पाली भाषेत :-

२९ उसभोरिव छेत्व२ (२ म.-छेत्वा.) बंधनानि (इति भगवा)
नागो पूतिलतं व दालयित्वा३(३ सी.-दाळ, म.-पदालयित्वा.)
नाहं पुन उपेस्सं४ (४ म.-उपेय्यं.) गब्भसेय्यं
अथ चे पत्थयसी पवस्स देव।।१२।।

३० निन्नं च थलं च पूरयन्तो महामेघो पावस्सि तावदेव।
सुत्वा देवस्स वस्सतो इममत्थं धनियो अभासथ।।१३।।

मराठीत अनुवाद “
-

२९. “ऋषभाप्रमाणें (प्रमुख बैलाप्रमाणें) मीं बन्धनें तोंडलीं आहेत”-असें भगवान् म्हणाला,-“हत्तीनें जशी गुळवेल तोडावी, तद्वत् मीं त्यांचा उच्छेद केला आहे. आतां मी पुनरपि गर्भवासाला जाणार नाहीं, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (१२)

३०. असें भगवान् म्हणत आहे तोंच जळस्थळ महामेघानें भरून टाकलें. पाऊस पडूं लागल्याचा आवाज ऐकून धनिय येणें-प्रमाणें बोलता झाला-(१३)

पाली भाषेत :-

३१ लाभा वत नो अनप्पका ये मयं भगवन्तं अद्दसाम।
सरणं तमुपेम चक्खुम सत्था नो होहि तुवं महामुनि।।१४।।

३२ गोपी च अहं अस्सवा ब्रह्मचरियं सुगते चरामसे१ (१ अ.-चरेमसे इति पि पाठं विकप्पेन्ति।)
जातिमरणस्स२ (२ म.-जातिजरामरणस्स.) पारगा३ (३ म.-गू.) दुक्खस्सऽन्तकरा भवामसे।।१५।।

३३ नन्दति पुत्तेहि पुत्तिमा (इति मारो पापिमा)
गोमिको४ (४ म.-गोपियो, अ.-गोमियो.) गोहि तथेव नन्दति।
उपधी हि नरस्स नन्दना
न हि सो नन्दति यो निरूपधि।।१६।।

मराठीत अनुवाद :-३१. “खरोखर आम्ही धन्य आहोंत; कां कीं, भगवन्ताचें आम्हांस दर्शन घडलें। हे चक्षुष्मन्, तुला आम्ही शरण जातों. हे महामुने, तूं आमचा शास्ता हो. (१४)

३२. “मी आणि माझी आज्ञाधारक गोपी सुगताच्या आश्रयाखालीं ब्रह्मचर्य पालन करूं आणि जन्ममरणाच्या पार जाऊन दु:खाचा अन्त करूं.” (१५)

३३. “पुत्रवन्ताला पुत्रांमुळें आनंद होतो.” असें पापी मार म्हणाला, “त्याचप्रमाणें गाईच्या मालकाला गाईमुळें आनंद होतो; कारण उपाधि मनुष्याला आनंद देते व उपाधिरहित माणसाला आनंद मिळत नाहीं.” (१६)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel