- ४ -

तो स्वत:ला दैवी समजे, अर्थात् परिणामत: दुसर्‍यांस तुच्छ मानी; तो स्वत:स अधिक चाहत असे, म्हणून दुसर्‍यांचा तिरस्कार करी. दुसर्‍यांचा तिरसकार ही आत्मस्तुतीची निषेधक बाजू होती. तो स्वत:च्या मोठेपणाचा पुजारी होता. स्वत:ला देव समजून तो आपला मानसन्मान करून घेई. प्राचीन जगज्जेत्या सम्राटांच्या पावलांवर पावलें टाकून जाण्यास तो उत्सुक होता. प्राचीन रोमन साम्राज्याचें पुररुज्जीवन करून पोप व आपण अशीं ईश्वराचीं दोन रूपें कल्पून आपण दोघांनीं राज्य करावें असें त्याचें स्वपन होतें. स्पेन व नेदर्लंड दोहोंविरुध्द त्यानें सारखेंच आक्रमक युध्द चालविलें होतें. चाळीस वर्षे चाललेल्या या युध्दानें त्यानें स्वत:साठीं वैभव मिळविलें, पण राष्ट्राला मात्र भिकारी केलें. फ्रान्सची विपन्नावस्था झाली.

प्रजेनें भावना पेटून लढण्यासाठीं उठावें म्हणून प्रचार करण्याला तो धर्मोपदेशक पाठवी. हे धर्मोपदेशक प्रवचनें देत व सांगत, ''राजांसाठीं मरणें हें शतकर्‍यांचें कर्तव्य यहोय, प्रजेचा हा धर्म होय.'' ऍबे थेसॉ नामक एक धर्मोपदेशक लिहितो, ''तरुणांना कांहीं तर करावयाला हवें असतें; म्हणून फ्रान्सला युध्दची जरुरी आहे.'' फ्रान्समधले तरुण मरण-मारणांहून अन्य कांहीं करूं इच्छीत असले तरी त्यांना तसें कोण करूं देणार ? बिशप बोसो याची घोषणा होती कीं, ''राजाला युध्द करावेंच लागले तर तें त्यानें पूर्ण शक्तीनें करावें, सारी शक्ति एकवटून करावें. ...... राजाचें वैभव व यश म्हणजेच देशाचें भूषण !''

पण या राजानें किंवा या ऍबट-बिशपांनीं शत्रूच्या गोळ्यांसमोर आपलीं शरीरें उभीं केल्याचा पुरावा मात्र आम्हांस तरी माहीत नाहीं. चौदावा लुई आपल्या देशांत तर आपला मोठेपणा वाढवीत होताच, तेथील कवी, लेखक, धर्मोपदेशक या सार्‍यांना तर त्यानें आपले भाट बनविले होतेच, पण इतर तटस्थ राष्ट्रांतील हुषार लेखकांनाहि लांच वगैरे देऊन त्यानें त्यांना स्वत:ची स्तुतिस्तोत्रें गावयास लावलें. ''चौदावा लुई हा अत्यंत थोर रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन राजा आहे, सर्व मोठ्या उत्सवप्रसंगीं त्याचें स्मरण करा, त्याचें भलें चिंता,'' असें इतर देशांतील लेखकहि सांगत. लुई लढाईवर विश्वास ठेवी, तितकाच लांचलुचपतीवरहि. तो इतर देश लढाईनें जिंकू पाही, तद्वतच पैशानेंहि; आणि त्याच्या या द्विविध प्रचारांपायीं शेतकर्‍यांना मात्र भिकारी व्हावें लागे.

लष्करी वैभवासाठीं हीं जीं पशुत्व, मूर्खत्व व कापट्य दाखविलीं जात, त्यांविरुध्द क्वचित् कोठें आवाज निघतच नसे असें नाहीं. १६७५ सालीं मार्चच्या पांचव्या तारखेस राजा व त्याचे सारे दरबारी बसले असतां पाद्री मास्कारॉन यानें सर्वांसमोर युध्दविरोधी प्रवचन दिले. तो म्हणाला, ''एकादा सामान्य चोर एकटा करतो तीच गोष्ट एकादा मोठा योध्द सैन घेऊन करतो ! चोराहून वेगळें त्याच्यामध्यें काय आहे ? एक लहान चोर, दुसरा मोठा चोर !''

पण तेवीसशें वर्षांपूर्वी जेरुसलेमच्या राजानें जेरिमियाच्या असल्याच शब्दांकडे दुर्लक्ष केलें, तसेंच चौदाव्या लुईनेंहि या शब्दांकडे दुर्लक्ष केलं. लढवय्ये वीर अजून शान्तिदूतांची भाषा ऐकण्यास उत्सुक नव्हते. चौदाव्या लुईनें १७०७ पर्यंत आपलीं विजययुध्दें चालविलीं होतीं. त्यानें थोडासा नवीन प्रदेश मिळविला, पण त्यासाठीं स्वत:चे लाखों लोक बळी दिले !

चौदावा लुई मोठा श्रध्दाळू कॅथॉलिक हाता. तो प्रॉटेस्टंटांना छळी. त्यानें कितीकांना हद्दपार केलें. दरसाल गुडफ्रायडेच्या दिवशीं बारा दरिद्री लोकांना बोलावून तो त्यांचे चरण प्रक्षाली व मग वर्षाचें उरलेले ३६४ दिवस तो त्यांना उपाशी मरूं देई.

बाहत्तर वर्षे राज्य करून लुई १ सपटेंबर १७१५ रोजीं मेला. क्षुद्र व साध्या गोष्टींतहि कृत्रिमतेनें कसें वागावें हें त्यानें दरबारी लोकांस शिकविलें होते. त्यानें दरबारी लोकांत कृत्रिमतेची कलावृत्ति निर्मिली, तर प्रजेंत अनियंत्रित राज्यसत्तेविरुध्द चीड उत्पन्न केली. तिचेंच पुढें पाऊणशें वर्षांच्या अल्पावधींत फ्रेंच राज्यक्रान्तीमध्यें पर्यवसान झालें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय