'The breakup of the sentiment of obedience to authority which is so manifest in the Hindu Society and is exercising disintegrating influence upon it has not proceeded quite so far among the Mahomedans, and so they have among them a solidarity of thought and sentiments which the Hindus do not posses.  You will meet Hindus by the thousand who would not hesitate to express their revolt against, Hinduism; but not one in a thousand among the Mahomedans who would speak disrespectfully of Islam or its founder and apostles. The most enlightened Mahomedans have a respect for the authority of their traditions which the Hindus do not have for theirs; and this reverence to authority has enabled the Mahomedan minority less wealthy and educated than the Hindus, to accept the leadership of Mr. Syed Ahmed and to co-operate with him in founding a college the like of which neither the millionaires of Bombay nor the landed magnets of Bengal with the rhetorical flood of twenty two congress behind their back, have been able to  produce.' पुष्कळ वेळा अर्ध अनुकरण करणे हा वेडेपणा असला तरी आम्ही पुष्कळ तरुण अलीकडे जी शंकावृत्ती प्रदर्शित करिती ती खरी नसून, काही करावयाचे नाही ही जी भ्याडपणाची वृत्ती असते, तिचे समर्थन करण्यासाठी, मुद्दाम निर्माण केलेली असते. पटले म्हणजे तरी आपण आपल्या पुढा-यांच्या सांगण्याप्रमाणे वागले पाहिजे. पटून सुध्दा काही न करण्यासाठीच शंका दाखविण्याचे धोरण टाकून देण्याची व सहकार्य करण्याची वेळ आता आली आहे. गोपाळरावांनी हीच भक्ती आपले गुरू रानडे यांविषयी दाखविली. रानडे जे म्हणतील त्याच्या विरुध्द गोखले कधी जात नसत. आपणांपैकी बहुतेक सर्व चंचलमती असतात. राजवाडे म्हणतात : 'पांढरपेशांचा वर्ग फार फसव्या आहे. हे लोक बोलतात एक व करतात एक. ह्यांचे जे मत आज दिसते त्याप्रमाणेच ते उद्या चालतील असा नेम नाही. इंग्रजी शिक्षण वाईट म्हणणार हेच आणि सरकारी शाळेत आपली पोरे पाठविणारही हेच; देशी माल वापरा म्हणून सांगणार हेच आणि परदेशी माल त्याच घटकेस विकत घेणारही हेच; इंग्रजी नौकरीला गुलामगिरी म्हणणार हेच व ती दररोज व आजन्म करणारही हेच. असला हा लोचट वर्ग आहे.' राजवाडे यांचे हे यथार्थ म्हणणे जर आपण अजूनही खोटे करून दाखविणार नाही तर अद्यापिही आपणांस आशा नाही. या लोकांमुळे पुढारी मानल्या गेलेल्या माणसाला पाठिंबा मिळत नाही. कायदे- कौन्सिलमध्ये गोखले काही धमकी-वजा बोलले किंवा इंग्लंडमध्ये बोलले, तर आपल्या प्रतिनिधीचा शब्द यथार्थ करून दाखविणारी संस्था अगर व्यक्ती एक तरी सापडेल काय? म्हणूनच टाऊनशेडसारखे लोक म्हणतात, 'We shall never be anything but rulers.' अजून तरी ही चंचलवृत्ती, ही दास्यत्वाची खोड आपण टाकू दिली पाहिजे. पुढा-यांस फसविता कामा नये. त्यांचेच उदाहरण पुढे ठेवून त्यांच्या मागोमाग कामाचा गाढा ओढण्यास, शक्य ते सर्व प्रयत्न केले तरच आता तरणोपाय आहे.

गोखले आणि टिळक यांच्याकडे आपण गुणैक व ग्राह्यैक दृष्टीने पाहू. या दोघांसही एकमेकांची किंमत कळत होती. परंतु राजकारण म्हणजे असेच आहे की तेथे खटके व विरोध ही यावयाचीच. राजकारणात पन्नास साठ वर्षे घालविलेल्या व मुरलेल्या ग्लॅडस्टन या महामुत्सद्दयाने राजकारणामुळे कसे प्रसंग ओढवतात याचे फार उत्कृष्ट वर्णन केले आहे. तो म्हणतो :- 'The vicissitudes of politics, the changes of position, the changes of alliance, the sharp transitions from cooperation to antagonism, the inevitable contact with revolting, displays of self-seeking and self- love; more than all these, perhaps the constant habit of forecasting future and shaping all its contingencies beforehand, which is eminently the merit and intellectual virtue of the politician; all these tend to make him and commonly do make him suspicious even of his best friead. This suspicion may be found to exist in conjunction with regard with esteem, nay, with affection.' तेव्हा राजकारणात पडल्यामुळे जरी गोखले व टिळक यांमध्ये विरोध आला तरी परस्परांच्या मनात परस्परांविषयी खरा आदर असे. आगरकर म्हणत, 'माझ्याविषयी सर्वात जास्त प्रेमळपणे रडतील तर ते टिळकच.' टिळकांविषयी आगरकरांस जसे वाटे तसेच टिळकांस आगरकरांविषयी वाटे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel