्यानंतर आलेल्या आवृत्तींमध्ये नवनवीन बदल केले गेली त्यामध्ये काही औषधे समाविष्ट केली गेली व काही औषधे काढून टाकण्यात आली.आशा पध्दतीने भारतीय औषधकोशाची नवनवीन आवृत्ती आल्या.
भारतीय औषधकोश २०१८ (IP 2018) ही भारतीय औषधकोशाची नवीनतम आवृत्ती आहे.
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६