*Rx*
*फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...* *भाग १३*
समाप्ती तिथी/तारीख (Expiry Date)
औषधावरील समाप्ती तारीख झाल्यानंतर औषध घ्यावे की नको किंवा समाप्ती तारखेनंतर औषध घेतल्यानंतर काय होत हा प्रश्न तुम्हाला कधी न कधी पडला असेलच. या लेखामध्ये आपण समाप्ती तारीख, ती कशी ठरवली जाते, तिच्यावर कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतो, समाप्ती तारखेनंतर औषध घेतल्यावर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो हे पाहणार आहोत.
औषध निर्मिती झाल्यापासून किती कालावधीपर्यंत ते योग्य परिणामकता दाखवते हे समाप्ती तारखेवरून समजते.
औषधाचा कार्यकाळ (Shelf life) हा औषध निर्मिती ते औषधाची पूर्ण परिणामकता या दरम्यानचा कालावधी असतो. औषधाचा प्रकार, औषध, औषध निर्मितीसाठी वापरलेली पद्धती, औषध भरण्यासाठी वापरलेले पत्र (container), औषध ठेवण्यासाठी वापरलेली पद्धत या सर्व गोष्टी औषधांच्या कार्यकाळावर परिणाम करतात.
काही औषधांचा कार्यकाळ हा १ ते २ महिन्यांचा असतो तर काही औषधांचा कार्यकाळ हा १ ते २ वर्षापर्यंत असू शकतो. तुम्हाला अस वाटत असेल पहिल्यांदा औषधाचा कार्यकाळ ठरवण्यासाठी तितक्या कालावधीपर्यंत थांबावं लागत असेल परंतु अस नाही औषध बांवळ्यांतर त्याच्यावर वेगवेगळ्या भौतिक आणि रासायनिक चाचण्या केल्या जातात ज्यावरून त्या औषधाचा कार्यकाळ ठरवला जातो
समाप्ती तरखेंतर औषध पुर्णपणे निकामी झालेले नसते परंतु त्याची परिणामकारकता कमी झालेली असते अशी औषधे घेतल्यास ती आपल्या शरीरामध्ये काही विषारी आणि घातक रासायनिक अभिक्रिया करू शकते ज्याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे समाप्ती तिथींनंतर औषध घेणे टाळावे. समाप्ती तिथीनंतर औषधांची योग्य विल्हेवाट लावावी. अशी औषधे लहान मुले व प्राण्यापासून दूर ठेवावीत.
समाप्ती तरखेंनंतर औषधात झालेले रासायनिक बदल हे नुसत्या डोळ्यांनी समजू शकत नाहीत परंतु औषधामध्ये झालेले काही भौतिक बदल हे आपल्याला निरीक्षणावरुन समजून येऊ शकतात. जसे की सस्पेनश मधील दोन थर (layer) वेगवेगळ्या होणे हा बदल आपल्याला फक्त डोळ्यांनी केलेल्या निरीक्षणावरून समजून येऊ शकतो मात्र दुसऱ्या बाजूला औषधात झालेल्या विषारी व घातक रासायनिक अभिक्रिया या आपल्याला फक्त डोळ्यांनी केलेल्या निरीक्षणावरून समजून येऊ शकत नाहीत. साठवणुकीसंदर्भात औषधावर दिलेल्या सूचनांचे (storage direction/condition) योग्य प्रकारे पालन केले नाही तर समाप्ती तिथीच्या आधीच औषधामध्ये रासायनिक व भौतिक बदल होऊन त्याची परिणामकारकता कमी होऊ शकते. म्हणून औषधांच्या वापराबाबत साठवणुकीबाबत दिलेल्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करावे.
समाप्ती तिथीनंतर औषध पूर्णपणे निकामी झालेले नसते त्यांची परिणामकता कमी झालेली असते परंतु अशा औषधांचा वापर केल्यास आपल्या शरीरात विषारी व घातक रासायनिक अभिक्रिया घडून त्याचा आपल्या शारीरिक यंत्रणेवर व आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकते. आशा औषधांचा वापर आपल्या जीवावर देखील बेतू शकतो त्यामुळे आपल्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने समाप्ती तिथीनंतर औषधांचा वावर करणे टाळावे.
*We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.*
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई)
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com