मूळ नाहीं शेंडा । काय म्हणावें त्या गुंडा । वेद अनुवादती प्रचंडा । शास्त्रें भांडती खंड विखंडा ॥ १ ॥

नवल जहालें बाई । पाणियानें विस्तव पेटला कोणा सांगावें काई ॥ध्रु०॥

शून्य होतें आधीं तेथें जाहलें एक । एक पाहतां दोन जहाले अलक्ष लक्ष देख ॥ २ ॥

पुरुष नाहीं स्त्री नाहीं नाहीं कांहीं आकार । पहातां पाहाणें बुडोनि गेले तेथें कैंचा निराकार ॥ ३ ॥

ब्रह्मज्ञान घरोघरीं कोण तया पुसे । शरण एका जनार्दनीं नाम गातसे ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel