सांगते तुम्हा वेगळे निघा ।

वेगळे निघून संसार बघा ॥ १ ॥

संसार करता शिणले भारी ।

सासू सासरा घातला भरी ॥ २ ॥

संसार करिता शिणले बहु ।

दादल्या विकून आणले गहू ॥ ३ ॥

गव्हाचे दिवसे जेविली मावशी ।

मजला वेडी म्हणता कैसी ॥ ४ ॥

संसार करिता दगदगले मनी ।

नंदा विकिल्या चौघीजणी ॥ ५ ॥

एका जनार्दनी संसार केला ।

कामक्रोध देशोधडी गेला ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel