पाली भाषेतः-

५४५ तुवं बुद्धो तुवं सत्था तुवं माराभिभू१ मुनि। (१-म.-मायाभिभू.)
तुवं अनुसये छेत्वा तिण्णो तारेसि मं पजं।।३६।।

५४६ उप२धी(२-सी., म.-उपधि.) ते समतिक्कन्ता आसवा ते पदालिता।
सीहोऽसि अनुपादानो पहीनभयभेरवो।।३७।।

५४७ पुण्डरीक यथा वग्गु तोये न उपलिप्प३ति।(३-म.-उपलिम्पति.)
एवं पुञ्ञे च पापे च उभये त्वं न लिप्प४सि।(४-म.-लिम्पसि.)

पादे वीर पसारेहि सभियो वन्दति सत्थुनो ति।।३८।।

अथ खो समियो परिब्बाजको भगवतो पादेसु सिरसा निपतित्वा भगवन्तं एतदवोच-अभिक्कन्तं भो गोतम...पे....धम्मं च भिक्खुसंघं च, लभेय्याहं भन्ते भगवतो सन्तिके पब्बज्जं, लभेय्यं उपसंपदं ति। यो खो सभिय अञ्ञतित्थियपुब्बो इमस्मिं धम्मविनये आकखति पब्बज्जं, आकंखति उपसंपदं, सो चत्तरो मासे परिवसति, चतुन्नं मासानं अच्चयेन आरद्धचित्ता भिक्खू पब्बाजेन्ति, उपसंपादेन्ति भिक्खुभावाय। अपि च१(१-सी.-चेत्थ.) मे त्थ पुग्गलवेमत्तता विदिता ति। सचे भन्ते अञ्ञतित्थियपुब्बा, इमस्मिं धम्मविनये आकंखन्ता पब्बज्जं आकंखन्ता उपसंपदं, चत्तारो मासे परिवसन्ति, चतुन्नं मासानं अच्चयेन आरद्धचित्ता भिक्खु पब्बाजेन्ति, उपसंपादेन्ति भिक्खुभावाय, अहं चत्तारि वस्सानि परिवसिस्सामि, चतुन्नं वस्सानं अच्चयेन आरद्धचित्ता भिक्खू पब्बाजेन्तु, उपसंपादेन्तु भिक्खुभावाया ति। अलत्थ खो सभियो परिब्बाजको भगवतो सन्तिके पब्बज्जं अलत्थ उपसंपदं...पे...अञ्ञतरो खो पनायस्मा सभियो अरहतं अहोसी ति।

सभियसुत्तं निट्ठितं।


मराठी अनुवादः-

५४५. तूं बुद्ध, तूं शास्ता, तूं माराचा पराभव करणारा मुनि, तूं अनुशय तोडून तरून गेलेला या लोकांना तारीत आहेस.(३६)

५४६. तूं उपाधि मागें टाकली आहेस. तूं आश्रव तोडले आहेस. तूं उपादानविरहित, भयभैरवविहीन सिंह आहेस.(३७)

५४७. सुन्दर पुण्डरीक (कमल) जसें पाण्यांत बद्ध होत नाहीं, तसा तूं पुण्य आणि पाप या दोहोंत बद्ध होत नाहींस! हे वीरा, पाय पुढें कर. हा सभिय तुला शास्त्याला वन्दन करतो.(३८)

त्यावर सभिय परिव्राजक भगवंताच्या पायांवर डोकें ठेऊन भगवंताला म्हणाला-धन्य! धन्य भो गोतम....इत्यादि.....भिक्षुसंघाला शरण जातों. मला भगवन्तापाशीं प्रव्रज्या मिळावी व उपसंपदा मिळावी. “हे सभिया, जो दुसर्‍या पंथांतील परिव्राजक या धर्मविनयांत प्रव्रज्या व उपसंपदा घेऊं इच्छितो, तो चार महिने उमेदवारी करतो. चार महिने होऊन त्याच्या आचरणानें भिक्षूंचें समाधान झालें असतां, ते त्याला प्रव्रज्या देतात व भिक्षु होण्यासाठी उपसंपदा देतात. परन्तु विशिष्ट व्यक्तीबद्दल विशिष्ट धोरण ठेवणें बरें हें मी जाणतों.” “भदन्त, जर आपल्या धर्मविनयांत प्रव्रज्या व उपसंपदा घेऊं इच्छिणारे अन्य पंथांतील प्ररिव्राजक चार महिने उमेदवारी करतात, व चार महिन्यांनंतर भिक्षूंचें समाधान झालें असतां ते त्यांना प्रव्रज्या देतात, व भिक्षु होण्यासाठीं उपसंपदा देतात, तर मी चार वर्षे उमेदवारी करतों, चार वर्षांनंतर भिक्षूंचे समाधान झालें असतां, ते मला प्रव्रज्या देवोत व भिक्षु होण्यासाठीं उपसंपदा देवोत.” सभिय परिव्राजकाला भगवन्तापाशीं प्रव्रज्या मिळाली, उपसंपदा मिळाली...इत्यादि. आयुष्मान् सभिय अरहन्तांपैकी एक झाला.

सभियसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel