प्रकरण ९ वें
जग जिंकूनहि निर्वासितावस्थेंत मरणारा नेपोलियन
- १ -

अठरावें हें बंडखोरीचें शतक होतें. सर्वत्र राजांचीं फर्मानें व धर्मोपदशेकांचे हट्ट यांविरुध्द बंडें होत होतीं. राजा व धर्म दोहोंच्याहि कचाट्यांतून जनता मुक्त होऊं पाहत होती. सर्व जगभर क्रान्तिकारक विचारांची विद्युत्संचार करीत होती. व्हॉल्टेअर पॅरिसला शेवटची भेट द्यावयास आल्या वेळीं तेथील विज्ञानमन्दिरांत बेजामिन फ्रँफ्रँकलिन त्याला भेटला होता. दोघां बंडखोरांनीं परस्परांस मिठ्या मारून चुंबनें घेतलीं. भोंवतालचे लोक म्हणाले, ''सोलोन व सोफोक्लिस हेच जणूं परस्परांस आलिंगन देत आहेत ! किती सुंदर दृश्य हें !''

ज्यानें आकाश फाडून त्यांतून विद्युत् खालीं आणली होती,  जो राजांचे राजदंड ओढून घेणार होता, असा तो अमेरिकन छापखानेवाला, विज्ञानवेत्ता व स्वतंत्र-विचार-वादी बेंजामिन या वेळीं अमेरिकन क्रान्तीला सोळाव्या लुईची सहानुभूति मिळविण्यासाठीं आला होता. इंग्रजांच्या सत्तेवर आघात करण्यासाठीं फ्रेंच राजा सदैव टपलेला असे; त्यानें अमेरिकेशीं करार केला. वस्तुत: त्याला त्या बंडखोरांस मदत देण्याची मनापासून इच्छा नव्हती; पण नाखुषीनें का होईना, इंग्रजांची सत्ता नष्ट करण्यासाठीं म्हणून त्यानें मदत देण्याचें मान्य केलें. अमेरिकेंतील विचार फ्रान्समध्येंहि येणार हें त्याला समजत नव्हतें असें नाहीं. पेन, जेफरसन, फ्रँकलिन, वॉशिंग्टन वगैरे अमेरिकन क्रांतीचें पुढारी लुईच्या मतें धोकेबाज होते. ते सारे बंडखोर होते येवढेंच नव्हे, तर देववादी म्हणजे चर्च वगैरेंची जरूर न ठेवतां देवाला मानणारे होते. 'चर्चची अडगळ कशाला ?' असें ते म्हणत. नास्तिकतेकडे जाणाराच त्यांचाहि रस्ता होता. व्हॉल्टेअरच्या मतांप्रमाणेंच या अमेरिकन क्रांतिकारकांचीहि मतें राजांच्या दैवी हक्कांच्या तत्त्वावर उभारलेल्या सामाजिक रचनेचा पाया उखडून टाकूं पाहणारी होतीं. लुईनें अमेरिकनांशीं मैत्री जोडण्याचें कारण त्याचे अमेरिकनांवरील प्रेम नसून तो इंग्रजांचा द्वेष करीत असे हें होतें. त्यानें अमेरिकनांस पैसे दिले, फौजा दिल्या; पण अमेरिकेंतील क्रांतीची प्रगति मात्र तो सचिंत होऊन पाहत होता.

लुईला वाटत असलेली भीति खरी ठरली. १७८९ सालच्या वसंत ॠतूंत, अमेरिकेंत वॉशिंग्टनचें इनॉगरेशन होण्याच्या थोडेच दिवस आधीं लुईच्या स्वत:च्या देशांत क्रांतीचा वणवा पेटला. फ्रेंच राज्यक्रांति बरीचशी रशियन राज्यक्रांतीसारखीच होती. प्रथम मिरोबाच्या नेतृत्वाखालीं मध्यम वर्गानें रजाविरुध्द बंड केलें. रशियांत केनेन्स्कीच्या पक्षानें झारविरुध्द केलेल्या बंडासारखेंच हें बंड होतें. पण पुढें डान्टन, राब्सोरी, मरात, वगैरे जहाल पुढारी लेनिन, ट्रॉट्स्की, इ० रशियन क्रांतिकारकांप्रमाणें अधीर झाले. त्यांना मवाळ पुढार्‍यांचा मवाळपणा आवडेना; त्यांनीं त्यांना दूर करून सत्ता स्वत:च्या हातीं घेतली व राजाचा शिरच्छेद केला. सरदारांचे विशिष्ट हक्क त्यांनीं नष्ट केले, त्यांच्या पदव्या रद्द केल्या व अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याप्रमाणें मानवी हक्कांचा जाहीरनामा काढला. त्यांनीं चर्चची मालमत्ता जप्त केली व ती सरकारच्या हवालीं केली. ईश्वराच्या पूजेविरुध्द एक फतवा काढून ईश्वराच पूजेऐवजीं त्यांनीं 'बुध्दीची दैवी पूजा' सुरू केली. त्यांनीं बुध्दीला ईश्वराच्या सिंहासनावर बसविलें.

येथपर्यंत क्रांति बरीचशी रत्तच्हीनच झाली. पण १७९१ सालीं प्रशियाचा राजा व ऑस्ट्रियाचा सम्राट पिल्निट्झ येथें भेटले. फ्रेंच क्रांतीविरुध्द प्रतिक्रांति सुरू करण्यासाठीं ते जमले होते. हद्दपार केलेले फ्रेंच सरदार व इतर राजनिष्ठ लोक यांचें सैन्य त्यांनीं गोळा केलें व सर्व जगाच्या कल्याणासाठीं पुन: राजशाही सुरू झालीच पाहिजे, असें जाहीर केलें. या घोषणेमुळें फ्रेंच क्रान्तिकारकांच भावना पेटून उठल्या. ते जणूं चवताळले ! घरची राजशाहीची नांवनिशाणी नष्ट करावयाची येवढेंच नाहीं, तर सर्व युरोपमधली राजशाही नष्ट करून सार्‍या युरोपचेंच रिपब्लिक करावयाचें असें त्यांनीं ठरविलें. त्यांनीं तुरुंग फोडले व शेंकडों कैद्यांना ठार केलें. त्यांनीं सर्वत्र 'रेन ऑफ टेरर' सुरू केलें. त्यांनीं सुरू केलेला मरणमारणाचा कारभार अक्षम्य होता. युध्दाचा मार्ग आजपर्यंत कधींहि प्रगतीचा ठरला नाहीं. खुनाखुनी करून मिळविलेला कोणताहि विजय महत्त्वाचा नसतो. लाखोंच्या प्राणांचें मोल देण्याइतका मूल्यवान् विजय कोणताच नसतो. फ्रेंच क्रांतिकारकांनीं हिंसेचा अवलंब केला व शेवटीं अपरिहार्य तें झालेंच-जयाचें परिवर्तन पराजयांत झालें. पण फ्रेंच राज्यक्रांतींतील या दुर्दैवी घटनेला उगीच नांवें ठेवण्यांत अर्थ नाहीं. ही भीषण राजवट सुरू करणारे घाबरून गेले होते. त्यांचीं डोकीं ठिकाणावर नव्हती. त्यांनीं हें सर्व आत्मरक्षणासाठी केलें. नवीनच मिळालेल्या स्वातंत्र्यामुळें ते मस्त झाले होते. पण तें स्वातंत्र्य जाणार कीं काय, अशा भीतीनें ते वेड्यासारखे झाले. आपण काय करीत आहों हें त्यांना कळेना.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय