या तिघांत सीझर वयानें सर्वांत लहान पण सर्वांत समर्थ व साहसी होता.  लहानपणीं त्याला चांचेगिरी करणार्‍या लुटारूंनीं पळवून नेलें असतां तो मोठमोठ्यानें कविता म्हणून त्या चोरांना त्रास देई व थट्टेनें म्हणे, ''कोणीतरी खंडणी भरून मला सोडवील.  पण मुक्त होतांच मी सैन्य घेऊन परत येईन व तुम्हां सर्वांना क्रॉसवर चढवीन.'' त्यानें हा शब्द पाळला.

तो मागेंपुढें पाहणारा नव्हता, तेजस्वी व साहसी होता.  त्याचे देशबांधव त्याच्या कर्तृत्वानें चकित व भयभीत झाले.  या वेळीं तो फक्त वीस वर्षांचा होता ; पण मुख्य धर्माचार्याच्या जागेवर त्यानें सक्तिनें स्वत:ची निवडणूक करून घेतली, तेव्हां त्याच्या हेतूविषयीं प्रसिध्द वक्ता सिसरो याला व इतर पुष्कळांना शंका आली.  राजसत्ता हातीं घेण्याचा त्याचा विचार असावा असें त्यांना वाटलें.  सिसरो लिहितो. ''त्याचे केस अत्यंत व्यवस्थित रीतीनें विंचरलेले असतात.  एका बोटानें तो नेहमीं आपले केस नीट करीत असतो.  असल्या माणसाच्या डोक्यांत रोमन सरकार उलथवून टाकण्याचा विचार येईल अशी कल्पनाहि मी करूं शकत नाहीं.'' पण सीझरच्या मनांतले विचार आपणास नीट वाचतां आले नाहींत असें पुढें सिसरेला आढळून आलें.

सीझर केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा व राजसत्ता यांचाच नव्हे तर प्रेमाचाहि आचार्य होता.  रोममधील किती तरी तरुणींना त्यानें मोह पाडला होता.  आणि ही गोष्ट सर्वांना माहीत होती.  त्याला 'प्रत्येक स्त्रीचा नवरा' अशी पदवी मिळाली होती !  पण त्यानें स्वत:च्या पत्नीचा मात्र त्याग केला होता.  कारण, त्याच्याच एका मित्रानें तिच्याजवळ प्रेमयाचना करण्याचा लाळघोटेपणा चालविला होता.  आपली पत्नी आपल्या मित्राच्या प्रेमयाचनेला बळी पडली असें समजावयाला त्याला कांहींहि कारण मिळालें नव्हते, तरीहि त्यानें तिचा त्याग केला.  कारण, 'सीझरची पत्नी संशयातीतच असली पाहिजे' असें तो म्हणे.

कारकीर्दीच्या प्रारंभी त्याच्याजवळ पैसा नव्हता ; पण दुसर्‍यांचे पैसे घेऊन तो खूप उदारपणा दाखवी.  एकदां त्याला चाळीसपन्नास लाख रुपये कर्ज झालें.  क्रॅशसशी संधान बांधण्यांत हें कर्ज फेडून टाकण्याला त्यांचे पैसे मिळावे असा सीझरचा हेतु होता.

- ३ -

सीझर, पाँपे व क्रॅशस यांनीं आपआपल्या वर्चस्वाचीं तीन क्षेत्रें मुक्रर केलीं.  एकाद्या खुसखुशीत भाकरीप्रमाणें त्यांनीं जगाचे तीन तुकडे केले व सर्व जग आपसांत विभागून घेतलें.  सीझरनें स्पेनचा कबजा घेतला, क्रॅशसला आशियांत पाठविण्यांत आलें, पाँपे रोममध्येंच राहिला.  पुढें लवकरच एका लढाईत क्रॅशस ठार झाला तेव्हां एक ब्याद आपोआपच दूर झाली म्हणून सीझर व पाँपे यांना आनंद झाला.  कारण, आतां रोममधील प्रभुत्वासाठीं उघडपणें नीट लढतां आलें असतें ; तिसरा कोणी मध्यें पडण्याला उरला नव्हता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय