रोजच्या वापरातील वस्तू आणि औषधांचे पॅकिंग यामध्ये खूप फरक आहे...
हा फरक पॅकींगच्या उद्देशापासून ते पॅकिंग साठी वापरल्या जाणाऱ्या वस्तुंपर्यंत दिसून येतो..
सर्वसामान्य वस्तूंच्या बाबती पॅकिंगची भूमिका ही केवळ सुरक्षा आणि माहिती इथपर्यंत मर्यादित असते मात्र औषधांच्या बाबतीत ही भूमिका व्यापक दिसून येते....औषधांचे पकिंग हा औषधांच्या निर्मितीमधील एक महत्वाचा टप्पा असतो.
बाहेरील वातावरणापासून जसे की तापमान,आर्द्रता, रासायनिक व भौतिक अभिक्रिया यांपासून औषधाची सुरक्षा करणे, रुग्णांना औषधांबाबत योग्य ती माहिती पुरवणे व औषधाला वापरण्यायोग्य स्थितीत ठेवणे आणि त्याला वापरायला सोयीचे करणे जसे की स्प्रे पावडर रोल ऑन ट्यूब इत्यादी याचशिवाय आपले औषध आकर्षक आसवे या दृष्टीने म्हणजेच सादरीकरणाच्या दृष्टिकोणातूनही हा मुद्दा महत्वाचा आहे तसेच रुग्णांवर औषधांच्या पॅकिंगचा मानसशास्त्रीय दृष्टिकोणातूनही परिणाम दिसून येतो जसे की लहान मुलांची औषधे ही विशिष्ट पॅक मध्ये असतात पॅकिंग वर वेगवेगळ्या फ्लेवरनुसार चित्रे रक्तवाढीची औषधे पॅक करण्यासाठी लाल रंगाचे पॅक या सगळ्याचा सकारात्मक परिणाम औषधाचा परिणाम व खप यावर दिसून येतो
आशा प्रकारची अनेक कामे पॅकिंग करते...
औषधांच्या पॅकिंगचे मुख्य तीन प्रकार आहेत
प्राथमिक पॅकिंग ज्यामध्ये औषध हे थेट पॅकच्या संपर्कात असते जसे की बॉटल,ट्यूब,गोळ्यांचे वेष्टण...
द्वितीय पॅकिंग यामध्ये पॅक हा औषधाच्या थेट संपर्कात नसून हे प्राथमिक पॅकच्या बाहेरून हे पॅक असते जसे की बॉक्स...
पॅकिंगवरील लेबलसाठी वापरला जाणारा कागद व टंकलेखनसाठी वापरली जाणारी शाई हा देखील पॅकिंगचाच भाग असतो....
तृतीय पॅकिंग यामध्ये खूप सारे नग एकत्र पॅक करण्यासाठी कार्डबॉर्डचे मोठमोठे बॉक्स वापरले जातात.
द्वितीय आणि तृतीय प्रकारातील पॅक हे मुख्यत्वेकरून वाहतुकीदरम्यान नुकसान न होऊ देने यासाठी उवयोगी ठरतात.
लेबल हा द्वितीय पॅकिंगचाच एक भाग आहे तर पॅकचे झाकण हे प्राथमिक पॅकचा भाग आहे...
औषधांच्या पॅकिंग साठी काच(ग्लास),प्लास्टिक,रबर,कागद (पेपर) यांचा वापर केला जातो.
यातील प्रत्येकाचे स्वतःचे असे फायदे आणि मर्याफ आहेत.
जसे की काच ही टिकाऊ,पारदर्शक पण वजनाने अवजड व तुटण्याची भीती यामुळे वाहतुकीत आणि हाताळण्यात अडचणी तर प्लास्टिक हे वजनाने हलके वापरण्यास सोयीस्कर मात्र तापमान वाढल्यावर मजबुती कमी होणे व पाण्याच्या वाफेला व काही रसायनांना पारदर्शक हे याचे तोटे आहेत....
पॅक करण्याचे औषध व त्याचा प्रकार यानुसार पकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि पॅकचा प्रकार बदलतो....
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६