हॉस्पिटल फार्मसी हा रुग्णालयातील (हॉस्पिटलमधील) एक स्वतंत्र विभाग आहे जो रुग्णांना औषधांचे वितरण करतो.
रुग्णांना जास्तीत जास्त आरोग्यविषयक सेवा पुरवणे ,रुग्णांचा वेळ वाचवणे आपत्कालीन स्थितीत औषधे उपलब्ध करून देणे यामधून हॉस्पिटल फार्मसी या विभागाचा उदय झाला. हॉस्पिटल फार्मसीमध्ये दोन वेगवेगळे विभाग असतात एक बाह्य रुग्ण विभाग आणि दुसरा रुग्णालयाती रुग्णांना करीता असतो. हॉस्पिटल फार्मसीमधील फार्मासिस्टची संख्या ही रुग्णालयातील बेडच्या संख्येवरून ठरवली जाते साधारणपणे ५० बेडसाठी १ फार्मासिस्ट असा नियम आहे याशिवाय कामाचा ताण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या या गोष्टीही विचारात घेतल्या जातात.
हॉस्पिटल फार्मसी चे स्थान हे हॉस्पिटलमध्ये आशा ठिकाणी असते जेणेकरून रुग्णांना शोधण्यास अडथळा होऊ नये. बाह्य रुग्ण आणि रुग्णालयातील रुग्ण या दोन्हीसाठी स्वतंत्र व्यवस्था असते जेणेकरुन रुगणांची गैरसोय होऊ नये तसेच फार्मासिस्टवरतीही ताण येऊ नये हा उद्देश यामागे असतो. औषधनिर्मिती विभाग आणि औषध वितरण विभाग हे वेगवेगळ्या ठिकाणी अथवा एकाच ठिकाणी परंतु स्वतंत्र विभाग व्यवस्था असू शकतो. हॉस्पिटल फार्मसी ही सेंट्रल सप्लाय विभाग तसेच हॉस्पिटल मधील इतर विभाग यांना जोडलेला असतो तसेच वितरण विभाग आशा ठिकाणी असतो जेणेकरून परिचारिका (नर्स) तसेच इतर कर्मचारी सहजरित्या त्याठिकानी पोहचू शातील. हॉस्पिटल फार्मसीमध्ये बाह्य रुग्णांना प्रतीक्षा करण्यासाठी पुरेसा जागा असतो, ज्याठिकाणी रुग्णांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणारे फलक तसेच काही साहित्य उपलब्ध असते. हॉस्पिटल फार्मसी मध्ये फार्मसिस्ट व इतर कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी स्वतंत्र व्यवस्था असते.
हॉस्पिटल फार्मसीमध्ये औषध वितरणाची व्यवस्था ही वेगळी असते. रुग्णालयातील रुग्णांना औषध वितरण करण्यासाठी औषधयोजनेनुसार औषध वितरण केले जाते अथवा प्रत्येक वॉर्ड साठी परिचारिका केंद्रावर औषध पाठवली जातात ज्याठिकाणी परिचारिका औषधांची नोंद ठेवतात शिवाय फार्मसिस्ट वैयक्तिकरित्या दररोज औषधांची तपासणी करतात. रुग्णालयातील रुग्णांना औषध वितानांसाठी बास्केट सुविधा वापरली जाते. याशिवाय बाह्य रुग्णांना औषध वितरणासाठी स्वतंत्र औषधयोजना ही पद्धती वापरली जाते.
Pharmacy & Therapeutic Committee (PTC) मध्येही फार्मासिस्ट ची भूमिका महत्त्वाची असते. यामध्ये तो सचिवाची भूमिका पार पाडतो. हॉस्पिटल फॉर्म्युलरीच्या निर्मितीमध्येही त्याचे योगदान महत्वाचे असते. रुग्णालयतील औषधयोजनांचे तसेच इतर महत्वाची कागदपत्रे हॉस्पिटल फार्मासिस्ट जतन करून ठेवतो. त्याचबरोबरीने PTC सभांसाठी विषयपत्रिक तसेच अहवालही बनवण्याची जबाबदारी हॉस्पिटल फर्मासिस्टकडे असते.
याशिवाय परिचरिकांना वॉर्डमधील रुग्णांना औषध वितरण करणार तसेच औषध वापराबाबत समुपदेशन करण्याचे काम फार्मासिस्ट करत असतो. रुग्णांनाच्या औषधयोजनांचा अभ्यास करणे , औषधांचा रुग्णांच्या शतिरावर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेणे, रुग्ण इतिहासाची नोंद करणे, औषध संशोधन करणे समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम राभवने ही अत्यंत महत्त्वाची कार्ये हॉस्पिटल फार्मासिस्ट करत असतो.
We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे नवी मुंबई.
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com