सेल्फ मेडिकेशन म्हणजे वैद्यकीय तपासणी व सल्ल्याशिवाय स्वतःहून औषधांचा वापर करणे होय.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली वाढ आणि सहजतेने उपलब्ध झालेले माहितीचे स्रोत यामुळे सेल्फ मेडिकेशन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.
सेल्फ मेडिकेशन चे काही फायदेदेखील आहेत
यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी होतो शिवाय डॉक्टरांची वाट पाहण्यामध्ये जाणारा वेळ वाचतो, काही काळापुरते त्रासापासून मुक्तता मिळते, अविकसित व विकसनशील देशातील लोकांची आर्थिक परिस्थिती तसेच विकसित देशातील महागड्या आरोग्यसेवा यामध्ये कुठेतरी सेल्फ मेडिकेशन लोकांना फायदेशीर ठरते,
परंतु यामध्ये आरोग्यासंदर्भात दुष्परिणाम संभावण्याचा व रुग्णाच्या जिवावर भेतण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्यतो सेल्फ मेडिकेशन टाळावे.
सेल्फ मेडिकेशनचा माहीत स्रोत हा इंटरनेट, यापूर्वी त्या औषधाचा वापर केलेले रुग्ण, जाहिराती, दूरदर्शनवरील व इतर प्रसार माध्यमातील विविध आरोग्यविषयक कार्यक्रम असतात.
बऱ्याचदा लक्षणे सारखी असली तरी आजार वेगळे आसू शकतात त्यामुळे सारख्या लक्षणांसाठी एकच औषध वापरणे टाळावे शिवाय रुगणाचे वय,लिंग, वजन यानुसार औषधाची मात्रा (डोस) बदलत असतो.
प्रथमोपचारामध्ये सेल्फ मेडिकेशन बऱ्यापैकी फायदेशीर ठरते ज्यामुळे पुढे जाऊन उद्धभवनाऱ्या समस्या काहीअंशी टाळल्या जातात.
सुरक्षित सेल्फ मेडिकेशनसाठी औषधे व आरोग्यसंदर्भात माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी शक्यतो स्वतःहून औषधांचा वापर करण्यापूर्वी फार्मासिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
सर्वसाधारणपणे Over The Counter Drugs (औषधयोजनेशिवाय घेता येणारी औषधे) यांचाच सेल्फ मेडिकेशन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो परंतु दुर्दैव बऱ्याच ठिकाणी जी औषधे फक्त औषधयोजना दाखवूनच खरेदी करता येतात अशी औषधे सुद्धा सहजतेने उपलब्ध होतात. त्यामुळे सेल्फ मेडिकेशनचा धोका संभावण्याची शक्यता असते.
सुरक्षित सेल्फ मेडिकेशन व सेल्फ मेडिकेशनमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी
वैद्यकीय सेवा पुरवणारे फार्मासिस्ट, डॉक्टर परिचारिका (नर्सेस) यांनी जनजागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे.
सेल्फ मेडिकेशन मध्ये फार्मासिस्टची भूमिका महत्वपूर्ण ठरते. फार्मासिस्ट हा औषधातील कार्यकारी तत्व, औषधाचा शरीरावर कसा परिणाम होतो, शरीरावर होणारे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकतात. सेल्फ मेडिकेशन मध्ये औषधेही थेट फार्मासिस्ट कडूनच खरेदी केली जात असल्यामुळे यामध्ये फार्मासिस्टचा भूमिका खूपच महत्वपूर्ण आहे त्यामुळे रुग्णांनी स्वतःहून औषधाचा वापर करण्यापूर्वी फार्मासिस्टचा सल्ल जरूर घ्यावा.
आणि शक्यतो सेल्फ मेडिकेशन टाळावे व औषधे ही डॉक्टरांकडून तपासणी करून डॉक्टर व फार्मासिस्ट यांच्या त्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत तसेच औषधाचा वापर केल्यानंतर होणाऱ्या समस्यांबाबत फार्मासिस्ट आणि डॉक्टरांशी संपर्क करावा...
जरी तुम्ही स्वतःहून कोणतेही औषध घेतले असेल आणि काही दुष्परिणाम जाणवू लागले असतील तर त्वरित त्या औषधाचा वापर थांबवून फार्मासिस्ट आणि डॉक्टरशी संपर्क साधावा...
We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे नवी मुंबई.
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com