५५. एकाच्या पापाचें फळ सर्व जातभाईंनां भोगावें लागतें.

(काकजातक नं. १४०)

एकदां बोधिसत्त्व कावळ्याच्या योनींत जन्मला होता व मोठ्या समुदायासहवर्तमान तो वाराणसीच्या जवळपास रहात होता. एके दिवशीं वाराणसी राजाचा पुरोहित नदीवरून स्नान करून येत होता. वाटेंत नगरद्वाराजवळ तोरणावर दोन कावळे बसले होते. त्यांतील एकजण दुसर्‍याला म्हणाला, ''हा पहा, दुष्ट ब्राह्मण उघड्या बोडक्यानीं येत आहे. मला वाटतें कीं, तो या तोरणाच्या खालीं आल्याबरोबर त्याच्या डोक्यावर देहधर्म करावा !''

दुसरा म्हणाला, ''बाबारे, असली भलतीच कुकल्पना करूं नकोस. हा ब्राह्मण सामान्य मनुष्य नसून राजाचा पुरोहित आहे. याचाशीं वैर संपादन करणें म्हणजे आपल्या हातानेंच आपला गळा कापून घेण्यासारखें आहे.''

पहिला कावळा म्हणाला, ''तुझे हे नुसते कुतर्क आहेत. राजाचा पुरोहित झाला काय किंवा त्याचा बाप झाला काय, आमच्यासारखा उडत्या पाखराचें तो काय करणार ? तुला जर भीति वाटत असेल तर तूं येथून खुशाल पळून जा ! पण मी याच्या गुळगुळीत डोळ्यावर देहधर्म केल्यावांचून येथून निघून जाणार नाहीं.''

त्या दुसर्‍या कावळ्यानें आपल्या मित्रास उपदेश करण्यांत तथ्य नाहीं असें जाणून तेथून पलायन केले; परंतु शिल्लक राहिलेल्यानें ब्राह्मण तोरणाखालीं आल्याबरोबर त्याच्या डोक्यावर देहधर्म केला ! डोक्यावर एकदम काय पडलें हें पाहण्यासाठीं ब्राह्मणानें वर मान केली. तों का का शब्द करीत वेडें वाकडें तोंड करून जणूं काय याची थट्टाच करीत आहे असा एक कावळा तोरणावर बसलेला याच्या पहाण्यांत आला. आपला अपमान कसाबसा गिळून डोकें धुवून तो आपल्या घरीं आला; परंतु कावळ्याविषयी त्याच्या मनांत अत्यंत द्वेषबुद्धि उद्भवली, व सर्व कावळ्यांचा सूड उगविण्याचा त्यानें निश्चय केला.

एके दिवशीं राजाची एक दासी तांदूळ सडण्याच्या कामांत गुंतली असतां थकून जाऊन तेथेंच झोपीं गेली. इतक्यांत एक एडका येऊन तांदुळ खाऊं लागला. जागी होऊन तिनें त्या एडक्याला घालवून दिलें; परंतु तो तांदुळाला इतका लंपट झाला होता कीं, तिची नजर चुकवून त्यानें तांदूळ खाण्याचा आपला क्रम सोडला नाहीं. दासीला त्याचा अत्यंत संताप आला. तिनें स्वयंपाकघरांतून एक जळकें कोलीत आणून एडक्याला न दिसेल अशा ठिकाणीं दडवून ठेविलें, व तो तांदुळ खाण्यास आल्याबरोबर त्याच्यावर प्रहार केला, जळके निखारे अंगावर पडून एडक्याच्या लोकरीनें पेट घेतला, आणि तो आपल्या रक्षणासाठीं इतस्ततः धावूं लागला. जवळच एक राजाच्या हत्तींची पागा होती. व तेथें एक मोठी गवताची गंजी होती. एडका आगीच्या त्रासानें त्या गंजीत शिरला; आणि त्यामुळें ती गंजी देखील पेटली. गंजीची आग पागेवर पडून पागेनें पेट घेतला. हत्तीच्या माहुतांनीं हत्तीचीं बंधनें तोडून त्यांना मोकळें केलें; तथापि कांहीं हत्तींना कातडी भाजल्यामुळें जखमा झाल्या. हें वर्तमान राजाला समजल्यावर राजानें जळलेल्या हत्तीस काय उपाय करावा असा आपल्या पुरोहितास प्रश्न विचारला. तेव्हां तो म्हणाला, ''महाराज, कावळ्याची वसा मिळाली असतां हत्तीच्या जखमा लवकर बर्‍या होतील.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel