११२. मोराला न पाहिल्यामुळें कावळ्याचा गौरव करण्यांत आला.
(बावेरूजातक नं. ३३९)
प्राचीन काळीं हिंदुस्थानांतील नावाडी लोक आपल्या जहाजांवर एक पाळींव कावळा ठेवीत असत. त्याला दिशाकाक असें म्हणत. जहाज कोणत्या दिशेकडे गेलें आणि जमीन किती दूर राहिली हें न समजून नावाडी घोटाळ्यांत पडले असतां या कावळ्याला सोडून देत असत. तो आकाशांत उंच जाऊन आसपास जमीन दिसली, तर ज्या दिशेला जमीन असेल त्या दिशेकडे प्रयाण करी. नावाडी त्या बाजूला जहाज हाकारून जमीन गांठीत असत. त्या वेळीं असा एक कावळा बरोबर घेऊन कांहीं नावाडी आपल्या जहाजांतून व्यापारासाठीं बावेरू नांवाच्या एका राष्ट्राला गेले. त्या राष्ट्रांत पक्षी मुळींच नव्हते. तेथील लोकांनीं या कावळ्याला पाहून त्याचें मोठें कौतुक केलें आणि ते नावाड्यांना म्हणाले, ''असा सुंदर पक्षी आम्ही कधीं पाहिला नाहीं. तुम्ही आमच्या देशांत व्यापार करण्यासाठीं आलां आहांत तेव्हां हा पक्षी आम्हांला नजराण्या दाखल द्या.''
पण नावाड्यांनीं तो मोठा उपयोगी आहे असें सांगून त्याला देण्याचें नाकारलें. शेवटीं त्याची किंमत वाढवत वाढवत त्या लोकांनीं शंभर कार्षापणापर्यंत नेली. तेव्हां स्वदेशी परत गेल्यावर वाटेल तेवढे कावळे मिळतील असा विचार करून नावाड्यांनीं शंभर कार्षापणांला तो कावळा बावेरूवासी लोकांना देऊन टाकला. त्यांनीं कावळ्यासाठीं एक मोठा सोन्याचा पिंजरा तयार करून त्यांत त्या कावळ्याला ठेवून त्याची फारच बडदास्त ठेविली. उत्तम अन्न त्याला देण्यांत येत असे, आणि केवळ त्याच्या दर्शनासाठीं दूरदूरचे लोक येत असत.
नावाड्यांनीं बावेरू राष्ट्रांत पक्षांची उणीव जाणून दुसर्या खेपेला एक उत्तम मोर बरोबर नेला. तो चिटकी वाजवल्याबरोबर नाचत असे, आणि मधूर शब्द काढीत असे. या पक्ष्याला पाहिल्याबरोबर बावेरूंतील श्रीमंत लोकांच्या त्यावर उड्या पडल्या. नावाड्यांनीं त्याची किंमत भलतीकडेच वाढवून एक हजार कार्षापण घेऊन त्याला देऊन टाकलें. हा सुशिक्षित मयूर सापडल्याबरोबर बाबेरूंतील लोकांनीं कावळ्याला सोन्याच्या पिंजर्यांतून हाकून लाविलें. आणि त्या दिवसापासून मोराची महती वाढविली. कावळा पिंजर्यातून मोकळा झाल्याबरोबर उकिरड्यावर जाऊन तेथील गलिच्छ पदार्थावर ताव मारूं लागला ! तेव्हां त्या लोकांना त्याची खरी किंमत समजून आली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.