धैर्याने ग्लॅडस्टन-बर्कची तत्त्वे येथील राज्यकारभारास लावण्यास मोर्ले कचरले. त्यांच्यावर सभोवारच्या प्रभावळीची छाया पडली. त्यांना शेजा-यांचा, सहका-यांचा गुण लागला. याबाबतीत टिळक हेच जास्त धोरणी, दूरदृष्टी ठरले. टिळकांस मनुष्यस्वभाव बरोबर माहीत. त्यांनी 'तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी' हा सुंदर लेख लिहून मोर्ले साहेबांविषयी अवास्तव कल्पना करण्यात हशील नाही, एखादा तुकडा फेकील तोंडावर- त्याचीही खात्री देववत नाही असे ते प्रतिपादिले तेच पुढे खरे ठरले.

नंतर सरतेशेवटी रानड्यांच्या रसाळ, सुंदर व स्फूर्तिदायक शब्दांनी त्यांनी समारोप केला; आणि कितीही बिकट परिस्थिती आली तरी निराश न होण्यास त्यांनी सांगितले. गोखल्यांचे भाषण फार जोरदार होते. त्यांचे आशापूर्ण उत्साही  मन त्यात दिसत होते. राजकारणात लागणारी अचूक दृष्टी त्यांस नसली तरी एकंदर परिस्थितीचे समालोचन त्यांनी चांगले केले. या भाषणावर टीका करिताना चिरोल साहेब लिहितात:-

'It must have been a proud moment for Mr. Tilak when the very man who had often fought so courageously against his inflamatory methods and reactionary tendencies in the Deccan, Mr. Gokhale, played into his  hands and from the presidential chair at Benares got up to commend the boycott as a political weapon used for a definite political purpose.'

परंतु गोखल्यांनी अध्यक्षपदावरून बहिष्कार न्याय्य आहे असे जे जाहीर केले ते का याची काहीशी कारणमीमांसा जी चिरोल साहेबांनी लाविली आहे ती पहा. ते म्हणतात :-

"Not even Mr. Gokhale with all his moral and intellectual  to force could stern the flowing tide of Tilak's popularity in the Deccan; and in order not to  be swept under, he was perhaps often compelled like many other Moderates to go further than his  own judgement could have approved.'' ही मीमांसा बरोबर आहे असे आम्हांस वाटत नाही. नवीन पक्षाच्या जोरकस प्रवाहात आपण नाहीसे होऊन जाऊ नये, या हेतूसाठी काही गोपाळरावांनी बहिष्काराचे समर्थन केले नाही. त्यांना खरोखरच बहिष्कार न्याय्य  वाटत होता. फक्त त्याचा उपयोग जेव्हा सर्व राष्ट्रास आग लागली असेल, आणि सर्वांचे ऐक्य असेल तेव्हाच व्हावा, नाही तर ते अस्त्र विफल ठरेल असे त्यांचे म्हणणे होते. असो. एकंदरीत बनारसची काँग्रेस आपल्या गोड व मृदु स्वभावाने गोखल्यांनी नीट पार पाडली हे त्यांस खरोखर भूषणावह झाले. अशा जोमाची व इतकी यशस्वी राष्ट्रीय सभा वीस वर्षांत झाली नव्हती. यंदाच्या काँग्रेसचा विशेष हा होता की, मुसलमानांच्या हिताविषयीही सभेने जागरुकता दर्शविली. हिंदुस्तानातून यात्रेकरिता बाहेर जाणा-या मुसलमानांवर क्वॉरटाइनचा त्रास- नसती पीडा लादली होती. ही पीडा, हे गा-हाणे दूर केले जावे अशा अर्थाचा ठराव पास करण्यात आला.

१९०५ च्या अखेरीस लॉर्ड मिंटो हे गव्हर्नर जनरल झाले होते. कर्झन व किचनेर यांचा झगडा होऊन, हा तेजस्वी व घमंडानंदन गव्हर्नर जनरल एकदाचा निघून गेला. सर्वांचा तळतळाट आपल्या डोक्याने त्याने घेतला होता. त्याच्यावर लोक दातओठ खात होते. त्यास शिव्याशाप देत होते. सर्वत्र असंतोषाच्या प्रचंड लाटा आदळत होत्या आणि सर्व देश हादरून गेला होता. हिंदुस्तानचा शनी कर्झन जरी निघून गेला तरी तेथील संताप थोडाच शमणार? आग लावणारा जरी गेला, तरी आग थोडीच विझणार? सर्प पळाला तरी त्याने मनमुराद विष हिंदुस्तानच्या हृदयात ओतलेच होते. सर्व देश दु:खावेगाने कण्हत होता. यामुळे नवीन गव्हर्नर जनरलने कसे धोरण ठेवावे याबद्दल गोपाळरावांनी त्यास कौन्सिलमध्ये सल्ला दिला. १९०६ मध्ये मिंटोच्या कारकीर्दीतील त्यांचे पहिले भाषण झाले. या व्याख्यानात सर्व प्रांतातील कर-जमिनीवरील कर जे होते त्यांची माहिती सांगून हे कर कमी करण्यात यावे, मिठावरील कर जास्त कमी व्हावा आणि जमिनीवरील आकारास काही तरी एक मर्यादा घालावी असे त्यांनी सांगितले. ईजिप्तमध्ये जशा शेतक-यांसाठी पतपेढ्या असतात, तशा, आपल्या देशात सरकारने स्थापन कराव्या; कालव्यांची सुधारणा करावी; पाटबंधारे जास्त वाढवावे; शेतीमध्ये सुधारणा घडवून आणाव्या; धंदेशिक्षण आणि औद्योगिक शिक्षण यावर पुष्कळ पैसा खर्च करून देशात या ज्ञानाची वाढ होईल असे करावे यासाठी अविरत प्रयत्न करणे सरकारचे कर्तव्य आहे; प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे; आरोग्याची सोय करणे, चांगल्या पाण्याचा पुरवठा होण्याची व्यवस्था करणे इत्यादी शेकडो बाबींत सरकारने सुधारणा करण्यासाठी झटून प्रजेचा दुवा घ्यावा; सरतेशेवटी गोखले म्हणतात, ''My Lord, the whole East  is to-day throbbing with a new impulse vibrating with a new passion-and it is not to be  expected that India alone should continue unaffected by changes that are in the very air around us.  We could not remain outside this influence even if we would. We would not so remain even if we could, I trust the Government will read aright the significance of the profound and far-reaching change which is taking place in the public opinion of the country. A volume of new feeling is gathering which requires to be treated with care. New generations are rising up whose notions of the character and ideals  of British rule are derived from their experience of the last few years, and  whose minds are not restrained by the thought of the great work which England has on the whole accomplished in the past in this land. I fully believe that it is in the power of the Government to give a turn to this feeling which will make it a source of strength and not of weakness to the Empire. One thing, however is clear. Such a result will not be achieved by any methods of repression. What the country needs at this moment above everything else is a Government, national in spirit even though it may be foreign in personnel- Government that will enable us to feel that our interests are the first consideration with it, and that our wishes and opinions are to it a matter of some account. My Lord, I have ventured to make these observations, because the present situation fills me with great anxiety. I can only raise  my humble voice by way of warning, by way of appeal: the rest lies on the knees of the gods.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel