या सजणाविण साजणी लागली झुरणी, मला करमेना । कधीं भेटसी साजणा मनमोहना ? ॥धृ०॥

बारा वर्षांची उमर, जानीचा भर, सुरत चांगली । या सजनानें मैत्रीनें प्रीत लाविली । काय सांगो चांगुलपण, गेलें लुबधुन, होत्यें धाकली । मायबापानें माजीच गोर गाइली । हळदिचा डाग लागला । भ्रतार लष्करा गेला । संगत्यांनीं फुसविला । माजी हेतु होइना त्याला । किती वाट पाहूं त्याची सख्या सजणाची, दृष्टी पडेना ॥१॥

मी संचीताची खोटी सुख ललाटीं नाहीं मजला । या जानीचा नवतीचा भर चालला । येती मदनाचीही लहरी पलंगावरी कैफ घेतला । कसें दुसमाना त्वां दु:ख दिलें मजला ? । जासुद धाडी तांतडी । कागदाची पाहतां घडी । जीव सोडुनी जातो कुडी । आकाशाची करवेल चौघडी । मेरुची बांधवेल पुडी । सुर्‍याची मोडवेल नरडी । या मनाची अनिवार वोढी, चालली घडी धीर आवरेना ॥२॥

नारीनें पत्रिका लिहून जासुद पाठविले लष्करा । गेली मंदिरीं दु:खें, नीद्रा आली तिला । आला सपनामधीं भ्रतार पलंगावरी कवटाळिला । बोले केसानें त्वां माजा गळा कापिला । सपनामधीं भोग दिला । तो गर्भ राहिला तीजला । नव महिने जाले त्याला । तिचे उदरीं बाळ जन्मला । विपरीत वाटे लोकांला । पाळण्यांत घालुनी बाळ हालवी नार गाते बहुगुणा ॥३॥

जासुद गेले लष्करा तिच्या भ्रतारा सांगे खबर । झाली खुशाली लष्कर फिरलें माधारं । घरा आला तिचा भ्रतार, भेटे सुंदरा, झाली दीलगीर । त्यानें बाळक पाहिलें पलंगावर । ‘कवणाचा पुत्र आणिला ?’ । नार बोले भ्रताराला । ‘तुम्ही सपनीं माझ्या आलां । सपनामधीं भोग दीला । तो गर्भ मला राहीला’ । विपरीत वाटलें त्याला । ही नार जात बेमान, पतीवाचुन बाळक होईना ॥४॥

तिनें बाळक धरिलें हातीं, घेउन गेली मग राजाकडे । त्या पंचाच्या मग बाळक ठेविलें पुढें । पंचांनी न्याय केला, बाळ पाहिलें, त्यासी नाहीं हाडें । हे रगताचें मांसाचें अवघे भांडें । हाड नाहीं त्या बाळाला । नाहीं गेली परद्वाराला । स्वपनाची अवस्ता हिजला । खोटें केलें भ्रताराला । दोघें पाठीवलीं घराला । जेथे पांचमुखीं परमेश्वर, तुटला घोर, लेश राहीना ॥५॥

हें रगतमास आईचें, हाड बापाचें, असें बोलती । शीव-शगतीला अंतर आहे किती बसलां सभा चातुर पाहा यामधीं खरें खोटें किती । बोले तुर्‍यानें कलगी धरिली हातीं । दोघांचे जाले येकचीत । सुखें गेली आपल्या माहालांत । छंद राजोरी नगरांत । शेखभाई करी कवीत । शेटी रुद्रापा बोलत । त्याला नागेश शरणागत । हे कलयुगीचें कवीत बोलिलों तरी तुम्ही ध्यानी आणा ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत