“An English official moves among the People (natives), isolated even when not unsympathetic, ignorant even when not uninquisitive, a syranger and a foreigner to the end of the chapter. Mr lord, I can therefore truly say, that it is I and my native colleagues who can claim to speak at first hand, and of our own personal and intuitive knowledge and experience of the feelings and thoughts of the Ryat, his prejudices, his habits of thought, his ways of life, his ambitions and his aspirations. In speaking on this bill, it is we who represent the real views of the agricultural masses, not the insular and issular and isolated English official.” पुष्कळ उत्तराउत्तरी झाल्यावर अखेर वर सांगितल्याप्रमाणे काही तेजस्वी लोकप्रतिनिधी उठून गेले. काही सभासद असे असतात की, कोणतेही बिल सरकारने पुढे आणले की, “theirs not to reason why, theirs but to vote and die” हाच त्यांचा मार्ग. परंतु काही मानधन असे असतात की त्यांस सरकारच्या, किंवा सरकारच्या प्रत्येक कृत्याचे समर्थन करण्याचे आजन्म व्रत उचललेल्या वर्तमानपत्रांच्या संपादकांच्या स्तुतीची किंवा निंदेची पर्वा नसते. मेथा प्रभृतींच्या कौन्सिलमधून उठून जाण्याच्या कृत्याबद्दल टाइम्सकारांनी 'नाटकी आविर्भाव' असे शब्द काढले. परंतु येथे नाटक नसून आतडे जळत आहे याची या परभृतांस कोठून कल्पना येणार? मायेवाचून रड नाही म्हणतात ते काही खोटे नव्हे. टाइम्सकारांना जी गोष्ट खेळ वाटते तीतच आमचे मरण होते. लोकप्रतिनिधींना जेथे बोलण्याची स्वतंत्रतासुध्दा मर्यादित असते. तेथे सभतून उठून जाण्यानेच त्यांस सरकारबद्दल तिरस्कार व स्वत:चा अभिमान दर्शवावयाचा असतो. टाइम्सकारांच्या थट्टेस कोण विचारतो? हा पहिलाच प्रसंग होता की ज्या वेळेस लोकप्रतिनिधी उठून गेले. त्यांच्या या बाणेदारपणाची देशात वाहवा झाली. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले. सरकारने मात्र लोकमताला सर्वस्वी धाब्यावर बसवून आपल्यास करावयाचे ते केले. सत्तेपुढे शहाणपणाचे काय होय?

हे १९०१ साल गोखल्यांच्या आयुष्यक्रमात फार महत्त्वाचे वर्ष होय. यावर्षी प्रकृती नीट नसल्यामुळे फेरोजशहा हे आपल्या जागेचा राजीनामा देणार होते. यामुळे वरिष्ठ कायदे कौन्सिलातील त्यांची जागा रिकामी होणार होती. १९०२ पर्यंत त्यांच्या जागेची या वर्षाची मुदत होती आणि या वर्षीची बैठक समाप्त झाल्यावर त्यांनी राजीनामा द्यावा असे पुष्कळांचे व गोपाळराव गोखल्यांचेही म्हणणे होते; परंतु मेथांस ते पटले नाही. कलकत्त्यास ४।१।१९०१ ला कौन्सिलची बैठक होती. तीस फेरोजशहांस हजर राहता आले नाही. परंतु त्यांनी हजर राहावे, असे गव्हर्नर जनरलचे आग्रहाचे म्हणणे होते. तेव्हा ९ तारखेस ते कलकत्त्यास गेले. प्रकृतीच्या अस्वास्थामुळे ही कामाची दगदग त्यांस झेपेना, तेव्हा ते जागेचा राजीनामा देऊन मोकळे झाले.

वरिष्ठ कौन्सिलातील मेथांची जागा भरून काढावयाची होती. मुंबई कौन्सिलच्या लोकनियुक्त सभासदांनी हा मनुष्य निवडावयाचा असे. गोखल्यांस वाटले की, आपण या जागेसाठी उभे राहावे आणि जर आपली नेमणूक हे प्रतिनिधी करितील तर आपण जास्त उपयुक्त कार्य करून दाखवू. वरिष्ठ कादे कौन्सिलात आपला शिरकाव व्हावा हा गोखल्यांची फार दिवसांची इच्छा. परंतु मेथांसारखा अनुभवी, धोरणी, धीरोदात्त आणि सरकारवर अचूक मारा करणारा वीर तेथे असता आपण त्या जागेसाठी उभे राहावे ही कल्पनाही त्यांच्या मनात नव्हती. कायदे कौन्सिलात जावयाचे म्हणजे आपली प्रतिष्ठा वाढावी, मानमरातब व्हावा, सरकारी मेजवान्यांस हजर राहता यावे असे गोपाळरावांस स्वप्नात वाटले नसेल. तेथे जावयाचे यासाठीच, की जरी सरकारपुढे 'अरण्यरूदन' असले तरी ते करून लोकांची गाऱ्हाणी वेशीवर टांगावयाची; सरकारला स्वकर्तव्याची जाणीव नीट शब्दांत करून द्यावयाची. सरकारच्या हातात सत्ता असली तरी, लोकपक्षीय प्रतिनिधीने सरकारचा अध:पात दाखविला म्हणजे उघडया माथ्याने तरी सरकारास मिरविता येणार नाही आणि त्याचे मन तरी त्यास खात राहील खास. हाही काही अगदीच टाकाऊ फायदा नव्हे. हे जबाबदारीचे काम मेथांनी आजपर्यंत उत्तम प्रकाराने पार पाडिले होते. त्यांची जागा आता भरून काढावयाची होती. गोखल्यांस वाटले की आपण या जागेसाठी उभे राहावे. मनांत खळबळ सुरू झाली आणि त्या भरात त्यांनी १५ जानेवारी १९०१ रोजी फेरोजशाहांस पत्र लिहिले. त्यात ते खालीलप्रमाणे लिहितात :-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel